इंडियाफर्स्ट लाईफमध्ये, ग्राहकांना चांगला अनुभव देण्याची आमची वचनबद्धता, अत्याधुनिक टेक्नोलॉजीमध्ये आम्ही करत असलेल्या धोरणात्मक गुंतवणूकीमध्ये दिसून येते. ग्राहक आणि वितरक दोन्हींसाठी एक सुरळीत आणि कार्यक्षम प्रक्रियेची खात्री करत, आम्ही आमच्या व्यवस्थेमध्ये डिजिटल सुधारणा करून घेतल्या आहेत.
ग्राहक प्राप्ति आणि अनुभवासाठी डिजिटल सुधारणा
आमच्या समर्पित ग्राहक प्राप्ति व्यवस्थेचा आम्हाला अभिमान वाटतो, ज्याला योग्य नाव दिले आहे “सिम्प्लिफाय”. या काही वर्षांमध्ये, 92.94% ते 99.13% अर्जांवर टॅबलेट्सद्वारे सुरळीत प्रक्रिया करण्यात आली आहे. ही नाविन्यपूर्ण व्यवस्था आमच्या मौल्यवान ग्राहकांना एक सहज आणि कार्यक्षम नोंदणीचा अनुभव देते.
सिम्प्लिफाय : समर्पित ग्राहक प्राप्ति व्यवस्था
आमची नवीन व्यवस्था, “सिम्प्लिफाय”, ग्राहक प्राप्तिचा प्रवास सुरळीत करण्यासाठी तयार केलेली आहे. हा समर्पित प्लॅटफॉर्म, ग्राहकांसाठी वापरण्यास सोपा अनुभव देण्यात महत्वाचा भाग बनला आहे.
स्वयंचलित हमी प्रक्रिया
डिजिटल लाटेला स्वीकारत, आम्ही आमची हमी घेण्याची प्रक्रिया बऱ्याच प्रमाणात स्वयंचलित केली आहे. 30 जून, 2022 रोजी संपलेल्या तीन महिन्यांनुसार, 64.75% प्रकरणांचे निर्णय स्वयंचलित-हमी द्वारे देण्यात आले आहेत.
आमच्या वेबसाइटवर सुरळीत डिजिटल अनुभव
आमची उपयोगकर्ता-केंद्रित वेबसाइटवर सर्वकाही उपलब्ध आहे. . हि ग्राहकांना वापरायला सोपी आहे. सर्वसमावेशक प्रोडक्ट माहितीपासून ते प्लॅन ची माहितीपत्रके , प्रिमियम कॅलक्युलेटर्स, ऑनलाइन खरेदी प्रक्रिया आणि ब्रांच लोकेटर्सपर्यंत , सर्वकाही मिळणारी अशी एक डिजिटल जागा आम्ही तयार केली आहे जी आमच्या ग्राहकांची प्रत्येक गरज पूर्ण करते.
अचूक संवादासाठी डेटा ॲनालिटिक्स
डेटा ॲनालिटिक्सचा वापर करून, आम्ही संपर्कव्यवस्था वैयक्तिकृत केली आहे जेणेकरून योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची खात्री होते . हा सक्रिय दृष्टीकोणामुळे आम्हाला संबंध स्थापित करण्याची धोरणे बदलून ग्राहकांना योग्य वेळी पाहिजे असलेली माहिती पुरवता येते.
झटपट इशुअन्स आणि स्मार्ट स्क्रुटिनी
कार्यक्षमतेसाठी आमची वचनबद्धता आमच्या झटपट इशुअन्स आणि 'स्मार्ट स्क्रुटिनी' प्रक्रियांमध्ये दिसून येते. टेक्नोलॉजीचा लाभ घेऊन, आम्ही जलद आणि अधिक सुसंगत ग्राहक नोंदणी करून घेत आहोत.यामुळे खरेदीच्या अनुभवात देखील सुधारणा झाली आहे.