एक लाईफ इन्शुरन्स पॉलिसी एक सर्वोत्तम आर्थिक सुरक्षा योजना आहे कारण ही अनेक फायदे देते.
आर्थिक सुरक्षा: जर तुम्ही एक मोठे लाईफ कव्हरखरेदी केले , तर तुमच्या आकस्मिक मृत्यूच्या परिस्थितीत, तुमच्यावर अवलंबून असणाऱ्यांना एकरकमी मृत्यू लाभाच्या स्वरुपात हे दिले जाईल. यामुळे त्यांना आरामात जगण्यात मदत होऊ शकते, विशेषकरून जर त्यांच्याकडे उत्पन्नाचे स्रोत नसतील आणि लहान मुलं किंवा वृद्ध आई-वडील आहेत.
संपत्ती निर्मिती: काही लाईफ इन्शुरन्स प्लॅन्स गुंतवणूक आणि इन्शुरन्स असा इन्शुरन्स दुहेरी फायदा देतात. इन्शुरन्स कंपनी तुमची संपत्ती वाढवण्यासाठी भरलेल्या प्रिमियमचा एक भाग इक्विटी फंडमध्ये गुंतवते, तर उर्वरित लाईफ कव्हरमध्ये जातो.
जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर संरक्षण: तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी आर्थिक सुरक्षा असो, कमावणाऱ्याच्या मृत्यूनंतर उत्पन्नाचा एक स्थिर स्रोत असो, सेवानिवृत्तीचे नियोजन असो किंवा फक्त दीर्घकालीन बचत असो, प्रत्येक गरजेसाठी एक लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आहे.
कर बचत: आयकर कायद्याचा कलम 80 सी, प्रिमियम भरणा कर-मुक्त बनवतो, ज्यामुळे तुमचे करयोग्य उत्पन्न कमी होते. शिवाय, कलम 10 (10डी) खात्री करतो कि पेआउट्स सुद्धा कर-मुक्त राहतील. हे कर कायदे लाईफ इन्शुरन्सला एक योग्य गुंतवणूक बनवतात.
सेवानिवृत्तीचे नियोजन: तुमच्या कामाचा कालावधी संपू शकतो, मात्र तुमचे रोजचे खर्च सुरुच राहतील. एक रिटायरमेंट लाईफ इन्शुरन्स पॉलिसी, कव्हरेज आणि उत्पन्नाचा एक स्थिर स्रोत देते जी दररोजच्या खर्चांसाठी, छोटासा व्यवसाय उभारणीसाठी भांडवल देऊ शकते किंवा इतर आर्थिक साधनांमध्ये पुन्हा गुंतवणूक केली जाऊ शकते.
सुरक्षित गुंतवणूक: बाजाराशी संलग्न परतावे देणारे आर्थिक प्रोडक्ट्स बाजारातील अस्थिरतेच्या अधीन असतात, ज्यामुळे ते जोखमीचे बनतात. लाईफ इन्शुरन्स, मात्र, प्रिमियम भरण्याच्या बदल्यात तुम्हाला खात्रीशीर फायदे देतो.
कर्जाचे पर्याय: एखाद्या अनपेक्षित आर्थिक संकटाच्या परिस्थितीत, लाईफ इन्शुरन्स तुम्हाला, पॉलिसीच्या नियम आणि अटींच्या आधारे, इन्शुरन्स रकमेतून उधार घेऊ देतो.
रायडर्स: रायडर्स हे अतिरिक्त फायदे आहेत जे तुम्ही तुमची लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आणखी मजबूत बनवण्यासाठी खरेदी करू शकता. रायडर्स तुमचे अनिश्चिततांपासून संरक्षण करतात जसे गंभीर आजार, अपघाती मृत्यू, किंवा संपूर्ण कायमस्वरुपी/आंशिक अपंगत्व ज्यामुळे उत्पन्नाचे नुकसान होऊ शकते.