प्रवेशाच्या वेळचे वय
- Question
- प्रवेशाच्या वेळचे वय
- Answer
-
किमान
- 18 वर्षे
कमाल
- 50 वर्षे
तुमच्यासाठी योग्य वेळ आम्हाला सांगा.
लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा
तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.
पुरुष
महिला
इतर
तुमचे तपशील प्रविष्ट केल्याबद्दल धन्यवाद
तुमच्या मौल्यवान अभिप्रायांमुळे आम्हाला आमची सेवा सुधारण्यात आणि आणखी कार्यक्षम बनवण्यात महत्वाची भूमिका बजावते.
किमान
कमाल
कमाल
किमान
कमाल
प्रति सभासद 2 लाख फिक्स कव्हर विकल्प
a) जून, जुलै आणि ऑगस्टमधल्या प्रवेशासाठी-436 /- रु.चा फुल वार्षिक प्रीमियम देय होतो
b) सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमधल्या प्रवेशासाठी- 342 /- रु. प्रो राटा प्रीमियम देय होतो.
c)डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी-228 /- रु. प्रो राटा प्रीमियम देय होतो.
d) मार्च, एप्रिल आणि मेमधल्या प्रवेशासाठी-114 /- रु. प्रो राटा प्रीमियम देय होतो.
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
विनासायास नोंदणी प्रक्रिया
माझ्यासाठी नोंदणीपासून सर्व वैद्यकीय तपासण्यांपर्यंत, इंडियाफर्स्ट लाईफ ने सर्व काही सुकर केले. मी घेतलेल्या प्लॅनची वैशिष्ट्ये माझ्या अपेक्षांप्रमाणे आहेत, जी मला भविष्याबद्दल मनःशांती देतात.
मोहित अगरवाल
(मुंबई, 21 मार्च 2024)
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
ऑनलाईन खरेदीचा सुखद अनुभव
इंडियाफर्स्ट लाईफकडून लाईफ इन्शुरन्स पॉलिसी विकत घेणे हा माझ्यासाठी सुखद अनुभव होता. कंपनीच्या प्रतिनिधींसोबत विनासायास संवाद हा वरदानासारखा होता आणि त्याचप्रमाणे अति आवश्यक वैशिष्ट्यांना प्लॅनमध्ये घेणेही.
सत्यम नागवेकर
(मुंबई, 22 मार्च 2024)
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
माझ्या आर्थिक प्रवासातील विश्वासू सहकारी
इंडियाफर्स्ट लाईफ रेडियंट स्मार्ट इन्व्हेस्ट प्लॅन ने मला जिंकून घेतले! आर्थिक प्रवासात विश्वासू सहकारी असल्यासारखे आहे. त्याच्या फंड स्विचच्या फ्लेक्झिबल पर्यायांमुळे, मी जसा विचार केला होता त्याप्रमाणे माझ्या गुंतवणुकी करू शकतो. माझ्या गुंतवणुकीवर 20% चे घसघशीत परतावे मिळाले आहेत! नोंदणी टीम कडून मिळालेला आधार खूपच सुंदर होता, ज्यामुळे माझी खरोखरच काळजी घेत असल्याचे आणि आधार दिल्याचे जाणवले.
पौलोमी बॅनर्जी
(कोलकाता, 21 मार्च 2024)
प्रक्रिया
18 ते 50 वर्षे वयोगटातील सर्व बचत खातेधारक, कोणत्याही सहभागी बॅंका/ पोस्ट ऑफिसातील प्रथम वेळच्या प्रवेशाच्या वेळी सहभागी होण्यास पात्र असतील. एका व्यक्तीने एका किंवा वेगवेगळ्या बॅंकांमध्ये/ पोस्ट ऑफिसमध्ये अनेक बचत खाती असण्याच्या स्थितीत, व्यक्तीला एका बचत बॅंक खात्याच्या मार्फत या योजनेमध्ये सहभागी होण्याची पात्रता आहे. बॅंक खात्यासाठी आधार प्राथमिक केवायसी दस्तऐवज असेल. रुची असलेले सभासद मास्टर पॉलिसीधारकाकडे उपलब्ध असलेल्या सभासद फॉर्मला भरुन सहभाग घेऊ शकतात. सभासद मास्टर पॉलिसीधारकाकडे उपलब्ध असलेल्या सभासद फॉर्मला भरुन सहभाग घेऊ शकतात. कव्हर एक वर्षाच्या कालावधीसाठी हा कालावधी 1 जून ते 31 मेपर्यंत असून, त्यासाठी नियुक्त केलेल्या बचत बॅंक/ पॉस्ट ऑफिस खात्यामधून ऑटो-डेबिटने सहभागी होण्याचा/ पेमेंट करण्याचा विकल्प आहे. यासाठी नमुद केलेला फॉर्म दर वर्षी 31 मेला देणे आवश्यक आहे, यासाठी वर सांगितलेले सुरुवातीचे वर्षे अपवाद असेल. शासकीय योजना नियम आणि/ किंवा शासकीय सूचना ज्या वेळोवेळी संभाव्य कव्हरसाठी दिल्या जातात त्यानुसार उशीरा प्रवेशासाठी प्रीमियम पेमेंट शक्य असू शकते, ज्यासाठी रिस्कचा आरंभ प्रीमियमच्या ऑटो डेबिट होण्याच्या दिनांकापासून असेल, सोबत चांगल्या आरोग्याचे स्वयं-प्रमाणपत्र, असल्यास प्रस्तुत करावे लागेल.
प्रथमत: प्रवेश घेणा-या सबस्क्रायबर्ससाठी योजनेमध्ये योजनेमध्ये प्रवेश घेण्याच्या दिनांकापासून (लीन पिरिएड) पहिल्या 30 दिवसांच्या आत (अपघाताव्यतिरिक्त इतर प्रकारे) मृत्यूसाठी इन्श्युरन्स कव्हर उपलब्ध असणार नाही त्याचप्रमाणे लीन पिरिएडच्या दरम्यान(अपघाताव्यतिरिक्त इतर प्रकारे) मृत्यूसाठी कोणताही दावा ग्राह्य नसेल.
कोणत्याही वेळी योजनेमधून निर्गमन झालेली व्यक्ती भविष्यातल्या वर्षांमध्ये योजनेच्या नियमांनुसार आणि/किंवा वेळोवेळी दिल्या जाणा-या शासकीय सूचनेनुसार चांगल्या आरोग्याचे जाहिरीकरण असल्यास प्रस्तुत करुन योजनेत पुन्हा प्रवेश करु शकते.
लीन पिरिएड दरम्यान इन्श्युरन्स लाभांपासून विलगीकरण अशा सबस्क्रायबर्ससाठी देखील लागू होते, जे पहिल्या वर्षादरम्यान किंवा नंतर योजनेतून बाहेर पडले आहेत आणि कोणत्याही दिनांकाला पुन्हा दाखल झाले आहेत. भविष्यातल्या वर्षांमध्ये, पात्र श्रेणीत नवीन प्रवेश घेतलेल्या व्यक्ती किंवा वर्तमान स्थितीत पात्र असलेल्या परंतु आधी प्रवेश न घेतलेल्या किंवा आपल्या सबस्क्रिप्शनला मध्येच सोडलेल्या व्यक्ती योजना निरंतर असताना सहभाग घेऊ शकतील, हा सहभाग 30 दिवसांच्या लीन पिरिएडच्या आणि
योजनेच्या नियमांनुसार आणि/किंवा विमा प्रदात्याच्या आदेशानुसार वेळोवेळी दिल्या जाणा-या शासकीय सूचनेनुसार चांगल्या आरोग्याचे जाहिरीकरण असल्यास प्रस्तुत करण्याचा अधीन आहे.
प्रीमियम पेमेंट | इन्श्युरन्स कव्हर | उदाहरण |
---|---|---|
तुम्ही मास्टर पॉलिसीधारक कंपनीला प्रीमियम भराल. हा तुमच्या सभासदांकडून संकलित केला जाईल. | एकदा सुरुवात झाल्यास प्रीमिअम मिळवला जाईल आणि सर्व अंडररिटन निकष असल्यास पूर्ण केले जातील. | मास्टर पॉलिसीधारक: बॅंक सहभागी: बचत खाते ग्राहक प्रीमियम: बॅंकेद्वारे सभासदाच्या परवानगीने त्याच्या बचत खात्यामधून थेट वजा करुन भरला जाईल. |
सध्या तुम्ही खाली दिलेल्या कर लाभांसाठी पात्र आहात. हे वेळोवेळी शासकीय कर अधिनियमांमध्ये होणा-या बदलाच्या अधीन आहे. परंतु तुम्हाला तुमच्या कर सल्लागाराचा सल्ला घेण्याची शिफारस केली जाते.
भरलेल्या प्रीमियमवर कोणकोणते कर लाभ आहेत?
लागू असलेल्या कर अधिनियमांनुसार प्लानच्या अंतर्गत प्रीमियम भरणा-या व्यक्तीवर अवलंबून कर सवलतीसाठी भरलेला प्रीमियम पात्र असेल.
प्रीमियम भरणारी व्यक्ती |
---|
सभासद |
तुम्ही, मास्टर पॉलिसीधारक प्रीमियम भरता परंतु त्याला सभासदांकडून वसूल करता. तुम्हाला, मास्टर पॉलिसीधारकाला कोणत्याही वजावटी लागू होत नाहीत. परंतु तुमचे सभासद आयकर अधिनियम 1961च्या कलम 80C अंतर्गत वजावटींचा दावा करु शकता. |
मृत्यू पश्चातचे लाभ कर मुक्त आहेत का?
हो, मृत्यू पश्चातचे लाभ देखील वेळोवेळी बदलाच्या अधीन असलेल्या आयकर अधिनियम 1961च्या कलम 10(10) D अंतर्गत कर मुक्त आहेत.
इंडियाफर्स्ट लाईफ प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना प्लान ऑन पार्टिसिपेटिंग, नॉनलिंक्ड, वार्षिक तत्वावर रिन्यु करता येणारा ग्रुप प्रोटेक्शन प्लान आहे जो बॅंका/ पोस्ट ऑफिस ग्राहकांच्या समुहाला देण्यात येतो. या ग्राहकांची बचत बॅंक खाती असतात.
या पॉलिसीमध्ये मास्टर पॉलिसीधारक आणि सहभागी समाविष्ट असतात.
2a. मास्टर पॉलिसीधारक कोण असतो?
मास्टर पॉलिसीधारक तुम्ही आहात, बॅंक किंवा वित्त संस्था किंवा पोस्ट ऑफिस जे ही पॉलिसी आपल्या सभासदांना/ ग्राहकांना ऑफर करतात, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे कोणत्याही आपत्तींपासून रक्षण होते. मास्टर पॉलिसीधारक पॉलिसी घेतो आणि तिचे संचालन करतो. परंतु व्यक्ती इंडियाफर्स्ट लाईफ इन्श्युरन्स कंपनीकडे या पॉलिसीत सहभाग घेण्यासाठी संपर्क करु शकतात.
2b. सभासद कोण असतो?
Tसभासद प्रथमत: कव्हरसाठी निवेदन करतेवेळी, 18 ते 50 वयोगटातील बचत खाते असलेली कोणतीही व्यक्ती असू शकते. सभासद या पॉलिसीच्या अंतर्गत जीवन आश्वस्त असतो. सहभाग्याच्या जीवनावर लाभ देय असतात.
सभासदाच्या या वयोमर्यादा आहेत-
प्रवेशाच्या वेळचे कमाल वय | प्रवेशाच्या वेळचे कमाल वय | परिपक्वतेच्या वेळचे कमाल वय |
---|---|---|
मागच्या वाढदिवसाला 18 वर्षे | ( नजीकच्या वाढदिवसाला ) 50 वर्षे | 5( नजीकच्या वाढदिवसाला ) 55 वर्षे |
तुम्ही कोणत्याही अटी व शर्तींशी असहमत असण्याच्या स्थितीत तुम्ही दूरवर्ती मार्केटिंग किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यम वगळता सर्व चॅनल्ससाठी पहिल्या 15 दिवसांमध्ये (फ्री लुक कालावधी) प्लान परत करु शकता. तुम्हाला प्लानचे मूळ दस्तऐवज आणि रद्दीकरणाची कारणे सांगणारे लेखी निवेदन आम्हाला द्यावे लागेल. आम्ही स्टॅंप ड्यूटी, प्रो राटा रिस्क प्रीमियम आणि कंपनीने वैद्यकीय चाचणीवर खर्च केला असल्यास त्याला वजा करुन तुमचे योगदान परत करु.
सभासदांना पॉलिसी वर्षात कधीही सहभागी होण्याची परवानगी आहे आणि प्रो राटा प्रीमियम भरल्यानुसार पॉलिसीच्या अंतर्गत सभासदाच्या प्रवेशाच्या दिनांकापासून त्याच्यासाठी कव्हरेज असेल.
ग्रुपची किमान साइझ | ग्रुपची कमाल साइझ |
---|---|
50 members | अमर्याद |
इंडियाफर्स्ट लाईफ प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजनेच्या अंतर्गत कोणताही परिपक्वता किंवा सर्व्हायवल लाभ देय नसतो.
प्लानमध्ये प्रति सभासद 2 लाख रुपयांचा निश्चित कव्हर विकल्प आहे. सर्व सभासदांना पॉलिसीमध्ये एकसमान रकमेचे रिस्क कव्हर मिळेल.
तुम्ही मास्टर पॉलिसीधारक प्लान कधीही सरेंडर करु शकता. पण सभासद इन्श्युरन्स प्रमाणपत्रात नमुद केल्याप्रमाणे सभासदाच्या व्यक्तीगत कव्हरेज कालावधीच्या समाप्तीपर्यंत व्यक्तीगत सभासद म्हणून कव्हरेज सुरु ठेवण्याची निवड करु शकतो. या प्लानच्या अंतर्गत कोणतेही सरेंडर किंवा पेड-अप मूल्य देय नसते.
हा वार्षिक तत्वावर रिन्यू करता येणारा टर्म प्लान आहे. हा समुहाच्या सभासदांसाठी प्रवेशाच्या दिनांकाच्या आणि आकारल्या जाणा-या प्रो राटा प्रीमियमवर आधारुन उपलब्ध आहे.
आम्ही तुम्हाला मास्टर पॉलिसीधारकाला आरंभाच्या दिनांकापासून किंवा मागील रिन्युअलपासून एका वर्षानंतर देय असलेल्या सर्व प्रीमियम्ससाठी 30 दिवसांचा वाढीव कालावधी देतो. तुम्हाला वाढीव कालावधीच्या समाप्तीच्या आत प्रीमियम्स भरवे लागतील, ज्यामुळे तुमचे सभासद प्लान/कव्हरचे लाभ घेणे सुरु ठेवण्याची शाश्वती मिळते. जर देय प्रीमियम वाढीव कालावधीत भरले न गेल्यास कव्हर बंद होते आणि प्लान/सभासदत्व रद्द होते.
एकच प्रीमियम भरावा लागत असलेला प्लान जो तुम्हाला वर्षातून केवळ एकदा पैसे भरण्याची आणि संपूर्ण पॉलिसी कालावधीमध्ये प्लानचे लाभ घेण्याची मुभा देतो.
पॉलिसी कालावधीमध्ये सभासद/ जीवन आश्वस्ताचा दुर्दैवी मृत्यू होण्याच्या स्थितीत, आम्ही वारसाला/ अपॉइंटीला/ कायदेशीर वारसांना निश्चित आश्वस्त रक्कम देऊ. प्रथमच किंवा १जून 2021नंतर प्रवेश घेणा-या सबस्क्रायबर्ससाठी, योजनेमध्ये योजनेमध्ये प्रवेश घेण्याच्या दिनांकापासून (लीन पिरिएड) पहिल्या 30 दिवसांच्या आत (अपघाताव्यतिरिक्त इतर प्रकारे) मृत्यूसाठी इन्श्युरन्स कव्हर उपलब्ध असणार नाही त्याचप्रमाणे लीन पिरिएडच्या दरम्यान (अपघाताव्यतिरिक्त इतर प्रकारे) मृत्यूसाठी कोणताही दावा ग्राह्य नसेल. आम्ही या शाश्वतीसाठी पूर्णपणे जवाबदार आहोत की, प्रीमियम पेमेंट आश्वस्त सभासदाच्या किंवा वारसाच्या/ अपॉंइटीच्या/ कायदेशीर वारसाच्या नावी, स्थितीनुसार आश्वस्त सभासदाच्या किंवा वारसाच्या/ अपॉंइटीच्या/ कायदेशीर वारसाच्या विशिष्ठ बॅक खात्यामध्ये कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमाने केले जाईल.
घोटाळे/मिसस्टेटमेंटला वेळोवेळी सुधारणा होत असलेल्या विमा अधिमियम 1938च्या कलम 45च्या तरतुदींनुसार हाताळले जाते.
वेळोवेळी सुधारणा होत असलेल्या विमा अधिमियम 19381938च्या कलम 45मध्ये नमुद केले आहे की
वेळोवेळी सुधारित केलेल्या विमा कायदा १९३८ च्या कलम ४५ मध्ये असे म्हटले आहे.
Prohibition of Rebate: Section 41 of the Insurance Act, 1938 as amended from time to time-
इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप लिव्हिंग बेनिफिट्स प्लान हा कार्पोरेशन्ससाठी एक विस्तृत सामुहिक हेल्थ इन्श्युरन्स समाधान आहे. आरोग्याच्या विविध गरजांसाठी तयार केलेला हा कार्पोरेट हेल्थ प्लान हॉस्पिटलमध्ये भरती होण्याच्या, फ्रॅक्चरच्या, अपंगत्वाच्या आणि गंभीर आजारांच्या स्थितीत आर्थिक सुरक्षेची शाश्वती देतो. तुमच्या कर्मचा-यांच्या जीवनाचे रक्षण करणा-या सामुहिक हेल्थ प्लानसाठी इंडियाफर्स्टची निवड करा.
ज्ञान केंद्र
सर्व पहा