Menu
close
एक्सपर्टला विचारा arrow

लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा

तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.

right-icon-placeholder
right-icon-placeholder
male male

पुरुष

male male

महिला

male male

इतर

मुख्य वैशिष्ट्ये

भरणा करण्याचे सोयिस्कर पर्याय

तुमचे दीर्घकालीन ध्येय पूर्ण करण्यासाठी तुमच्या प्रीमियम भरण्याच्या वेळापत्रकाशी जुळणाऱ्या पर्यायासह, छोट्या कालावधीचा भरणा करण्याचा पर्याय

cover-life

अखंडित लाईफ कव्हरचा आनंद घ्या

तुमचा एक प्रीमियमजरी चुकला तरी विमा संरक्षण कायम ठेवा, हे दोन वर्षांसाठी पूर्ण प्रीमियम भरणा केल्यानंतरच लागू होते.

wealth-creation

संभावित लाभ

कमाईमध्ये वृद्धीचा आनंद घ्या वार्षिक बोनससह, घोषित झाल्यास,.

secure-future

सर्व्हायव्हल लाभ

जीवित राहिल्यास लाभ म्हणून एक वार्षिक प्रीमियमच्या 103% परत प्राप्त करा.

many-strategies

परिपक्वता लाभ

मुदतीच्या शेवटी परिपक्वता म्हणून विमा रकमेसोबत जमा बोनस (घोषित झाल्यास) मिळवा.

secure-future

वेव्हार ऑफ प्रीमियम रायडर

वेव्हार ऑफ प्रीमियम रायडर^ घ्या आणि अखंडित पॉलिसी लाभांची खात्री करा आणि कोणत्याही दुर्दैवी प्रसंगी भविष्यातील प्रीमियम भरण्याच्या ओझ्यापासून तुमच्या प्रियजनांना सुरक्षित करा.

secure-future

सोयिस्कर ऑनलाइन खरेदी

तुमच्या सोयीनुसार, सहजपणे तुमची पॉलिसी ऑनलाइन खरेदी करा.

many-strategies

कर लाभ

प्रचलित कर कायद्यांचे पालन करून, प्रीमियम आणि लाभांवर संभावित बचत करा.

many-strategies

इंडियाफर्स्ट लाईफ स्मार्ट पे प्लॅन कसा खरेदी करायचा?

टप्पा 1

तुमची माहिती द्या

फक्त तुमचे नाव, मोबाइल क्रमांक आणि इतर मूलभूत माहिती प्रविष्ट करा.

choose-plan

टप्पा 2

कव्हरेज आणि पॉलिसीची मुदत निवडा

तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुमची इच्छित विमा रक्कम आणि एकतर 10 किंवा 15 वर्षांचा पॉलिसी कालावधी निवडा.

premium-amount

टप्पा 3

तुमचे कोटेशन तपासा

निवडलेल्या कव्हरेजसाठी तुमचे वैयक्तिक कोटेशन मिळवा आणि ते तपासा.

select-stategy

टप्पा 4

आमच्या तज्ञांशी बोला

पुढील टप्पे समजून घेण्यात आमचे सेल्स प्रतिनिधी तुम्हाला मदत करतील.

make-payments

टप्पा 5

तुमची खरेदी पूर्ण करा

भरणा करुन तुमचा अर्ज निश्चित करा.

make-payments

तुमच्या योजनेची कल्पना करा

alt

वय 40

श्री कुमार यांनी 15 वर्ष पॉलिसी मुदतीचा आणि ₹ 1,50,000 विमा रकमेचा इंडियाफर्स्ट लाईफ स्मार्ट पे प्लॅन खरेदी केला, ज्यासाठी ते 8 वर्षांसाठी वार्षिक ₹ 19,200 प्रीमियम भरत आहेत.

alt

वय 47

श्री कुमार यांना वेळेवर ₹ 19,776 चा मॅच्युरिटीलाभ मिळतो जो त्यांच्या वार्षिक प्रीमियमचा 103% आहे, जो त्यांच्या कुटुंबाच्या गरजांसाठी आर्थिक मदतआहे.

alt

Age 55

At the end of the plan term, he will receive the maturity benefit of INR 1,50,000 @4% or INR 2,25,375 @ 8%.

alt

Death Benefit

Even in case of his death during the policy term, his loved ones are safeguarded with the life cover through a lumpsum or in instalment over a period of 5 years.

alt

पात्रता निकष

नोंदणीच्या वेळी वय

Question
नोंदणीच्या वेळी वय
Answer

किमान 

  • 10 वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी 8 वर्षे
  • 15 वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी 3 वर्षे
     

कमाल: 50 वर्षे

Tags

परिपक्वतेच्या वेळी कमाल वय

Question
परिपक्वतेच्या वेळी कमाल वय
Answer

65 वर्षे

Tags

पॉलिसी मुदत

Question
पॉलिसी मुदत
Answer

10 आणि 15 वर्षे

Tags

प्रीमियम भरण्याचा कालावधी (PPT)

Question
प्रीमियम भरण्याचा कालावधी (PPT)
Answer

10 वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी

  • 5 वर्षे

15 वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी

  • 5/6/7/8 वर्षे
Tags

विमा रक्कम

Question
विमा रक्कम
Answer

किमान: ₹1,50,000.
 

कमाल: हमीच्या अधीन कोणतीही मर्यादा नाही.

Tags

प्रीमियमची पद्धत

Question
प्रीमियमची पद्धत
Answer

वार्षिक, अर्धवार्षिक, त्रैमासिक किंवा मासिक.

Tags

कमाल प्रिमियम

Question
कमाल प्रिमियम
Answer

बोर्ड अनुमोदित हमी धोरणाच्या अधीन कोणतीही मर्यादा नाही

Tags

किमान प्रिमियम

Question
किमान प्रिमियम
Answer
  • मासिक: ₹1,556
  • त्रैमासिक: ₹4,662
  • अर्धवार्षिक: ₹9,215
  • वार्षिक: ₹18,000

 

Tags

लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे

विनासायास नोंदणी प्रक्रिया

माझ्यासाठी नोंदणीपासून सर्व वैद्यकीय तपासण्यांपर्यंत, इंडियाफर्स्ट लाईफ ने सर्व काही सुकर केले. मी घेतलेल्या प्लॅनची वैशिष्ट्ये माझ्या अपेक्षांप्रमाणे आहेत, जी मला भविष्याबद्दल मनःशांती देतात.

मोहित अगरवाल

(मुंबई, 21 मार्च 2024)

लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे

ऑनलाईन खरेदीचा सुखद अनुभव

इंडियाफर्स्ट लाईफकडून लाईफ इन्शुरन्स पॉलिसी विकत घेणे हा माझ्यासाठी सुखद अनुभव होता. कंपनीच्या प्रतिनिधींसोबत विनासायास संवाद हा वरदानासारखा होता आणि त्याचप्रमाणे अति आवश्यक वैशिष्ट्यांना प्लॅनमध्ये घेणेही.

सत्यम नागवेकर

(मुंबई, 22 मार्च 2024)

लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे

माझ्या आर्थिक प्रवासातील विश्वासू सहकारी

इंडियाफर्स्ट लाईफ रेडियंट स्मार्ट इन्व्हेस्ट प्लॅन ने मला जिंकून घेतले! आर्थिक प्रवासात विश्वासू सहकारी असल्यासारखे आहे. त्याच्या फंड स्विचच्या फ्लेक्झिबल पर्यायांमुळे, मी जसा विचार केला होता त्याप्रमाणे माझ्या गुंतवणुकी करू शकतो. माझ्या गुंतवणुकीवर 20% चे घसघशीत परतावे मिळाले आहेत! नोंदणी टीम कडून मिळालेला आधार खूपच सुंदर होता, ज्यामुळे माझी खरोखरच काळजी घेत असल्याचे आणि आधार दिल्याचे जाणवले.

पौलोमी बॅनर्जी

(कोलकाता, 21 मार्च 2024)

आम्ही कशाप्रकारे मदत करू शकतो?

View All FAQ

इंडियाफर्स्ट लाईफ स्मार्ट पे प्लॅन काय आहे?

Answer

सादर आहे इंडियाफर्स्ट लाईफ स्मार्ट पे प्लॅन, ज्यात  लाईफ इन्शुरन्स  आणि बचत प्लॅन एकत्रित आहे. हा फक्त स्मार्ट पेमेंट प्लॅनच नाही; तर एक आय कर-बचत योजना सुद्धा आहे. या मनी-सेविंग प्लॅनने, तुम्ही मर्यादित कालावधीसाठी प्रीमियम भरता, आणि या कालावधीच्या दरम्यान तुम्हाला काही रक्कम परत मिळू शकते. तुमचा एखादा  प्रीमियम भरणा जरी चुकला, तरी तुमचे लाईफ कव्हर चालू राहते. या व्यतिरिक्त, जेव्हा हा स्मार्ट टर्म पेमेंट प्लॅन मॅच्युअर होतो, तेंव्हा बोनस (घोषित झाल्यास) तुम्हाला मिळू शकतो. कोणत्याही दुर्दैवी घटनेच्या प्रसंगी हा प्लॅन तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी लाईफ कव्हर सुद्धा देतो. हा अधिक लवचिकता आणि सुरक्षेसह तुमच्या आर्थिक लक्ष्यांपर्यंत पोहोचण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी तयार केलेला आहे.

तुमच्या पॉलिसीमध्ये उपलब्ध फ्री लूक पिरियड काय आहे?

Answer

फ्री लूक पिरियडच्या दरम्यान तुम्ही तुमची पॉलिसी परत करु शकता;
जर तुम्ही पॉलिसीच्या कोणत्याही अटी आणि नियमांशी असहमत असाल, तर तुमच्याकडे पॉलिसीच्या अटी आणि नियम तपासण्याचा पर्याय आहे आणि जर तुम्ही त्या अटी किंवा नियमांपैकी कशाशीही असहमत असाल, तर तुमच्याकडे पॉलिसी प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत तुमचा आक्षेपाचे कारण सांगून, पॉलिसी रद्द करण्यासाठी कंपनीकडे पॉलिसी परत पाठवण्याचा पर्याय आहे. डिस्टन्स मार्केटिंग किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने खरेदी केलेल्या पॉलिसींसाठी फ्री-लूक पिरियड 30 दिवसांचा असेल.

तुम्ही तुमची पॉलिसी रद्द करता तेव्हा तुम्हाला काही रिफंड मिळतो का?

होय. आम्ही पुढील रक्कम परत करू -
भरणा केलेला प्रीमियम
वजा: i. पॉलिसी ज्या कालावधीसाठी, कोणताही असल्यास, लागू होती त्यासाठी प्रो-रेटा जोखिम प्रीमियम आणि रायडर प्रीमियम
वजाii. भरलेली कोणताही स्टँप ड्युटी
वजाiii. वैद्यकीय तपासणीवर, कोणतीही केली असल्यास, झालेला खर्च
डिस्टन्स मार्केटिंग मध्ये खालील माध्यमांद्वारे इन्शुरन्स प्रोडक्ट्सच्या विक्री आणि विनंतीच्या प्रत्येक कृतींचा (लीड निर्मितीसह) समावेश आहे: (i) वॉइस मोड, ज्यात टेलिफोन कॉलिंगचा समावेश आहे; (ii) शॉर्ट मेसेजिंग सर्विस (एसएमएस); (iii) इलेक्ट्रॉनिक मोड ज्यात ई-मेल, इंटरनेट आणि इंटरॅक्टिव टिव्ही (डीटीएच) चा समावेश आहे; (iv) फिजिकल मोड ज्यात थेट पोस्टाने आणि वर्तमानपत्रे व मॅगझीनमधील पत्रकांचा ; आणि, (v) वैयक्तिकपणे सोडून संपर्काच्या इतर कोणत्याही माध्यमांद्वारे विनंती यांचा समावेश आहे.

या पॉलिसीमध्ये मला कर्ज मिळू शकते का?

Answer

होय, या प्लॅन अंतर्गत तुम्हाला कर्ज सुविधेचा लाभ मिळू शकतो.
कोणत्याही क्षणी तुम्ही घेऊ शकणाऱ्या कर्जाची रक्कम, सरेंडर मूल्यावर अवलंबून असेल. तुम्ही उपलब्ध सरेंडर मूल्याच्या 90% पर्यंत रक्कम कर्जाऊ  घेऊ शकता. कर्जाची कमीत कमी रक्कम ₹ 1,000 असली पाहिजे. आम्ही प्रति वर्ष 10% च्या दराने व्याज आकारू, जो आयआरडीएआयच्या स्वीकृतीच्या अनुसार वेळोवेळी बदलला जाऊ शकतो. जेव्हा जमा व्याजासह कर्जाची रक्कम सरेंडर मूल्यापेक्षा वाढते, पॉलिसी मुदतपूर्व बंद केली जाईल आणि जमा व्याजासह थकीत कर्जसरेंडर मूल्यातून वसूल केले जाईल. व्याजासह थकीत कर्जाची मृत्यू किंवा मॅच्युरिटीच्या आधी परतफेड न केल्यास, मृत्यू/मॅच्युरिटी लाभातून त्याची वसूली केली जाईल.

तुम्ही तुमची पॉलिसी सरेंडर करू शकता का?

Answer

तुमच्या पॉलिसीच्या संपूर्ण लाभांचा आनंद घेण्यासाठी तुमची पॉलिसी सुरु ठेवण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, आम्हाला कल्पना आहे की काही परिस्थितींमध्ये तुम्ही तुमची पॉलिसी सरेंडर करू इच्छित असाल. दोन संपूर्ण वर्षांचा प्रीमियम भरणा केल्यानंतर पॉलिसीला सरेंडर मूल्य प्राप्त होईल.
सरेंडर करण्याच्या वेळी गॅरंटीडसरेंडर व्हॅल्यू (जीएसव्ही) किंवा स्पेशल सरेंडर व्हॅल्यू (एसएसवी) पैकी जी जास्त असेल तर देय असेल. पॉलिसीची मुदत आणि सरेंडरचे पॉलिसी वर्ष यांच्याअनुसार देय असलेले सरेंडर मूल्य बदलेल. जीएसव्ही फॅक्टर्स, सरेंडरचे पॉलिसी वर्ष आणि पॉलिसी मुदतीवर अवलंबून आहे. इथे जीएसव्ही फॅक्टर्सचे दोन संच आहेत. जीएसव्ही फॅक्टरचा एक संच एकूण भरलेल्या प्रीमियमवर लागू होईल आणि जीएसव्ही फॅक्टरचा दुसरा संच सरेंडरच्या तारखेपर्यंत जमा झालेल्या कोणत्याही विद्यमान सरळ प्रत्यावर्ती बोनस (घोषित झाल्यास) वर लागू होईल.
जीएसव्ही= प्रीमियमसाठी जीएसव्ही फॅक्टर * एकूण भरणा केलेला प्रीमियम, ज्यात लागू कर, रायडर प्रीमियम कोणतेही असल्यास आणि अतिरिक्त प्रीमियम, कोणतेही असल्यास, समाविष्ट नाही; अधिक
सरळ प्रत्यावर्ती बोनस * अधिक सरळ प्रत्यावर्ती बोनस (घोषित झाल्यास) साठी जीएसवी फॅक्टर; वजा
सरेंडरच्या तारखेपर्यंत भरणा केलेल्या वार्षिक प्रीमियम, कोणताही असल्यास, च्या 103% इतर उत्तरजीवित लाभ.
एसएसव्ही असेल = {(भरणा केलेल्या प्रीमियमची एकूण संख्या/पॉलिसी मुदतीच्या दरम्यान देय प्रीमियमची एकूण संख्या) x (सम अशुअर्ड अधिक पॉलिसीच्या अंतर्गत देय वार्षिक प्रीमियमचा  103% इतका जीवित राहिल्यास लाभ);
वजा, सरेंडरच्या तारखेपर्यंत भरणा केलेल्या वार्षिक प्रीमियम, च्या 103% कोणताही असल्यास,जीवित राहिल्याचा लाभ; अधिक, सरळ प्रत्यावर्ती बोनस (घोषित झाल्यास) गुणिले सरेंडरच्या वेळी प्रचलित एसएसव्ही फॅक्टर.
नियायमकाच्या पूर्व मंजूरीच्या अधीन एसएसव्ही फॅक्टर आमच्या द्वारे वेळोवेळी निश्चित केला जाईल. जीएसव्ही फॅक्टर्स जोडपत्र I मध्ये नमूद केल्याप्रमाणे आहे.

ही पॉलिसी कशाप्रकारे काम करते?

Answer

खालील दिलेल्या उदाहरणात आम्ही पॉलिसीचे कार्य स्पष्ट केलेले आहे.
40 वर्षीय श्री. कुमार यांनी 15 वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी इंडियाफर्स्ट लाईफ स्मार्ट पे प्लॅन खरेदी केला. त्यांनी 8 वर्षांच्या प्रीमियम भरायच्या मुदतीसाठी आणि परिपक्वतेच्या वेळी ₹ 150,000 च्या गॅरंटीड विमा रकमेसाठी ₹ 19,200 (कर वगळून) चा वार्षिक प्रीमियम भरला. शेवटचा प्रीमियम भरणा करायच्या अगदी आधी, कुमार यांना ₹ 19,776 चा जीवित राहिल्याचा लाभ प्राप्त होईल; जो त्यांच्या वार्षिक प्रीमियमचा 103% आहे. प्लॅनच्या मुदतीच्या शेवटी, त्यांना 4% दराने ₹ 169,776 किंवा 8% दराने ₹ 248,526 चा मॅच्युरिटी लाभ प्राप्त होईल. पॉलिसी मुदतीच्या दरम्यान त्यांचे निधन झाल्यावर सुद्धा, त्यांचे प्रियजन लाईफ कव्हरने सुरक्षित राहतील. पॉलिसीमधील हा मृत्यू लाभ एकरकमी स्वरुपात किंवा 5/10/15 वर्षांच्या कालावधीत हप्ता स्वरुपात मिळणे श्री कुमार निवडू शकतात.  

या पॉलिसीमधील मूलभूत पात्रता निकष काय आहेत?

Answer

 

निकषपैलू
नोंदणीच्या वेळी वय

किमान*– 10 वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी 8 वर्षे ;
                      15 वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी 3 वर्षे

कमाल – 50 वर्षे

मॅच्युरिटीच्या वेळी कमाल वय65 years
प्रीमियम भरायच्या पद्धती - मोडल फॅक्टर

10 वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी 5 वर्षे पीपीटी

15 वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी 5/6/7/8 वर्षे पीपीटी

प्रीमियम

किमान

- ₹ 18,000 वार्षिक

- ₹ 9,215 अर्धवार्षिक

- ₹ 4,662 त्रैमासिक

- ₹ 1,556 मासिक

कमाल – बोर्ड अनुमोदित हमी धोरणाच्या अधीन कोणतीही मर्यादा नाही

प्रीमियम भरायच्या पद्धती - मोडल फॅक्टर

वार्षिक

अर्धवार्षिक – 0.5119

त्रैमासिक – 0.2590

मासिक – 0.0870


*अल्पवयीन विमाधारकासाठी, जोखिम कव्हर ताबडतोब चालू होते. अल्पवयीन विमाधारकासाठी, एकतर आई-वडील किंवा कायदेशीर पालक ज्यांचे  अल्पवयीन विमाधारकाशी  विमायोग्य हितसंबंध आहेत, ते अर्जदार/पॉलिसीधारक बनू शकतात जे प्रीमियम भरतील. जसे आणि जेव्हा विमाधारक सज्ञान होतात, पॉलिसी विमाधारकाकडे जाईल.


विमाधारक अल्पवयीन असताना पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, जीवित आई/वडील किंवा कायदेशीर पालक, ज्यांचे  अल्पवयीन विमाधारकाशीविमायोग्य हितसंबंध आहेत, ते पॉलिसीधारक होतील. जर आई-वडील किंवा कायदेशीर पालक कुणीही नसतील आणि पॉलिसीने अजून सरेंडर मूल्य प्राप्त केलेले नसेल, तेव्हा पॉलिसी समाप्त होते किंवा पेड-अप पॉलिसी म्हणून पॉलिसी सुरु ठेवली जाईल आणि पॉलिसी अटी आणि नियमांनुसार लाभ दिले जातील.

या पॉलिसीच्या अंतर्गत कर लाभ काय आहे?

Answer

तुम्ही भरलेल्या प्रीमियमवर आणि प्राप्त झालेल्या लाभांवर प्रचलित आयकर कायद्यांनुसार कर लाभ उपलब्ध असू शकतो. हे सरकारी कर कायद्यांनुसार वेळोवेळी बदलाच्या अधीन आहे. कृपया ही पॉलिसी खरेदी करण्याआधी तुमच्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.

जेव्हा जमा केलेली माहिती खोटी किंवा चुकीची असते तेव्हा काय होते?

Answer

वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार विमा कायदा 1938 च्या कलम 45 च्या तरतूदींनुसार फसवणूक/चूकीच्या विधानांवर कारवाई केली जाईल.

वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार विमा कायदा 1938 च्या कलम 45 अनुसार, जो सांगतो कि

 

  1. पॉलिसीच्या तारखेपासून म्हणजेच पॉलिसी जारी केल्याच्या तारखेपासून किंवा जोखिम सुरु झाल्याच्या तारखेपासून किंवा पॉलिसी पुन्हा सुरु केल्याच्या तारखेपासून किंवा पॉलिसीमध्ये रायडर घेतल्याच्या तारखेपासून, जी कोणतीही नंतरची असेल, तीन वर्षांची मुदत संपल्यावर कोणत्याही लाईफ इन्शुरन्स  पॉलिसीवर कोणत्याही कारणास्तव प्रश्न विचारला जाणार नाही.
  2. पॉलिसी जारी केल्याच्या तारखेपासून किंवा जोखिम सुरु झाल्याच्या तारखेपासून किंवा पॉलिसी पुन्हा सुरु केल्याच्या तारखेपासून किंवा पॉलिसीमध्ये रायडर घेतल्याच्या तारखेपासून, जी कोणतीही नंतरची असेल, तीन वर्षांच्या मुदतीच्या आत, फसवणूकीच्या कारणास्तव, एखाद्या लाईफ इन्शुरन्स  पॉलिसीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो: मात्र विमा कंपनीला विमाधारक किंवा कायदेशीर प्रतिनिधी किंवा विमाधारकाच्या नामनिर्देशित किंवा नियुक्त व्यक्तींना या निर्णयाचा त्या आधार आणि आशयांविषयी लिखित स्वरुपात कळवावे लागेल.
  3. उपकलम (2) मध्ये काहीही असले तरी, कोणताही विमाकर्ता फसवणुकीच्या कारणास्तव जीवन विमा पॉलिसी नाकारू शकत नाही जर, विमाधारकाने हे  सिद्ध केले की एखाद्या वस्तुस्थितीबद्दल चुकीचे किंवा लपवलेले  विधान, त्याच्या माहिती आणि विश्वासाप्रमाणे सत्य होते किंवा वस्तुस्थिती लपवण्याचा हेतू जाणूनबुजून केलेला नव्हता किंवा असे वस्तुस्थितीचे चुकीचे विधान किंवा लपवणे विमाकर्त्याला माहिती होते:  मात्र, फसवणूकीच्या प्रसंगी, जर पॉलिसीधारक जीवित नसेल, तर सिद्ध करण्याचे दायित्व लाभार्थींवर आहे.
  4. पॉलिसी जारी केल्याच्या तारखेपासून किंवा जोखिम सुरु झाल्याच्या तारखेपासून किंवा पॉलिसी पुन्हा सुरु केल्याच्या तारखेपासून किंवा पॉलिसीमध्ये रायडर जोडल्याच्या तारखेपासून, जी कोणतीही नंतरची असेल, तीन वर्षांच्या मुदतीच्या आत, या आधारावर पॉलिसीविषयी प्रश्न केला जाऊ शकतो कि ज्याआधारे पॉलिसी जारी करण्यात आली होती किंवा पुन्हा सुरु करण्यात आली होती किंवा रायडर जारी करण्यात आले, त्या अर्ज किंवा इतर दस्तऐवजात विमाधारकाच्या आयुष्याच्या अपेक्षेबद्दल केलेले विधान किंवा वस्तूस्थिती चुकीची किंवा लपवली गेली आहे. : मात्र विमा कंपनीला विमाधारक किंवा कायदेशीर प्रतिनिधी किंवा विमाधारकाच्या नामनिर्देशित किंवा नियुक्त व्यक्तींना लिखित स्वरुपात त्या आधार आणि आशयांविषयी कळवावे लागेल ज्यावर लाईफ इन्शुरन्स  पॉलिसी नाकारण्याचा निर्णय आधारित आहे: परंतु पुढे असे की, चुकीचे विधान केल्यामुळे किंवा वस्तुस्थिती लपवण्याच्या कारणास्तव पॉलिसी नाकारल्यास,फसवणूकीच्या आधारे नाही, तर पॉलिसी नाकारल्याच्या तारखेपर्यंत पॉलिसीमध्ये गोळा केलेले प्रीमियम पॉलिसी नाकारण्याच्या अशा तारखेपासून नव्वद दिवसांच्या कालावधीच्या आत विमाधारकाला किंवा कायदेशीर प्रतिनिधीला किंवा नामनिर्देशित किंवा विमाधारकाच्या नियुक्त व्यक्तीला दिले जातील.
  5. या विभागातील कोणतीही बाब विमा कंपनीला वयाच्या पुराव्यासाठी कधीही कॉल करण्यापासून रोखणार नाही जर ते असे करण्यासाठी पात्र असतील, आणि अर्जात विमाधारकाचे वय चुकीचे आढळल्यास पॉलिसीच्या अटींना बदलण्यात आल्यास केवळ त्यासाठी कोणत्याही पॉलिसीवर प्रश्न केला जाणार नाही.

या प्लान मधील अखंडित लाईफ कवर लाभ काय आहे?

Answer

पॉलिसीने पेड अप मूल्य प्राप्त केले असल्यास तुमच्या पॉलिसीमध्ये अखंडित लाईफ कव्हर लाभ असेल.
या लाभाच्या अंतर्गत, तुमच्या पॉलिसीचे पेड अप मूल्य पूर्ण केल्यावर, पॉलिसीच्या एक वर्षासाठी तुमचा प्रीमियम हप्ता चुकल्यास, “न भरलेल्या पहिल्या प्रीमियम” च्या तारखेपासून एक वर्षासाठी लागू पॉलिसी नुसार पॉलिसीच्या अंतर्गत मृत्यू लाभ सुरु राहील. या कालावधीच्या दरम्यान त्या वर्षासाठी कोणताही सरळ प्रत्यावर्ती बोनस (घोषित झाल्यास) दिला जाणार नाही, ज्यात त्या वर्षाचा वार्षिक प्रीमियम भरला गेलेला नाही.
ग्राहकाला “अखंडित लाईफ कव्हर लाभ” पुढे आणखी वाढवण्याचा पर्याय असेल तर तो/ती “न भरलेल्या पहिल्या प्रीमियम” च्या तारखेपासून एक वर्षाच्या आत लागू व्याजासह प्रीमियम भरतो/भरते. अशा भरण्यावर, सुधारित “न भरलेल्या प्रीमियम” च्या तारखेपासून एक वर्षासाठी अखंडित लाईफ कव्हर लाभ लागू होईल. तुम्हाला त्या वर्षासाठी प्रत्यावर्ती बोनस, घोषित झाल्यास, प्राप्त होईल ज्यासाठी तुम्ही देय प्रीमियम भरला आहे.
जर तुम्ही “न भरलेल्या पहिल्या प्रीमियम” च्या तारखेपासून 12 महिन्यांच्या आत प्रीमियम भरला नाही, तर कमी केलेल्या पेड अप पॉलिसीनुसार मृत्यू लाभ कमी केला जाईल.

या पॉलिसीमध्ये मॅच्युरिटीवरील विमा रक्कम काय आहे?

Answer

पॉलिसीमध्ये मॅच्युरिटीवरील विमा रक्कम पॉलिसीच्या सुरुवातीला तुम्ही निवडल्यानुसार आहे आणि जो मॅच्युरिटीवर मिळणारा कमीतकमी लाभ आहे.

 

किमान मूळ विमा रक्कमकिमान मूळ विमा रक्कम
1,50,000बोर्ड अनुमोदित हमी धोरणाच्या अधीन कोणतीही मर्यादा नाही

तुम्ही वाढीव लाभासाठी वेव्हार ऑफ प्रीमियम रायडर सुद्धा निवडू शकता. उल्लेखित रायडरविषयी अधिक तपशीलांसाठी कृपया इंडियाफर्स्ट लाईफ वेव्हार ऑफ प्रीमियम रायडर ब्रोशर पहा.

प्रीमियम चूकल्यास ग्रेस पिरियड आहे का?

Answer

आम्ही तुम्हाला वाढीव कालावधी देतो जो प्रीमियम देय तारखेपासून प्रीमियमचा भरणा करण्यासाठी दिलेला वेळ आहे, ज्या दरम्यान पॉलिसी जोखिम कव्हरसह लागू असल्याचे ग्राह्य धरले जाते. या पॉलिसीसाठी वार्षिक, अर्ध-वार्षिक आणि त्रैमासिक फ्रिक्वेंसीसाठी प्रीमियम देय तारखेपासून 30 दिवसांचा आणि मासिक फ्रिक्वेंसीसाठी 15 दिवसांचा वाढीव कालावधी आहे. या कालावधीत  विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, मृत्यू होण्याच्या तारखेपर्यंतचा देय प्रीमियम कापून घेतल्यानंतर, त्यांच्या नामनिर्देशित व्यक्ती/ नियुक्त व्यक्ती/ कायदेशीर वारसाला मृत्यू लाभ दिला जाईल. या कालावधीच्या दरम्यान, पॉलिसीला सक्रिय असल्याचे मानले जाईल.

या पॉलिसीमध्ये उच्च विमा रकमेवर काही सूट आहे का?

Answer

होय, तुम्ही उच्च विमा रक्कम निवडल्यास खालील तक्त्यानुसार प्रीमियम मध्ये सूट आहे :- 

 

मॅच्युरिटीवरील विमा रक्कम श्रेणी  प्रीमियमवर % सूट
1,50,000 to < 2,00,000शून्य
2,00,000 to <3,00,0001%
3,00,000 to <5,00,0002%
5,00,000 to <10,00,000 3%
10,00,000 आणि अधिक4% 

 

या पॉलिसीमध्ये कोणते रायडर्स उपलब्ध आहेत का?

Answer

होय, तुमच्याकडे इंडियाफर्स्ट लाईफ वेव्हर ऑफ प्रीमियम (डब्ल्यूओपी) रायडर (UIN:143B017V01) निवडण्याचा पर्याय आहे.  हा रायडर निवडल्यावर, पॉलिसीधारकाचा/ विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, अपघातामुळे पूर्ण कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास किंवा रायडर अंतर्गत नमूद गंभीर आजारपण आल्यास तुम्ही निवडलेल्या रायडर पर्यायानुसार तुमच्या बेस पॉलिसीचे भविष्यातील प्रीमियम माफ केले जातील. पॉलिसीधारक/ विमाधारकासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पर्याय आहेत.

 

पर्यायलाभ
मृत्यूवर वेव्हर ऑफ प्रीमियमहा पर्याय पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास बेस पॉलिसी अंतर्गत बाकी आणि देय असलेले भविष्यातील सर्व प्रीमियम माफ करण्याचा लाभ देतो (फक्त तेव्हाच जेव्हा बेस पॉलिसी अंतर्गत विमाधारक आणि पॉलिसीधारक वेगवेगळी व्यक्ती आहेत), जे रायडर आणि बेस पॉलिसी लागू असण्याच्या अधीन आहेत.
अपघातामुळे पूर्ण कायमस्वरुपी अपंगत्व आणि गंभीर आजाराचे निदान झाल्यास वेव्हर ऑफ प्रीमियमहा पर्याय खाली दिलेल्या घटनांपैकी कोणतीही एकदा किंवा एकत्रितपणे घडल्यास बेस पॉलिसीच्या अंतर्गत बाकी आणि देय भविष्यातील सर्व प्रीमियम माफ करण्याचा लाभ देतो; रायडर विमाधारकाचे अपघातामुळे पूर्ण कायमस्वरुपी अपंगत्व किंवा रायडर अंतर्गत कव्हर असलेल्या कोणत्याही एक गंभीर आजारापासून रायडर विमाधारक ग्रस्त असल्याचे खात्रीशीर निदान झाल्यावर, सदर लाभ रायडर आणि बेस पॉलिसी लागू असण्याच्या अधीन आहे.  
मृत्यू किंवा अपघातामुळे पूर्ण कायमस्वरुपी अपंगत्व किंवा गंभीर आजारावर वेव्हर ऑफ प्रीमियम

हा पर्याय खाली दिलेल्या घटनांपैकी कोणतीही लवकर घडल्यास बेस पॉलिसीच्या अंतर्गत बाकी आणि देय भविष्यातील सर्व प्रीमियम माफ करण्याचा लाभ देतो; रायडर विमाधारकाचा मृत्यू किंवा रायडर विमाधारकाचे अपघातामुळे पूर्ण कायमस्वरुपी अपंगत्व किंवा रायडर अंतर्गत कव्हर असलेल्या कोणत्याही एक गंभीर आजारापासून रायडर विमाधारक ग्रस्त असल्याचे खात्रीशीर निदान झाल्यावर, सदर लाभ रायडर आणि बेस पॉलिसी लागू असण्याच्या अधीन आहे.  

हा पर्याय निवडण्यासाठी, बेस पॉलिसी अंतर्गत विमाधारक आणि पॉलिसीधारक वेगवेगळी व्यक्ती असली पाहिजे.  

 

 

या पॉलिसीच्या अंतर्गत घोषित झालेले बोनस कोणते आहेत?

Answer

कंपनीच्या घोषित बोनस धोरणानुसार या पॉलिसीच्या अंतर्गत बोनस मध्ये सरळ प्रत्यावर्ती बोनस (एसआरबी) आणि टर्मिनल बोनस (टीबी) चा समावेश आहे.

 

  • सरळ प्रत्यावर्ती बोनस (एसआरबी): हा बोनस, घोषित झाल्यास, परिपक्वतेच्या वेळी गॅरंटीड विमा रकमेच्या आधारे मोजला जातो. जसेकी एसआरबी दर निश्चित नाही आणि बदलू शकतात, मात्र एकदा घोषित झाल्यावर, ते ग्यारंटेड होतात. मात्र, जर पॉलिसी पेड-अप मोड अंतर्गत आहे, तर भविष्यातील एसआरबी जोडले जाणार नाही.
  • टर्मिनल बोनस (टीबी): टर्मिनल बोनस, घोषित झाल्यास, कंपनीच्या गुंतणवूकीच्या अनुभवावर आधारित आहे आणि कंपनीच्या विवेकबुद्धीनिुसार दिला जातो. हा पॉलिसीच्या नियमांनुसार, मृत्यू, परिपक्वता किंवा सरेंडर केल्यावर दिला जाऊ शकतो. पॉलिसी पेड-अप मोडमध्ये असल्यास कोणताही टर्मिनल बोनस देय नसतो.

तुम्ही प्रीमियमचा भरणा चुकवल्यास काय होते?

Answer

ग्रेस पिरियड दरम्यान पॉलिसी अंतर्गत देय असलेल्या प्रीमियमचा भरणा न झाल्यास, पॉलिसी रद्द होईल जर पॉलिसीने ग्यारंटेड सरेंडर मूल्य प्राप्त केलेले नाही. जोखिम कव्हर थांबेल आणि रद्द झालेल्या पॉलिसीमध्ये पुढे कोणतेही लाभ देय होणार नाही.
दोन संपूर्ण वर्षांपेक्षा कमी प्रीमियम भरणा केला असल्यास पॉलिसी रद्द होईल.


मात्र, तुम्ही पुनरारंभ कालावधीच्या अंतर्गत तुमची रद्द झालेली पॉलिसी पुन्हा सुरु करू शकता. पुन्हा सुरु करण्याविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेले पुढील भाग पाहू शकता.
पहिल्या भरणा न केलेल्या प्रीमियमपासून ग्रेस पिरियडच्या मुदत समाप्तीनंतर पॉलिसीला पेड-अप मूल्य प्राप्त होईल जर कमीत कमी दोन (2) पूर्ण वर्षांचा प्रीमियम भरला गेला आहे आणि त्यानंतरचे कोणतेही प्रीमियम भरले गेलेले नाही. पॉलिसी पेड-अप पॉलिसीमध्ये रुपांतरित झाल्यानंतर कोणतेही भविष्यातील सरळ प्रत्यावर्ती बोनस (घोषित झाले असल्यास) साठी पॉलिसी पात्र असणार नाही.


टीप:
एक पेड-अप पॉलिसी पहिल्या न भरलेल्या प्रीमियमच्या तारखेपासून अटींच्या अधीन पाच वर्षांच्या आत (मूळ लाभांसह) पुन्हा सुरु केली जाऊ शकते.

जर पुनरारंभ कालावधीच्या दरम्यान पेड-अप मोड मध्ये असलेली पॉलिसी पुन्हा सुरु केली जात नाही, तर ती परिपक्वता किंवा मृत्यू किंवा पॉलिसी सरेंडर केली जाईपर्यंत रेड्युस्ड पेड अप मोड मध्ये राहील. पॉलिसी मुदतीच्या दरम्यान सर्व देय प्रीमियम भरलेले असल्यास पॉलिसी पूर्ण पेड-अप होते आणि देय असलेले लाभ पॉलिसीच्या अटी आणि नियमांनुसार असतील. 

पॉलिसी पेड-अप झाल्यानंतर:

  • मृत्यू लाभ:
    • पहिला न भरलेल्या प्रीमियमच्या तारखेपासून एक वर्षाच्या आत - पॉलिसीच्या अंतर्गत मृत्यू लाभ, वर बिंदु 14 मध्ये नमूद केल्यानुसार सक्रिय पॉलिसीनुसार सुरु राहतील.
    • जर पहिल्या न भरलेल्या प्रीमियमच्या तारखेपासून एक वर्षानंतर मृत्यू होतो - तर मृत्यू लाभ मृत्यू झाल्यावर रेड्युस्ड पेड-अप विमा रक्कम अधिक जमा सरळ प्रत्यावर्ती बोनस (घोषित झाल्यास) अधिक रेड्युस्ड पेड-अप च्या तारखेपर्यंत टर्मिनल बोनस, घोषित झाल्यास* असेल, जेथे मृत्यूवर रेड्युस्ड पेड-अप विमा रक्कम याप्रमाणे आहे:
      पेड-अप झालेल्या पॉलिसीच्या तारखेनुसार मृत्यू झाल्यावर विमा रक्कम * (भरलेल्या प्रीमियमची एकूण संख्या / पॉलिसी मुदतीच्या दरम्यान देय असलेल्या प्रीमियमची एकूण संख्या)
  • परिपक्वता लाभ:  
     

पॉलिसी मुदतीच्या शेवटी, तुम्हाला परिपक्वतेवरील रेड्युस्ड पेड-अप विमा रक्कम अधिक सरळ प्रत्यावर्ती बोनस, घोषित असल्यास, अधिक रेड्युस्ड पेड-अपच्या तारखेपर्यंत टर्मिनल बोनस, घोषित असल्यास वजा उत्तरजीवित लाभ रक्कम जर कोणतीही दिली असल्यास, असेल.
जेथे परिपक्वतेवरील रेड्युस्ड पेड-अप विमा रक्कम याप्रमाणे आहे:

(परिपक्वतेच्या वेळी गारंटीड विमा रक्कम अधिक उत्तरजीवित लाभ) x (भरलेल्या प्रीमियम्सची एकूण संख्या)/ पॉलिसी मुदतीच्या दरम्यान देय प्रीमियम्सची  एकूण संख्या).

 

पॉलिसी पुनः सुरु करण्यासाठी तुमच्याकडे काय पर्याय आहेत?

 

तुम्ही पहिल्या न भरलेल्या प्रीमियमच्या देय तारखेपासून 5 वर्षांच्या आत परंतु पॉलिसीची मुदत समाप्त होण्याच्या आधी याद्वारे तुमची पॉलिसी पुनः सुरु करू शकता -
व्याजासह सर्व न भरलेले देय प्रीमियम भरून; आणि
बोर्ड अनुमोदित हमी धोरणानुसार आरोग्याचा समाधानकारक पुरावा, आवश्यक असल्यास, देऊन. वैद्यकीय तपासणींचा खर्च, कोणताही असल्यास, पॉलिसीधारकाद्वारे वहन केला जाईल.

एक रद्द झालेली किंवा रेड्युस्ड पेड-अप पॉलिसी तिच्या सर्व लाभांसह आमच्या बोर्ड अनुमोदित हमी धोरणाच्या अनुषंगाचे पुन्हा सुरु केली जाऊ शकते. जर पॉलिसी पुन्हा सुरु केली जाते, तर  एक सक्रिय पॉलिसीसाठी पॉलिसी अटी आणि नियमांनुसार सर्व लाभ पुनर्संचयित केले जातील.
टीप: प्रीमियम भरणा करण्यात विलंबासाठी आकारला जाणारा सध्याचा व्याजदर 9% वार्षिक आहे ज्यामध्ये आयआरडीएआय कडून पूर्व मंजूरीच्या अधीन प्रत्येक आर्थिक वर्षात बदल केला जाऊ शकतो.

विमाधारकाने आत्महत्या केल्यास काय होते (आत्महत्या कलम)?

Answer

पॉलिसी अंतर्गत जोखिम कव्हर सुरु झाल्याच्या तारखेपासून किंवा पॉलिसी पुन्हा सुरु केल्याच्या तारखेपासून, जसे लागू असेल तसे, 12 महिन्यांच्या आत आत्महत्येमुळे मृत्यूच्या प्रसंगी, पॉलिसीधारकाचे नामनिर्देशित व्यक्ती किंवा लाभार्थी, मृत्यू तारखेपर्यंत भरलेल्या एकूण प्रीमियमच्या 80% रक्कम किंवा मृत्यूच्या तारखेनुसार उपलब्ध सरेंडर मूल्य, जी कोणतीही जास्त आहे, मिळवण्यासाठी पात्र आहे, ज्यासाठी पॉलिसी सक्रिय असायला हवी.

पॉलिसी मुदतीच्या शेवटी तुम्हाला काय मिळते (परिपक्वता लाभ)?

Answer

परिपक्वतेच्या वेळी तुम्हाला खालील गोष्टी मिळतील: -

  • परिपक्वतेच्या वेळी गारंटीड विमा रक्कम; अधिक
  • जमा सरळ प्रत्यावर्ती बोनस, घोषित झाल्यास; अधिक
  • टर्मिनल बोनस, घोषित झाल्यास


यास पॉलिसीमध्ये परिपक्वता लाभ म्हणून सुद्धा ओळखले जाते.
परिपक्वता लाभ दिल्यावर, पॉलिसी समाप्त होईल आणि इतर कोणतेही लाभ दिले जाणार नाही.

या पॉलिसीमध्ये विमाधारकाचा मृत्यू झाल्यास काय होते (मृत्यू लाभ)?

Answer

पॉलिसी मुदतीच्या दरम्यान विमाधारकाचे निधन झाल्याच्या प्रसंगी, मृत्यू लाभ एकतर एकरकमी स्वरुपात किंवा 5/10/15 वर्षासाठी मासिक उत्पन्नाच्या स्वरुपात नामनिर्देशित व्यक्तीला दिला जातो. दोन पर्यायांपैकी जो जास्त असेल त्यानुसार मृत्यू लाभ निश्चित केला जातो:
 

  1. मृत्यू झाल्यावर विमा रक्कम अधिक कोणतेही जमा बोनस, घोषित झाल्यास, किंवा
  2. मृत्यूच्या तारखेपर्यंत भरलेल्या एकूण प्रिमियच्या 105%, ज्यामध्ये कर, रायडर प्रीमियम, आणि स्वीकृत अतिरिक्त प्रीमियमचा समावेश नाही.


मृत्यू झाल्यावर विमा रकमेची गणना यातील जास्त असेल त्याप्रमाणे केली जाते:

  • वार्षिक प्रीमियमच्या 10 पट,
  • मृत्यू झाल्यावर द्यायची कोणतीही संपूर्ण रक्कम,
  • किंवा मॅच्युरिटीच्या वेळी किमान गॅरंटीड विमा रक्कम.



जर हप्त्यांमध्ये मृत्यू लाभ दिला गेल्यास, मृत्यू लाभाला मृत्यूच्या तारखेला प्रचलित एसबीआय बँक व्याज दरावर आधारित ॲन्युईटी फॅक्टरने गुणून करून मासिक हप्त्याची रक्कम निश्चित केली जाईल. संपूर्ण कालावधीत हप्त्याची रक्कम समान राहते. 31 मार्च रोजी घेतलेल्या निर्णयानुसार, प्रचलित एसबीआय बचत बँक व्याज दर प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी तपासणीच्या अधीन आहे.

या पॉलिसीच्या अंतर्गत उत्तरजीवित लाभ काय आहे?

Answer

खालील तक्त्यानुसार तुम्हाला तुमचा जीवित असल्याचा लाभ प्राप्त होईल: -

 

प्रीमियम भरायची मुदत पेआउट वर्ष
(या पॉलिसी वर्षाच्या शेवटी एक वार्षिक प्रीमियमच्या 103% रक्कम दिली जाते)
5 वर्षे4th वर्षे
6 वर्षे 5th वर्षे
7 वर्षे6th वर्षे
8 वर्षे 7th वर्षे

 

हा जीवित असल्याचा लाभ तुमच्या पॉलिसीचा प्रीमियम भरण्यासाठी वापरण्याचा तुमच्याकडे पर्याय आहे. सुरुवातीला तुम्ही निवडलेल्या मॅच्युरिटी विमा रकमेची रक्कम जीवित असल्याच्यालाभानंतर सुद्धा गॅरंटीड होईल आणि तुम्हाला पुन्हा दिलेल्या रकमेच्या राशीपर्यंत कमी केली जाणार नाही. तुम्हाला हा पर्याय सुरुवातीलाच  निवडणे आवश्यक आहे.

प्लान्स ज्यात कदाचित तुम्हाला रुची असेल!

IndiaFirst Life Guarantee Of Life Dreams Plan

Product Image

 

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ गॅरंटी ऑफ लाईफ ड्रिम्स प्लॅन

Dropdown Field
गारंटीड रिटर्न
Product Description

आपल्या स्वप्नांना पाठिंबा द्यायला जर आपल्याकडे उत्पन्नाचा दुसरा स्त्रोत असेल तर किती चांगले होईल नाही का? तुमच्या स्वप्नांना सत्यात आणण्याचा हा एक मार्ग आहे, ज्यायोगे तुम्ही 1ल्या महिनाअखेरीपासून उत्पन्न मिळवण्यास सुरुवात करु शकता.

Product Benefits
  • 3 उत्पन्न विकल्पांमधून निवड करता येईल
  • गॅरंटी असलेले दीर्घकालीन उत्पन्न
  • ऑनलाइन खरेदीवर 5%पर्यंत अतिरिक्त उत्पन्न
  • लाईफ इन्श्युरन्स कव्हर
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

IndiaFirst Life Fortune Plus Plan

Product Image

 

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ फॉर्च्युन प्लस प्लॅन

Dropdown Field
बचत
Product Description

सोईस्कर प्रीमियम्स, गॅरेंटेड सर्व्हाव्हल लाभ आणि 15 किंवा 20 वर्षांच्या संपूर्ण पॉलिसी कालावधीच्या दरम्यान लाईफ इन्श्युरन्स कव्हरसोबत रोख बोनस(जर जाहिर केला असल्यास) उपलब्ध करुन देणा-या या गॅरंटेड सेव्हिंग्ज लाईफ इन्श्युरन्स प्लानसह व्यक्तीगत स्वरुपाच्या प्रवासाला सुरुवात करा.

Product Benefits
  • 6,7,8,9 किंवा 10 वर्षांची पेमेंटची अल्पकालीन वचनबध्दता.
  • गॅरंटेड सर्व्हाव्हल लाभ मिळवा.
  • व्याजासोबत लाभांना एकत्रित करा.
  • प्रीमियम पेमेंट्सचे सोईस्कर विकल्प
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

Indiafirst Life Guaranteed Single Premium Plan

Product Image

 

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ गॅरंटेड सिंगल प्रीमियम प्लॅन

Dropdown Field
गारंटीड रिटर्न
Product Description

तुमच्या गुंतवणूकींवर 7 x परतावा मिळाला तर आश्चर्य वाटेल नाही का? तुमचा शोध इथे संपतो! या सिंगल पेमेंट प्लॅनसोबत, तुम्ही तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करु शकता.

Product Benefits
  • गुंतवणूकीवर खात्रीशीर 7 x रिटर्न्स
  • एकदाच पेमेंट (सिंगल पे)
  • कराच्या बचतीचे लाभ
  • 11.25 पटीने जास्त असलेले लाईफ कव्हर
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

इंडियाफर्स्ट लाईफ जीवन विमा योजना का?

1.6 कोटी

सुरुवात केल्यापासून, आयुष्ये सुरक्षित केली

list

16,500+

बीओबी आणि युबीआय शाखांमध्ये उपलब्ध

list

30,131 कोटी

AUM डिसेंबर 24 पर्यंत

list

1 दिवसात

दावा पूर्ण करण्याची खात्री 

list

Disclaimer

Linked Insurance Products are different from the traditional insurance products and are subject to risk factors. The Premium paid in unit-linked life insurance policies are subject to investment risks associated with capital markets and NAVs of the units may go up or down, based on the performance of fund and factors influencing the capital market and the insured is responsible for his/her decisions. IndiaFirst Life Insurance Company Limited is only name of the Insurance Company and does not in any way indicate the quality of the contract, its future prospects, or returns. 

 

Please know the associated risks and the applicable charges from your Insurance Agent or the Intermediary or policy document issued by the Insurance Company. The various funds offered under this contract are the names of the funds and do not in any way indicate the quality of these plans, their future prospects and returns. Past performance may or may not be sustained in future and is not a guarantee of future performance. Some of the contents of this document may contain statements / estimates / expectations / predictions, which may be 'forward looking'. 

 

The actual outcomes could differ materially from those expressed /implied in this document.These statements, do not intend to provide personal recommendation to any specific individual or any investment needs of an individual. The recommendations / statements / estimates / expectations / predictions are of general in nature and may not take into account the specific investment needs or risk appetite or financial situations of individual policyholder / clients. For more details on risk factors and terms and conditions, please read the sales brochure carefully before concluding the sale. Tax benefits are subject to changes in the tax laws.

सर्वात जास्त शोधले गेलेले शब्द

1800 209 8700

ग्राहक सेवा क्रमांक

whatsapp

8828840199

ऑनलाइन पॉलिसी खरेदीसाठी

call

+91 22 6274 9898

आमच्यासोबत व्हॉट्सॲपवर चॅट करा

mail

You’re eligible for a Discount!!

Get 10% off on online purchase of IndiaFirst Life Elite Term Plan