फॅमिली टर्म इंश्युरन्स काय आहे?
हा पॉलिसीचा एक प्रकार आहे जो एकाच प्लानच्या अंतर्गत एक घरातील अनेक सदस्यांना कवर करतो. फॅमिली टर्म इंश्युरन्स पॉलिसी मुदतीच्या दरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाल्यास लाभार्थींना मृत्यू लाभ देतो. हा तुमच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा देण्यासाठी तयार केलेला आहे, जो तुम्ही नसाल तेव्हा सुद्धा त्यांच्या गरजांची काळजी घेतल्याची खात्री करतो.
एक सिंगल टर्म लाईफ इंश्युरन्स पॉलिसी जी कुटुंबातील अनेक सदस्यांना कवर करते, ज्यामुळे ही सोयिस्कर आणि किफायतशीर बनते. ही मुख्य कमवणारी व्यक्ती, पत्नी आणि मुलांसाठी कवरेज देऊन संपूर्ण कुटुंबासाठी आर्थिक संरक्षणाची खात्री करते.
तुमच्या कुटुंबासाठी योग्य विमा रक्कम निवडा, जेणेकरुन ते पुरेशा आर्थिक मदतीपासून वंचित राहणार नाही. इथे क्लिक करून आमच्या ₹ 5 कोटी टर्म इंश्युरन्स प्लान्स विषयी जाणून घ्या.
कुटुंबासाठी टर्म इंश्युरन्सचे लाभ
एक अशा कुटुंबाचा विचार करा जेथे प्रत्येकजण उल्लेखनीय योगदान देतो आणि म्हणून जवळपास सर्वच सदस्यांसाठी कवरेजची आवश्यकता आहे जेणेकरुन त्यांच्या अनुपस्थितीमध्ये कुणालाही त्रास होणार नाही. कुटुंबासाठी टर्म इंश्युरन्सचा विचार करण्याचे हे चांगले कारण आहे.
हे देत असलेले काही फायदे इथे दिले आहेत.
कुटुंबासाठी टर्म इंश्युरन्सचा मुख्य फायदा हा आहे की हे तुमच्या प्रियजनांच्या आर्थिक सुरक्षेची खात्री करते. पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्याच्या प्रसंगी, विमा रक्कम दररोजचे खर्च कवर करण्यात, कर्जाची परतफेड करण्यात आणि शिक्षण किंवा लग्न सारख्या भविष्यातील लक्ष्यांकरीता पैसे पुरवण्यासाठी मदत करू शकते.
टर्म इंश्युरन्स पॉलिसी इतर काही प्रकारच्या लाईफ इंश्युरन्स प्लान्सच्या तुलनेत जास्त किफायतशीर असतात, ज्यामुळे कुटुंबांना त्यांच्या बजेटवर ताण न देताना मोठे कवरेज मिळवणे सोपे होते.
फॅमिली टर्म इंश्युरन्स प्लान साठी भरलेले प्रिमियम लागू कर कायद्यांनुसार कर कपातीसाठी पात्र असतात, ज्यामुळे अतिरिक्त बचत होते.
तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या गरजांच्या आधारे कवरेजची रक्कम आणि पॉलिसी मुदत निवडू शकता, जे पॉलिसी तुमच्या आर्थिक लक्ष्यांच्या अनुरुप असल्याची खात्री करते.
तुमचे कुटुंब आर्थिकरित्या सुरक्षित असल्याची भावना तुम्हाला मनःशांती देते, ज्यामुळे तुम्ही त्यांच्या भविष्याविषयी काळजी न करता आयुष्यातील इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित करु शकता.
कुटुंबासाठी असलेल्या टर्म इंश्युरन्स प्लान्सचे प्रकार काय आहेत?
कुटुंबातील अनके सदस्यांना कवर करणारा टर्म इंश्युरन्स प्लान खरेदी करताना सुद्धा, प्लान्सच्या उप-प्रकारांची श्रेणी आहे ज्यातून तुम्ही निवड करू शकता. हे मुख्यतः तुमच्या विमा पुरवठादाराकडे उपलब्ध पर्यायांवर अवलंबून आहे.
हा संपूर्ण पॉलिसी मुदतीच्या दरम्यान एक निश्चित विमा रक्कम देतो. हा स्थिर आणि अपेक्षित कवरेज पसंत असणाऱ्या कुटुंबांसाठी आदर्श आहे.
इंक्रीजिंग टर्म इंश्युरन्स
या प्रकारच्या प्लानमध्ये, विमा रक्कम दर वर्षी वाढत जाते, जी वाढत्या आर्थिक जबाबदाऱ्या असलेल्या कुटुंबासाठी यास योग्य बनवते.
डीक्रीजिंग टर्म इंश्युरन्स
कालांतराने विमा रक्कम कमी होते, सामान्यपणे गृह कर्ज सारखी दायित्वे कवर करण्यासाठी वापरले जाते जे तुम्ही जसजसे परतफेड करता तसतसे कमी होते. हे मोठे कर्ज असलेल्या कुटुंबांसाठी उपयोगी होऊ शकते.
कुटुंबासाठी ग्रूप टर्म लाईफ इंश्युरन्स
सामान्यपणे मालक/ कंपनी द्वारे दिले जाते, या प्रकारचा प्लान एक ग्रूप इंश्युरन्स पॉलिसीच्या अंतर्गत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला कवर करते. कुटुंबासाठी ग्रूप टर्म लाईफ इंश्युरन्स खरेदी करणे मूलभूत कवरेज देऊ शकते आणि स्वतंत्र पॉलिसींने भर घातली जाऊ शकते.
रिटर्न ऑफ प्रिमियम टर्म इंश्युरन्स
हा प्लान पॉलिसीधारक पॉलिसी मुदतीनंतर पर्यंत जिवंत राहिल्यास भरलेले प्रिमियम परत करतो. हा इंश्युरन्स प्लानमध्ये बचतीच्या पैलूसाठी शोधत असलेल्या कुटुंबांसाठी आकर्षक असू शकतो.
तुमच्या कुटुंबासाठी सर्वोत्तम टर्म लाईफ इंश्युरन्स निवडा
पुढे टप्पे दिलेले आहेत जे तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी सर्वोत्तम टर्म लाईफ इंश्युरन्स निवडण्यात मदत करू शकतात, मग हे फक्त तुमच्या जोडीदारासाठी किंवा इतर काही सदस्यांसाठी असू शकते.
तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजांचे मूल्यमापन करा
दररोजचा खर्च, शिक्षणाचा खर्च आणि दीर्घकालीन लक्ष्यांसह तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजांचे मूल्यमापन करा. हे योग्य विमा रक्कम निश्चित करण्यात मदत करते.
ऑनलाइन टर्म इंश्युरन्स कॅलक्युलेटर तुम्हाला तुमची इच्छित कवरेज रक्कम, पॉलिसी मुदत आणि इतर फॅक्टर्सच्या आधारे प्रिमियम निर्धारित करण्यात मदत करू शकते.
वेगवेगळ्या प्लान्सची तुलना करा
कवरेज, प्रिमियम आणि फायद्यांचे सर्वोत्तम संयोजन देणारा प्लान शोधण्यासाठी वेगवेगळे फॅमिली टर्म इंश्युरन्स प्लान तपासा.
क्रिटिकल इलनेस, ॲक्सीडेंटल डेथ आणि वेवर ऑफ प्रिमियम सारखे ॲड-ऑन कवर्स तुमच्या फॅमिली टर्म इंश्युरन्स प्लानचे कवरेज वाढवू शकतात.
क्लेम सेटलमेंट रेशियो आणि ग्राहक सेवा
विश्वसनीयतेची खात्री करण्यासाठी चांगला क्लेम सेटलमेंट रेशियो आणि ग्राहकांचे चांगले रिव्यूव असलेली विमा कंपनी निवडा.
फॅमिली टर्म इंश्युरन्स प्लान का निवडावा?
एक फॅमिली टर्म इंश्युरन्स प्लान तुमच्या कुटुंबासाठी योग्य का असेल याची ही काही कारणे पहा.
एक फॅमिली टर्म इंश्युरन्स प्लान एकाच पॉलिसीच्या अंतर्गत सर्वसमावेशक कवरेज देतो, ज्यामुळे हा सांभाळण्यासाठी सोपा होतो आणि कुटुंबातील सर्व सदस्य सुरक्षित असल्याची खात्री करतो.
कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी वेगवेगळी पॉलिसी खरेदी करण्याऐवजी, फॅमिली टर्म इंश्युरन्स प्लान कमी किंमतीत कवरेज देतो.
अनेक वेगवेगळ्या पॉलिसींच्या ऐवजी एकच पॉलिसी सांभाळणे प्रिमियम भरणा आणि पॉलिसी ट्रॅक करणे सुलभ बनवते.
हे प्लान्स जसजसे कालांतराने तुमच्या कुटुंबाच्या गरजा वाढतात तसे कवरेजची रक्कम समायोजित करण्याची आणि रायडर्स जोडण्याची लवचिकता देतात.
मुख्य कमवणाऱ्या व्यक्तीने फॅमिली टर्म इंश्युरन्स खरेदी करण्याचा विचार का करायला हवा?
घरातील मुख्य कमवणाऱ्या व्यक्तीलाच कुटुंबाचा दाता मानले जाते. घराच्या मुख्य आर्थिक आवश्यकता सहसा त्यांच्याच खांद्यावर असतात, मग भलेही घरात योगदान देणारे इतर सदस्य सुद्धा असतील.
हे पहा कि मुख्य कमवणाऱ्या व्यक्तीने कुटुंबासाठी एक योग्य टर्म लाईफ इंश्युरन्स पॉलिसी खरेदी करण्याचा विचार का करायला हवा.
कुटुंबाच्या आर्थिक भविष्याची सुरक्षा करणे
मुख्य कमवणारी व्यक्ती म्हणून, तुमचे उत्पन्न तुमच्या कुटुंबाच्या जीवनशैली, शिक्षण आणि भविष्यातील लक्ष्यांना आधार देते. फॅमिली टर्म इंश्युरन्स निश्चित करते कि तुमच्या अनुपस्थितीमध्ये या लक्ष्यांसोबत तडजोड होणार नाही.
अनेक कुटुंब घर किंवा कार सारख्या मोठ्या खरेदींसाठी कर्जांवर अवलंबून राहतात. मुख्य कमवणाऱ्या व्यक्तीच्या निधनाच्या परिस्थितीमध्ये, विमा रकमेचा या कर्जांची परतफेड करण्यासाठी उपयोग केला जाऊ शकतो, ज्यामुळे कुटुंबावर आर्थिक ताण पडत नाही.
फॅमिली टर्म इंश्युरन्स पॉलिसींसाठी भरलेले प्रिमियम कर कपातीसाठी पात्र होऊ शकतात, जे तुमचे एकंदरीत कर दायित्व कमी करतात.
पॉलिसी मुदतीमध्ये लवचिकता
तुम्ही तुमच्या आर्थिक जबाबदाऱ्यांना अनुसरुन, जसे तुमच्या मुलांचे शिक्षण कवर करणारी किंवा तुमच्या जोडीदाराची आर्थिक सुरक्षा निश्चित करणारी, पॉलिसी मुदत निवडू शकता.
एक गृहिणी कुटुंबासाठी टर्म इंश्युरन्स खरदेी करू शकतात का?
अशा विभिन्न परिस्थिती आहेत जेथे एक गृहिणी तिच्या कुटुंबाकरीता कवरेज मिळवण्यासाठी टर्म लाईफ प्लान खरेदी करू इच्छित असेल. हा कदाचित पारंपारिक पर्याय नसेल. मात्र, हामीदारी टीमच्या स्वीकृती आणि इतर आवश्यकतांची पूर्तता करण्याच्या अधीन, हे शक्य होऊ शकते. चला अशा परिस्थितींमधील काही मुख्य विचार पाहू.
जरी एक गृहिणी पारंपारिक उत्पन्न कमावत नसेल, मात्र घराचा सांभाळ करण्यात तिचे भूमिका अमूल्य आहे. काही विमा कंपन्या, कुटुंबाच्या हितामध्ये गृहिणींचे योगदान ओळखून, विशेषकरून त्यांच्यासाठी टर्म इंश्युरन्स पॉलिसी देतात.
एक गृहिणी तिच्या पतीच्या कवरेजमध्ये भर घालण्यासाठी फॅमिली टर्म इंश्युरन्स खरेदी करू शकते, जे ती नसताना सुद्धा कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण केल्या जातील याची खात्री करते.
गृहिणीच्या अनुपस्थितीमध्ये, विमा रक्कम कुटुंबाचे जीवनमान कायम ठेवून कुटुंबाचे अतिरिक्त खर्च जसे मुलाची देखभाल किंवा घरगुती नोकर/ मोलकरीण, कवर करण्यात मदत करू शकते.
तुम्हाला जाणून घ्यायचे हे की तुमच्या पॉलिसीची किंमत काय असेल जर तुम्ही ₹ 1 कोटी टर्म इंश्युरन्स प्लान सारखे उच्च कवरेज निवडता? आमच्या ऑनलाइन टर्म इंश्युरन्स कॅलक्युलेटरने प्रिमियमचा अनुमान मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.
तुमच्या कुटुंबासाठी ऑनलाइन टर्म इंश्युरन्स खरेदी करा
फॅमिली टर्म इंश्युरन्स ऑनलाइन खरेदी करणे सहसा एक त्रास-मुक्त प्रक्रिया असते. तुम्हाला या टप्प्यांचे पालन करण्याची आवश्यकता पडू शकते.
कवरेज, प्रिमियम आणि अतिरिक्त लाभांच्या आधारे वेगवेगळ्या फॅमिली टर्म इंश्युरन्स प्लानची तुलना करण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरा.
ऑनलाइन टर्म इंश्युरन्स कॅलक्युलेटर वापरा. तुमचे वय, इच्छित विमा रक्कम आणि पॉलिसी मुदत सारखे तपशील प्रविष्ट करून प्रिमियमचा अनुमान मिळवा.
तुम्ही एकदा प्लान निवडल्यावर, ऑनलाइन अर्जाच्या फॉर्ममध्ये तुमचे वैयक्तिक आणि कौटुंबिक तपशील भरा.
आवश्यक दस्तावेज अपलोड करा जसे ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा आणि उत्पन्नाचा पुरावा.
तुमची पसंतीची भरणा पद्धत निवडा आणि ऑनलाइन प्रिमियम भरा.
पडताळणीनंतर, विमा कंपनी पॉलिसी जारी करेल आणि तुम्ही त्यांच्या वेबसाइट किंवा ॲपवरून ती डाउनलोड करू शकता.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू)
कुटुंबासाठी सर्वोत्तम लाईफ इंश्युरन्स पॉलिसी कोणती आहे?
एक कुटुंबासाठी सर्वोत्तम लाईफ इंश्युरन्स पॉलिसी तुमच्या विशिष्ट गरजा, आर्थिक लक्ष्य आणि बजेटवर अवलंबून असते. वेगवेगळ्या लाईफ इंश्युरन्स प्लानची तुलना करणे आणि सर्वसमावेशक कवरेज देऊन तुमच्या आर्थिक नियोजनात फिट बसणारा प्लान निवडणे महत्त्वाचे आहे.
एक व्यक्ती किंवा कुटुंबासाठी टर्म इंश्युरन्स खरेदी केले जाऊ शकते का?
व्यक्ती आणि कुटुंब दोघांसाठी टर्म इंश्युरन्स खरेदी केले जाऊ शकते. फॅमिली टर्म इंश्युरन्स एकाच पॉलिसीच्या अंतर्गत अनेक सदस्यांना कवर करते तर इंडिविज्युअल टर्म इंश्युरन्स फक्त एकाच व्यक्तीला कवर करते.
टर्म पॉलिसी तुम्ही रोख मध्ये बदलू शकता का?
सामान्यपणे, टर्म इंश्युरन्स पॉलिसींमध्ये रोख मूल्य घटक नसतो, म्हणून ते रोखमध्ये बदलले जाऊ शकत नाही. टर्म इंश्युरन्सचा मुख्य हेतू मृत्यू लाभ देणे आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी टर्म इंश्युरन्स खरेदी केले जाऊ शकते का?
होय, ज्येष्ठ नागरिकांसाठी टर्म इंश्युरन्स खरेदी केले जाऊ शकते. वेगवेगळे प्लान पर्याय पाहण्यासाठी तुमच्या विमा कंपनीकडे तपासा.
मी माझ्या कुटुंबाच्या टर्म इंश्युरन्सवर कर्ज घेऊ शकतो का?
टर्म इंश्युरन्स पॉलिसी सहसा कर्जाची सुविधा देत नाही कारण त्यांच्यामध्ये रोख मूल्य जमा होत नाही. कर्ज सामान्यपणे होल लाईफ किंवा एंडोवमेंट पॉलिसींवर घेतले जाऊ शकते.
चार सदस्यांच्या कुटुंबासाठी किती कवरेजची आवश्यकता आहे?
तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा, सध्याचे उत्पन्न आणि भविष्यातील लक्ष्यांवर आवश्यक कवरेज अवलंबून आहे. योग्य विमा रक्कम निश्चित करण्यासाठी टर्म इंश्युरन्स कॅलक्युलेटर वापरण्याची शिफारस केली जाते.
एक पती आणि पत्नी एकाच टर्म इंश्युरन्स पॉलिसी अंतर्गत कवरेज मिळवू शकतात का?
होय, काही फॅमिली टर्म इंश्युरन्स प्लान एकाच पॉलिसीच्या अंतर्गत पती आणि पत्नी दोघांसाठी कवरेज देतात, जे संयुक्त मृत्यू लाभ देतात.
माझ्या फॅमिली टर्म इंश्युरन्स प्लानसाठी पॉलिसीची मुदत काय असली पाहिजे?
पॉलिसीची मुदत तुमच्या आर्थिक जबाबदाऱ्यांना अनुसरून असली पाहिजे जसे तुमची मुलं आर्थिकरित्या स्वावलंबी होईपर्यंतचा किंवा तुमच्या कर्जाची पूर्णपणे परतफेड होईपर्यंतचा कालावधी.
एक टर्म इंश्युरन्स प्लान पुनरुज्जीवित केला जाऊ शकतो का?
होय, अनेक विमा कंपन्या विशिष्ट कालावधीमध्ये बंद झालेली टर्म इंश्युरन्स पॉलिसी, सहसा थकलेले प्रिमियम आणि कोणतेही लागू दंड भरून पुनरुज्जीवित करु देतात.
माझ्या कुटुंबासाठी कमीत कमी विमा रक्कम किती असली पाहिजे?
तुमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा खर्च, कर्ज आणि भविष्यातील आर्थिक लक्ष्त कवर करण्यासाठी विमा रक्कम पुरेशी असली पाहिजे. तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या 10-15 पट कवर निवडण्याची बऱ्याचदा शिफारस केली जाते.