प्रवेशाच्या वेळी कमीत कमी वय
- Question
- प्रवेशाच्या वेळी कमीत कमी वय
- Answer
-
8 वर्षे (डेफिनिट इंकम पर्यायासाठी) / 30 वर्षे (होल ऑफ लाईफ इंकम पर्यायासाठी)
तुमच्यासाठी योग्य वेळ आम्हाला सांगा.
लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा
तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.
पुरुष
महिला
इतर
तुमचे तपशील प्रविष्ट केल्याबद्दल धन्यवाद
तुमच्या मौल्यवान अभिप्रायांमुळे आम्हाला आमची सेवा सुधारण्यात आणि आणखी कार्यक्षम बनवण्यात महत्वाची भूमिका बजावते.
8 वर्षे (डेफिनिट इंकम पर्यायासाठी) / 30 वर्षे (होल ऑफ लाईफ इंकम पर्यायासाठी)
50 वर्षे (डेफिनिट इंकम पर्यायासाठी) / 60 वर्षे (होल ऑफ लाईफ इंकम पर्यायासाठी)
18 वर्षे (डेफिनिट इंकम पर्यायासाठी) / 40 वर्षे (होल ऑफ लाईफ इंकम पर्यायासाठी)
60 वर्षे (डेफिनिट इंकम पर्यायासाठी) / 70 वर्षे (होल ऑफ लाईफ इंकम पर्यायासाठी)
10 वर्षे
5/6/7 वर्षे
वार्षिक - ₹48,000, / अर्ध वार्षिक - ₹ 24,571 / त्रैमासिक - ₹ 12,432 / मासिक - ₹ 4176
कोणतीही मर्यादा नाही (बोर्ड अनुमोदित हमी धोरणाच्या अधीन)
₹4,80,000
कोणतीही मर्यादा नाही (बोर्ड अनुमोदित हमी धोरणाच्या अधीन)
वार्षिक
अर्ध वार्षिक
त्रैमासिक
मासिक
अल्पवयीन विमाधारकासाठी जोखिम कवर ताबडतोब सुरु होते.
18 वर्ष पूर्ण केल्यावर पॉलिसी विमाधारकास सुपूर्द केली जाते.
विमाधारक अल्पवयीन असताना पॉलिसीधारकाचे निधन झाल्यास, उत्तरजीवित आई/वडील किंवा कायदेशीर पालक पॉलिसीधारक बनतात.
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
विनासायास नोंदणी प्रक्रिया
माझ्यासाठी नोंदणीपासून सर्व वैद्यकीय तपासण्यांपर्यंत, इंडियाफर्स्ट लाईफ ने सर्व काही सुकर केले. मी घेतलेल्या प्लॅनची वैशिष्ट्ये माझ्या अपेक्षांप्रमाणे आहेत, जी मला भविष्याबद्दल मनःशांती देतात.
मोहित अगरवाल
(मुंबई, 21 मार्च 2024)
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
ऑनलाईन खरेदीचा सुखद अनुभव
इंडियाफर्स्ट लाईफकडून लाईफ इन्शुरन्स पॉलिसी विकत घेणे हा माझ्यासाठी सुखद अनुभव होता. कंपनीच्या प्रतिनिधींसोबत विनासायास संवाद हा वरदानासारखा होता आणि त्याचप्रमाणे अति आवश्यक वैशिष्ट्यांना प्लॅनमध्ये घेणेही.
सत्यम नागवेकर
(मुंबई, 22 मार्च 2024)
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
माझ्या आर्थिक प्रवासातील विश्वासू सहकारी
इंडियाफर्स्ट लाईफ रेडियंट स्मार्ट इन्व्हेस्ट प्लॅन ने मला जिंकून घेतले! आर्थिक प्रवासात विश्वासू सहकारी असल्यासारखे आहे. त्याच्या फंड स्विचच्या फ्लेक्झिबल पर्यायांमुळे, मी जसा विचार केला होता त्याप्रमाणे माझ्या गुंतवणुकी करू शकतो. माझ्या गुंतवणुकीवर 20% चे घसघशीत परतावे मिळाले आहेत! नोंदणी टीम कडून मिळालेला आधार खूपच सुंदर होता, ज्यामुळे माझी खरोखरच काळजी घेत असल्याचे आणि आधार दिल्याचे जाणवले.
पौलोमी बॅनर्जी
(कोलकाता, 21 मार्च 2024)
इंडियाफर्स्ट लाईफ लाँग ग्यारंटेड इंकम प्लान हा लाईफ इंश्युरन्स कवरेज घेतलेले असताना पैशांची बचत करण्याचा एक उत्कृष्ट मार्ग आहे. हा नियमित उत्पन्नाची हमी देतो, ज्यामुळे हा एक उत्कृष्ट सेविंग प्लान बनतो. या व्यतिरिक्त, हा आय कर बचत योजनांसाठी पात्र आहे, जो अतिरिक्त आर्थिक लाभ देतो. ऑनलाइन खरेदीच्या सोयीसह, तुमचे आर्थिक लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आणि तुमच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी हा एक सरळसोपा उपाय आहे.
इंडियाफर्स्ट लाईफ लाँग ग्यारंटेड इंकम प्लान दोन उत्पन्न लाभ पर्याय देतो. एक डेफिनिट इंकम पर्याय आणि एक होल लाईफ इंकम पर्याय. डेफिनिट इंकम पर्यायाच्या अंतर्गत, वार्षिक प्रिमियमची एक टक्केवारी (X%) 20 वर्षांसाठी उत्पन्न स्वरुपात दिली जाते, सोबत उत्पन्न लाभ कालावधीच्या शेवटी प्रिमियम परताव्याची (Y%) भर घातली जाते, जे प्रिमियम भरणा आणि विमाधारकाच्या जिवंत असण्यावर अवलंबून आहे. होल ऑफ लाईफ इंकम पर्याय वयाच्या 99 व्या वर्षांपर्यंत वार्षिक प्रिमियमचा X% उत्पन्न स्वरुपात निश्चित करतो, सोबत उत्पन्न लाभ कालावधीच्या शेवटी प्रिमियम परताव्याची Y% भर घातली जाते, जे प्रिमियम भरणा आणि विमाधारकाच्या जिवंत असण्याच्या अधीन आहे. हे पर्याय व्यक्तींना त्यांच्या आर्थिक उद्दिष्ट्यांच्या अनुरूप त्यांचे उत्पन्न लाभ तयार करण्याची सुविधा देतात. सविस्तरपणे तपासण्यासाठी, कृपया प्लानचे ब्रोशर पहा.
होय, या प्लान अंतर्गत तुम्हाला कर्ज सुविधेचा लाभ मिळू शकतो.
कोणत्याही क्षणी तुम्ही घेऊ शकणाऱ्या कर्जाची रक्कम सरेंडर मूल्यावर अवलंबून असेल. तुम्ही उपलब्ध सरेंडर मूल्याच्या 90% पर्यंत कर्जाची रक्कम घेऊ शकता. कर्जाची कमीत कमी रक्कम ₹ 1,000 असली पाहिजे. आम्ही प्रति वर्ष 9% च्या दराने व्याज आकारू जो आयआरडीएआयच्या पूर्व स्वीकृतीच्या अधीन आमच्या द्वारे वेळोवेळी बदलला जाऊ शकतो.
पॉलिसी मुदतीच्या शेवटी त्यावेळेस व्याजसह थकीत कर्ज, कोणतेही असल्यास भविष्यातील खात्रीशीर उत्पन्नाच्या आणि सर्व भरलेल्या प्रिमियमच्या Y% च्या विद्यमान मूल्यातून कापण्यात येईल, 9% वार्षिकच्या दराने सवलतीने आणि शिल्लक रक्कम, कोणतीही असल्यास ताबडतोब देय असेल आणि पॉलिसी समाप्त होईल.
नामनिर्देशित व्यक्ती/ नियुक्त व्यक्ती/ कायदेशीर वारसांना मृत्यू लाभ किंवा विमाधारकाला परिपक्वता लाभ देण्याआधी आम्ही व्याजासह कोणतीही न भरलेली कर्जाची रक्कम वसूल करू. जसे आणि जेव्हा व्याजासह कर्ज मुद्दलची रक्कम पेड-अप पॉलिसींसाठी सरेंडर मूल्यापेक्षा वाढते, पॉलिसी आमच्याद्वारे अनिवार्यपणे सरेंडर केली जाईल आणि व्याजासह थकीत कर्जाची सरेंडर मूल्यातून किंवा पेड-अप लाभातून वसूल केली जाईल. अनिवार्य सरेंडर सक्रिय पॉलिसींसाठी लागू नसेल.
आम्ही तुम्हाला ग्रेस पिरियड देतो जो प्रिमियम देय तारखेपासून प्रिमियमचा भरणा करण्यासाठी दिलेला वेळ आहे ज्या दरम्यान पॉलिसी जोखिम कवरसह लागू असल्याचे ग्राह्य धरले जाते. या पॉलिसीसाठी वार्षिक, अर्ध-वार्षिक आणि त्रैमासिक फ्रिक्वेंसीसाठी प्रिमियम देय तारखेपासून 30 दिवसांचा आणि मासिक फ्रिक्वेंसीसाठी 15 दिवसांचा ग्रेस पिरियड आहे. या कालावधीच्या दरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, मृत्यू होण्याच्या तारखेपर्यंतचे देय प्रिमियम कापून घेतल्यानंतर, त्यांच्या नामनिर्देशित व्यक्ती/ नियुक्त व्यक्ती/ कायदेशीर वारसाला मृत्यू लाभ दिला जाईल. या कालावधीच्या दरम्यान पॉलिसीला सक्रिय असल्याचे मानले जाईल.
तुमच्या पॉलिसीच्या संपूर्ण लाभांचा आनंद घेण्यासाठी तुमची पॉलिसी सुरु ठेवण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, आम्ही समजतो की काही परिस्थितींमध्ये तुम्ही तुमची पॉलिसी सरेंडर करू इच्छिता असाल. पहिल्या 2 संपूर्ण वर्षांचा प्रिमियम भरणा केल्यानंतर पॉलिसीला सरेंडर मूल्य प्राप्त होईल.
सरेंडर करण्याच्या वेळी गांरटेड सरेंडर व्हॅल्यू (जीएसवी) किंवा स्पेशल सरेंडर व्हॅल्यू (एसएसवी) पैकी जी जास्त असेल तर देय असेल. जीएसवी फॅक्टर्स सरेंडरचे पॉलिसी वर्ष आणि पॉलिसी मुदतीवर अवलंबून आहे. सरेंडरच्या तारखेपर्यंत भरलेल्या एकूण प्रिमियमवर जीएसवी फॅक्टर लागू होईल.
जीएसवी = प्रिमियमसाठी जीएसवी फॅक्टर x लागू कर आणि अतिरिक्त प्रिमियम आणि रायडर प्रिमियम, कोणतेही असल्यास, वगळून भरलेला एकूण प्रिमियम
एसएसवी = {(भरलेल्या प्रिमियमची एकूण संख्या/पॉलिसी मुदतीच्या दरम्यान देय प्रिमियमची एकूण संख्या) x (उत्पन्न लाभाचे विद्यमान मूल्य आणि भरललेल्या सर्व प्रिमियमचे Y%, 9% वार्षिक दराने सूट)} गुणिले सरेंडरच्या वेळी प्रचलित एसएसवी फॅक्टर. आयआरडीएआयच्या पूर्व मंजूरीच्या अधीन एसएसवी फॅक्टर आमच्या द्वारे वेळोवेळी निश्चित केला जाईल.
टीप: जीएसवी फॅक्टर्स जोडपत्र I मध्ये नमूद केल्याप्रमाणे आहे.
तुम्ही फ्री लूक पिरियड दरम्यान तुमची पॉलिसी परत करू शकता;
जर तुम्ही पॉलिसीच्या कोणत्याही अटी आणि नियमांशी सहमत नाही, तर तुमच्याकडे पॉलिसीच्या अटी आणि नियम तपासण्याचा पर्याय आहे आणि जर तुम्ही त्या अटी किंवा नियमांपैकी कशाशीही असहमत आहात, तर तुमच्याकडे पॉलिसी प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत तुमचा आक्षेपाचे कारण सांगून, पॉलिसी रद्द करण्यासाठी कंपनीकडे पॉलिसी परत पाठवण्याचा पर्याय आहे. डिस्टन्स मार्केटिंग किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने खरेदी केलेल्या पॉलिसींसाठी फ्री-लूक पिरियड 30 दिवसांचा असेल.
तुम्ही तुमची पॉलिसी रद्द करता तेव्हा तुम्हाला काही रिफंड मिळतो का?
होय. आम्ही इतकी रक्कम परत करू -
भरलेला प्रिमियम
वजा: i. पॉलिसी जितक्या कालावधीसाठी लागू होती त्यासाठी प्रो-रेटा जोखिम प्रिमियम आणि रायडर प्रिमियम, कोणताही असल्यास
वजा ii. भरणा केलेला कोणताही मुद्रांक शुल्क
वजा iii. वैद्यकीय तपासणी, कोणतीही केली असल्यास, वर झालेले खर्च
डिस्टन्स मार्केटिंग मध्ये खालील माध्यमांद्वारे इंशुरन्स प्रोडक्ट्सच्या विक्री आणि विनंतीच्या प्रत्येक क्रियाकलापांचा (लीड निर्मितीसह) समावेश आहे: (i) वॉइस मोड, ज्यात टेलिफोन कॉलिंगचा समावेश आहे; (ii) शॉर्ट मेसेजिंग सर्विस (एसएमएस); (iii) इलेक्ट्रॉनिक मोड ज्यात ई-मेल, इंटरनेट आणि इंटरॅक्टिव टिव्ही (डीटीएच) चा समावेश आहे; (iv) फिजिकल मोड ज्यात डिरेक्ट पोस्टल मेल आणि वर्तमानपत्रे व मॅगझीनमधील इंसर्ट्सचा समावेश आहे; आणि, (v) वैयक्तिकपणे सोडून संपर्काच्या इतर कोणत्याही माध्यमाद्वारे विनंती.
पॉलिसी अंतर्गत जोखिम कवर सुरु झाल्याच्या तारखेपासून किंवा पॉलिसी पुन्हा सुरु केल्याच्या तारखेपासून, जसे लागू असेल तसे, 12 महिन्यांच्या आत आत्महत्येमुळे मृत्यूच्या प्रसंगी, पॉलिसीधारकाचे नामनिर्देशित व्यक्ती किंवा लाभार्थी, मृत्यू तारखेपर्यंत भरलेल्या एकूण प्रिमियमच्या 80% रक्कम किंवा मृत्यूच्या तारखेनुसार उपलब्ध सरेंडर मूल्य, जी कोणतीही जास्त आहे, मिळवण्यासाठी पात्र आहे, ज्यासाठी पॉलिसी सक्रिय असायला हवी.
पॉलिसी मुदतीच्या शेवटी (परिपक्व झाल्यावर), इंडियाफर्स्ट लाईफ लाँग ग्यारंटेड इंकम प्लान खालील लाभ देतो:
डेफिनिट इंकम पर्याय:
परिपक्वता लाभामध्ये 20 वर्षांसाठी खात्रीशीर उत्पन्नाचा समावेश आहे.
प्रिमियमच्या परताव्याचा Y% उत्पन्न लाभ कालावधीच्या शेवटी दिला जातो.
एकरकमी रक्कम प्राप्त करण्याचा पर्याय, जो भविष्यातील खात्रीशीर उत्पन्नाच्या वर्तमान मूल्य आणि प्रिमियमच्या परताव्याचा Y% दर्शवतो, ज्यात 9% वार्षिक दराने सूट दिली जाते (व्याज दराची हमी नाही, आयआरडीएआय स्वीकृतीच्या अधीन आहे).
होल ऑफ लाईफ इंकम पर्याय:
परिपक्वता लाभामध्ये वयाच्या 99 वर्षांपर्यंत खात्रीशीर उत्पन्नाचा समावेश आहे.
प्रिमियमच्या परताव्याचा Y% उत्पन्न लाभ कालावधीच्या वितरण केला जातो.
एकरकमी रक्कम प्राप्त करण्याचा पर्याय, जो भविष्यातील खात्रीशीर उत्पन्नाच्या वर्तमान मूल्य आणि प्रिमियमच्या परताव्याचा Y% दर्शवतो, ज्यात 9% वार्षिक दराने सूट दिली जाते (व्याज दराची हमी नाही, आयआरडीएआय स्वीकृतीच्या अधीन आहे).
उत्पन्न लाभ कालावधीच्या दरम्यान, एक पर्यायी पर्याय जो पॉलिसीधारकाला भविष्यातील उत्पन्न एकरकमी स्वरुपात प्राप्त करण्याचा पर्याय देतो, भविष्यातील खात्रीशीर उत्पन्नाच्या वर्तमान मूल्य आणि प्रिमियमच्या परताव्याचा Y% दर्शवतो, ज्यात 9% वार्षिक दराने सूट दिली जाते (व्याज दराची हमी नाही, आयआरडीएआय स्वीकृतीच्या अधीन आहे). “प्रिमियमचा परतावा” म्हणजे वार्षिक प्रिमियमची एकूण बेरीज. सविस्तरपणे तपासण्यासाठी, कृपया प्लानचे ब्रोशर पहा.
तुम्ही प्रिमियमचा भरणा चुकवल्यास, खालील परिस्थिती उघड होतात:
ग्यारंटेड सरेंडर मूल्याच्या आधी रद्द होते:
पुनरारंभ पर्याय:
पेड अप व्हॅल्यू:
ग्रेस पिरियड समाप्त होण्याच्या आधी भरणा न केल्याने पॉलिसीला पेड-अप मूल्य प्राप्त होते.
मृत्यू लाभ:
पहिल्या न भरलेल्या प्रिमियमच्या एक वर्षाच्या आत: पूर्ण मृत्यू लाभ.
एक वर्षानंतर: मृत्यू झाल्यावर रेड्युस्ड पेड-अप विमा रक्कम.
परिपक्वता लाभ:
पॉलिसी मुदतीच्या समाप्तीपर्यंत जिवंत राहिल्यास परिपक्वतेवर पेड-अप विमा रक्कम तयार होते.
रेड्युस्ड पेड-अप विमा रकमेची गणना:
पुनरारंभाची प्रक्रिया:
पाच वर्षांच्या आत पॉलिसी पुन्हा सुरु करण्यासाठी सर्व थकित प्रिमियम व्याजासह (सध्या 9% वार्षिक) भरणे आवश्यक आहे.
यशस्वीरित्या पुन्हा सुरु केल्याने मूळ पॉलिसीनुसार सर्व लाभ पुनर्संचयित केले जातात.
रेड्युस्ड पेड-अप मोडमध्ये सुरु ठेवणे:
जर पुनरारंभ कालावधीच्या दरम्यान पॉलिसी पुन्हा सुरु केली जात नाही, तर ती परिपक्वता, मृत्यू किंवा पॉलिसी सरेंडर केली जाईपर्यंत रेड्युस्ड पेड अप मोड मध्ये राहते. सविस्तरपणे तपासण्यासाठी, कृपया प्लानचे ब्रोशर पहा.
सर्व परिस्थितींमध्ये, मृत्यू झाल्यावर किंवा परिपक्वतेवरील रेड्युस्ड पेड-अप विमा रक्कम पॉलिसीच्या अंतर्गत भरलेल्या एकूण प्रिमियमपेक्षा कमी नसेल. पुनरारंभ बोर्ड अनुमोदित हमी धोरणाच्या अधीन आहे.
विमाधारकाच्या दुर्दैवी निधनाच्या प्रसंगी, पॉलिसी व्यापक मृत्यू लाभ देते.
पॉलिसीच्या मुदतीच्या दरम्यान मृत्यू:
नामनिर्देशित व्यक्तीसाठी एकरकमी किंवा मासिक उत्पन्नाचे पर्याय.
पेआउट्सची गणना मृत्यू झाल्यावर विमा रक्कम किंवा एकूण प्रिमियमच्या 105% पैकी जी जास्त असेल ती केली जाते.
पेआउट दिल्यावर पॉलिसी समाप्त होते.
हप्त्यांमध्ये पेआउट पर्याय:
:
ॲन्युईटी फॅक्टर आणि एसबीआय सेविंग बँक व्याज दराद्वारे मासिक पेआउट्स निश्चित केले जातात.
इंस्टॉलमेंट कालावधीच्या दरम्यान समान रक्कम दिली जाते.
एसबीआय सेविंग बँक व्याज दराची वार्षिक समीक्षा.
उत्पन्न लाभ कालावधीच्या दरम्यान मृत्यू:
प्रिमियम परताव्याची व्याख्या:
वार्षिक प्रिमियमची एकूण म्हणून व्याख्या केली जाते.
विशिष्ट मृत्यू लाभ गुणकांचे तपशील जोडपत्र II मध्ये दिलेले आहे.
हा कुशल दृष्टीकोन इंडियाफर्स्ट लाइफ लाँग ग्यारंटेड इंकम प्लान अंतर्गत मृत्यू लाभांची स्पष्ट समज देतो. सविस्तरपणे तपासण्यासाठी, कृपया प्लानचे ब्रोशर पहा.
पॉलिसीने पेड अप मूल्य प्राप्त केले असल्यास तुमच्या पॉलिसीमध्ये अखंडित लाईफ कवर लाभ असेल.
पहिल्या न भरलेल्या प्रिमियम (एफयुपी) च्या तारखेपासून एक वर्षाच्या कालावधीसाठी (अखंडित लाईफ कवर कालावधी) संपूर्ण मृत्यू लाभ सक्रिय राहील.
तुम्हाला “अखंडित लाईफ कवर लाभ” पुढे आणखी वाढवण्याचा पर्याय असेल जर तुम्ही एफयुपी तारखेपासून एक वर्षाच्या आत 9% वार्षिक दराच्या व्याजासह देय प्रिमियम भरता. अशा भरणावर, सुधारित “न भरलेल्या प्रिमियम” च्या तारखेपासून एक वर्षासाठी अखंडित लाईफ कवर लाभ लागू होईल.
जर तुम्ही एफयुपीच्या तारखेपासून 12 महिन्यांच्या आत देय प्रिमियम भरत नाही, तर सदर पॉलिसी कमी केलेल्या पेड अप पॉलिसीमध्ये रुपांतरित होईल.
अखंडित लाईफ कवर कालावधीच्या शेवटी, तुमच्याकडे अंमलात आणण्यासाठी खालील पर्याय असतील:
जर तुम्ही प्रिमियम देय तारखेच्या कमीत कमी एक महिना आधी पासून ते प्रिमियम देय तारखेच्या 12 महिने आधीपर्यंत प्रिमियम भरता तर आम्ही रिन्यूअल प्रिमियमच्या रकमेवर डिस्काउंट देऊ.
डिस्काउंटसाठी पात्र होण्यासाठी एका आर्थिक वर्षातील देय प्रिमियम आधीच्या आर्थिक वर्षात प्रिमियमच्या देय तारखेच्या अगोदर जास्तीत जास्त तीन महिन्यांपर्यंत जमा केला जाऊ शकतो.
प्रिमियम देय तारखेच्या आधी एक महिन्याच्या आत प्रिमियम भरल्यास डिस्काउंट दिले जाणार नाही. आगाऊ जमा झालेला नूतनीकरण प्रिमियम फक्त प्रिमियमच्या देय तारखेला समायोजित केला जाईल.
तुम्ही भरलेल्या प्रिमियमवर आणि प्राप्त झालेल्या लाभांवर प्रचलित आय कर कायद्यांनुसार कर लाभ उपलब्ध असू शकतो. हे सरकारी कर कायद्यांनुसार वेळोवेळी बदलाच्या अधीन आहे. कृपया गुंतवणूक करण्याआधी तुमच्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या
होय, तुमच्याकडे या पॉलिसीमध्ये इंडियाफर्स्ट लाईफ वेवर ऑफ प्रिमियम रायडर (UIN 143B017V01) आणि इंडियाफर्स्ट टर्म रायडर (युआयएन: 143B001V02) जोडण्याचा पर्याय आहे.
इंडियाफर्स्ट लाईफ वेवर ऑफ प्रिमियम रायडर निवडल्यावर, पॉलिसीधारकाचा/ विमाधारकाचा मृत्यू, अपघातामुळे पूर्ण कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास किंवा रायडर अंतर्गत नमूद गंभीर आजारपण आल्यास तुम्ही निवडलेल्या रायडर पर्यायानुसार तुमच्या बेस पॉलिसीचे भविष्यातील प्रिमियम माफ केले जातील. पॉलिसीधारक/ विमाधारकासाठी पर्याय खाली नमूद केल्याप्रमाणे आहेत. पॉलिसीच्या सुरुवातीला तुम्ही फक्त एक पर्याय निवडू शकता आणि एकदा पर्याय निवडल्यानंतर पॉलिसीच्या मुदतीच्या दरम्यान तो बदलला जाऊ शकत नाही.
पर्याय | लाभ |
---|---|
मृत्यूवर वेवर ऑफ प्रिमियम | हा पर्याय पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास बेस पॉलिसी अंतर्गत बाकी आणि देय असलेले भविष्यातील सर्व प्रिमियम माफ करण्याचा लाभ देतो (फक्त तेव्हाच जेव्हा बेस पॉलिसी अंतर्गत विमाधारक आणि पॉलिसीधारक वेगवेगळी व्यक्ती आहेत), जे रायडर आणि बेस पॉलिसी लागू असण्याच्या अधीन आहेत. तुम्ही हा पर्याय निवडल्यास, या रायडर अंतर्गत असलेला प्रिमियम मूळ पॉलिसी अंतर्गत प्रिमियमच्या 30% पेक्षा अधिक वाढणार नाही. |
अपघातामुळे पूर्ण कायमस्वरुपी अपंगत्व आणि गंभीर आजाराचे निदान झाल्यास वेवर ऑफ प्रिमियम | हा पर्याय खाली दिलेल्या घटनांपैकी कोणतीही एकदा किंवा एकत्रितपणे घडल्यास बेस पॉलिसीच्या अंतर्गत बाकी आणि देय भविष्यातील सर्व प्रिमियम माफ करण्याचा लाभ देतो; रायडर विमाधारकाचे अपघातामुळे पूर्ण कायमस्वरुपी अपंगत्व किंवा रायडर अंतर्गत कवर असलेल्या कोणत्याही एक गंभीर आजारापासून रायडर विमाधारक ग्रस्त असल्याचे खात्रीशीर निदान झाल्यावर, सदर लाभ रायडर आणि बेस पॉलिसी लागू असण्याच्या अधीन आहे. तुम्ही हा पर्याय निवडल्यास, या रायडर अंतर्गत असलेला प्रिमियम मूळ पॉलिसी अंतर्गत प्रिमियमच्या 100% पेक्षा अधिक वाढणार नाही. |
मृत्यू किंवा अपघातामुळे पूर्ण कायमस्वरुपी अपंगत्व किंवा गंभीर आजारावर वेवर ऑफ प्रिमियम | हा पर्याय खाली दिलेल्या घटनांपैकी कोणतीही लवकर घडल्यास बेस पॉलिसीच्या अंतर्गत बाकी आणि देय भविष्यातील सर्व प्रिमियम माफ करण्याचा लाभ देतो; रायडर विमाधारकाचा मृत्यू किंवा रायडर विमाधारकाचे अपघातामुळे पूर्ण कायमस्वरुपी अपंगत्व किंवा रायडर अंतर्गत कवर असलेल्या कोणत्याही एक गंभीर आजारापासून रायडर विमाधारक ग्रस्त असल्याचे खात्रीशीर निदान झाल्यावर, सदर लाभ रायडर आणि बेस पॉलिसी लागू असण्याच्या अधीन आहे. हा पर्याय निवडण्यासाठी, बेस पॉलिसी अंतर्गत विमाधारक आणि पॉलिसीधारक वेगवेगळी व्यक्ती असली पाहिजे.. तुम्ही हा पर्याय निवडल्यास, या रायडर अंतर्गत असलेला प्रिमियम मूळ पॉलिसी अंतर्गत प्रिमियमच्या 100% पेक्षा अधिक वाढणार नाही. |
इंडियाफर्स्ट टर्म रायडर हा प्युअर टर्म इंश्युरन्स रायडर आहे, जो निवडल्यावर तुमच्या कुटुंबाला अतिरिक्त संरक्षण देण्यासाठी मूळ पॉलिसीच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कवरच्या अतिरिक्त विमाधारकाचे लाईफ कवर वाढवतो. विमाधारकाच्या दुर्दैवी निधनाच्या प्रसंगी, तुमच्या मूळ पॉलिसीच्या अंतर्गत मृत्यू लाभाच्या रकमेसोबतच नामनिर्देशित व्यक्तीला रायडर अंतर्गत विमारक्कम सुद्धा प्राप्त होईल. तुम्ही हा रायडर निवडल्यास, या रायडर अंतर्गत असलेला प्रिमियम मूळ पॉलिसी अंतर्गत प्रिमियमच्या 30% पेक्षा अधिक वाढणार नाही.
रायडर दिले जाणार नाही जर रायडरची मुदत मूळ पॉलिसी अंतर्गत थकीत मुदतीपेक्षा अधिक आहे. रायडरच्या अटी आणि नियमांविषयी अधिक तपशीलांसाठी कृपया आमच्या वेबासइटवर उपलब्ध रायडर ब्रोशर पहा.
तुमच्या गुंतवणूकींवर 7 x परतावा मिळाला तर आश्चर्य वाटेल नाही का? तुमचा शोध इथे संपतो! या सिंगल पेमेंट प्लॅनसोबत, तुम्ही तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करु शकता.
आपल्या स्वप्नांना पाठिंबा द्यायला जर आपल्याकडे उत्पन्नाचा दुसरा स्त्रोत असेल तर किती चांगले होईल नाही का? तुमच्या स्वप्नांना सत्यात आणण्याचा हा एक मार्ग आहे, ज्यायोगे तुम्ही 1ल्या महिनाअखेरीपासून उत्पन्न मिळवण्यास सुरुवात करु शकता.
सोईस्कर प्रीमियम्स, गॅरेंटेड सर्व्हाव्हल लाभ आणि 15 किंवा 20 वर्षांच्या संपूर्ण पॉलिसी कालावधीच्या दरम्यान लाईफ इन्श्युरन्स कव्हरसोबत रोख बोनस(जर जाहिर केला असल्यास) उपलब्ध करुन देणा-या या गॅरंटेड सेव्हिंग्ज लाईफ इन्श्युरन्स प्लानसह व्यक्तीगत स्वरुपाच्या प्रवासाला सुरुवात करा.
सर्व पहा