प्रवेशाच्या वेळचे किमान वय
- Question
- प्रवेशाच्या वेळचे किमान वय
- Answer
-
90 दिवस
तुमच्यासाठी योग्य वेळ आम्हाला सांगा.
लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा
तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.
पुरुष
महिला
इतर
तुमचे तपशील प्रविष्ट केल्याबद्दल धन्यवाद
तुमच्या मौल्यवान अभिप्रायांमुळे आम्हाला आमची सेवा सुधारण्यात आणि आणखी कार्यक्षम बनवण्यात महत्वाची भूमिका बजावते.
90 दिवस
तात्काळ उत्पन्न आणि इंटरमिडिएट उत्पन्न विकल्प
पीपीटीसाठी 6 – 50 वर्षे
पीपीटीसाठी 8 आणि 10 – 55 वर्षे
डिफर्ड उत्पन्न विकल्प
पीपीटीसाठी 6 – 50 वर्षे
पीपीटीसाठी 8 आणि 10 – 60 वर्षे
30 वर्षे
90 वर्षे
वार्षिक : 48,000
अर्ध वार्षिक: 24,571
त्रैमासिक: 12,432
मासिक: 4,176
किमान: 4,80,000
कमाल: अमर्याद, बोर्डाने मंजूर केलेल्या अंडररायटिंग धोरणानुसार
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
विनासायास नोंदणी प्रक्रिया
माझ्यासाठी नोंदणीपासून सर्व वैद्यकीय तपासण्यांपर्यंत, इंडियाफर्स्ट लाईफ ने सर्व काही सुकर केले. मी घेतलेल्या प्लॅनची वैशिष्ट्ये माझ्या अपेक्षांप्रमाणे आहेत, जी मला भविष्याबद्दल मनःशांती देतात.
मोहित अगरवाल
(मुंबई, 21 मार्च 2024)
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
ऑनलाईन खरेदीचा सुखद अनुभव
इंडियाफर्स्ट लाईफकडून लाईफ इन्शुरन्स पॉलिसी विकत घेणे हा माझ्यासाठी सुखद अनुभव होता. कंपनीच्या प्रतिनिधींसोबत विनासायास संवाद हा वरदानासारखा होता आणि त्याचप्रमाणे अति आवश्यक वैशिष्ट्यांना प्लॅनमध्ये घेणेही.
सत्यम नागवेकर
(मुंबई, 22 मार्च 2024)
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
माझ्या आर्थिक प्रवासातील विश्वासू सहकारी
इंडियाफर्स्ट लाईफ रेडियंट स्मार्ट इन्व्हेस्ट प्लॅन ने मला जिंकून घेतले! आर्थिक प्रवासात विश्वासू सहकारी असल्यासारखे आहे. त्याच्या फंड स्विचच्या फ्लेक्झिबल पर्यायांमुळे, मी जसा विचार केला होता त्याप्रमाणे माझ्या गुंतवणुकी करू शकतो. माझ्या गुंतवणुकीवर 20% चे घसघशीत परतावे मिळाले आहेत! नोंदणी टीम कडून मिळालेला आधार खूपच सुंदर होता, ज्यामुळे माझी खरोखरच काळजी घेत असल्याचे आणि आधार दिल्याचे जाणवले.
पौलोमी बॅनर्जी
(कोलकाता, 21 मार्च 2024)
हा एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, व्यक्तीगत बचत मर्यादित प्रीमियम देणारा लाईफ इन्श्युरन्स प्लान आहे, जो 6, 8 किंवा 10 वर्षांच्या लघु वचनबध्दता आणि तुमचे प्रियजन संरक्षित राहतील याची खात्री करण्यासाठी लाईफ कव्हरसह 30 किंवा 40 वर्षांसाठी नियमित उत्पन्न उपलब्ध करतो. एवढेच नाही तर ही पॉलिसी तुम्ही जरी एखादा प्रीमियम चुकवला तरी देखील तुमच्या लाईफ कव्हर लाभाच्या निरंतरतेची खात्री देते, अशाप्रकारे तुमच्या कुटुंबाचे एका वर्षासाठी निरंतर लाईफ कव्हरसह संरक्षण करते.
या प्लानमध्ये तीन उत्पन्न विकल्प आहेत. उत्पन्न विकल्प, पॉलिसी कालावधी, प्रीमियम पेमेंट कालावधी आणि ऍन्युअलाइझ प्रीमियम रक्कम ज्यांची सुरुवातीला निवड केली आहे, त्यांना नंतर बदलता येत नाही.
उत्पन्न विकल्प/ उत्पन्न पेमेंट वारंवारता | वार्षिक | अर्धवार्षिक | त्रैमासिक | मासिक |
---|---|---|---|---|
तात्काळ उत्पन्न विकल्प | 12व्या महिन्याच्या अखेरीस | 6 महिन्याच्या अखेरीस | 3-या महिन्याच्या अखेरीस | 1ल्या महिन्याच्या अखेरीस |
इंटरमिडिएट उत्पन्न विकल्प | 60व्या महिन्याच्या अखेरीस | 54व्या महिन्याच्या अखेरीस | 51व्या महिन्याच्या अखेरीस | 49व्या महिन्याच्या अखेरीस |
डिफर्ड उत्पन्न विकल्प | 120व्या महिन्याच्या अखेरीस | 114व्या महिन्याच्या अखेरीस | 111व्या महिन्याच्या अखेरीस | 109व्या महिन्याच्या अखेरीस |
टीप: सर्व लाभ ऍरियर्समध्ये म्हणजेच विशिष्ट वारंवारतेच्या अखेरीस देय असतील
तुम्ही तुमचे उत्पन्न अर्ध वार्षिक, त्रैमासिक किंवा मासिक वारंवारतेमध्ये मिळवण्याची देखील निवड करु शकता. त्या स्थितीत, प्रथम उत्पन्नाच्या हप्त्याचे पेमेंट अशाप्रकारे केले जाईल:
उत्पन्न विकल्प/ उत्पन्न पेमेंट वारंवारता | वार्षिक | अर्धवार्षिक | त्रैमासिक | मासिक |
---|---|---|---|---|
तात्काळ उत्पन्न विकल्प | 12व्या महिन्याच्या अखेरीस | 6 महिन्याच्या अखेरीस | 3-या महिन्याच्या अखेरीस | 1ल्या महिन्याच्या अखेरीस |
इंटरमिडिएट उत्पन्न विकल्प | 60व्या महिन्याच्या अखेरीस | 54व्या महिन्याच्या अखेरीस | 51व्या महिन्याच्या अखेरीस | 49व्या महिन्याच्या अखेरीस |
डिफर्ड उत्पन्न विकल्प | 120व्या महिन्याच्या अखेरीस | 114व्या महिन्याच्या अखेरीस | 111व्या महिन्याच्या अखेरीस | 109व्या महिन्याच्या अखेरीस |
पात्रता | किमान | कमाल |
---|---|---|
प्रवेशाच्या वेळचे वय | 90 दिवस | तात्काळ उत्पन्न आणि इंटरमिडिएट उत्पन्न पर्याय पीपीटीसाठी 6 – 50 वर्षे पीपीटीसाठी 8 आणि 10 – 55 वर्षे डिफर्ड उत्पन्न विकल्प पीपीटीसाठी 6 – 50 वर्षे पीपीटीसाठी 8 आणि 10 – 60 वर्षे |
मॅच्युरिटीच्या वेळचे वय | 30 वर्षे | 90 वर्षे |
प्रीमियम पेमेंटचे कालावधी (वर्षांमध्ये पीपीटी) | 6 / 8 / 10 | |
पॉलिसी कालावधी (वर्षांमध्ये पीटी) | 30 / 40 | |
प्रीमियम पेमेंट वारंवारता आणि किमान प्रीमियम (रु.) | वार्षिक | 48,000 |
अर्ध वार्षिक | 24,571 | |
त्रैमासिक | 12,432 | |
मासिक | 4,176 | |
सम अशुअर्ड (रु.मध्ये) | 4,80,000 | अमर्याद, बोर्डाने मंजूर केलेल्या अंडररायटिंग धोरणानुसार |
Note:
आमच्या इन्श्युरन्स सेव्हिंग प्लानमध्ये लवचिकतेचा अनुभव घ्या- सेव्ह द डेट गुणविशेष! इतर आयकर बचत योजनांप्रमाणे नसून, तुम्ही वार्षिक उत्पन्न पेमेंट्सची निवड करु शकता आणि सर्व्हायवल लाभ मिळवण्यासाठी प्रथम उत्पन्न ड्यू डेट नंतर 365 दिवसांमधला दिनांक निवडू शकता. त्याला एखाद्या विशेष दिनांकासोबत संरेखीत करा, मग ते वाढदिवस किंवा ऍनिवर्सरीज असू शकतात. पेआउट्स या निवडलेल्या दिनांकावर होतात, सोबत 3% प्रति वर्ष व्याज तो पर्यंत मासिक तत्वावर कंपाउंड केले जाते. लक्षात ठेवा, अखेरचा हप्ता परिपक्वता दिनांकावर दिला जातो. एकदा पॉलिसीच्या सुरुवातीला निवडलेला हा विकल्प पॉलिसी कालावधीसाठी अढळ राहतो.
या बचत पॉलिसीसह रिन्युअल प्रीमियमवरच्या सवलतींना अनलॉक करा. आर्थिक वर्षामध्ये अकरा महिन्यांपर्यंत प्रीमियमच्या अखेरच्या दिनांकाच्या आधी किमान एक महिना प्रीमियम भरा आणि बचतीचा लाभ घ्या. बचतीच्या दराचे गणन 5 वर्ष जी-सेक बॉंड यील्डवर त्रैमासिकाच्या सुरुवातीला केले जाते. शुल्कांना आयआरडीएआय मंजूरीची आवश्यकता असते आणि दराचे गणन ऍडवान्स प्रीमियम पेमेंट दिनांकापासून संपूर्ण महिन्यांच्या अंतिम देय दिनांकापर्यंत केले जाते.
तुमच्या प्रियजनांच्या भविष्याला आमच्या लाईफ इन्श्युरन्ससोबत सेव्हिंग्ज प्लानसह लाईफ कव्हर निरंतरता लाभाने सुरक्षित करा. न भरलेल्या पहिल्या प्रीमियम नंतर देखील मृत्यूपश्चातचे सर्व लाभ एका वर्षासाठी सुरु राहतात. हा कालावधीनंतरच्या विकल्पांमध्ये व्याजसह सर्व थकबाकी प्रीमियम्स भरुन, थकबाकी असलेल्या एक प्रीमियम व्याजासह भरुन कालावधी विस्तारणाने किंवा थकबाकी प्रीमियम्स न भरता कपात केलेल्या पेड-अप लाभांसह पॉलिसी पुनरुज्जीवीत करण्याचा समावेश होतो.
घोटाळे/मिसस्टेटमेंटला वेळोवेळी सुधारणा होत असलेल्या विमा अधिमियम 1938च्या कलम 45च्या तरतुदींनुसार हाताळले जाते. वेळोवेळी सुधारणा होत असलेल्या विमा अधिमियम 1938मध्ये नमुद केले आहे की
हो, तुमच्याकडे इंडियाफर्स्ट लाईफ व्हेवर ऑफ प्रीमियम (डब्ल्यूओपी) रायडर (UIN : 143B017V01) निवडण्याचा विकल्प आहे: या रायडरची जेव्हा निवड केली जाते, तेव्हा तो तुम्हाला तुमच्या आधारभूत पॉलिसीचे भविष्यातले प्रीमियम या स्थितींमध्ये रद्द करण्यामार्फत समर्थन देतो- जर पॉलिसीधारक/ जीवन आश्वस्ताचा मृत्यू झाला, अपघातामुळे स्थायीस्वरुपी संपूर्ण अपंगत्व आले किंवा निवडलेल्या रायडर विकल्पात रायडर बेसिसच्या अंतर्गत परिभाषित केल्यानुसार गंभीर आजार आढळला.
विकल्प | लाभ |
---|---|
मृत्यू झाल्यास प्रीमियम व्हेवर | या विकल्पामध्ये भविष्यातील सर्व थकीत प्रीमियम आणि बेस पॉलिसीच्या अंतर्गत देय असलेले प्रीमियम पॉलिसीधारकाचा मृत्यू होण्याच्या स्थितीत (जेव्हा जीवन आश्वस्त आणि पॉलिसी धारक बेस पॉलिसीच्या अंतर्गत वेगळ्या व्यक्ती असतील तेव्हाच) माफ केला जाईल, जो रायडर आणि लागू असलेल्या बेस पॉलिसीच्या अधीन आहे. |
अपघातामुळे संपूर्ण कायमस्वरुपी अपंगत्वाच्या स्थितीत किंवा गंभीर आजाराच्या (निदानाच्या स्थितीत) प्रीमियम माफ होणे | हा विकल्प भविष्यात देय असलेल्या सर्व आणि बेस पॉलिसीच्या अंतर्गत देय असलेल्या प्रमियम्सना खालील घटना उद्भवण्याच्या किंवा एकामागोमाग एक घडण्याच्या स्थितीत सवलत देतो- अपघातामुळे रायडर जीवन आश्वस्त कायमस्वरुपी संपूर्ण अपंग होणे किंवा रायडर जीवन आश्वस्त रायडरमध्ये आंतर्भूत केलेल्या गंभीर आजारांपैकी एकाने त्रस्त असल्याचे पुष्टी देणारे निदान झाल्यास, हे रायडर आणि लागू असलेल्या पॉलिसीच्या अधीन आहे. |
मृत्यू किंवा अपघातामुळे संपूर्ण कायमस्वरुपी अपंगत्वाच्या स्थितीत किंवा गंभीर आजाराच्या स्थितीत) प्रीमियम माफ होणे | हा विकल्प भविष्यात देय असलेल्या सर्व आणि बेस पॉलिसीच्या अंतर्गत देय असलेल्या प्रमियम्सना खालील घटना उद्भवण्याच्या किंवा एकामागोमाग एक घडण्याच्या स्थितीत सवलत देतो- अपघातामुळे रायडर जीवन आश्वस्त कायमस्वरुपी संपूर्ण अपंग होणे किंवा रायडर जीवन आश्वस्त रायडरमध्ये आंतर्भूत केलेल्या गंभीर आजारांपैकी एकाने त्रस्त असल्याची पुष्टी देणारे निदान झाल्यास, हे रायडर आणि लागू असलेल्या पॉलिसीच्या अधीन आहे. या विकल्पाची निवड करण्यासाठी जीवन आश्वस्त आणि पॉलिसी धारक बेस पॉलिसीच्या अंतर्गत वेगळ्या व्यक्ती असाव्या लागतात. |
जर तुम्ही या रायडरची निवड केल्यास, त्याच्या अंतर्गत प्रीमियम बेस पॉलिसीच्या अंतर्गत असलेल्या प्रीमियमच्या 30% किंवा 100%पेक्षा जास्त असणार नाही, हे रायडर विकल्प निवडण्यावर अवलंबून असेल. या व्यतिरिक्त या रायडरचा कालावधी, बेस पॉलिसीच्या अंतर्गत थकीत प्रीमियम पेमेंट कालावधीपेक्षा जास्त असल्यास तो दिला जाणार नाही.
तुम्ही मिळवलेल्या सरेंडर मूल्याच्या जर ते असेल तर, 80% पर्यंत कर्ज मिळवू शकता. लाभ घेता येण्यायोग्य कर्जाची किमान रक्कम 25000 रु. आहे.
तुमच्या पॉलिसीच्या संपूर्ण लाभांचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला तुमची पॉलिसी सुरु ठेवण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, आम्ही समजू शकतो की काही स्थितींमध्ये तुम्हाला कदाचित तुमची पॉलिसी सरेंडर करावी लागू शकते.
जर तुम्ही तुमचे प्रीमियम पॉलिसीच्या दोन वर्षांपर्यंत पूर्णपणे भरले असतील तर सरेंडर मूल्य मिळवले जाते.
तुम्ही पॉलिसी कालावधीमध्ये आम्हाला लेखी विनंती प्रस्तुत करुन पॉलिसीने सरेंडर मूल्य मिळवल्यानंतर कधीही पॉलिसी सरेंडर करु शकता. कृपया हे लक्षात ठेवा, की तुम्ही एकदा सरेंडर केली की तुम्ही पॉलिसी पुनरुज्जीवीत करु शकत नाही.
सरेंडर केल्यावर देय असलेली रक्कम गॅरंटेड सरेंडर मूल्यापेक्षा (जीएसव्ही) आणि स्पेशल सरेंडर मूल्यापेक्षा (एसएसव्ही) उच्च असते.
गॅरंटेड सरेंडर मूल्य (जीएसव्ही) जीएसव्ही फॅक्टर * भरलेले एकूण प्रीमियम वजा सर्व सर्व्हायवल लाभांची बेरीज आणि लॉयल्टी कॅशबॅक व गॅरंटेड कॅशबॅक असल्यास, जे सरेंडरच्या दिनांकापर्यंत पॉलिसीच्या अंतर्गत आधीच दिले जातात.
जीएसव्ही फॅक्टर्स सरेंडरच्या पॉलिसी वर्षावर आणि पॉलिसी कालावधीवर अवलंबून असतात.
स्पेशल सरेंडर मूल्य असे गणन केले जाईल:
एसएसव्ही फॅक्टर 1* कमाल [(मृत्यू झाल्यावरची पेड-अप आश्वस्त रक्कम), (परिपक्वतेवरची पेड-अप आश्वस्त रक्कम, वजा दिनांकापर्यंतचे सर्व्हायवल लाभ)]
अधिक
एसएसव्ही फॅक्टर 2ए * (पेड-अप उत्पन्न)
अधिक
एसएसव्ही फॅक्टर 2बी * (फ्युचर लॉयल्टी उत्पन्न, डीफर्ड उत्पन्न विकल्पाच्या अंतर्गत पूर्णपणे पेड-अप पॉलिसीसाठी लागू)
अधिक
एसएसव्ही फॅक्टर 3*[( परिपक्वतेवरची पेड-अप आश्वस्त रक्कम)]
अधिक
एसएसव्ही फॅक्टर 4*[(पेड अप गॅरंटीड कॅशबॅक)]
गॅरंटेड सरेंडर मूल्य फॅक्टर्सच्या अधिक माहितीसाठी कृपया पॉलिसी दस्तऐवज पहा किंवा आमच्या बेबसाइटला www.indiafirstlife.com ला भेट द्या किंवा आमच्या आर्थिक सल्लागारांशी संपर्क साधा.
एसएसव्ही फॅक्टरमधला कोणताही बदल नियामक मंजूरीच्या अधीन आहे.
कर लाभ भरलेल्या प्रीमियम्सवर आणि प्रचलित आयकर अधिनियमांनुसार मिळणा-या लाभांवर उपलब्ध असू शकतात. ते शासनाच्या कर अधिनियमांप्रमाणे वेळोवेळी बदलाच्या अधीन आहेत. कृपया गुंतवणूक करण्याआधी तुमच्या कर सल्लागारांचा सल्ला घ्या.
तुम्ही पहिल्या न भरलेल्या नियमित प्रीमियमच्या अंतिम दिनांकापासून परंतु परिपक्वता दिनांकाआधी यामार्फत 5 वर्षांमध्ये तुमच्या पॉलिसीला पुनरुज्जीवीत करु शकता:
आमच्या बोर्डाने मंजूर केलेल्या अंडररायटिंग धोरणासोबत सर्व लाभांसह पॉलिसी पुनरुज्जीवीत होईल. FY23मध्ये पुनरुज्जीवनासाठी आकारला जाणारा वर्तमान व्याजदर 10.50% प्रति वर्ष आहे, ज्याची वेळोवेळी उजळणी होऊ शकते. पुनरुज्जीवन व्याज दरातला कोणताही बदल आयआरडीएआयच्या पूर्व मंजूरीच्या अधीन आहे.
लॅप्स झालेल्या पॉलिसीच्या पुनरुज्जीवनाच्या स्थितीत, पॉलिसी लॅप्स स्थितीत असतानाचे लागू असल्यानुसार आणि देय असल्यानुसार सर्व सर्व्हायवल लाभ पेआउट्स कोणत्याही व्याजाशिवाय एकरकमी दिले जातील.
पेड-अप पॉलिसीच्या पुनरुज्जीवनाच्या स्थितीत, सक्रिय पॉलिसीसाठी लागू आणि देय असलेले सर्व सर्व सर्व्हायवल लाभ पेआउट्स वजा कोणतेही पेड-अप सर्व्हायवल लाभ पेआउट्स जे पॉलिसी पेड-अप स्थितीत असताना आधीच दिले गेले आहेत, व्याजाशिवाय एकरकमी दिले जातील.
पुनरुज्जीवनावर, पॉलिसीच्या अटी व शर्तींनुसार सर्व लाभ सक्रिय पॉलिसीसाठी रिस्टोअर केले जातील. जर लॅप्स झालेली पॉलिसी पुनरुज्जीवन कालावधीच्या समाप्तीपर्यंत पुनरुज्जीवीत केली गेली नाही तर, पॉलिसी रद्द होईल आणि तुम्ही कोणतेही लाभ मिळवण्यास पात्र नसाल.
तुम्ही कोणत्याही अटी व शर्तींशी असहमत असण्याच्या स्थितीत तुम्ही दूरवर्ती मार्केटिंग किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यम वगळता सर्व चॅनल्ससाठी पहिल्या 15 दिवसांमध्ये पॉलिसी परत करु शकता. दूरवर्ती मार्केटिंग किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमासाठी पॉलिसी दस्तऐवज मिळण्यापासून 30 दिवसांचा कालावधी दिलेला आहे. तुम्हाला पॉलिसीचे मूळ दस्तऐवज आणि रद्दीकरणाची कारणे सांगणारे लेखी निवेदन आम्हाला द्यावे लागेल.
तुमची पॉलिसी तुम्ही रद्द केल्यावर काही रिफंड मिळतो का?
हो, आम्ही एवढी रक्कम परत करु-
भरलेला प्रीमियम
वजा: i. प्रो-राटा रिस्क प्रीमियम
वजा: ii. भरलेली कोणतीही स्टॅंप ड्यूटी
वजा: iii. वैद्यकीय चाचणीसाठी, जर असेल तर खर्च आल्यास
इथे प्रो-राटा रिस्क प्रीमियम कव्हरच्या कालावधीसाठी रिस्क प्रीमियमच्या गुणोत्तरात असतो.
दूरवर्ती मार्केटिंगमध्ये विनंतीच्या प्रत्येक कृतीचा (लीड निर्माणासह) आणि खालील माध्यमांनी विमा उत्पादनांच्या विक्रीचा समावेश होतो: (i) ध्वनी माध्यम ज्यामध्ये टेलिफोन कॉलिंगचा समावेश होतो; (ii) शॉर्ट मेसेजिंग सर्विसेस (एसएमएस); (iii) इलेक्ट्रॉनिक मोड ज्यामध्ये ई-मेल, इंटरनेट आणि इंटरऍक्टिव्ह टेलिव्हिजन (डीटीएच) यांचा समावेश होतो; (iv) फिजिकल माध्यम ज्यामध्ये थेट पोस्टल मेल आणि वर्तमानपत्र आणि मासिकांमधल्या पत्रकांचा समावेश होतो; आणि (v) व्यक्ती व्यतिरिक्त इतर संप्रेषण माध्यमांच्या मार्फत केलेली विनंती
जर तुम्ही उच्च ऍन्युअलाइझ प्रीमियमची निवड केली असेल तर आम्ही सुधारीत बेस इन्कम देऊ. ऍन्युअलाइझ प्रीमियम बॅंड्स असे आहेत- 48,000 - 99,999 | 1,00,000 -2,49,999 | 2,50,000 – 4,99,999 | 5,00,000 आणि त्याहून जास्त
चुकवलेल्या प्रीमियम पेमेंट्सचे नॅव्हिगेशन तुमच्या आर्थिक स्थैर्याचे रक्षण करण्यासाठी महत्वपूर्ण असते. जर तुम्ही प्रीमियम भरणे चुकवले असेल तर हे घडेल: जरी तुमच्याकडे सेव्हिंग्ज इन्श्युरन्स प्लान असेल किंवा दुसरा एखादा लाईफ इन्श्युरन्स प्लान असेल, तरी परिणाम समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे.
तुम्ही प्रीमियम भरणे चुकवल्यास हे घडू शकते:
ही पॉलिसी पहिल्या दोन वर्षांचे प्रीमियम पूर्ण भरल्यास गॅरंटेड सरेंडर मूल्य मिळवते.
जर वाढीव कालावधीत प्रीमियम्स भरले गेले नाहीत आणि पॉलिसीने गॅरंटेड सरेंडर मूल्य मिळवले नसेल तर ती लॅप्स होईल.
रिस्क कव्हर बंद होते आणि कोणतेही लाभ देय राहत नाहीत. पण, तुम्ही पुनरुज्जीवन कालावधीच्या आत लॅप्स झालेली पॉलिसी पुनरुज्जीवीत करु शकता.
जर पॉलिसी लॅप्स राहिली आणि पुनरुज्जीवन कालावधीत तिचे पुनरुज्जीवन झाले नाही, तर कोणताही लाभ न देता ती फोरक्लोज (वेळेआधी बंद) केली जाईल.
पॉलिसीने सरेंडर मूल्य मिळवल्यानंतर तुम्ही प्रीमियम चुकवलात, तरी तुम्ही आमच्या लाईफ कव्हर निरंतरता लाभासाठी पात्र असाल. अधिक माहितीसाठी पत्रकाचे कलम 5 पहा.
वाढीव कालावधीत प्रीमियम न भरण्याच्या स्थितीत, पॉलिसी पेड-अप मूल्य मिळवेल, त्यासाठी दोन संपूर्ण वर्षांचे प्रीमियम भरणे आवश्यक आहे.
कपात केलेल्या पेड-अप पॉलिसीला पहिल्या न भरलेल्या प्रीमियमच्या दिनांकापासून पाच वर्षांच्या आत पुनरुज्जीवीत करता येते, हे अटींच्या अधीन आहे.
जर पॉलिसी कपात केलेल्या पेड-अप मोडमध्ये असेल, ती पुनरुज्जीवन कालावधीत पुनरुज्जीवीत केली गेली नाही, तर ती परिपक्वतेपर्यंत, मृत्यूपर्यंत किंवा पॉलिसी सरेंडर होईपर्यंत कपात केलेल्या पेड-अप मोडमध्ये सुरु राहते.
कपात केलेली पेड-अप आश्वत रक्कम मृत्यू झाल्यास किंवा परिपक्वतेवर पेड-अप लाभ उत्पन्न लाभांसह पॉलिसीच्या अंतर्गत भरलेल्या एकूण प्रीमियम्सपेक्षा कमी नसेल.
मृत्यू पश्चातचा लाभ: लाभ यापेक्षा जास्त असेल:
मृत्यू झाल्यावर पेड-अप आश्वस्त रक्कम
परिपक्वतेच्या वेळची पेड-अप आश्वस्त रक्कम वजा दिनांकापर्यंत दिलेले सर्व्हायवल लाभ किंवा
मृत्यूच्या दिनांकावर लागू असलेले सरेंडर मूल्य
सर्व्हायवल लाभ: उत्पन्नाच्या विकल्पावर आधारीत पेड-अप उत्पन्न आणि सुरुवातीला निवडलेली पेमेंट वारंवारता आणि पेड-अप गॅरंटेड कॅशबॅक, लागू असल्यास देय असेल.
परिपक्वता लाभ: परिपक्वता लाभ परिपक्वतेच्या वेळी असलेली पेड-अप आश्वस्त रक्कम असेल.
या तरतुदी याची शाश्वती करतात की जरी प्रीमियम चुकले तरी, हे विकल्प पॉलिसीचे लाभ आणि मूल्य राखण्यासाठी उपलब्ध असतात.
आम्हाला मासिक/ त्रैमासिक/ अर्धवार्षिक/ वार्षिक पेमेंट मोडच्या मार्फत नियमित प्रीमियम्स देता येतात, ज्यांची प्रस्ताव फॉर्ममध्ये तुम्ही निवड करता. प्रीमियम पेमेंट वारंवारता पॉलिसीच्या कोणत्याही वर्षगाठीला बदलता येते, हे किमान प्रीमियम निकष पूर्ण करण्याच्या अधीन आहे. खालील प्रीमियम वारंवारता फॅक्टर्स वार्षिक प्रीमियम्सवर लागू केले जातील.
प्रीमियम वारंवारता | वार्षिक प्रीमियमवर लागू केला जाणारा फॅक्टर |
---|---|
वार्षिक | 1.00 |
अर्ध वार्षिक | 0.5119 |
त्रैमासिक | 0.2590 |
मासिक | 0.0870 |
प्रीमियम्स देय दिनांकांवर किंवा त्याआधी दिले गेले पाहिजेत ज्यामुळे लॅप्स होणे टळते. तुम्ही देय दिनांकावर प्रीमियम भरणे चुकवण्याच्या स्थितीत तुम्हाला मासिक मोडमध्ये 15 दिवसांचा आणि इतर प्रीमियम पेमेंट मोड्समध्ये 30 दिवसांचा वाढीव कालावधी दिला जातो.
उत्पन्न वार्षिक, अर्ध वार्षिक, त्रैमासिक किंवा मासिक वारंवारतेवर घेता येऊ शकते. उत्पन्न हप्त्याची रक्कम वार्षिक उत्पन्नाचा खाली तक्त्यात दिलेल्या घटकांसोबत गुणाकार करुन निर्धारीत केले जाते.
उत्पन्नाच्या पेमेंटची वारंवारता | फॅक्टर |
---|---|
वार्षिक | 1.00 |
अर्ध वार्षिक | 0.49 |
त्रैमासिक | 0.24 |
मासिक | 0.08 |
उत्पन्न लाभ ऍरियर्समध्ये निवडलेल्या उत्पन्न पेमेंट वारंवारतेनुसार देय होतील.
पॉलिसीच्या कोणत्याही वर्षगाठीवर, उत्पन्न वारंवारता पॉलिसीधारकाच्या पसंतीने, किमान एक महिनाआधी पूर्वसूचना देण्यामार्फत बदलता येऊ शकते. या विकल्पाला 5 वर्षांनी एकदा कार्यान्वयीत करता येऊ शकते.
तुम्ही देय दिनांकावर प्रीमियम भरणे चुकवण्याच्या स्थितीत तुम्हाला मासिक मोडमध्ये 15 दिवसांचा आणि इतर प्रीमियम पेमेंट मोड्समध्ये 30 दिवसांचा वाढीव कालावधी दिला जातो. जीवन आश्वस्ताचा मृत्यू होण्याच्या किंवा निवडलेल्या लाभ विकल्पाप्रमाणे आंतर्भूत केलेली कोणतीही घटना घडण्याच्या स्थितीत, आम्ही मृत्यूच्या किंवा आंतर्भूत घटनेच्या दिनांकापर्यंत न दिलेल्या प्रीमियम्सना वजा करुन लाभ देऊ. या कालावधीमध्ये पॉलिसीला सक्रिय मानले जाईल.
उत्पन्नाच्या सर्व विकल्पांमध्ये, तुम्ही एका विशिष्ट कालावधीसाठी प्रीमियम्स देता आणि पॉलिसीच्या निवडलेल्या कालावधीच्या अखेरीला नियमित उत्पन्न मिळवता. ज्यावेळी उत्पन्न सुरु होते आणि उत्पन्नातली वाढ निवडलेल्या उत्पन्न विकल्पावर अवलंबून असते.
देय उत्पन्नाच्या रकमेमध्ये दोन घटक असतात:
a.तात्काळ उत्पन्न विकल्प
I. सर्व्हायवल लाभ
लॉयल्टी इन्कम (बेस उत्पन्नात % वाढ)
प्रीमियम पेमेंट कालावधी | पॉलिसी वर्ष | |||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 | 8 | 9 | 10 | |
6 | 0% | 6% | 12% | 18% | 24% | 30% | ||||
8 | 0% | 8% | 16% | 24% | 32% | 40% | 48% | 56% | ||
10 | 0% | 10% | 20% | 30% | 40% | 50% | 60% | 70% | 80% | 90% |
II. परिपक्वता लाभ
सर्व्हायवलवर पॉलिसी कालावधीच्या अखेरपर्यंत, यासाठी सर्व थकीत प्रीमियम भरणे आवश्यक आहे, परिपक्वतेवर आश्वस्त रक्कम देय होईल.
जिथे,
परिपक्वतेवरील आश्वस्त रक्कम बरोबर पॉलिसीच्या अंतर्गत देय असलेल्या सर्व ऍन्युअलाइझ प्रीमियमच्या बेरजेच्या 100% एवढी असते.
स्पष्टीकरण
सावी नावाची 30 वर्षे वयाची स्त्री जी नुकतीच आई बनली आहे, जिला तिच्या वाढत्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दुस-या उत्पन्नाची आवश्यकता आहे. तिने इंडिया फर्स्ट लाईफ गॅरंटी ऑफ लाईफ ड्रिम्सच्या “तात्काळ उत्पन्न” विकल्पाला खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि वार्षिक तत्वावर (कर वगळून) 10 वर्षांसाठी 30 वर्षांच्या पॉलिसी कालावधीसह 100000 रुपये वार्षिक प्रीमियम भरण्याची निवड केली. तिने वार्षिक उत्पन्न पेमेंट वारंवारतेची निवड केली आहे.
प्रीमियम पेमेंट कालावधी | पॉलिसी कालावधी | वार्षिक प्रीमियम | बेस इन्कम (वार्षिक) | इन्कममधली % वाढ 2-या वर्षापा |
---|---|---|---|---|
10 वर्षे | 30 वर्षे | 1,00,000 रु. | रु. 22,153 | 10% दरवर्षी |
सावीला देय असलेले उत्पन्न प्रीमियम पेमेंट कालावधीच्या (पीपीटी) समाप्तीपर्यंत दर वर्षी वाढेल, त्यासाठी त्या त्या वर्षाच्या देय प्रीमियम्सना भरणे आवश्यक आहे. खालील तक्त्यात उत्पन्नाचे वेळापत्रक दाखवले आहे
पॉलिसी वर्षाची अखेर | उत्पन्न | |
---|---|---|
1 | 22,153 | <--या वर्षापासून देय असलेले उत्पन्न |
2 | 24,369 | |
3 | 26,584 | |
4 | 28,799 | |
5 | 31,015 | |
6 | 33,230 | |
7 | 35,445 | |
8 | 37,661 | |
9 | 39,876 | |
10 ते 30 | 42,091 | |
परिपक्वता लाभ | 10,00,000 |
खालील तक्ता प्रीमियम पेमेंट कालावधी आणि पॉलिसी कालावधीच्या विविध संयोजनांसाठी बेस उत्पन्न दाखवतो
प्रीमियम पेमेंट कालावधी | पॉलिसी कालावधी | |
---|---|---|
30 वर्षे | 40 वर्षे | |
6 वर्षे | 16,887 | 17,609 |
8 वर्षे | 20,231 | 21,320 |
10 वर्षे | 22,153 | 23,475 |
तक्त्यामध्ये दाखवण्यात आलेले उत्पन्न वरील कलम 4.a.I मध्ये दिल्यानुसार वाढेल.
b. इंटरमिडिएट विकल्प:
I.सर्व्हायवल लाभ
लॉयल्टी उत्पन्न (बेस उत्पन्नात % वाढ)
प्रीमियम पेमेंट कालावधी | पॉलिसी वर्ष | |||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 | 8 | 9 | 10 | |
6 | 0% | 5% | 10% | 15% | 20% | 25% | ||||
8 | 0% | 10% | 20% | 30% | 40% | 50% | 60% | 70% | ||
10 | 0% | 15% | 30% | 45% | 60% | 75% | 90% | 105% | 120% | 135% |
II. परिपक्वता लाभ
सर्व्हायवलवर पॉलिसी कालावधीच्या अखेरपर्यंत, यासाठी सर्व थकीत प्रीमियम भरणे आवश्यक आहे, परिपक्वतेवर आश्वस्त रक्कम देय होईल.
जिथे,
परिपक्वतेवरील आश्वस्त रक्कम (एसईम) पॉलिसीच्या अंतर्गत देय असलेल्या सर्व ऍन्युअलाइझ प्रीमियमच्या बेरजेच्या 100% एवढी असते.
स्पष्टीकरण
प्रणव नावाचा 35 वर्षांचा निरोगी गृहस्थ इंडिया फर्स्ट लाईफ गॅरंटी ऑफ लाईफ ड्रिम्सच्या “इंटरमिडिएट उत्पन्न” विकल्पाला खरेदी करण्याचा निर्णय घेतो आणि वार्षिक तत्वावर (कर वगळून) 10 वर्षांसाठी 30 वर्षांच्या पॉलिसी कालावधीसह 200000 रुपये वार्षिक प्रीमियम भरण्याची निवड करतो. त्याने वार्षिक उत्पन्न पेमेंट वारंवारतेची निवड केली आहे.
प्रीमियम पेमेंट कालावधी | पॉलिसी कालावधी | वार्षिक प्रीमियम | बेस उत्पन्न (वार्षिक) | बेस इन्कममधली % वाढ 2-या वर्षापासून पुढे | पॉलिसीच्या 5व्या वर्षाच्या अखेरपासून देय उत्पन्न |
---|---|---|---|---|---|
10 वर्षे | 30वर्षे | रु 2,00,000 | रु. 46,288 | दर वर्षी 15% | रु. 74,061 |
प्रवणचे उत्पन्न प्रीमियम पेमेंट कालावधीच्या (पीपीटी) समाप्तीपर्यंत दर वर्षी वाढेल, त्यासाठी त्या त्या वर्षाच्या देय प्रीमियम्सना भरणे आवश्यक आहे. खालील तक्त्यात उत्पन्नाचे वेळापत्रक दाखवले आहे
पॉलिसी वर्षाची अखेर | उत्पन्न | |
---|---|---|
1 | - | |
2 | - | |
3 | - | |
4 | - | |
5 | 74,061 | <--या वर्षापासून उत्पन्न देय होईल |
6 | 81,004 | |
7 | 87,947 | |
8 | 94,890 | |
9 | 1,01,834 | |
10 ते 30 | 1,08,777 | |
परिपक्वता लाभ | 20,00,000 |
खालील तक्ता प्रीमियम पेमेंट कालावधी आणि पॉलिसी कालावधीच्या विविध संयोजनांसाठी प्रणवला देय आलेले पॉलिसीच्या 5 व्या वर्षा अखेरचे उत्पन्न दाखवतो.
प्रीमियम पेमेंट कालावधी | पॉलिसी कालावधी | |
---|---|---|
30 वर्षे | 40 वर्षे | |
6 वर्षे | 54,226 | 54,859 |
8 वर्षे | 67,206 | 69,084 |
10 वर्षे | 74,061 | 76,701 |
तक्त्यामध्ये दाखवण्यात आलेले उत्पन्न वरील कलम 4.a.I मध्ये दिल्यानुसार वाढेल.
c. डिफर्ड उत्पन्न विकल्प:
I. सर्व्हायवल लाभ
लॉयल्टी उत्पन्न (बेस उत्पन्नात % वाढ) | पॉलिसी कालावधी =30वर्षे | पॉलिसी कालावधी =40वर्षे | ||||
---|---|---|---|---|---|---|
पॉलिसी वर्ष/प्रीमियम पेमेंट कालावधी | 6 वर्षे | 8 वर्षे | 10 वर्षे | 6 वर्षे | 8 वर्षे | 10वर्षे |
1-15 | 0% | 0% | 0% | 0% | 0% | 0% |
16-20 | 15% | 30% | 45% | 15% | 30% | 45% |
21-25 | 30% | 60% | 90% | 30% | 60% | 90% |
26-30 | 45% | 90% | 135% | 45% | 90% | 135% |
31-35 | NA | NA | NA | 60% | 120% | 180% |
36-40 | NA | NA | NA | 75% | 150% | 225% |
कॅशबॅकचा प्रकार | लॉयल्टी कॅशबॅक केव्हा दिला जाईल? |
---|---|
लॉयल्टी कॅशबॅक | पॉलिसीच्या 3-या वर्षाच्या अखेरीस देय होईल |
गॅरंटेड कॅशबॅक | प्रीमियम पेमेंट कालावधीच्या अखेरीस देय होईल. |
II. परिपक्वता लाभ
सर्व्हायवलवर पॉलिसी कालावधीच्या अखेरपर्यंत, यासाठी सर्व थकीत प्रीमियम भरणे आवश्यक आहे, परिपक्वतेवर आश्वस्त रक्कम देय होईल.
जिथे,
परिपक्वतेवरील आश्वस्त रक्कम (एसईम) पॉलिसीच्या अंतर्गत देय असलेल्या सर्व ऍन्युअलाइझ प्रीमियमच्या बेरजेच्या 150% एवढी असते.
स्पष्टीकरण
वैभव नावाचा 40 वर्षांचा निरोगी गृहस्थ इंडिया फर्स्ट लाईफ गॅरंटी ऑफ लाईफ ड्रिम्सच्या “डिफर्ड उत्पन्न” विकल्पाला खरेदी करण्याचा निर्णय घेतो आणि वार्षिक तत्वावर (कर वगळून) 10 वर्षांसाठी 30 वर्षांच्या पॉलिसी कालावधीसह 500000 रुपये वार्षिक प्रीमियम भरण्याची निवड करतो. त्याने वार्षिक उत्पन्न पेमेंट वारंवारतेची निवड केली आहे.
प्रीमियम पेमेंट कालावधी | पॉलिसी कालावधी | वार्षिक प्रीमियम | पॉलिसीच्या 10 व्या वर्षाच्या अखेरपासून देय उत्पन्न |
---|---|---|---|
10 वर्षे | 30 वर्षे | 5,00,000 रु. | 2,23,146 रु. |
पॉलिसीच्या 10 वर्षाच्या अखेरपासून वैभवला नियमित उत्पन्न देय होईल. या व्यतिरिक्त लॉयल्टी उत्पन्न देखील देय बनेल. खालील तक्ता देय उत्पन्न लाभ दाखवतो.
पॉलिसी वर्षाची अखेर | कॅशबॅक | उत्पन्न | |
---|---|---|---|
1 | - | ||
2 | - | ||
3 | 2,50,000 | - | |
4 | - | ||
5 | - | ||
6 | - | ||
7 | - | ||
8 | - | ||
9 | - | ||
10 | 2,50,000 | 2,23,146 | <--या वर्षापासून उत्पन्न देय होते
|
11-15 | 2,23,146 | ||
16-20 | 3,23,562 | ||
21-25 | 4,23,977 | ||
26-30 | 5,24,393 | ||
परिपक्वता लाभ | 75,00,000 |
खालील तक्ता प्रीमियम पेमेंट कालावधी आणि पॉलिसी कालावधीच्या विविध संयोजनांसाठी वैभवला पॉलिसीच्या 10 वर्षी देय असलेले उत्पन्न दाखवतो.
प्रीमियम पेमेंट कालावधी | पॉलिसी कालावधी | |
---|---|---|
30 वर्षे | 40 वर्षे | |
6 वर्षे | 1,11,699 | 1,24,236 |
8 वर्षे | 1,78,668 | 1,89,378 |
10 वर्षे | 2,23,146 | 2,29,824 |
तक्त्यामध्ये दाखवण्यात आलेले उत्पन्न वरील कलम 4.a.I मध्ये दिल्यानुसार वाढेल.
जर वार्षिक उत्पन्न पेमेंट वारंवारता निवडली असल्यास. वार्षिक उत्पन्न पेमेंट वारंवारतेशिवाय इतर वारंवारतांसाठी सर्व लाभ ऍरियर्समध्ये म्हणजे दिलेल्या वारंवारतेच्या अखेरीस देय होतील.
मृत्यू पश्चातचा लाभ (सर्व उत्पन्न विकल्पांना लागू होतो)
पॉलिसीच्या कालावधीत जर जीवन आश्वस्ताचा मृत्यू झाला तर, जेव्हा पॉलिसी सक्रिय असते आणि सर्व देय प्रीमियम्स भरले गेले असतील, तर मृत्यू पश्चातचा लाभ देय होईल आणि पॉलिसी रद्द होईल.
मृत्यू पश्चातचा लाभ यांच्याहून सर्वोच्च असेल:
जिथे मृत्यू झाल्यावरची आश्वस्त रक्कम ऍन्युअलाइझ प्रीमियमच्या 10 पट असते, परिपक्वतेवरील आश्वस्त रक्कम पॉलिसीच्या अंतर्गत देय असलेल्या सर्व ऍन्युअलाइझ प्रीमियम्सच्या बेरजेच्या X% असते, जिथे X% तात्काळ आणि इंटरमिडिएट उत्पन्न विकल्पांसाठी 100% असतात आणि डिफर्ड उत्पन्न विकल्पासाठी 150% असतात.
जिथे ऍन्युअलाइझ प्रीमियम पॉलिसीधारकाने निवडलेल्या वर्षात देय असणारी प्रीमियमची रक्कम असेल, त्यामधून कर, रायडर प्रीमियम्स वजा केले जातात, अतिरिक्त प्रीमियम्स आणि मोडल प्रीमियम्ससाठी असलेली लोडिंग्ज, जर असतील तर अंडरराइट केली जातात.
जिथे भरलेले एकूण प्रीमियम्स म्हणजे मिळालेल्या सर्व प्रीमियम्सची बेरीज, वजा कोणतेही अतिरिक्त प्रीमियम, कोणतेही रायडर प्रीमियम आणि लागू असलेले कर असतात.
वर परिभाषित केलेला मृत्यू पश्चातचा लाभ एकतर एकरकमी रकमेच्या स्वरुपात नाहीतर पॉलिसीधारकाने/ वारसाने पॉलिसी कालावधीत कधीही/ जीवन आश्वस्ताच्या मृत्यू झाल्यावर निवडल्याप्रमाणे 5 वर्षांच्या कालावधीत मासिक हप्त्यांमध्ये दिला जातो.
आत्महत्येमुळे मृत्यू होण्याच्या स्थितीत पॉलिसीच्या अंतर्गत जोखमीच्या आरंभाच्या दिनांकापासून 12 महिन्यांच्या आत किंवा पॉलिसीच्या पुनरुज्जीवन दिनांकापासून, लागू असल्याप्रमाणे वारस किंवा पॉलिसीधारकाचा लाभार्थी मृत्यूच्या दिनांपर्यंत भरलेल्या एकूण प्रीमियम्सच्या 80% किंवा मृत्यूच्या दिनांकावर उपलब्ध असलेले सरेंडर मूल्य यापैकी उच्च असलेल्या रकमेला मिळवण्यास पात्र असेल, त्यासाठी पॉलिसी सक्रिय असणे आवश्यक आहे.
तुमच्या गुंतवणूकींवर 7 x परतावा मिळाला तर आश्चर्य वाटेल नाही का? तुमचा शोध इथे संपतो! या सिंगल पेमेंट प्लॅनसोबत, तुम्ही तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करु शकता.
तुम्ही अशा एखाद्या प्लान बद्दल ऐकले आहे का, जो तुम्हाला लाईफ कव्हरसोबत संपत्तीच्या निर्माणात देखील मदत करतो? 1 प्लानमध्ये 2 लाभांचा इंडियाफर्स्ट लाईफ रेडियन्स स्मार्ट इनव्हेस्ट प्लानसोबत आस्वाद घ्या.
तुमच्या सोन्यासारख्या वर्षांना ख-या अर्थाने सोनेरी बनवा! गॅरंटेड पेन्शन प्लानमध्ये गुंतवणूक करा, ज्याची रचना तुमच्या हयातभर उत्पन्न निर्माणासाठी झालेली आहे.
सर्व पहा