Menu
close
एक्सपर्टला विचारा arrow

लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा

तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.

right-icon-placeholder
right-icon-placeholder
male male

पुरुष

male male

महिला

male male

इतर

आम्हाला संपर्क करा

तुमच्या पॉलिशीसी संबंधित प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आम्हाला संपर्क करा. लगेचच उत्तरं मिळवण्यासाठी आमच्या स्वयं-सहायता सेवा चॅनल्स वापरा जसे चॅट बॉट आणि व्हॉट्सॲप चॅट. आणखी तपशीलांसाठी तुम्ही कॉल किंवा ईमेल द्वारे आमच्या सर्विस टीमला संपर्क करू शकता.

काही प्रश्न आहे का? चला बोलू.

whatsapp

व्हॉट्सॲपवर चॅट करा

आमच्या मैत्रीपूर्ण टीमसोबत बोला

व्हॉट्सॲप क्रमांक
+91 22 6274 9898
whatsapp

आम्हाला कॉल करा

सोमवार ते शनिवार, सकाळी 9 - रात्री 9

टोल फ्री क्रमांक

(आयव्हीआर प्रवाह)

आमच्या सल्लागाराशी संपर्क साधा

सोमवार-शनिवार, सकाळी १० ते संध्याकाळी ६

whatsapp

आम्हाला ईमेल करा

आम्ही 24x7 मदत करण्यासाठी इथे आहोत

सेवा विनंती
दाव्यांसाठी
whatsapp

ऑनलाइन खरेदी

सोमवार ते शनिवार, सकाळी 9 - संध्याकाळी 7

ऑनलाइन खरेदीसाठी क्रमांक
whatsapp

संपर्काचे तपशील - एनआरआय

सोमवार ते शनिवार, सकाळी 9 - रात्री 9

आम्हाला कॉल करा

आम्ही कशाप्रकारे मदत करू शकतो?

View All FAQ’s

ई-इंश्युरन्स काय आहे?

Question
ई-इंश्युरन्स काय आहे?
Answer

ई-इंश्युरन्स म्हणजे काय?

ई-इंश्युरन्स हे इंश्युरन्स रिपोझिटरी असलेल्या डीमॅट खात्याच्या समकक्ष इंश्युरन्स आहे. हे एक इलेक्ट्रॉनिक/ डीमटेरियलाइज्ड स्वरुपात तुमच्या सर्व इंश्युरन्स पॉलिसी ठेवण्यासाठी एक भरवश्याची सुविधा देते. हे एक प्लॅटफॉर्म आहे जे तुम्हाला कमालीच्या सुविधेसह इंश्युरन्स पॉलिसीमध्ये बदल करू देते. तुम्हाला फक्त इतकेच करायचे आहे की एक ई-इंश्युरन्स खाते उघडायचे आहे आणि या खात्यात तुमच्या सर्व इंश्युरन्स पॉलिसींना टॅग करायचे आहे.

ई-इंश्युरन्स खाते विना शुल्क, उघडण्यासाठी आणि चालवण्यासाठी सरळसोपे, खुपच सुरक्षित आणि ऑनलाइन उपलब्ध आहे. तुम्ही सर्व विमा कंपन्यांच्या तुमच्या सर्व लाईफ इंश्युरन्स पॉलिसी एक सिंगल ई-इंश्युरन्स खात्यात सांभाळू शकता. यामुळे तुम्हाला तुमचा विमा पोर्टफोलिओ वास्तविक वेळेत ट्रॅक करण्यात आणि राखण्यात मदत होते.

एक ई-इंश्युरन्स खात्याने तुम्ही प्रत्येक खरेदीसाठी तुम्ही केवायसी निकष टाळू शकते (जसे पत्ता आणि ओळखीचा पुरावा).

 

ई-इंश्युरन्स खात्याचे काय फायदे आहेत?

  • सुरक्षा: इलेक्ट्रॉनिक फॉर्म खात्री करतो कि पॉलिसी सुरक्षित ताब्यात आहेत, कारण ई-इंश्युरन्स खात्याशी कोणतीही जोखिम किंवा नुकसान संलग्न नाही.
  • सोयिस्करता: सर्व इंश्युरन्स पॉलिसी एकाच ई-इंश्युरन्स खात्याच्या अंतर्गत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दाखल केल्या जाऊ शकतात. इंश्युरन्स रिपॉझिटरीच्या ऑनलाइन पोर्टलवर लॉगइन करून कधीही पॉलिसीची प्रत डाउनलोड केली जाऊ शकते, तसेच कोणत्याही पॉलिसीचे तपशील मिळवले जाऊ शकतात.
  • सेवेचे एक ठिकाण: एक सिंगल विनंती वेगवेगळ्या विमा कंपन्यांच्या पॉलिसीची पूर्तता करू शकते. इंश्युरन्स रिपॉझिटरीच्या कोणत्याही सेवा ठिकाणांवर सेवा विनंती जमा केल्या जाऊ शकतात. उदाहरणार्थ, इंश्युरन्स रिपॉझिटरीवर पत्त्यात बदल करण्याची एक विनंती वेगवेगळ्या विमा कंपन्यांद्वारे जारी केलेल्या पॉलिसींमध्ये अपडेट करु शकते. सेवा विनंतीसाठी तुम्हाला प्रत्येक विमा कंपनीच्या वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये भेट देण्याची गरज नाही.
  • वेळेची बचत करा आणि पर्यावरण अनुकूल व्हा: नवीन पॉलिसी घेताना प्रत्येक वेळी तुम्हाला केवायसी तपशील जमा करत राहण्याची गरज नाही. तुमचे सर्व व्यवहार कागद विरहित असल्याने, तुम्ही पर्यावरण राखण्यात सुद्धा योगदान देता.
  • खात्याचे स्टेटमेंट: दर वर्षी कमीत कमी एकदा, इंश्युरन्स रिपॉझिटरी तुमच्या सर्व पॉलिसींच्या तपशीलांसह खात्याचे एक स्टेटमेंट पाठवेल.
  • एक देखावा: ई-इंश्युरन्स खातेधारकाच्या मृत्यूच्या प्रसंगी एक अधिकृत व्यक्तीसाठी सर्व पॉलिसींचा एक देखावा उपलब्ध करून दिला जाईल.
Tags

ईआयए काय आहे आणि याचे काय फायदे आहेत?

Question
ईआयए काय आहे आणि याचे काय फायदे आहेत?
Answer

ईआयए म्हणजे ‘ई-इंश्युरन्स खाते’ किंवा ‘इलेक्ट्रॉनिक इंश्युरन्स खाते’. सुरक्षा प्रमाणपत्रांसारखे जसे शेयर्स, बाँड्स आणि म्युच्युअल फंड्स इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तयार केले आणि एकाच डीमॅट खात्यात संग्रह केले जाऊ शकतात, तुम्ही इंश्युरन्स पॉलिसी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने संग्रह करू शकता आणि त्यांना एक इंश्युरन्स रिपॉझिटरीसह तुमच्या ई‐इंश्युरन्स खात्यात (ईआयए) मध्ये ठेवू शकता.

मी ई-आयए (ई-इंश्युरन्स खाते) का उघडायला हवे?

तुम्ही एक ईआयए उघडायला हवे कारण हे तुम्हाला कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय सोप्या, सुरक्षित आणि कागदविरहित पद्धतीने तुमच्या इंश्युरन्स पॉलिसी संग्रह करू शकता. एक ईआयएने, तुम्हाला इंश्युरन्स पॉलिसी खरेदी करताना प्रत्येक वेळी केवायसी प्रक्रिया करण्याची आवश्यकता नसेल. इंश्युरन्स रिपॉझिटरी तुम्हाला एक अद्वितीय ईआयए खाते क्रमांक देईल ज्याअंतर्गत तुमच्या सर्व पॉलिसी संग्रह केल्या जातील ज्यामध्ये जीवन, आरोग्य, वाहन आणि ग्रूप कवरचा समावेश आहे.

ईआयए उघडण्यासाठी काय शुल्क आहेत?

ईआयए उघडणे विनाशुल्क आहे. इंश्युरन्स रिपॉझिटरीशी संलग्न कुणालाही पैसे देण्याचे तुम्हाला गरज नाही.


एक व्यक्ती/ पॉलिसीधारक एकपेक्षा अधिक ई-इंश्युरन्स खाते उघडू शकतो का?

नाही. एक व्यक्ती/ पॉलिसीधारकाकडे एक इंश्युरन्स रिपॉझिटरीचे फक्त एकच ईआयए असू शकते. तुम्ही वेगवेगळ्या इंश्युरन्स रिपॉझिटरींसोबत एकपेक्षा अधिक ईआयए खाते उघडू शकत नाही. तुम्ही एकदा ईआयए उघडल्यावर, तुमचे तपशील सर्व इंश्युरन्स रिपॉझिटरीकडे केंद्रियरित्या शेयर केले जातील.


ईआयए अर्जाचा फॉर्म काय आहे?

एक ईआयए अर्जाचा फॉर्म म्हणजे तुम्ही, पॉलिसीधारकाने, इंश्युरन्स रिपॉझिटरीकडे एक ई-इंश्युरन्स खाते उघडण्यासाठी केलेला अर्ज आहे. हा फॉर्म इंश्युरन्स कंपनी किंवा कोणत्याही इंश्युरन्स रिपॉझिटरीकडे उपलब्ध असतो.


एक ईआयए खाते उघडण्यासाठी आवश्यक असलेल्या सामान्य आवश्यकता काय आहेत?

तुम्हाला ईआयए फॉर्म भरायचा आहे आणि इंश्युरन्स कंपनी किंवा इंश्युरन्स रिपॉझिटरी शाखेमध्ये तुमच्या फोटो आयडी, पॅन / आधार कार्डाची प्रत आणि पत्त्याच्या पुराव्यासह जमा करायचा आहे.

मी एखाद्या पॉलिसीशिवाय एखादे ईआयए खाते उघडू शकतो का?

होय, तुम्ही कोणत्याही इंश्युरन्स पॉलिसीशिवाय ईआयए खाते उघडू शकता.


सर्व आवश्यक औपचारिकतांची पूर्तता केल्यानंतर एक ईआयए खाते उघडण्यासाठी किती दिवस लागतात?

तुमचे ईआयए खाते (जास्तीत जास्त) 7 कामकाजी दिवसांच्या आत उघडले जाईल आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि ईमेल आयडीवर रिपॉझिटरी कडून पुष्टीकरण एसएमएस आणि ईमेल प्राप्त होईल. तसेच ईआयए ब्रोशर, लॉगइन आयडी आणि पासवर्ड (ऑनलाइन सेट केला नसल्यास) सह वेलकम किट तुमच्या पत्रव्यवहाराच्या पत्त्यावर कुरियर केले जाईल. हे तपशील वापरुन तुम्ही तुमचे ई-इंश्युरन्स खाते सक्रिय करू शकता.

 

अधिकृत प्रतिनिधी कोण आहे?

एक अधिकृत प्रतिनिधी ही ईआयए उघडताना तुमच्या (पॉलिसीधारक) द्वारे नियुक्त केलेली एक व्यक्ती आहे. तुमच्या दुर्दैवी निधन किंवा अपंगत्वाच्या प्रसंगी ही व्यक्ती ईआयए खाते चालवेल. मृत्यूच्या वैध्य पुराव्यासह तो तुमच्या मृत्यूविषयी इंश्युरन्स रिपॉझिटरीला कळवेल आणि कोणत्याही दाव्याच्या निपटारानंतर, असल्यास, तुमचे खाते बंद करण्यासाठी विनंती जमा करेल.


माझ्या ई-इंश्युरन्स खात्यात मी कोणते तपशील शोधू शकतो?

इंश्युरन्स रिपॉझिटरी तुम्हाला एक अद्वितीय खाते क्रमांक देईल. यामध्ये सर्व प्रकारच्या पॉलिसींचा समावेश असेल जसे जीवन, आरोग्य, वाहन आणि ग्रूप कवर्स. रिपॉझिटरी द्वारे सांभाळल्या जाणाऱ्या डेटामध्ये तुमच्या दाव्यांच्या इतिहासाचा समावेश असेल आणि यामध्ये तुम्ही नमूद केलेल्या लाभार्थीं, नियुक्त व्यक्ती आणि नामनिर्देशित व्यक्तींचे नाव सुद्धा असेल.


पॉलिसीधारक आणि विमा कंपनीसाठी इंश्युरन्स रिपॉझिटरीचे एकंदरीत फायदे काय आहेत?

ईआयए खाते उघडणे हा सर्वात लाभदायक टप्प्यांपैकी एक आहे जो कार्यकुशलता आणि चांगल्या ग्राहक सेवेची खात्री करतो. जसे की, रिपॉझिटरी एकाच खात्यात सर्व पॉलिसी एकत्रित करते, तातडीच्या प्रसंगी, तुम्ही खरेदी केलेल्या सर्व पॉलिसी नामनिर्देशित व्यक्ती पाहू शकतो. अशी सुविधा उपलब्ध असल्याने, तुमचे प्रमाणीकरण आणि विमा करण्याची क्षमता देखील विमा कंपनीद्वारे सहजपणे पडताळली जाऊ शकते. तुमच्या पॉलिसी ऑनलाइन खरेदी करताना तुम्ही सोप्या आणि जलद प्रक्रियांचा आनंद घेऊ शकता.

Tags

विद्यमान ग्राहकांसाठी प्रक्रिया काय आहे?

Question
विद्यमान ग्राहकांसाठी प्रक्रिया काय आहे?
Answer

जर तुम्ही विद्यमान पॉलिसीधारक आहात आणि एक ईआयए खाते उघडण्यात तुम्हाला रुची आहे, तर खालील टप्प्यांचे पालन करून तुम्ही तसे करू शकता:
 

टपाल/ कुरियर

सीएफआर सपोर्ट टीम
12वा आणि 13वा मजला, नॉर्थ [सी] विंग,
टॉवर 4, नेस्को आयटी पार्क, नेस्को सेंटर,
वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, गोरेगाव (पूर्व),
मुंबई - 400063
 

इंडियाफर्स्ट लाईफ तुमचे तपशील आणि कागदपत्रे संबंधित रिपॉझिटरीसोबत शेयर करेल. त्याबदल्या, रिपॉझिटरी ईआयए उघडेल. तुमचा ईआयए क्रमांक, लॉगइन आयडी आणि पासवर्ड तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडी आणि मोबाइल क्रमांकावर पाठवला जाईल. आमच्या नोंदींमध्ये तुमचा ईआयए क्रमांक अद्यावत करण्यासाठी रिपॉझिटरी हा इंडियाफर्स्ट लाईफ सोबत सुद्धा शेयर करेल. तुमचा ईआयए जारी केल्यावर पॉलिसी त्यात ई-क्रेडिट केली जाईल.
 

वॉक-इन

ऑनलाइन - रिपॉझिटरीं द्वारे

ईआयए खात्यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणत्याही इंश्युरन्स रिपॉझिटरीच्या वेबसाइटवर जाऊ शकता.

  1. एनएसडीएल डेटाबेस मॅनेजमेंट लिमिटेड
  2. सीआयआरएल सेंट्रल इंश्युरन्स रिपॉझिटरी लिमिटेड.
  3. कार्वी इंश्युरन्स रिपॉझिटरी लिमिटेड.
  4. कॅम्स रिपॉझिटरी अँड सर्विसेस लिमिटेड


एक ईआयए खाते उघडण्यासाठी स्वीकार्य पत्त्याच्या पुराव्यांसाठी जोडपत्र.

तुम्ही खालीलपैकी कोणतीही कागदपत्रे जमा करू शकता:

  • राशन कार्ड
  • पासपोर्ट
  • आधार कार्ड
  • मतदार ओळख पत्र
  • वाहन चालवण्याचा परवाना
  • राष्ट्रीयकृत बँक पासबूक स्टेटमेंट (6 महिन्यांपेक्षा जुने नको)
  • याच्या सत्यापित प्रति
    • वीज बिल (6 महिन्यांपेक्षा जुने नको)
    • घरचे दूरध्वनी बिल (6 महिन्यांपेक्षा जुने नको)
    • नोंदणीकृती भाडेपट्टी आणि परवाना करार
Tags

नवीन ग्राहकांसाठी प्रक्रिया काय आहे?

Question
नवीन ग्राहकांसाठी प्रक्रिया काय आहे?
Answer

नवीन ग्राहक जे इंडियाफर्स्ट लाईफकडून इंश्युरन्स पॉलिसीसाठी अर्ज करू इच्छितात ते ईआयए (ई-इंश्युरन्स खाते) उघडणे निवडू शकतात. ही प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:
 

ऑफलाइन (मदतपूर्ण विक्री):

पॉलिसी खरेदी करते वेळी, विमा प्रस्ताव अर्ज भरताना ईआयए उघडणे निवडा. खालीलपैकी कोणतीही रिपॉझिटरी तुम्हाला निवडावी लागेल.

  1. एनएसडीएल डेटाबेस मॅनेजमेंट लिमिटेड
  2. सीआयआरएल सेंट्रल इंश्युरन्स रिपॉझिटरी लिमिटेड.
  3. कार्वी इंश्युरन्स रिपॉझिटरी लिमिटेड.
  4. कॅम्स रिपॉझिटरी अँड सर्विसेस लिमिटेड


ऑनलाइन

ऑनलाइन पॉलिसी खरेदी करते वेळी, इंडियाफर्स्ट लाईफ वेबसाइटवर विमा प्रस्ताव अर्ज भरताना ईआयए उघडणे निवडा. खालीलपैकी कोणतीही एक रिपॉझिटरी तुम्हाला निवडावी लागेल.

  1. एनएसडीएल डेटाबेस मॅनेजमेंट लिमिटेड
  2. सीआयआरएल सेंट्रल इंश्युरन्स रिपॉझिटरी लिमिटेड.
  3. कार्वी इंश्युरन्स रिपॉझिटरी लिमिटेड.
  4. कॅम्स रिपॉझिटरी अँड सर्विसेस लिमिटेड


ईआयए उघडण्यासाठी, तुमचा पॅन क्रमांक किंवा आधार कार्ड क्रमांक, वैध ईमेल आयडी आणि संपर्क क्रमांक देणे अनिवार्य आहे.

इंडियाफर्स्ट लाईफ तुमचे तपशील आणि कागदपत्रे संबंधित रिपॉझिटरीसोबत शेयर करेल. त्याबदल्या, रिपॉझिटरी ईआयए उघडेल आणि तुमचा ईआयए क्रमांक, लॉगइन आयडी आणि पासवर्ड तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडी आणि मोबाइल क्रमांकावर पाठवला जाईल. आमच्या नोंदींमध्ये तुमचा ईआयए क्रमांक अद्यावत करण्यासाठी रिपॉझिटरी हा इंडियाफर्स्ट लाईफ सोबत सुद्धा शेयर करेल. तुमचा ईआयए जारी केल्यावर पॉलिसी त्यात ई-क्रेडिट केली जाईल.

जर तुमच्याकडे आधीच एक ईआय खाते आहे, तर कृपया प्रस्ताव अर्ज भरताना ईआयए खाते क्रमांक आणि रिपॉझिटरी नाव नमूद करा. रिपॉझिटरीकडून प्रमाणीकरण आणि पुष्टीकरण झाल्यानंतर, तुमची पॉलिसी ईआयए खात्याशी जोडली जाईल.

Tags

टप्पा 1: आम्हाला संपर्क करा

Question
टप्पा 1: आम्हाला संपर्क करा
Answer

ऑनलाइन:

  • कस्टमर पोर्टलवर लॉग इन करा. जर तुमच्याकडे लॉगइन आयडी आणि पासवर्ड नाही, तर तुम्ही तो इथे तयार करू शकता.
  • क्यूआरसी (प्रश्न, विनंती आणि तक्रार) विभागात जा आणि विनंती/तक्रार करा.


आम्हाला ईमेल करा:

लाईफ इंश्युरन्स पॉलिसीसाठी:

ईमेल आयडी: customer.first@indiafirstlife.com

 

आम्हाला कॉल करा:

  • सोमवार ते शनिवार पर्यंत सकाळी 9 ते संध्याकाळी 7 दरम्यान आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-209-8700 वर.
  • आमच्या कोणत्याही इंडियाफर्स्ट लाईफ शाखेत जा. नजीकची शाखा इथे शोधा.


आम्हाला भेट द्या:

आमच्या कोणत्याही इंडियाफर्स्ट लाईफ शाखेत जा आणि तुमच्या तक्रारी जमा करा.

तुमच्य शहरातील आमच्या तक्रार निवारण अधिकाऱ्याला संपर्क करण्यासाठी इथे क्लिक करा.
 

टपाल/ कुरियर:

आम्हाला खालील पत्त्यावर पत्र लिहा:

ग्राहक सेवा
इंडियाफर्स्ट लाईफ इंश्युरन्स कंपनी लिमिटेड
12वा आणि 13वा मजला, नॉर्थ [सी] विंग, टॉवर 4,
नेस्को आयटी पार्क, नेस्को सेंटर, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे,
गोरेगाव (पूर्व), मुंबई - 400063.

 

आम्हाला तुमची तक्रार मिळाल्यानंतर, ती मिळाल्याच्या 15 कँलेंडर दिवसांमध्ये, आम्ही ती एकतर सोडवण्याच्या किंवा नाकारण्याच्या कारणांसह तुम्हाला उत्तर पाठवू.

आमची तक्रार निवारण पॉलिसी तुम्ही इथे पाहू शकता.

Tags

टप्पा 2: तुमची तक्रार आणखी पुढे न्या

Question
टप्पा 2: तुमची तक्रार आणखी पुढे न्या
Answer

तुमची तक्रार मिळाल्यानंतर, ती मिळाल्याच्या तारखेपासून 15 (पंधरा) दिवसांमध्ये, आम्ही ती एकतर सोडवण्याच्या किंवा नाकारण्याच्या कारणांसह तुम्हाला उत्तर पाठवू. तुम्हाला आमचे उत्तर मिळाल्याच्या तारखेपासून 8 आठवड्यांच्या आत आम्हाला तुमच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास, आम्ही तक्रार बंद समजू.

मात्र, जर आम्ही दिलेल्या उपायाशी तुम्ही समाधानी नाही आहात किंवा 15 (पंधरा) दिवसांच्या आत काहीही प्रतिसाद न मिळाल्यास, तुम्ही आमच्या कोणत्याही शाखेतील आमच्या तक्रार निवारण अधिकाऱ्याकडे जाऊ शकता किंवा grievance.redressal@indiafirstlife.com वर आमच्या तक्रार निवारण अधिकाऱ्याला लिहू शकता.

प्राप्त झालेल्या अशा सर्व तक्रारींची पोचपावती तक्रार मिळाल्यापासून 3 (तीन) कामकाजाच्या दिवसांत पाठवली जाईल.

त्याचप्रमाणे, तुम्ही खालील टप्प्यांचे सुद्धा पालन करू शकता:
 

टपाल/ कुरियर:

आम्हाला खालील पत्त्यावर पत्र लिहा:

 

रजनीश कुमार
तक्रार निवारण अधिकारी
इंडियाफर्स्ट लाईफ इंश्युरन्स कंपनी लिमिटेड
12वा आणि 13वा मजला, नॉर्थ [सी] विंग, टॉवर 4,
नेस्को आयटी पार्क, नेस्को सेंटर, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे,
गोरेगाव (पूर्व), मुंबई - 400063.

 

ईमेल: grievance.redressal@indiafirstlife.com

कृपया तुमच्या तक्रार/सेवा विनंती क्रमांकाचा उल्लेख करा. हा तुमच्या पहिल्या टप्प्यातील तुमच्या तक्रारीच्या नोंदणीच्या दरम्यान दिलेला असेल.

Tags

टप्पा 3: आयआरडीएआय तक्रार कक्षाशी संपर्का करा

Question
टप्पा 3: आयआरडीएआय तक्रार कक्षाशी संपर्का करा
Answer

जर तुम्ही उत्तराशी समाधानी नाही आहात किंवा 15 दिवसांच्या आत तुम्हाला उत्तर मिळत नाही, तर तुम्ही खालील संपर्काच्या तपशीलावर इंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथोरिटी ऑफ इंडिया (आयआरडीएआय) च्या तक्रार कक्षाशी संपर्क करू शकता:

आयआरडीएआय तक्रार कॉल सेंटर (आयजीसीसी) टोल फ्री क्रमांक: 18004254732 ईमेल आयडी: complaints@irda.gov.in

तुम्ही इथे सुद्धा तुमची तक्रार नोंदवू शकता: http://www.igms.irda.gov.in/

त्याचप्रमाणे, तुम्ही खालील टप्प्यांचे सुद्धा पालन करू शकता:

 

टपाल/ कुरियर:

खाली दिलेल्या पत्त्यावर तुमच्या तक्रारी आम्हाला लिहून कळवा:

 

ग्राहक प्रकरण विभाग
इंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेवलपमेंट ऑथोरिटी ऑफ इंडिया,
सि. नंबर. 115/1, फायनांशियल डिस्ट्रिक्ट, नानक्रमगुडा
गचीबावली, हैदराबाद - 500032, तेलंगणा

फॅक्स:

क्रमांक: 91- 40 – 6678 9768

Tags

टप्पा 4: विमा लोकपालाशी कसा संपर्क करायचा

Question
टप्पा 4: विमा लोकपालाशी कसा संपर्क करायचा
Answer

जर तुम्ही उपायाशी असमाधानी आहात किंवा तुमची समस्या सोडवलेली नाही, तर तु्मही थेट विमा लोकपालाशी संपर्क करू शकता. पत्ता शोधण्यासाठी इथे क्लिक करा

ग्राहक/तक्रारदार किंवा त्यांच्या कायदेशीर वारसांनी योग्यप्रकारे सही करून लिखित स्वरुपात तक्रार करायली हवी, ज्यामध्ये तक्रारीचे संपूर्ण तपशील आणि ग्राहकाच्या/तक्रारदाराच्या संपर्काच्या माहितीचा समावेश असला पाहिजे.

सार्वजनिक तक्रार निवारण नियम 1998 च्या तरतूद 13(3) अनुसार, लोकपालाकडे तक्रार केली जाऊ शकते

  • फक्त तेव्हाच जर विमा कंपनीच्या तक्रार निवारण व्यवस्थेद्वारे तक्रार नाकारली जाते
  • विमा कंपनी तक्रार नाकारल्याच्या तारखेपासून एक वर्षाच्या कालावधीमध्ये
  • जर एकाच वेळी कोणत्याही खटल्याच्या अंतर्गत नाही
Tags

सर्वात जास्त शोधले गेलेले शब्द

1800 209 8700

Customer Care Number

whatsapp

8828840199

For online policy purchase

call

+91 22 6274 9898

आमच्याशी  व्हॉट्सॲपवर चॅट करा

mail

Start a conversation with IndiaFirst Life Insurance Expert