₹1 करोड टर्म इन्शुरन्स काय आहे?
एक लाईफ इन्शुरन्स, ज्यामध्ये ₹1 करोड टर्म इन्शुरन्स हि, लेव्हल टर्म लाईफ इन्शुरन्स पॉलिसी जे फायदे देते त्याची किंमत आहे. या पॉलिसीचे वैशिष्ट्य आहे ₹1 करोडची विमा रक्कम. हे प्लॅन्स खरेदी करण्याची प्रक्रिया इतर कोणत्याही टर्म लाईफ पॉलिसी खरेदी करण्यासारखीच आहे.
तुमच्या ₹1 करोड लाईफ कव्हरचा प्रिमियम तुमचे वय, जीवनशैली, लिंग, ठिकाण आणि यासारख्या बऱ्याच वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून आहे. टर्म इन्शुरन्स कॅलक्युलेटर वापरून, तुम्ही प्रिमियमच्या मूल्याचा अंदाज लावू शकता.
₹1 करोड टर्म इन्शुरन्स प्लॅनचे काम कशाप्रकारे चालते?
जेव्हा तुम्ही स्वतःसाठी एक करोड टर्म इन्शुरन्स लाईफ कव्हर खरेदी करता, तेव्हा तुम्ही वय, आरोग्य आणि जीवनशैली या सारख्या घटकांवर आधारित प्रिमियम भरता. जर पॉलिसी मुदतीच्या दरम्यान तुमचा मृत्यू होतो, तर विमा कंपनी तुमच्या नामनिर्देशित लाभार्थींना ₹1 करोड विमा रक्कम देते. ही एकरकमी रक्कम त्यांना जगण्याचे खर्च सांभाळण्यात, कर्जाची परतफेड करण्यात आणि इतर आर्थिक जबाबदाऱ्या सांभाळण्यात मदत करू शकते, जे तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थिरतेची खात्री करते.
चला आपण हे 31 वर्षे वयाच्या कुमारी अंबिकाच्या उदाहरणाने समजून घेऊ. अंबिका ही एक कार्यरत व्यावसायिक आहे जिच्यावर सध्या कोणीही अवलंबून नाही पण ती पुढच्या वर्षी लग्न करण्याची योजना करत आहे. ती स्वतःला आर्थिकरित्या तयार करण्यासाठी एक करोड टर्म लाईफ इन्शुरन्स प्लान खरेदी करण्याची योजना करत आहे. ते कशाप्रकारे काम करेल ते इथे पहा.
वय - 31 वर्षे:
उपलब्ध सर्व पर्याय तपासल्यानंतर आणि ऑनलाइन कॅलक्युलेटर्स वापरून अंदाज मिळवल्यावर अंबिका ₹1 करोड टर्म प्लान खरेदी करते. ती वार्षिक प्रिमियम भरणे निवडते, जे तिने तिच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास केल्यानंतर स्वतःसाठी योग्य पर्याय मानले आहे.
वय - 32-40 वर्षे:
अंबिकाचे लग्न होते आणि आता ती दोन मुलांचे संगोपन करत आहे. तसेच ती बराच वेळ कामात आणि कुटुंबातील इतर सदस्यांची देखभाल करण्यात घालवते, जे हळूहळू तिच्या आधारावर अवलंबून आहेत.
वय - 58 वर्षे:
अंबिका आणि तिच्या पतीचा दुर्घटनेमध्ये मृत्यू होतो. त्यांच्या पश्चात तिची मुलं आहेत. तिने ₹1 करोड लाईफ कवरसाठी नामनिर्देशित म्हणून तिच्या मुलांना आणि तिच्या आईला नामांकित केलेले.
तिच्या नामनिर्देशित व्यक्तींद्वारे केलेल्या दाव्यांवर प्रक्रिया झाल्यावर तिची मुलं आता त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी या पैशांचा उपयोग करू शकतात. अशाच प्रकारे, तिची आई सुद्धा म्हातारपणात स्वतःची काळजी घेऊ शकते, जसे तिच्या प्रिय दिवंगत मुलीची इच्छा होती.
अंबिका प्रमाणेच, जर तुम्ही एक नवीन टर्म इन्शुरन्स प्लान खरेदी करू इच्छिता, तर तुम्ही इंडियाफर्स्ट लाईफचे अनेक प्लॅन्स पाहू शकता जे ₹1 करोडचा टर्म इन्शुरन्स देतात.
₹1 करोड टर्म इन्शुरन्स प्लान कोणी खरेदी करायला हवा?
₹1 करोड टर्म लाईफ इन्शुरन्स विभिन्न वयोच्या आणि उत्पन्न गटातील व्यक्तींसाठी योग्य आहे. समाजातील काही भाग ज्यांना ₹1 करोड लाईफ इन्शुरन्सच्या विमा रकमेचा लाभ होऊ शकतो:
असे व्यक्ती ज्यांच्यावर अवलंबून असलेले व्यक्ती त्यांच्या उत्पन्नावर अवलंबून आहेत, त्यांनी एक उल्लेखनीय लाईफ कवरने त्यांच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करायला हवे. गृहकर्ज किंवा मुलांचे शिक्षण यासारख्या महत्त्वपूर्ण आर्थिक जबाबदाऱ्या असलेल्या लोकांनाही या कवरेजचा फायदा होऊ शकतो. ₹1 करोड लाईफ इन्शुरन्स, नामनिर्देशित व्यक्तीला विमाधारकाच्या मृत्यू नंतर आर्थिक ताणतनावाची चिंता न करता, अनेक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात मदत करू शकतो.
तरुण व्यक्ती आपल्या करीयरच्या सुरुवातीलाच पॉलिसी खरेदी करून कमी प्रिमियम मध्ये विमा मिळवू शकतात, यामुळे अधिक किफायतशीर दरात दीर्घकाळ कव्हरेज सुनिश्चित होतो. यामुळे त्यांना भविष्यात आपल्या प्रियजनांसाठी कोणतीही दायित्वे सोडून जावी लागतील याची चिंता न करता आपली स्वप्ने पूर्ण करण्याची संधी मिळते.
जबाबदारी असलेल्या व्यक्ती
आपल्या जबाबदाऱ्या आपल्या प्रियजनांवर सोडून जाणे हे योग्य नाही. तुम्ही कर्जाच्या किंवा इतर मोठ्या ऋणांच्या ओझ्यापासून कुटुंबाचे रक्षण करू शकता. मोठे कर्ज डोक्यावर असलेल्या एखाद्या व्यक्तीला कुटुंब सुरक्षित ठेवण्यासाठी , ₹1 करोड टर्म प्लान मदत करू शकतो.
संपत्ती हस्तांतरण आणि इस्टेटीचे नियोजन या सारखी प्रकरणे उत्तराधिकाऱ्यांसाठी पुरेशा कवरेजने सुरक्षित केल्या जाऊ शकतात. एखाद्याच्या प्रियजनांना त्यांच्या निधनानंतर आर्थिक आधार मिळेल.
Why Should You Buy ₹1 Crore Term Insurance?
There are several reasons why you may find term insurance for ₹1 crore a suitable option for yourself.
High Coverage at Affordable Premiums
Financial Security for Dependents
Provides a substantial amount to cover daily expenses, education, and future needs.
Ensures your family maintains their lifestyle in your absence.
Customisable Plan
Offers options to add riders for enhanced protection, such as critical illness or accidental death.
Flexible premium payment terms to suit your financial planning.
योग्य 1 करोड टर्म इन्शुरन्स प्लान कसा निवडावा?
योग्य पॉलिसी मुदत निश्चित करा
अशी टर्म इन्शुरन्स पॉलिसी निवडा जी त्या वेळी कव्हरेज देऊ शकते जेव्हा तुम्हाला त्याची सर्वात जास्त गरज आहे. संपूर्ण मुदतीच्या दरम्यान प्लान तुम्हाला आरामात प्रिमियम भरू देईल याची खात्री करा.
टर्म इन्शुरन्स कॅलक्युलेटर वापरून तुमच्या निवडलेल्या प्लानसाठी प्रिमियम निश्चित करा. चांगल्याप्रकारे माहितीपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यासाठी संपूर्ण पॉलिसी मुदतीसाठी प्रिमियम किफायतशीर असल्याची खात्री करा.
विशेषता आणि पात्रता निकषांच्या आधारे ₹1 करोड इन्शुरन्स पॉलिसीचे पर्याय शोधा आणि त्यांची तुलना करा. तो प्लान निवडा जो तुमच्या आर्थिक आवश्यकता पूर्ण करतो.
विशेषता, लाभ आणि प्रिमियम दरांच्या आधारे टर्म इन्शुरन्स प्लान्सचे विश्लेषण आणि तुलना करा. ₹1 करोड विमा रक्कम असलेल्या टर्म इन्शुरन्सचे लाभ तुमच्या कुटुंबाला मिळण्याची खात्री करण्यासाठी उच्च क्लेम सेटलमेंट रेश्यो असलेली विमा कंपनी निवडा.
टर्म इन्शुरन्स पॉलिसी कस्टमाइज करा
योग्य प्रिमियम भरणा पर्याय, पेआउट पर्याय निवडून आणि वाढीव कवरेजसाठी रायडर्स जोडून प्लान कस्टमाइज करा. प्रिमियम भरणाचे सोयिस्कर माध्यम निवडा (जसे मासिक, अर्ध वार्षिक किंवा वार्षिक).
रायडर्स समाविष्ट करण्याचा विचार करा
विशिष्ट परिस्थितींमध्ये कव्हरेज वाढवण्यासाठी रायडर्स अतिरिक्त लाभ देतात जसे अपघाती मृत्यू लाभ.
योग्य कव्हरेज रक्कम कशी निश्चित करायची?
जर तुम्ही विचार करत आहात की ₹1 करोडची विमा रक्कम तुमच्यासाठी योग्य आहे की नाही, तर इथे काही गोष्टी दिलेल्या आहेत ज्यांच्याविषयी तुम्ही विचार करायला हवा:
कव्हरेज तुमच्या वार्षिक उत्पन्नाचे कमीत कमी 10 पट असायला हवे, जेणेकरून ते तुमच्या प्रियजनांना बराच वेळपर्यंत आधार देऊ शकेल, जोपर्यंत ते आपल्या पायांवर उभे राहत नाही.
जर तुमच्यावर कोणतेही दायित्वे आहेत, तर त्यांना विमा रकमेच्या गणनेत समाविष्ट करणे योग्य आहे.
तुमच्या विशिष्ट जबाबदाऱ्या, जसे तुमच्या मुलाचे शिक्षण, यांचा सुद्धा गणनेसाठी विचार केला जाऊ शकतो.
योग्य विमा रक्कम ओळखण्यासाठी आणि ₹1 करोड प्लान तुमच्यासाठी योग्य आहे की नाही हे समजण्यासाठी, ऑनलाइन टर्म इन्शुरन्स कॅलक्युलेटर वापरा.
व्यापक कव्हरेज देणारा टर्म प्लान निवडण्याची शिफारस केली जाते का?
चला जाणून घेऊ कि उच्च विमा रक्कम, जसे ₹1 करोड, निवडण्याचा तुमच्यावर कसा परिणाम होऊ शकतो.
टर्म इन्शुरन्स पॉलिसी, ज्यामध्ये ₹1 करोड विमा रक्कम देणाऱ्या पॉलिसींचा समावेश आहे, खुपच किफायतशीर प्रिमियममध्ये भरीव कव्हरेज देतात. तुम्ही ₹50 लाख प्लान निवडा किंवा ₹1 करोड प्लान, मात्र खर्च नेहमीच सांभाळता येणारा असतो. यामुळे तुम्ही तुमच्या आर्थिक स्थितीवर कोणताही दबाव न टाकता उच्च कवरेजचा लाभ घेऊ शकता.
टर्म प्लान संपूर्ण पॉलिसी अवधी दरम्यान तुमचे प्रिमियम एक समान राहिल्याची खात्री करतो.
30 वर्षांपर्यंतसाठी ₹1 करोड पॉलिसी निवडणे म्हणजे तुम्ही तोच वार्षिक प्रिमियम भराल.
आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात, आदर्शतः तुमच्या विशी किंवा तिशीच्या सुरुवातीला, टर्म इन्शुरन्स खरेदी करणे दीर्घकालिन किफायतशीरपणा आणि आर्थिक अंदाजाची खात्री होते.
एक ₹1 करोड टर्म इन्शुरन्स प्लान मजबूत आर्थिक संरक्षण देतो. ही उच्च विमा राशी निवडण्याने तुमच्या प्रियजनांना भविष्यातील आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यात आणि उच्च महागाईच्या दरात सुद्धा त्यांचे जीवनमान कायम राखण्यात मदत मिळू शकते.
तुमची विमा रक्कम वाढवणे ही कव्हरेज वाढवण्याची एकमेव पद्धत नाही. तुम्ही तुमची पॉलिसी अशा रायडर्सने कस्टमाइज करू शकता जे अतिरिक्त लाभ देतात. क्रिटिकल इलनेस रायडर्स आणि इतर पर्याय लवचिकता देतात, आणि तुमची इन्शुरन्स पॉलिसी विशिष्ट गरजा आणि परिस्थितीला अनुसरुन बनवतात.
इंडियाफर्स्ट लाईफचा ₹1 करोड टर्म इन्शुरन्स प्लान का खरेदी करावा
इंडियाफर्स्ट लाईफ त्यांच्या 1 करोड टर्म लाईफ इन्शुरन्स प्लॅन्स साठी किफायतशीर प्रिमियम देतो, ज्यामुळे व्यापक कवरेजसाठी हा एक किफायतशीर पर्याय बनतो.
आमचे प्लॅन्स तुमच्या अकाली मृत्यूच्या प्रकरणी तुमच्या लाभार्थींना ₹1 करोडची एकरकमी रक्कम निश्चित करून आर्थिक सुरक्षा देतात. आम्ही मिळून त्यांची जीवनशैली कायम ठेवण्यात आणि आर्थिक दायित्वे पूर्ण करण्यात त्यांची मदत करू शकतो.
इंडियाफर्स्ट लाईफचे ₹1 करोड टर्म इन्शुरन्स प्लॅन्स सोयिस्कर पॉलिसी मुदती आणि पर्यायांसोबत येतात. आम्ही तुम्हाला तुमच्या विशिष्ट गरजा आणि आर्थिक लक्ष्यांसाठी योग्य कव्हरेज तयार करु देतो.
आम्ही क्रिटिकल इलनेस रायडर्स आणि ॲक्सीडेंटल डेथ रायडर्स सारखे अतिरिक्त लाभ देतो, जे वेगवेगळ्या अनपेक्षित परिस्थितींच्या विरुद्ध व्यापक संरक्षण देण्यासाठी कव्हरेज वाढवतात.
इंडियाफर्स्ट लाईफ आपल्या कुशल ग्राहक सेवा आणि झंझट मुक्त दावा प्रक्रियांसाठी प्रसिद्ध आहे. तुमच्या प्रियजनांना कठीण प्रसंगी कोणत्याही अनावश्यक विलंब न करता आवश्यक आर्थिक मदत मिळू शकते.
₹1 करोड टर्म इन्शुरन्स प्लान खरेदी करण्याआधी विचारात घ्यायच्या गोष्टी
कवरेजचे मूल्यमापन: पुरेशा कवरेजची खात्री करण्यासाठी कर्ज, भविष्यातील खर्च आणि जीवनशैलीच्या महत्त्वाकांक्षासह तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजांचे मूल्यमापन करा.
पॉलिसी मुदत: कर्जाची मुदत, मुलांचे शिक्षण आणि सेवानिवृत्तीचे वय या गोष्टी ध्यानात ठेवून तुमच्या आर्धिक लक्ष्यांना अनुसरुन मुदत निवडा.
प्रिमियमचा किफायतशीरपणा: पॉलिसीच्या कालावधी दरम्यान तुमच्या बजेटमध्ये बसणारे प्रिमियम निवडा आणि भरणाची वारंवारता तुमच्या आर्थिक नियोजनानुसार ठेवा.
क्लेम सेटलमेंट रेशियो: कुशल दावा प्रक्रिया आणि मनःशांतिसाठी विमा कंपनीच्या क्लेम सेटलमेंट रेशियो विषयी रिसर्च करा.
रायडर्स: आपल्या आवश्यकतांनुसार कव्हरेज वाढवण्यासाठी क्रिटिकल इलनेस रायडर किंवा ॲक्सीडेंटल डेथ रायडर सारखे अतिरिक्त पर्याय शोधा.
खरेदीच्या आवश्यकता: वय आणि कवरेजच्या रकमेच्या आधारे कोणत्याही वैद्यकीय परीक्षणाच्या आवश्यकता समजून घ्या.
पॉलिसी अपवाद: तुमच्या कवरेजची सीमा स्पष्ट करण्यासाठी पॉलिसी द्वारे कव्हर न केलेल्या विशिष्ट स्थितींचे अवलोकन करा आणि समजून घ्या.
दावा प्रक्रिया: पारदर्शक आणि कुशल निकालासाठी विमा कंपनीच्या दावा प्रक्रियासोबत स्वतःला परिचित करून घ्या.
इंडियाफर्स्ट लाईफचा ₹1 करोड टर्म इन्शुरन्स प्लान कसा खरेदी करायचा?
इंडियाफर्स्ट लाईफच्या टर्म इन्शुरन्स पॉलिसी ऑनलाइन खरेदी केल्या जाऊ शकतात. तुमच्या पसंतीचा प्लान निवडा आणि खरेदी पेजवर जा.
प्लानचे तपशील निवडा आणि त्यानंतर तुमचे वैयक्तिक तपशील प्रविष्ट करा.
प्लानचे अवलोकन करा आणि तपशील निश्चित करा.
त्यानंतर तुम्हाला आवश्यकत कागदपत्रे जमा करावी लागतील आणि प्रिमियम भरावा लागेल.
तुम्हाला पॉलिसी कागदपत्राची तुमची प्रत मिळेल.
योग्य लाईफ इन्शुरन्स प्लान निवडण्यात मदत पाहिजे का? 8828840199 वर आम्हाला आताच कॉल करा किंवा इथे कॉल बूक करा.
Frequently Asked Questions
₹ 1 करोडचा टर्म इन्शुरन्स खरेदी करण्यासाठी किमान किती उत्पन्नाची आवश्यकता आहे?
यामध्ये उत्पन्नाशी संबंधित कोणतीही कठोर आवश्यकता नाही. मात्र, अंडररायटिंग टीम तुमच्या उत्पन्न आणि इतर दायित्वाच्या आधारे स्वीकृती सुरक्षित ठेवू शकते. हा पैलू समजून घेण्यासाठी विमा कंपनीसोबत सल्ला मसलत करणे योग्य आहे, कारण हे प्रकरण प्रत्येक प्रकरणात वेगवेगळे असू शकते.
₹1 करोड टर्म प्लान साठी कोण पात्र आहे?
भलेही अंतिम स्वीकृती अंडररायटिंग टीम कडे असते, परंतु एक रेग्युलर टर्म प्लान साठी पात्र प्रत्येक व्यक्ती ₹ 1 करोड टर्म इन्शुरन्स प्लान साठी अर्ज करू शकतो.
₹1 करोड टर्म इन्शुरन्स पॉलिसी साठी सरासरी प्रिमियम मूल्य काय आहे?
टर्म इन्शुरन्सचा प्रिमियम वय, लिंग आणि जीवनशैली सारख्या वेगवेगळ्या बाबींवर अवलंबून आहे. तुमच्या वैयक्तिक तपशीलांच्या आधारे अंदाज मिळवण्यासाठी तुम्ही कॅलक्युलेटर वापरू शकता.
₹1 करोड टर्म इन्शुरन्स प्लान ऑनलाइन कसा खरेदी करायचा?
प्लान खरेदी करण्यासाठी तुम्ही इन्शुरन्स प्रदात्याच्या वेबसाइटवर जाऊ शकता. तुम्हाला तुमची खरेदी पूर्ण करण्यासाठी संबंधित कागदपत्रांच्या डिजिटल प्रति जमा कराव्या लागतील आणि ऑनलाइन प्रिमियम भरणा करावा लागेल.
उच्च कवरेजसाठी दोन टर्म इन्शुरन्स प्लॅन्स खरेदी केले जाऊ शकतात?
एक पेक्षा अधिक टर्म इन्शुरन्स प्लान असण्याच्या विरुद्ध कोणताही नियम नाही. मात्र, दुसऱ्या पॉलिसीमध्ये पैसे खर्च करण्याआधी तुमच्या गरजांचे मूल्यमापन करणे तसेच तुमच्या वर्तमान प्लानला तुमच्या सर्व आवश्यकतांनुसार बदलले जाऊ शकते कि नाही याचे मूल्यमापन करणे योग्य आहे.
एनआरआय व्यक्ती ₹1 करोड विमा रक्कम असलेला टर्म इन्शुरन्स खरेदी करू शकतात का?
होय, एनआरआय साठी ₹1 करोडची विमा रक्कम असलेला टर्म इन्शुरन्स खरेदी करण्यासाठी उपलब्ध असू शकतात.