भविष्याचा वेध घेणारे, इंडिया फर्स्ट लाईफ, कर्मचाऱ्यांची निरंतर काळजी, शिक्षण आणि आमच्या प्रतिभावान कर्मचाऱ्यांना विकासाच्या संधी देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांसाठी एक एम्प्लॉयी वैल्यू प्रोपोजिशन (ईव्हीपी) तयार केले आहे जेणेकरुन कर्मचारी जे देतात आणि त्यांना जे मिळते त्यात समतोल साधला जातो, जिथे कर्मचारी ’नवीन विचार, मदतीस तत्परता, प्रामाणिकपणा आणि अधिक काम हि महत्वाची मूल्ये देतो आणि या बदल्यात यश साजरे करणे, प्रगती, उत्तम कामाचे कौतुक आणि त्यांना सक्षम बनवणे यासह कर्मचाऱ्यांची ‘काळजी’ घेतली जाते.
योग्य कर्मचारी ओळखणे, त्यांच्या कौशल्य विकासाठी मदत करणे यावर आमची जीवन विमा क्षेत्रात उत्तम कार्य करण्याची क्षमता आणि उत्तम सेवा,अवलंबून आहे. या बाबतीत, इंडिया फर्स्ट लाईफ आपल्या कर्मचाऱ्यांसाठी भरघोस गुंतवणुक करते जेणेकरुन ते उत्कृष्टपणे आपले काम करू शकतील, त्यांना प्रगती साठी संधी मिळतील. आमच्या कर्मचारी जीवन चक्र संभाळण्यातील निरंतर प्रयत्नांचाच परिणाम म्हणूनग्रेट प्लेसेस स टू वर्क सर्वेक्षण 2021नुसार, ‘भारतातील काम करण्यासाठी उत्तम असलेल्या प्रमुख 100 कंपन्यांच्या’ यादीत जागा मिळाली आहे. आमच्या बद्दल ‘इंडियाज बेस्ट कंपनीज टू वर्क फॉर इन बीएफएसआय’ वर्ष 2020 आणि 2021 मध्ये उल्लेख झालेला आहे. जून 30, 2022 ला, आमच्या कडे 3,433 पूर्ण वेळ कर्मचारी आहेत.
आम्ही पुन्हा पुन्हा प्रयत्न करून करुन चांगले बदल घडवत आहोत कारण ज्या ठिकाणी सर्व कर्मचारी आपल्या संपूर्ण क्षमतेनुसार काम करतील आणि त्यांच्या कामाचे कौतुक होईल असे वातावरण तयार करणे हे आमचे लक्ष्य आहे. त्याचप्रमाणे आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांबरोबर घट्ट नाते तयार करणे आणि त्यांना आधार देण्याबरोबरच नवीन कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्याकडेही लक्ष देतो. उत्तम गुणवत्तेच्या कर्मचारी भरतीसाठी आणि ऑनबोर्डिंग प्रक्रिया व्यवस्थित होण्यासाठी ‘HR टेक’ ('PMaps', एक मूल्यांकन प्लॅटफॉर्म आणि 'PATCH ऑप्टिमायझेशन' मॉडेल) चा आम्ही मोठ्या प्रमाणावरवापर करतो. ‘AMBER’ आणि ‘HRकनेक्ट’ च्या माध्यमातून आम्ही अभिप्राय मागवतो ज्यामुळे कर्मचाऱ्यांमधील असंतोष ओळखून आणि त्यांचे मनोबल वाढवणे व कामाच्या ठिकाणी प्रेरणादायक वातावरण निर्माण करणे यासाठी योग्य ती पावले उचलतो.
बीडीएमस्ची कार्यक्षमता वाढवणे आणि यशस्वी व्यवसायासाठी उपयुक्त माहिती देणारे ए-आय आधारित मॉडेल तयार केले आहे. हा प्रभावी कॉर्पोरेट शासन व उत्कृष्ट प्रशिक्षण आणि वैयक्तिक व्यावसायिक लक्ष्यपूर्तिसाठी सहाय्य देणारे वातावरण याच्या माध्यमातून आम्ही सुयोग्य समन्वय साधणारी कामाची जागा देत आहोत हे कायम सुनिश्चित करत असतो. आणि आम्ही विविध वर्कशॉप, मार्गदर्शन सत्र, कोचिंग, ऑन द जॉब प्रशिक्षण आणि विविध कार्यसंबंधी आणि कार्यसंबंधी नसलेले प्रकल्प सुरु ठेवतो जेणेकरुन क्षमता विकास आणि नेतृत्व विकास होत राहतो.
आमचा नवीन व्यवसाय आईआरपी प्रति कर्मचारी, या कालावधीसाठी नवीन बिजनेस आईआरपी म्हणून गणना केली जाते, संबंधित कालावधीच्या शेवटी कर्मचारी संख्येने यास भागल्यास भारतीय रु 3.07 मिलियन, रु 2.88 मिलियन आणि रु 4.11 मिलियन आणि रु 0.86 मिलियन प्रति कर्मचारी गणना होणार. हा प्रकार फिस्कल वर्ष 2020, 2021, 2022 आणि 30 जून 2022 रोजी संपलेल्या तीन महिन्यांसाठी, अनुक्रमे आहे. आमच्याकडे उत्पादनक्षमता-केंद्रित आणि कर्मचारी दीर्घमुदतीसाठी काम करतील असे वातावरण आहे आणि आम्हाला आमच्या त्याचा अभिमान आहे.
आणखी सांगायचे तर, इन्डिया फर्स्ट लाईफ यांना ग्रेट प्लेस टू वर्क इन्स्टीट्यूट कडून वर्ष 2021 साठी भारतातील काम करण्यासाठी उत्तम कंपन्यांपैकी एक आणि टॉप 100 इन्डियाज बेस्ट वर्कप्लेसेस फॉर वूमन हा मान मिळाला आहे, हे सर्व सन्मान आमची संस्था आणि कर्मचारी जे आमचे मूळ तत्व - #CustomerFirst आणि #EmployeeFirst - यानुसार काम करतात, त्यांच्या वचनबद्धतेचे फळ आहे - जे इन्डियाफर्स्ट लाईफ चे केंद्रस्थान आहे. आमचे कर्मचारी हे आमची चालना देणारी, प्रमुख कार्यशक्ती आहेत, आम्हाला वेगळे ठरवणारे आणि आमचे ब्रँड एम्बेसेडर्स आहेत. आमचा प्रमुख मंत्र #EmployeeFirst ने आम्हाला आमचे #CustomerFirst चे ध्येय साध्य करण्यात मदत झाली आहे.