तुम्हाला तुमचे संपर्काचे तपशील खालील परिस्थिती तपासण्याची आणि बदलण्याची आवश्यकता असेल:
- जर तुम्ही नवीन घरात राहण्यास गेले आहात आणि म्हणून, संपर्कासाठी/ टपालासाठी तुमचा पत्ता बदलू इच्छिता
- तुम्ही तुमचा संपर्काचा क्रमांक किंवा ईमेल आयडी बदलला आहे आणि म्हणून, तो सिस्टम मध्ये अद्यावत करू इच्छिता
- नोंदीमध्ये असलेल्या संपर्काच्या तपशीलांमध्ये काही त्रुटी आहे
तुमचा पत्ता बदलून घेण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:
आम्हाला ईमेल करा:
- पत्त्याच्या पुराव्याच्या स्वयं-साक्षांकित प्रतिसोबत रीतसर भरलेला बदल विनंती फॉर्मcustomer.first@indiafirstlife.com वर आम्हाला ईमेल करा.
- इथे क्लिक करून पत्त्यासाठी स्वीकार्य पुराव्यांची यादी पहा.
- ईमेल मध्ये तुमचा पॉलिसी क्रमांक नमूद करण्यास विसरु नका.
टपाल/ कुरियर:
- पत्त्याच्या कोणत्याही पुराव्याच्या स्वयं-साक्षांकित प्रतिसोबत रीतसर भरलेला बदल विनंती फॉर्म जमा करा किंवा आम्हाला पाठवा.
- इथे क्लिक करून पत्त्यासाठी स्वीकार्य पुराव्यांची यादी पहा.
- खाली दिलेल्या पत्त्यावर आम्हाला हे पाठवा:
इंडियाफर्स्ट लाईफ इंश्युरन्स कंपनी लिमिटेड
१२वा आणि १३वा मजला,उत्तर [क] विंग, टॉवर ४
नेस्को आयटी पार्क, नेस्को सेंटर,
पश्चिम द्रुतगती महामार्ग,
गोरेगाव (पूर्व), मुंबई – ४०००६३0.
एएमएल मार्गदर्शक नियमांनुसार पत्त्याच्या स्वीकार्य पुराव्यांची यादी
- आधार कार्ड
- पासपोर्ट
- राशन कार्ड
- मतदार ओळखपत्र (पत्ता असलेले)
- युटिलिटी बिल (मोबाइल, लँडलाइन, वीज बिल, गॅस बिल), दोन महिन्यांपेक्षा जुने नाही
- बँक खात्याचे स्टेटमेंट ज्यावर वास्तव्याचा कायमचा/ सध्याचा पत्ता नमूद आहे, दोन महिन्यांपेक्षा जुने नाही
- नोंदणीकृत विक्री कराराची प्रत (निवासी) किंवा भाड्याच्या पावतीसह वैध लीज/ रजा आणि परवाना करार
- वास्तव्याचा पुरावा म्हणून मालकाचे प्रमाणपत्र
- सध्याचा पत्ता दर्शवणारे बँक पासबूक
- सध्याचा पत्ता दर्शवणारे पोस्ट ऑफिस बचत खात्याचे पासबूक