ज्येष्ठ नागरिकांसाठी टर्म इंश्युरन्स काय आहे?
तरुणांच्या आर्थिक पोर्टफोलियोमध्ये टर्म लाईफ इंश्युरन्स प्लान एक महत्त्वपूर्ण भर आहे. शिवाय, तुलनेने कमी प्रिमियम रक्कम मिळवण्यासाठी आयुष्यात शक्य तितके लवकर टर्म इंश्युरन्स खरेदी करण्याचा सुद्धा सल्ला दिला जातो. ही विधाने जरी मोठ्या प्रमाणात बरोबर असली तरी ज्येष्ठ नागरिकांसाठी टर्म इंश्युरन्स उपलब्ध नाही किंवा आवश्यकता नाही असे मानने चुकीचे ठरेल.
भारतामध्ये, 60 वर्षांवरील वयाच्या व्यक्तींसाठी “ज्येष्ठ नागरिक” शब्द वापरला जातो. सर्वसाधारपणे असे मानले जाते कि हे व्यक्ती सेवानिवृत्त आहेत आणि उत्पन्नाच्या प्रमुख स्रोत, जसे महिन्याचा पगार, ऐवजी पेंशन किंवा गुंतवणूकीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर जीवन जगत आहेत.
ज्येष्ठ नागरिकांचे टर्म इंश्युरन्स विशेषकरून वयस्कर लोकांच्या आर्थिक आवस्यकता पूर्ण करतात. हे पूर्वनिर्धारित मुदतीसाठी कवरेज पुरवते, जी पॉलिसी खरेदीच्या वेळी ज्येष्ठ नागरिकाचे वय आणि त्यांच्या सेवानिवृत्तीच्या वास्तविक वयाच्या आधारे निवडली जाऊ शकते. सदर प्लान नामनिर्देशित व्यक्ती/ लाभार्थीला मृत्यू लाभ देतो जो कोणत्याही थकीत कर्ज किंवा खर्च (जसे अंत्यविधीचा खर्च) पूर्ण करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
ज्येष्ठ नागरिकांसाठी टर्म इंश्युरन्स हा त्यांच्याकरीता त्यांच्यावर अवलंबून असलेल्या लोकांसाठी एक वारसा मागे सोडण्याचा मार्ग आहे. हा खात्री करू शकतो कि त्यांची कोणतीही दायित्वे त्यांच्या प्रियजनांसाठी, मग ते त्यांची पत्नी/ पती किंवा मुलं असोत, ओझे बनणार नाही.
उच्च विमा रक्कम असलेल्या टर्म लाईफ इंश्युरन्स प्लानच्या शोधात आहात का? इथे क्लिक करून आमच्या ₹ 1 कोटी टर्म इंश्युरन्स प्लान्स विषयी आणि इतर आणखी जाणून घ्या.
ज्येष्ठ नागरिकांसाठी टर्म इंश्युरन्स कशाप्रकारे काम करते?
ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कोणताही टर्म इंश्युरन्स प्लान हा रेग्युलर टर्म प्लान्स प्रमाणेच काम करतो. तुम्ही एखाद्या वयस्कर व्यक्तीसाठी कोणतीही रेग्युलर टर्म लाईफ इंश्युरन्स पॉलिसी खरेदी करू शकता, फक्त त्यासाठी ते पात्र असले पाहिजेत.
60 वर्षआंवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी टर्म इंश्युरन्स खरेदी करताना एक सामान्य चिंता ही आहे कि ते कदाचित पॉलिसीकरीता वयाची पात्रता निकष पूर्ण करू शकत नसतील. टर्म इंश्युरन्स खरेदी करताना एक महत्त्वपूर्ण गोष्ट ध्यानात ठेवायला हवी की हे प्लान्स सहसा विशिष्ट वयानंतरच्या, सामान्यता 65 वर्षांनंतरच्या लोकांकरीता खरेदीसाठी उपलब्ध नसतील. मात्र, हा निकष वेगवेगळ्या प्लानमध्ये वेगवेगळा असू शकतो. प्लानाच्या स्पेसिफिकेशन्सच्या आधारे, प्रस्तावित कवरेजचा कालावधी 75 वर्षे वयापर्यंत वाढवला जाऊ शकतो.
जेव्हा एक ज्येष्ठ नागरिक एखादा टर्म लाईफ इंश्युरन्स प्लान खरेदी करतात, तेव्हा ते त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींसाठी आर्थिक सहाकार्याचा एक स्रोत मिळवत असतात. विमाधारकाच्या निधनाच्या दुर्दैवी घटनेच्या प्रसंगी, त्यांचे नामनिर्देशित मृत्यू लाभाचा दावा करू शकतात आणि विमाधारकाद्वारे मागे सोडलेल्या दायित्वांची काळजी घेण्यासाठी एक रक्कम मिळवू शकतात.
ज्येष्ठ नागरिकांसाठी टर्म इंश्युरन्स महत्त्वपूर्ण का आहे?
सामान्यतः वयस्कर लोकांकरीता कोणत्याही प्रकारच्या लाईफ इंश्युरन्स साठी जास्त आग्रह केला जात नाही. मात्र, 65 वर्षांवरील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी टर्म इंश्युरन्स महत्त्वपूर्ण असण्याची अनेक कारणे आहेत.
जर तुम्ही पत्नी/पती किंवा इतर कोणत्याही अवलंबितांसोबत जसे आई-वडील, भावंड, मुलगा/मुलगी किंवा नात/नातू, सोबत राहत आहात, तर तुम्हाला कदाचित त्यांच्या आर्थिक भविष्याविषयी चिंता असेल जेव्हा तुम्ही नसाल. या गोष्टीची काळजी घेण्यासाठी वृद्धांचा टर्म लाईफ इंश्युरन्स एक मार्ग आहे.
जर एखाद्या वयस्कर व्यक्तीला त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी मागे काहीतरी सोडून जाण्यासाठी वारसा तयार करायचा असेल, तर ते टर्म इंश्युरन्स वापरून अनेक नामनिर्देशितांची नोंदणी करू शकतात.
रायडर्स द्वारे आरोग्य मदत
टर्म इंश्युरन्सच्या माध्यमातून क्रिटिकल इलनेस आणि ॲक्सीडेंटल परमनंट डिसेबिलिटी सारखे रायडर्स तुम्हाला जीवनातील अशा अनिश्चिततांसाठी आर्थिक मदतीचा स्रोत बनण्यात मदत करू शकतात, ज्यामुळे तुम्हाला अगोदरपेक्षा जास्त दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागू शकते.
जर तुम्ही रिटर्न ऑफ प्रिमियम प्लान असलेला टर्म इंश्युरन्स निवडता, तर कोणतेही लागू शुल्क वजा करून तुम्ही प्लानमध्ये भरलेली प्रिमियमची रक्कम सुद्धा परत मिळवू शकता.
|
ज्येष्ठ नागरिकांसाठी टर्म इंश्युरन्सच्या विशेषता
ज्येष्ठ नागरिकांसाठी एक टर्म प्लान खरेदी करताना, या काही मुख्य विशेषता ध्यानात ठेवा ज्या तुमच्या पॉलिसीसोबत येऊ शकतात.
पॉलिसी अंतर्गत सुरक्षित असलेल्या व्यक्तीसाठी लाईफ कवर ही कोणत्याही टर्म लाईफ इंश्युरन्स प्लानची मूलभूत विशेषता आहे. यामुळे विमाधारकाला ते त्यांच्या मागे हयातीत राहणाऱ्यांसाठी मागे सोडणाऱ्या दायित्वांविषयी निश्चिंत राहता येते.
जर पॉलिसीधारक जुन्या कर प्रणालीच्या अंतर्गत एक करदाता आहे, तर ते भरलेल्या प्रिमियमसाठी सवलतीचा दावा करू शकतात. पॉलिसीतून मिळालेले फायदे सुद्धा प्रचलित कर नियमांच्या अंतर्गत सवलतीसाठी पात्र असू शकतात.
टर्म प्लान्स पॉलिसीधारकाने निवडल्यानुसार एक मर्यादित कालावधीसाठी कवरेज देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. म्हणून, जर विमाधारकाच्या एखाद्या विशिष्ट कालावधीसाठी दायित्वे आहेत, तर ते त्यानुसार कवरेज निवडू शकतात.
लेवल टर्म इंश्युरन्स प्लान आज सर्वात किफायतशीर लाईफ कवर पैकी एक मानला जातो. मर्यादित उत्पन्ना साधनांवर आयुष्य जगत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी, किफायतशीर दरांमध्ये मुख्य कवरेज देणारे प्लान निवडणे आदर्श आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी टर्म इंश्युरन्सचे फायदे
ज्येष्ठ नागरिकांसाठी टर्म इंश्युरन्सचे काही फायदे इथे दिलेले आहेत.
होल लाईफ इंश्युरन्सच्या तुलनेत, टर्म इंश्युरन्स जास्त किफायतशीर आहे ज्यामुळे हा ज्येष्ठ नागरिकांसाठी सुलभ बनतो.
टर्म इंश्युरन्सचे सरळसाधे स्वरुप - मृत्यू लाभासह निश्चित कालावधीसाठी कवरेज - यास समजण्यासाठी आणि सांभाळण्यासाठी सोपे बनवते.
इतर काही लाईफ इंश्युरन्स पॉलिसीच्या विरुद्ध, टर्म इंश्युरन्समध्ये कोणत्याही बाजाराशी संलग्न गुंतवणूकीचा समावेस नसतो, ज्यामुळे जोखीम कमी होते.
टर्म इंश्युरन्ससाठी भरलेले प्रिमियम लागू कर कायद्यांनुसार कर कपातीसाठी पात्र असू शकतात, ज्यामुळे अतिरिक्त आर्थिक मदत मिळते.
पॉलिसीधारकाला आत्मविश्वासाची जाणीव मिळते कि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांच्या प्रियजनांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
योग्य ज्येष्ठ नागरिक टर्म इंश्युरन्स पॉलिसी कशी निवडायची?
जर तुम्ही एक वयस्कर व्यक्ती आहात जे टर्म इंश्युरन्स प्लानच्या शोधात आहात, तर तुम्ही या काही गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत.
कवरेजच्या गरजांचे मूल्यमापन करा
कवरेजची रक्कम निवडताना विद्यमान कर्ज, आर्थिक जबाबदाऱ्या आणि तुमच्या अवलंबितांना पाहिजे असलेल्या जीवनशैलीचा विचार करा.
पॉलिसीची मुदत तुमचे वय आणि आरोग्याच्या स्थितीच्या अनुरुप असल्याची खात्री करा. छोटी मुदत कदाचित वयस्कर व्यक्तींसाठी जास्त योग्य असू शकते.
टर्म इंश्युरन्स कॅलक्युलेटर वापरून वेगवेगळ्या विमा कंपन्यांच्या प्रिमियमची तुलना करा आणि तुमच्या बजेटमध्ये बसणारा प्रिमियम निवडा.
विमा कंपनीची प्रतिष्ठा तपासा
विश्वसनीयतेची खात्री करण्यासाठी चांगला क्लेम सेटलमेंट रेशियो आणि चांगला ग्राहक फीडबॅक असलेली विमा कंपनी निवडा.
आरोग्याच्या आवश्यकतांचा विचार करा
काही पॉलिसींकरीता वैद्यकीय तपासणीची आवश्यकता असू शकते, तर इतर काही तपासणीशिवाय कवरेज देऊ शकतात. तुमच्या आरोग्याच्या परिस्थितीच्या आधारे या पर्यायांचे मूल्यांकन करा.
तुमचे कवरेज वाढवण्यासाठी क्रिटिकल इलनेस कवर किंवा ॲक्सीडेंटल डेथ बेनेफिट सारख्या अतिरिक्त रायडर्सचा विचार करा.
ज्येष्ठ नागरिकांसाठी टर्म इंश्युरन्ससोबत कोणते रायडर्स उपलब्ध आहेत?
क्रिटिकल इलनेस रायडर : पॉलिसीधारकाला कर्करोग किंवा हृदयरोग सारख्या गंभीर आजारांनी निदान झाल्यास एकरकमी लाभ देतो.
ॲक्सीडेंटल डेथ रायडर : पॉलिसीधारकाचा अपघातामुळे मृत्यू झाल्यास अतिरिक्त मृत्यू लाभ देतो.
वेवर ऑफ प्रिमियम रायडर : पॉलिसीधारक कायमस्वरुपी अपंग झाल्यास किंवा गंभीररित्या आजारी पडल्यास भविष्यात प्रिमियम माफ करतो.
- इंकम बेनेफिट रायडर: पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर विशिष्ट कालावधीसाठी कुटुंबाला नियमित उत्पन्न देतो.
- हॉस्पिटल कॅश रायडर: हॉस्पिटलमध्ये भरती झालेले असताना दररोज रोख लाभ देतो, ज्यामुळे वैद्यकीय खर्च कवर करण्यास मदत होते.
ज्येष्ठ नागरिकांसाठी एखादा टर्म प्लान खरेदी करताना कोणत्या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात?
आरोग्य : विमा काढायचा असलेल्या व्यक्तीचे आरोग्य टर्म इंश्युरन्सकरीता प्रिमियम आणि पात्रता निश्चित करण्यात उल्लेखनीय भूमिका निभावते.
पॉलिसी मुदत : तुमच्या भविष्यातील आर्थिक जबाबदाऱ्या आणि आयुर्मानाशी अनुरुप मुदत निवडा.
विमा रक्कम : कर्ज, वैद्यकीय खर्च आणि दररोजचा उदरनिर्वाहाचा खर्च या सह तुमच्या कुटुंबाच्या गरजा कवर करण्यासाठी विमा रक्कम पुरेशी असल्याची खात्री करा.
प्रिमियमचा किफायतशीरपणा : तुमच्या निश्चित उत्पन्न किंवा सेवानिवृत्तीच्या बचतीचा विचार करून, प्रिमियम किफायतशीर असल्याची खात्री करा.
विमा कंपनीची विश्वसनीयता : विमा कंपनीची विश्वसनीयता तपासण्यासाठी क्लेम सेटलमेंट रेशियो आणि ग्राहकांचे रिव्यू तपासा.
पॉलिसीतीली अपवाद : तुमच्या कवरेजवला प्रभावित करणाऱ्या कोणत्याही अपवाद किंवा नियमांतविषयी जाणून घ्या, जसे आधीच असलेल्या आरोग्याच्या समस्या.
आमच्या ऑनलाइन टर्म इंश्युरन्स कॅलक्युलेटरने प्रिमियमचा अनुमान मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू)
ज्येष्ठ नागरिकांसाठी टर्म इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी कमाल वय काय आहे?
विमा कंपनीच्या आधारे, हे सामान्यतः 65 ते 75 वर्षे आहे.
तुम्ही आवश्यक लाईफ कवर कसे निश्चित करता?
हे तुमच्या आर्थिक जबाबदाऱ्या, विद्यमान कर्ज आणि तुमच्या अवलंबितांच्या भविष्यातील गरजांच्या आधारे असले पाहिजे. योग्य विमा रकमेचा अनुमान काढण्यासाठी टर्म इंश्युरन्स कॅलक्युलेटर वापरण्याचा सल्ला दिला जातो.
ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वोत्तम टर्म इंश्युरन्स प्लान कसा खरेदी करायचा?
प्रिमियम, कवरेज, पॉलिसी मुदत आणि अतिरिक्त लाभांच्या आधारे वेगवेगळ्या प्लान्सची तुलना करा. संपूर्ण मूल्यांकन करण्यासाठी ऑनलाइन कंपेरिजन टूल्स वापरण्याचा विचार करा.
काही मुख्य फॅक्टर्स कोणते आहेत जे ज्येष्ठ नागरिकांसाठी टर्म इंश्युरन्स प्रिमियमवर परिणाम करू शकतात?
मुख्य फॅक्टर्समध्ये वय, आरोग्याची स्थिती, जीवनशैलीच्या सवयी (जसे धुम्रपान) आणि निवडलेली विमा रक्कम यांचा समावेश आहे. वैद्यकीय तपासणीचा सुद्धा प्रिमियमवर परिणाम होऊ शकतो.
ज्येष्ठ नागरिकांचा टर्म प्लान नियमित उत्पन्न लाभाच्या पर्यायासोबत येतो का?
होय, ज्येष्ठ नागरिकांचा टर्म प्लान नियमित उत्पन्न लाभाचा पर्याय देऊ शकतो, जो लाभार्थींना आर्थिक मदत सुरु राहील याची खात्री करत मृत्यू लाभ हप्त्यांमध्ये देतो.
ज्येष्ठ नागरिकांसाठी टर्म इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी जास्तीत जास्त वय काय आहे?
सामान्यपणे ज्येष्ठ नागरिकांसाठी टर्म इंश्युरन्स मिळवण्यासाठी जास्तीत जास्त वय 75 वर्षे आहे, मात्र हे वेगवेगळ्या विमा कंपन्यांनुसार वेगवेगळे असू शकते.