सुरुवातीचे वय
- Question
- सुरुवातीचे वय
- Answer
-
किमान: 18 वर्षे
कमाल: 70 वर्षे
तुमच्यासाठी योग्य वेळ आम्हाला सांगा.
लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा
तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.
पुरुष
महिला
इतर
तुमचे तपशील प्रविष्ट केल्याबद्दल धन्यवाद
तुमच्या मौल्यवान अभिप्रायांमुळे आम्हाला आमची सेवा सुधारण्यात आणि आणखी कार्यक्षम बनवण्यात महत्वाची भूमिका बजावते.
^रिटायर स्मार्ट पर्यायाअंतर्गत
*खात्रीशीर वाढ निवडलेल्या PPT व रक्कम भरण्याच्या वारंवारतेवर अवलंबून आहे आणि केवळ 1ल्या पॉलिसी वर्षाच्या प्रीमियमवर लागू आहे आणि फ्री लुक कालावधीमध्ये पॉलिसी बंद केल्यास ते रद्द करण्यात येईल.
किमान: 18 वर्षे
कमाल: 70 वर्षे
किमान: 40 वर्षे
कमाल: 80 वर्षे
किमान:
वारंवारता | प्रीमियमची रक्कम |
---|---|
दरवर्षी | 36,000 |
अर्ध वार्षिक | 18,000 |
त्रैमासिक | 10,500 |
मासिक | 3,500 |
एकरकमी | 1,50,000 |
कमाल: मर्यादा नाही, बोर्ड अप्रुव्ह्ड अंडररायटिंग पॉलिसी (BAUP).
किमान:
एकरकमी भरणा - 5 वर्षे
5 वेळा भरणा – 10 वर्षे
7, 8, 10,वेळा नियमित भरणा – 15 वर्षे
15 वेळा भरणा – 16 वर्षे
कमाल:
वय वर्षे 80 पर्यंत
सूचना:
नुकत्याच झालेल्या वाढदिवसाचे वय ग्राह्य धरले जाईल.
सर्व वयोगटांसाठी, पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून जोखीम लागू होते.
IndiaFirst Life स्मार्ट रिटायरमेंट प्लॅन हा नॉन-पार्टीसिपेटिंग, युनिट लिंक्ड, इंडीव्हिजुअल सेव्हिंग्ज, पेन्शन प्लॅन आहे, जो मार्केट संलग्न रिटर्न्ससह आपला सेवानिवृत्ती निधी वाढवू इच्छिणाऱ्या आमच्या ग्राहकांना सेवानिवृत्तीचा कमी खर्चिक पर्याय देण्यासाठी बनवला आहे. ही स्मार्ट निवृत्ती योजना सिंगल, नियमित किंवा मर्यादित प्रीमियम भरण्याची सोयिस्करता देते आणि 80 वर्षांपर्यंत दीर्घकालीन सुरक्षा देते.
हा रिटायरमेंट स्मार्ट प्लॅन 2 पर्याय देतो:
रिटायर स्मार्ट
रिटायर सिक्युअर
पॉलिसी सुरुवातीच्या वेळी निवडलेल्या पर्यायानुसार या रिटायरमेंट स्मार्ट प्लॅन अंतर्गत मृत्यू लाभ निश्चित होईल.
लाईफ अशुअर्डचा मृत्यू झाल्यावर, पॉलिसी कालावधी समाप्त होण्याआधी, पॉलिसी चालू असताना, लाभार्थीला/ क्लेमंटला मृत्यू लाभ मिळेल, आणि पॉलिसी समाप्त होईल. मृत्यू लाभ खालीलपेक्षा अधिक असेल:
मृत्यू झाल्यावर सम अशुअर्ड; किंवा
मृत्यूची सूचना मिळाल्याच्या तारखेचे फंड मूल्य
लाईफ अशुअर्डचा मृत्यू झाल्यावर, पॉलिसी कालावधी समाप्त होण्याआधी, पॉलिसी चालू असताना, लाभार्थीला/ क्लेमंटला खालीलप्रमाणे मृत्यू लाभ मिळेल:
मृत्यू झाल्यावर सम अशुअर्ड तात्काळ एकरकमी देण्यात येईल
भविष्यातील सर्व प्रीमियम्स, जर असल्यास, जेव्हा आणि जसे देय असेल त्याप्रमाणे आमच्यातर्फे भरण्यात येतील आणि पॉलिसी चालू राहील.
जेथे,
या पॉलिसी कालावधी अंतर्गत कधीही मृत्यू झाल्यावर सम अशुअर्ड ही भरलेल्या एकूण प्रीमियम्सच्या 105% असेल.
लाईफ अशुर्डच्या मृत्यूच्या तारखेपूर्वीच्या 2 (दोन) वर्षांच्या कालावधीत अंशत: काढलेल्या रकमेइतकी रक्कम, मृत्यू वेळी दिल्या जाणाऱ्या सम अशुअर्ड मधून कमी केली जाईल.
पॉलिसी कालावधीच्या शेवटी, व्हेस्टिंग तारखेपर्यंतचा सध्याचा फंड मूल्य देय असेल.
याव्यतिरिक्त, रिटायर स्मार्ट पर्यायाचा एक मोठा सेवानिवृत्ती लाभ म्हणजे, पॉलिसी कालावधीदरम्यान कमी करण्यात आलेले सर्व मृत्युदर शुल्क, फंड मूल्यात परत जोडले जाईल, जर पॉलिसी चालू असेल आणि सर्व देय प्रीमियम भरले गेले असतील तर.
वेस्टिंगच्या तारखेदिवशी, त्याच पॉलिसीमध्ये मूळ पॉलिसीच्या अटी व नियमांनुसारच, अक्युम्युलेशन कालावधी किंवा डिफरमेंट कालावधी वाढवण्याचा पर्याय पॉलिसीधारकाकडे असेल. व्हेस्टींग लाभ पुढे ढकलण्याबाबत अधिक माहितीसाठी, उत्पादन विक्रीपुस्तिका पहा.
वेस्टिंगच्या तारखेदिवशी, सर्व देय प्रीमियम्स भरून IndiaFirst Life स्मार्ट रिटायरमेंट प्लॅन चालू असल्यास आणि आणि पॉलिसीधारकाने व्हेस्टिंग लाभाचा 100% भाग IndiaFirst Life कडून ॲन्युइटी खरेदीसाठी वापरल्यास, गेल्या आठ पॉलिसी तिमाहींच्या शेवटच्या व्यावसायिक दिवशीच्या फंड मूल्याच्या सरासरीच्या 0.5% एवढी रक्कम, व्हेस्टींग लॉयल्टी बूस्टर म्हणून जोडण्यात येईल. ती रक्कम युनिट्सच्या रूपात फंड मूल्यात जोडली जाईल.
The retirement smart plan offers three fund options and two fund management strategies:
या स्ट्रॅटेजीमध्ये, तुम्ही तुमच्या जोखीम घेण्याची क्षमता आणि गरजेनुसार तुमचे प्रीमियम एक, अनेक किंवा सर्व फंडांमध्ये गुंतवण्याचा पर्याय निवडू शकता. या पर्यायाद्वारे तुम्ही तुमचे मार्केटचे ज्ञान वापरून, मार्केटशी संलग्न गुंतवणुकीतून तुमच्या निवृत्ती निधीचा जास्तीत जास्त फायदा घेऊ शकता.
The existing funds offered are –
फंडाचे नाव | फंडाचा उद्देश | रिटर्न्स आणि जोखीम प्रोफाइल |
---|---|---|
पेन्शन इक्विटी फंड (SFIN: ULIF 029210725PENDEBTFND143) | मुख्यत्वे मोठ्या भांडवलाच्या कंपन्यांच्या इक्विटीमध्ये आणि इक्विटी-संबंधित साधनांमध्ये गुंतवणूक करून, स्थिर आणि दीर्घकालीन भांडवल वाढ करणे. | मध्यम ते उच्च |
पेन्शन डेबिट फंड (SFIN: ULIF029210725PENDEBTFND143) | कॉर्पोरेट डेट साधने, सरकारी सिक्युरिटीज आणि मनी मार्केट साधनांमध्ये विविध गुंतवणुकीद्वारे, चांगल्या प्रमाणात उत्पन्न मिळवणे आणि भांडवल वाढीच्या संधी निर्माण करणे | मध्यम |
पेन्शन लिक्विड फंड (SFIN: ULIF030210725PENLIQFUND143) | कमी कालावधीसाठी व्याजदरांपेक्षा जास्त वाढीसह भांडवली संरक्षण देणे आणि तसेच जास्त लिक्विडीटी उपलब्ध करून देणे. | कमी |
हि स्ट्रॅटेजी तुमची गुणवणूक नियमितपणे डेट मधून इक्विटी फंडात टाकत राहते, ज्यामुळे तुमचा नफा वाढत राहतो आणि सुरक्षित राहतो. फंड ट्रान्सफर स्ट्रॅटेजीबद्दल अधिक माहितीसाठी उत्पादन पुस्तिका वाचा.
शुल्काचा प्रकार | शुल्काचा तपशील |
---|---|
प्रीमियम वाटप शुल्क | Nil |
पॉलिसी व्यवस्थापन शुल्क | Nil |
फंड व्यवस्थापन शुल्क (FMC) | 1.35% (डिसकंटिन्यूअन्स फंडासाठी लागू होणारा फंड मॅनेजमेंट चार्ज हा डिसकंटिन्यूअन्स फंडाच्या मूल्यावर दरवर्षी 0.50% असेल). |
मॉर्टेलिटी शुल्क | लाईफ अशुअर्डच्या वय व लिंग यावर मॉर्टेलिटी शुल्क आधारित आहे. वार्षिक मॉर्टेलिटी शुल्क पॉलिसीच्या संपूर्ण कालावधीसाठी खात्रीशीर असते. आम्ही मृत्युदर आकारणी “सम- ॲट-रिस्क” वर लावू, मात्र त्यासाठी सम-ॲट-रिस्क हा ऋण नसावा, म्हणजेच तो शून्य किंवा त्यापेक्षा कमी नसावा. सम- ॲट-रिस्क बद्दल अधिक माहितीसाठी, उत्पादन पॉलिसी कागदपत्रे पहा. |
पार्शल विथड्रॉवल शुल्क | पार्शल विथड्रॉवल शुल्क लागू नाही. |
रिव्हायव्हल शुल्क | रिव्हायव्हल शुल्क लागू नाही. |
स्विचिंग शुल्क | स्विचिंग शुल्क लागू नाही. |
IndiaFirst Life स्मार्ट रिटायरमेंट प्लॅनमधील बंद शुल्कांविषयी अधिक माहितीसाठी कृपया उत्पादन पुस्तिका पाहा
रिटायरमेंट स्मार्ट प्लॅनचा लॉक-इन पिरियड पूर्ण झाल्यावर पार्शल विथड्रॉवल करता येते आणि केवळ खालील कारणांसाठी:
कायदेशीररित्या दत्तक घेतलेल्या मुलांसह, मुलांचे उच्च शिक्षण.
कायदेशीररित्या दत्तक घेतलेल्या मुलांसह, मुलांचा विवाह.
लाईफ अशुअर्डच्या नावावर किंवा त्याच्या/तिच्या कायदेशीररित्या विवाह झालेल्या जोडीदाराच्या संयुक्त नावाने राहते घर/फ्लॅट चे बांधकाम किंवा विक्री. परंतु, जर लाईफ इन्शुअर्डकडे आधीच (वंशपरंपरागत मालमत्ता वगळता) स्वतःच्या मालकीचे राहण्याचे घर/फ्लॅट असेल, तर अंशतः पैसे काढण्यास परवानगी दिली जाणार नाही.
स्वतःच्या, जोडीदाराच्या किंवा कायदेशीररीत्या दत्तक घेतलेल्या मुलांसह अवलंबून असणाऱ्या मुलांसाठीच्या गंभीर आजारांवर उपचारांसाठी.
लाईफ इन्शुअर्डला आलेल्या अपंगत्व किंवा कार्यक्षमतेतील अडथळ्यामुळे उद्भवणारा वैद्यकीय आणि इतर अपवादात्मक खर्च.
लाईफ इन्शुअर्डने नवीन शिकण्यासाठी/ स्किल वाढविण्यासाठी/ किंवा स्वतःचा स्टार्ट-अप सुरु करण्यासाठी येणार खर्च.
IRDAI कडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या परिपत्रकां/मार्गदर्शक सूचनां/नियमांनुसार इतर कोणतेही कारण.
रिटायरमेंट प्लॅन्स मधील पार्शल विथड्रॉवलवरील अधिक माहितीसाठी, आमची उत्पादन माहितीपुस्तिका पहा.
त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक पर्यायांअंतर्गत आम्ही तुम्हाला सर्व प्रीमियम्स भरण्यासाठी 30 दिवसांचा आणि मासिक पर्यायात 15 दिवसांचा वाढीव कालावधी देतो. हा कालावधी प्रत्येक प्रीमियम भरण्याच्या देय तारखेपासून चालू होतो. या कालावधीमध्ये तुमचा IndiaFirst Life स्मार्ट रिटायरमेंट प्लॅन चालू असल्याचे ग्राह्य धरण्यात येईल, आणि या वाढीव कालावधीमध्ये तुमचे सर्व लाभ चालू राहतील. भावी खरेदीदार निवृत्तीनंतरच्या गरजा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी रिटायरमेंट कॅल्क्युलेटरचा वापर करू शकतात आणि त्यानुसार त्यांच्या खरेदीचे नियोजन करू शकतात. यामुळे त्यांना वेळच्यावेळी प्रीमियम भरत राहण्यास मदत होऊ शकते.
तुमची पॉलिसी कागदपत्रे इलेक्ट्रॉनिकली किंवा इतर मार्गाने मिळाल्यापासून, त्यातील नियम व अति समजून घेण्यासाठी तुम्हाला 30 (तीस) दिवसांचा फ्री लुक पिरियड मिळतो, जर त्या काळात कुठलाही क्लेम केला नसेल तर, तुमच्या हरकतीचे कारण सांगून, पॉलिसी रद्द करण्यासाठी आमच्याकडे परत पाठवण्याचा पर्याय तुमच्याकडे आहे. असे झाल्यास, रद्द करण्याचे कारण कुठलेही असो, आम्ही तुमचे नॉन-अलोकेटेड प्रीमियम परत करण्याची व्यवस्था करू, ज्यात रद्द करण्याच्या तारखेला लागू असलेल्या नेट ॲसेट व्हॅल्यू (NAV) प्रमाणे वाटप केलेल्या युनिट्सची किंमत, त्यासोबत प्रीमियम वाटप शुल्क आणि युनिट्स रद्द करण्यासाठी आकारलेले शुल्क आकारून तुम्हाला दिले जाईल. मात्र, यातून संरक्षण कालावधीसाठी लागणारा प्रमाणानुसार जोखीम प्रीमियम, स्टॅम्प ड्युटी शुल्क, वैद्यकीय तपासणीसाठी आमच्याकडून केलेला खर्च (जर असल्यास), आणि पॉलिसीच्या सुरुवातीला कंपनीने दिलेले गॅरंटीड ॲडिशन्स1 वजा केले जातील.
अशा फ्री लुक रद्द करण्याच्या विनंतीवर, अशी विनंती मिळाल्याच्या तारखेपासून 7 (सात) दिवसांच्या आत, लागू वजावटीसह अंमलबजावणी केली जाईल.
IndiaFirst Life स्मार्ट रिटायरमेंट प्लॅनअंतर्गत, पॉलिसीच्या कालावधीत तुम्ही हवे तितक्या वेळा एका फंडातून दुसऱ्या उपलब्ध फंडात स्विच करू शकता. सध्या या स्विचसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. लाईफ अशुअर्ड अल्पवयीन असताना देखील पॉलिसीधारकाला फंड स्विच करण्याची परवानगी आहे. मात्र, न वापरलेले मोफत स्विच पुढील महिना किंवा वर्षात वापरले जाऊ शकत नाहीत.
IndiaFirst Life स्मार्ट रिटायरमेंट प्लॅनअंतर्गत तुम्हाला एक फंडातील प्रीमियम दुसऱ्या फंडात वळवण्याचा पर्याय उपलब्ध आहे. यासाठी आम्हाला लेखी कळवावे लागेल. प्रीमियम रीडायरेक्शन अंतर्गत, तुम्ही पुढील प्रीमियम वेगळ्या फंड किंवा फंडांच्या गटात गुंतवू शकता. मात्र, या पर्यायात आधी भरलेल्या प्रीमियमचे वाटप बदलत नाही. सध्या प्रीमियम रीडायरेक्शनसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
तुमच्या स्मार्ट पेन्शन प्लॅन मध्ये पुढील बदल करण्यास परवानगी आहे –
कुठल्याही शुल्क/ फी शिवाय प्रीमियम भरण्याच्या कालावधीदरम्यान तुमच्याकडे प्रीमियमची वारंवारता (प्रीमियम भरण्याची पद्धत) बदलण्याचा पर्याय असतो. उपलब्ध प्रीमियम वारंवारता पर्यायांतूनच प्रीमियम वारंवारता बदलता येते. परंतु, एकदा मृत्यू क्लेम सुरु झाल्यावर, प्लॅन पर्याय - रिटायर सिक्युअर च्या अंतर्गत लाभार्थी/ दावेदार प्रीमियम वारंवारता बदलू शकत नाही.
IRDAI ने दिलेल्या युनिटशी संलग्न नियमावलीनुसार आम्ही तुमच्या युनिट्सचे मूल्यांकन करू. प्राधिकरणाच्या सध्याच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार, युनिट किंमत खालीलप्रमाणे मोजली जाईल:
ॲसेट्सचे मार्केट मूल्य, अधिक: सध्याच्या ॲसेट्सचे मूल्य, वजा: सध्याची दायित्वे व तरतुदींचे मूल्य, जर असल्यास, भागिले : मूल्यांकन दिनांकाच्या दिवशी असलेल्या युनिट्सची संख्या (युनिट्स तयार/ रिडीम करण्यापूर्वी)
मूल्यांकनाच्या दिवशी निधीत असलेल्या एकूण युनिट्सच्या संख्येने (कोणतेही युनिट्स रिडीम होण्यापूर्वी) भागल्यावर, आपल्याला संबंधित निधीच्या युनिट्सची किंमत कळते.
तुम्ही भरलेला प्रत्येक प्रीमियम (नवीन पॉलिसीसाठी असो किंवा नूतनीकरणासाठी) – तुम्ही प्रस्ताव अर्जात किंवा नंतर केलेल्या विनंतीनुसार, किंवा निवडलेल्या गुंतवणूक धोरणानुसार, संबंधित फंड पर्यायांमध्ये गुंतवला जातो. यात, जर लागू असेल तर, प्रथम वाटप शुल्क वजा केले जाते. प्रीमियम वाटपाबद्दल सविस्तर माहितीसाठी कृपया उत्पादन पुस्तिका पाहा.
हो, तुमच्या स्मार्ट पेन्शन प्लॅन मध्ये जोखीम आहे.
IndiaFirst Life इन्शुरन्स कंपनी लिमिटेड हे फक्त इन्शुरन्स कंपनीचे नाव आहे, आणि “IndiaFirst Life स्मार्ट रिटायरमेंट प्लॅन” हे फक्त युनिट-संलग्न फंडवर आधारित पॉलिसीचे नाव आहे आणि कुठल्याही प्रकारे या पॉलिसीची गुणवत्ता, भविष्यातील संधी, किंवा रिटर्न्स दर्शवित नाही.
युनिट-संलग्न इन्शुरन्स उत्पादनांवर गुंतवणूक जोखीम असते, जी तुम्हाला उचलावी लागेल.
युनिट-संलग्न इन्शुरन्स पॉलिसीजमध्ये भरले गेलेले प्रीमियम्स, भांडवली मार्केट संबंधी गुंतवणूक जोखमींच्या अधीन आहेत, आणि युनिट्सचे NAV हे निधीच्या कामगिरीवर व भांडवली मार्केटवर परिणाम करणाऱ्या घटकांवर अवलंबून वाढू किंवा कमी होऊ शकतात, तसेच घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी विमाधारकाची स्वतःची असेल.
फंडातील गुंतवणूक मार्केट जोखमींच्या अधीन असतात आणि गुंतवणुक पोर्टफोलियोमधील गुंतवणूक जोखीम तुम्हाला उचलावी लागेल.
या पॉलिसीमधील फंड किंवा त्यांची नावे ही कोणत्याही प्रकारे त्या फंडाची गुणवत्ता, भविष्यातील संधी किंवा रिटर्न्सची खात्री देत नाहीत. आमच्या कोणत्याही निधीची भूतकाळातील कामगिरी ही भविष्यातील कामगिरीची हमी मानली जाऊ शकत नाही.
We do not guarantee the Fund Value or the NAV. Please note that, depending on the market risk and the performance of the Funds to which the Units are referenced, the Fund Value or the NAV may fall, rise or remain unchanged. We have not given any assurance that the objectives of any of the Funds will be achieved.
The Funds do not offer a guaranteed or assured return except to the extent as guaranteed or assured by us under this Policy.
नाही. या पॉलिसीअंतर्गत आम्ही खात्री किंवा आश्वासन दिलेल्या मर्यादेव्यतिरिक्त, आमचे कुठलेही फंड खात्रीशीर किंवा अशुअर्ड रिटर्न्स देत नाहीत. फंडांची नावे त्या फंडांची गुणवत्ता, भविष्यातील संधी, किंवा रिटर्न्स कुठल्याही प्रकारे दर्शवित नाहीत.
आमच्या इतर फंडांची भूतकाळातील कामगिरी त्यांच्या भविष्यातील कामगिरीची खात्री देतील हे जरुरी नाही.
23.03.2015 रोजीच्या इन्शुरन्स कायदे (दुरुस्ती) अधिनियम, 2015 नुसार दुरुस्त केलेल्या, 1938 च्या विमा अधिनियमातील सेक्शन 45 अंतर्गत लाईफ इन्शुरन्स पॉलिसीवर आक्षेप न घेण्यासंबंधीच्या तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत:
लाईफ इन्शुरन्सच्या कुठल्याही पॉलिसीवर पॉलिसी संपल्यापासून पुढे दिलेल्या तारखांपासून 3 वर्षे झाल्यानंतर प्रश्न विचारता येणार नाहीत
पॉलिसी इन्शुरन्सची तारीख किंवा
जोखीम सुरु झाल्याची तारीख किंवा
पॉलिसी पुनरुज्जीवित झाल्याची तारीख किंवा
पॉलिसीच्या रायडरची तारीख यापैकी जी शेवट असेल ती
फसवणुकीच्या कारणावरून, लाईफ इन्शुरन्स पॉलिसीवर पुढील तारखांपासून ३ वर्षांच्या आत प्रश्न विचारले जाऊ शकतात
पॉलिसी इन्शुरन्सची तारीख किंवा
जोखीम सुरु झाल्याची तारीख किंवा
पॉलिसी पुनरुज्जीवित झाल्याची तारीख किंवा
पॉलिसीच्या रायडरची तारीख यापैकी जी शेवट असेल ती
यासाठी, इन्शुररने इन्शुअर्ड किंवा कायदेशीर प्रतिनिधी किंवा वारसदार किंवा इन्शुअर्डचा/ची असाईनी, जे लागू असेल त्याप्रमाणे, ज्या कारणांवर आणि माहितीवर हा निर्णय आधारित आहे ते लेखी कळवले पाहिजे.
फसवणूक म्हणजे इन्शुअर्ड किंवा त्याच्या प्रतिनिधीने केले पुढीलपैकी कोणतेही कृत्य, ज्याचा उद्देश इन्शुररला फसवणे किंवा इन्शुररला पॉलिसी देणे भाग पाडणे असेल:
खरी नसलेली आणि इन्शुअर्डला खरी वाटत नसलेली गोष्ट तथ्य म्हणून सांगणे;
ज्या गोष्टीची माहिती किंवा खात्री आहे, ती गोष्ट जाणीवपूर्वक लपवणे;
फसवण्यासाठी केलेली इतर कोणतीही कृती; आणि
कायद्याने ज्या कृतीला किंवा जी गोष्ट लपवण्याला स्पष्टपणे फसवणूक म्हणून घोषित केलं आहे, अशी कोणतीही कृती किंवा लपवलेली गोष्ट.
फक्त गप्प राहणे ही फसवणूक ठरत नाही, जोपर्यंत प्रकरणाच्या परिस्थितीनुसार, इन्शुअर्ड किंवा त्यांचे प्रतिनिधी यांच्यावर गप्प न राहता बोलण्याची जबाबदारी असते, किंवा गप्प राहणे हे स्वतः बोलण्यासारखे मानले जाते.
कोणताही इन्शुरर लाईफ इन्शुरन्स पॉलिसी फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर फेटाळू शकत नाही, जर इन्शुअर्ड/ लाभार्थी हे सिद्ध करू शकले की चुकीचे विधान हे त्यांच्या माहितीनुसार सत्य होते आणि ती गोष्ट लपवण्याचा कोणताही जाणीवपूर्वक हेतू नव्हता, किंवा असे चुकीचे विधान किंवा महत्त्वाची गोष्ट लपवणे हे इन्शुरन्स कंपनीच्या माहितीत होते, तर ते ग्राह्य धरले जाईल.हे चुकीचे असल्याचे सिद्ध करण्याची जबाबदारी, पॉलिसीधारक जिवंत असल्यास त्याच्यावर किंवा लाभार्थ्यांवर असते.
पॉलिसी चालू करताना, पुन्हा सुरू करताना किंवा रायडर चालू करताना प्रस्तावपत्रात किंवा इतर कागदपत्रांत इन्शुअर्डच्या आयुष्याच्या अपेक्षित कालावधीसंबंधी महत्त्वाची गोष्ट चुकीची नमूद केली असेल किंवा लपवली असेल, तर अशा कारणावरून ३ वर्षांच्या आत लाईफ इन्शुरन्स पॉलिसीवर आक्षेप घेता येतो. यासाठी, इन्शुररने पॉलिसी रद्द करण्याचा निर्णय कोणत्या कारणांवर आणि कोणत्या आधारांवर घेतला आहे, ते लेखी स्वरूपात इन्शुअर्डला, त्याच्या कायदेशीर प्रतिनिधीला, नॉमिनीला किंवा असाईनीला (जसे लागू असेल) लिखित स्वरूपात कळवणे आवश्यक आहे.
जर पॉलिसी रद्द करण्याचे कारण फसवणूक नसून चुकीचे विधान असेल, तर पॉलिसी रद्द झाल्याच्या तारखेपर्यंत जमा झालेले प्रीमियम, पॉलिसी रद्द झाल्यानंतर 90 दिवसांच्या आत, इन्शुअर्डला किंवा त्याच्या कायदेशीर प्रतिनिधीला, नॉमिनीला किंवा हक्कधारकाला (जसे लागू असेल) परत दिला जाईल.
एखादी गोष्ट इन्शुररने घेतलेल्या जोखमीशी थेट संबंधित नसल्यास, ती महत्त्वाची मानली जाणार नाही. जर इन्शुररला ती गोष्ट माहित असती तर पॉलिसी दिलीच नसती, हे सिद्ध करण्याची जबाबदारी इन्शुररवर असते.
इन्शुररला जर हक्क असेल तर तो कधीही वयाचा पुरावा मागवू शकतो आणि वयाचा पुरावा मिळाल्यानंतर जर पॉलिसीच्या अटी बदलल्या, तर केवळ त्या कारणासाठी पॉलिसीवर आक्षेप घेता येणार नाही. त्यामुळे, नंतर सादर केलेल्या वयाच्या पुराव्यावरून वय तपासणे किंवा अटी बदलणे यासाठी हे कलम लागू होणार नाही.
[अस्वीकरण: हे 2015 च्या विमा कायदे (दुरुस्ती) अधिनियमातील सर्व दुरुस्त्यांची संपूर्ण यादी नाही, तर हे केवळ सर्वसाधारण माहिती देण्यासाठी बनवले आहे. संपूर्ण आणि अचूक माहितीसाठी, पॉलिसीधारकांनी 23.03.2015 रोजीचा विमा कायदे (दुरुस्ती) अधिनियम, 2015 पाहावा.]
अस्वीकरण
# फक्त 1 ल्या पॉलिसी वर्षातील प्रीमियमवर खात्रीशीर वाढ म्हणून 5% पर्यंत जास्त फंड वाटप. निवडलेल्या प्रीमियम भरण्याच्या कालावधी (PPT) आणि पेमेंट वारंवारतेनुसार ही खात्रीशीर वाढ बदलू शकते. फ्री लुक कालावधीत पॉलिसी रद्द केल्यास ही रक्कम परत घेतली जाईल.
*पॉलिसी व्यवस्थापन व प्रीमियम वाटपावर शून्य शुल्क
^आमच्या फंड स्विच स्ट्रॅटेजीसह
लिंक्ड इन्शुरन्स उत्पादने पारंपरिक इन्शुरन्स उत्पादनांपेक्षा वेगळी असतात आणि ती जोखमीच्या घटकांवर अवलंबून असतात. युनिट-लिंक्ड लाईफ इन्शुरन्स पॉलिसींमध्ये भरलेले प्रीमियम, कॅपिटल मार्केटशी संबंधित गुंतवणुकीच्या जोखमेच्या अधीन असतो आणि फंडाच्या कामगिरीवर आणि कॅपिटल मार्केटवर प्रभाव टाकणाऱ्या घटकांनुसार युनिट्सचे NAV वाढू किंवा कमी होऊ शकते आणि विमाधारक त्याच्या/तिच्या निर्णयांसाठी जबाबदार असतो. IndiaFirst Life इन्शुरन्स कंपनी लिमिटेड हेच इन्शुरन्स कंपनीचे नाव असून IndiaFirst Life स्मार्ट रिटायरमेंट प्लॅन (UIN 143L076V01) हे लिंक्ड लाईफ इन्शुरन्स कराराचे नाव आहे आणि कुठल्याही प्रकारे कराराची गुणवत्ता, भविष्यातील संधी, किंवा रिटर्न्स दर्शवत नाहीत. कृपया तुमच्या इन्शुरन्स प्रतिनिधीकडून किंवा मध्यस्त किंवा इन्शुरन्स कंपनीकडून देण्यात आलेल्या कागदपत्रांद्वारे संबंधित जोखीम आणि लागू शुल्क यासंबंधी माहिती जाणून घ्या. या कराराअंतर्गत देण्यात आलेले विविध फंड म्हणजे त्यांची नावे आहेत आणि कुठल्याही प्रकारे कराराची गुणवत्ता, भविष्यातील संधी, किंवा रिटर्न्स दर्शवत नाहीत. गुंतवणूक फंडाची भविष्यातील कामगिरी, त्याच फंडाच्या आधीच्या कामगिरीवर अवलंबून नाही. या योजनेतील गुंतवणूकदारांना कोणतेही हमखास / खात्रीशीर रिटर्न्स दिले जात नाहीत. प्रीमियम व फंड हे फंडशी संबंधित किंवा भरलेल्या प्रीमियमशी संबंधित काही शुल्कांच्या अधीन आहेत. कुठलीही विक्री पूर्ण करण्याआधी, जोखीम घटक आणि नियम व अटींशी संबंधित अधिक माहितीसाठी, कृपया विक्री माहितीपुस्तिका काळजीपूर्वक वाचा. IndiaFirst Life इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, IRDAI नोंदणी क्र. 143, CIN: U66010MH2008PLC183679, पत्ता: 12वा व 13वा मजला, नॉर्थ टॉवर, बिल्डिंग 4, नेसको IT पार्क, नेसको सेंटर, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, गोरेगाव, (पूर्व), मुंबई – 400 063. टोल फ्री क्र. – 18002098700. ईमेल आयडी : customer.first@indiafirstlife.com, वेबसाईट: www.indiafirstlife.com. फॅक्स क्र.: +912268570600.
सर्व पहा