Menu
close
एक्सपर्टला विचारा arrow

लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा

तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.

right-icon-placeholder
right-icon-placeholder
male male

पुरुष

male male

महिला

male male

इतर

गोपनीयता धोरण

हे गोपनीयता धोरण इंडियाफर्स्ट लाईफ इंश्युरन्स कंपनी लिमिटेड (“इंडियाफर्स्ट लाईफ”) च्या या (www.indiafirstlife.com) वेबसाइटचा वापर नियंत्रित करते.

 

कृपया वापराच्या अटी काळजीपूर्वकपणे वाचा. ही वेबसाइट आणि तिचे पृष्ठ (एकत्रितपणे, ही “वेबसाइट”) ॲक्सेस करून किंवा वापरून, तुम्ही वापराच्या अटींशी बांधील असण्यासाठी आणि त्या पूर्णपणे स्वीकारण्यासाठी सहमत आहात. इंडियाफर्स्ट लाईफ वापराच्या अटी वेळोवेळी बदलू शकते आणि सदर बदल या वेबसाइटवर पोस्ट केले जातील. पोस्ट केलेल्या अशा कोणत्याही बदलानंतर ही साइट ॲक्सेस करणे आणि वापरणे सुरु ठेवून, असे बदल तुम्ही स्वीकारल्याचे मानले जाईल. वेबसाइटवर वर्णन केलेल्या उत्पादनं आणि सेवांसाठी सर्वच  ग्राहक पात्र नसतील, आणि कोणत्याही उत्पादन किंवा सेवेसाठी तुमची पात्रता निश्चित करण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवलेला आहे.

आम्ही बाहेरील पक्षांसमोर कोणतीही माहिती उघड करतो का?

Answer

आम्ही तुमची वैयक्तिकपणे ओळख करणारी माहिती बाहेरील पक्षांना विकत, देवाण-घेवाण किंवा इतर प्रकारे हस्तांतर करत नाही. यामध्ये विश्वसनीय तिसऱ्या पक्षांचा समावेश नाही जे आम्हाला आमची वेबसाइट चालवण्यात, आमचा व्यवसाय करण्यात, किंवा तुम्हाला सेवा देण्यात आम्हाला सहकार्य करतात, जोपर्यंत ते पक्ष ही माहिती गोपनीय ठेवण्यासाठी सहमत आहेत.

 

अटी आणि नियम आणि गोपनीयता धोरणाशी सहमत होऊन, तुमची माहिती एक तिसऱ्या पक्षासोबत शेयर करण्यासाठी तुम्ही आम्हाला अधिकृत करता, जे तुम्हाला चांगली सेवा देण्यासाठी गोळा केलेल्या माहितीवर प्रक्रिया करू शकतात. आम्ही तुमची माहिती बाहेरील पक्षांसमोर उघड करणार नाही जोपर्यंत अशी कारवाई या संदर्भात आवश्यक होत नाही:

  • आमच्या अधिकारांची, हितांची, प्रतिष्ठेची किंवा मालमत्तेची सुरक्षा करणे; किंवा
  • लागू कायद्यांचे पालन करणे; किंवा
  • जर कोणत्याही न्यायिक किंवा लवादच्या अधिकृत घोषणा किंवा आदेशाच्या अंतर्गत अशी माहिती आवश्यक आहे; किंवा
  • आमच्या उत्पादनांच्या किंवा सेवांच्या अटी आणि नियमांची किंवा अटी आणि नियमांची अंमलबजावणी करणे.

 

तुमची वैयक्तिकरित्या ओळख करणारी माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही योग्य ते सर्व आणि वाजवी उपाय करू आणि तुम्ही स्पष्टपणे मान्य करता आणि सहमत आहात की कोणतीही माहिती जी आमच्या वेबसाइटद्वारे आम्हाला पाठवण्यात आलेली आहे ती तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपापासून कदाचित सुरक्षित असू शकत नाही आणि अशा कोणत्याही हस्तक्षेपासाठी आम्ही जबाबदार असणार नाही किंवा जबाबदार मानले जाणार नाही.

तुम्ही आम्हाला कधीही ईमेलद्वारे सूचना देऊन तुमची माहिती तिसऱ्या पक्षासोबत शेयर न करण्याची सूचना देऊ शकता. आम्ही बिगर-वैयक्तिकरित्या ओळख करणारी पाहुण्याची माहिती मार्केटिंग, जाहिरातबाजी किंवा आमच्या विवेकबुद्धीनुसार इतर उपयोगांसाठी इतर पक्षांसोबत शेयर करू शकतो.

आम्ही कूकीज वापरतो का?

Answer

होय, आम्ही वापरतो. कूकीज छोट्याश्या फाईल्स आहेत ज्या एक साइट किंवा तिचा सेवा पुरवठादार तुमच्या वेब ब्राउजर द्वारे तुमच्या कंप्युटरच्या हार्ड ड्राईववर पाठवतो (जर तुम्ही संमती देता) ज्या साइट्सना किंवा सेवा पुरवठादारांच्या प्रणालींना तुमचा ब्राउजर ओळखू देतो आणि काही माहिती हस्तगत आणि आठवू देतो.

तुमच्या शॉपिंग कार्टमधील वस्तू लक्षात ठेवून त्यावर प्रक्रिया करण्यात आणि भविष्यातील भेटींसाठी तुमच्या पसंती समजून सेव करण्यात आणि साइट आणि तिच्यावरील संभाषणांविषयी डेटा एकत्र करून संकलित करण्यात आम्हाला मदत करण्यासाठी आम्ही कूकीज वापरतो जेणेकरून आम्ही भविष्यात अधिक चांगला अनुभव आणि साधनं देऊ शकू.

आमच्या साइटवर भेट देणाऱ्यांना चांगल्याप्रकारे समजण्यात आम्हाला मदत करण्यासाठी आम्ही कदाचित तिसऱ्या पक्षीय सेवा पुरवठादारांसोबत करार करू शकतो. आमचा व्यवसाय करण्यात आणि सुधारण्यात आम्हाला मदत करण्याच्या व्यतिरिक्त या सेवा पुरवठादारांना आमच्या वतीने गोळा केलेली माहिती वापरण्याची परवानगी नाही.

तुम्हाला पसंत असल्यास, तुम्ही प्रत्येक वेळी कूकीज पाठवले जात असताना तुम्हाला तुमच्या संगणकाने तुम्हाला इशारा देणे तुम्ही निवडू शकता किंवा तुमच्या ब्राउजर सेटिंग्स द्वारे सर्व कूकीज बंद करणे तुम्ही निवडू शकता. बहुतांश वेबसाइट्स प्रमाणेच, जर तुम्ही तुमच्या कूकीज बंद करता, तर कदाचित आमच्या काही सेवा व्यवस्थितपणे काम करणार नाही. मात्र, तरीही तुम्ही आमच्या वेबसाइटवरील संपर्क पृष्ठाद्वारे आमच्या ग्राहक सेवेला संपर्क करून ऑर्डर्स देऊ शकता.

आमच्या वेबसाइटद्वारे ठेवलेल्या कूकीजमध्ये कोणतीही वैयक्तिक माहिती गोळा किंवा संग्रह केली जात नाही आणि, परिणामी, कोणत्याही तिसऱ्या पक्षांना काहीही पाठवले जाऊ शकत नाही.

आम्ही तुमची माहिती कशी गोळा करतो आणि त्यात काय समाविष्ट आहे?

Answer

जेव्हा तुम्ही आमच्या वेबसाइटवर नोंदणी करता, आमचे न्यूजलेटर सबस्क्राइब करता, सर्वेची उत्तरं देता किंवा फॉर्म भरता तेव्हा आम्ही तुमच्याकडून माहिती गोळा करतो.

 

तुम्ही ज्या डोमेन आणि होस्ट वरून इंटरनेट ॲक्सेस करता, तुम्ही वापरत असलेल्या संगणक किंवा इंटरनेट सेवा पुरवठादाराच्या इंटरनेट प्रोटेकॉल ॲड्रेस, अनामित सांख्यिकीय डेटा संदर्भात माहिती आणि तुमच्याकडून आवश्यक असलेले कोणतेही आणि सर्वच तपशील आम्ही गोळा करू शकतो.

 

जर तुम्ही भारताबाहेरून आमच्या वेबसाइटला भेट देत आहात, तुमच्या भेटीच्या परिणामस्वरुप आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून माहितीचे हस्तांतरण होईल, ज्यासाठी तुम्ही संमती देता आणि आमची वेबसाइट वापरून संमती दिल्याचे मानले जाईल.

 

तुमच्या द्वारे दिलेली सर्व माहिती किंवा दस्तऐवज इंडियाफर्स्ट लाईफ द्वारे खरे, अचूक आणि संपूर्ण मानले जाईल आणि हाताळली जाईल. जर तुम्ही अनामिकपणे वेबसाइटला भेट देण्याचे ठरवता, तर आमच्या वेबसाइटवरील सर्वच कार्ये कदाचित तुमच्यासाठी उपलब्ध नसतील.

आम्ही तुमच्या माहितीची कशाप्रकारे सुरक्षा करतो?

Answer

जेव्हा तुम्ही आमच्या वेबासइटवर ऑर्डर देता किंवा तुमची वैयक्तिक माहिती वापरता, तुमच्या वैयक्तिक माहितीची सुरक्षा सांभाळण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करतो.

 

आम्ही एक सुरक्षित सर्वरचा वापर देऊ करतो. सर्व पुरवलेली संवेदनशील/क्रेडिट माहिती सिक्युर सॉकेट लेयर (एसएसएल) द्वारे हस्तांतरित केली जाते आणि त्यानंतर आमच्या पेमेंट गेटवे प्रदात्याच्या डेटाबेसमध्ये एनक्रिप्ट केली जाते जी फक्त अशा प्रणालींसाठी विशेष प्रवेश अधिकारांद्वारे अधिकृत असलेल्या व्यक्तींसाठी उपलब्ध असते आणि सदर माहिती गोपनीय ठेवण्याची आवश्यकता असते.

 

एखाद्या व्यवहारानंतर, तुमची खाजगी माहिती (क्रेडिट कार्ड, सामाजिक सुरक्षा क्रमांक, आर्थिक माहिती इत्यादी) आमच्या सर्वर्सवर संग्रह केली जाणार नाही.

आम्ही तुमची माहिती कशाप्रकारे वापरतो?

Answer

आम्ही तुमच्याकडून जी कोणतीही माहिती गोळा करू ती खालीलपैकी मार्गांनी वापरली जाऊ शकते:

 

तुमचा अनुभव पर्सनलाइज करण्यासाठी: तुमची माहिती आम्हाला तुमच्या वैयक्तिक गरजांना चांगल्याप्रकारे प्रतिसाद देण्यात मदत करते.

 

वेबसाइटमध्ये सुधारणा करण्यासाठी: तुमच्याकडून आम्हाला मिळालेल्या माहिती आणि अभिप्रायाच्या आधारे आम्ही आमच्या वेबसाइटमध्ये सुधारणा करण्याचा सतत प्रयत्न करतो.

 

ग्राहक सेवेत सुधार करण्यासाठी: तुमची माहिती आम्हाला तुमच्या ग्राहक सेवेच्या विनंतींना प्रभावीपणे प्रतिसाद देण्यात आणि गरजांना मदत करण्यास आणि आवश्यकतेनुसार तुमच्याशी संपर्क करण्यात मदत करते.

 

व्यवहारांवर प्रक्रिया करण्यासाठी: तुमची माहिती, सार्वजनिक किंवा खाजगी, खरेदी केलेले उत्पादन किंवा विनंती केलेली सेवा वितरण करण्याच्या स्पष्ट हेतूच्या व्यतिरिक्त, कोणत्याही कारणासाठी, तुमच्या संमतीशिवाय इतर कोणत्याही कंपनीला विकली, बदली, हस्तांतर केली किंवा दिली जाणार नाही.

 

स्पर्धा, जाहिरात, सर्वेक्षण किंवा इतर साइट विशेषता प्रशासित करण्यासाठी.

 

नियमित ईमेल्स पाठवण्यासाठी: (a) तुम्ही ऑर्डरवर प्रक्रिया करण्यासाठी आम्हाला देत असलेला ईमेल ॲड्रेस फक्त त्या संदर्भात माहिती आणि अद्यतने पाठवण्यासाठी वापरला जाईल. (b) जर तुम्ही आमच्या मेलिंग लिस्टमध्ये सहभागी होण्याचे ठरवता, तर तुम्हाला ईमेल्स प्राप्त होतील ज्यामध्ये कंपनीच्या बातम्या, अद्यतने, संबंधित उत्पादन किंवा सेवा माहिती इत्यादी समाविष्ट असू शकते.

जर तुम्ही भविष्यातील ईमेल्स प्राप्त करण्यापासून अनसबस्क्राइब करू इच्छिता, तर कृपया अनसबस्क्राइब करण्यासाठी सविस्तर सुचना पहा ज्या आमच्या ईमेलच्या तळभागात दिसतात.

परवानगी असलेले प्रगटीकरण

Answer

वर वर्णन केलेल्या परिस्थितींच्या व्यतिरिक्त, इंडियाफर्स्ट लाईफ सदस्याची माहिती उघड करू शकते जर तसे करणे कायद्याने, न्यायालयाच्या आदेशाने, इतर सरकारद्वारे किंवा कायदा अंमलबजावणी प्राधिकरणाद्वारे विनंती केल्यानुसार आवश्यक आहे किंवा या सद्भावनेने कि असे प्रगटीकरण अन्यथा आवश्यक किंवा योग्य आहे, ज्यामध्ये, कोणत्याही मर्यादेशिवाय, आमच्या अधिकार किंवा मालमत्तांचे, किंवा कोणत्याही, किंवा सर्वच आमचे संबंधित, सहयोगी, कर्मचारी, संचालक किंवा अधिकाऱ्यांचे संरक्षण करण्याचा समावेश आहे, किंवा जेव्हा आमच्याकडे असे मानण्याचे कारण असते की आमच्या अधिकारांमध्ये किंवा मालमत्तेमध्ये हस्तक्षेप करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी, संपर्क साधण्यासाठी किंवा त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी, हेतुपुरस्सर किंवा अन्यथा, किंवा अशा क्रियाकलापांमुळे इतर कोणाचेही नुकसान होऊ शकते. याव्यतिरिक्त, जर इंडियाफर्स्ट लाईफ किंवा त्याची सर्व मालमत्ता मोठ्या प्रमाणात अधिग्रहित केली गेली असेल तर, युजरने प्रदान केलेली वैयक्तिक माहिती अशा संपादनाच्या संदर्भात हस्तांतरित केली जाण्याची बहुतेक शक्यता असेल.

अस्वीकृति

लिंक्ड इंश्युरन्स प्रोडक्ट्स हे पारंपारिक इंश्युरन्स प्रोडक्ट्स पेक्षा वेगळे आहेत आणि जोखमीच्या कारकाच्या अधीन आहेत. युनिट-लिंक्ड जीवन विमा पॉलिसींमध्ये भरलेले प्रिमियम भांडवल बाजाराशी संबंधित गुंतवणूकीच्या जोखमीच्या अधीन आहेत आणि युनिट्सचे एनएव्ही वर किंवा खाली जाऊ शकतात, जे फंडच्या परफॉर्मन्स आणि भांडवल बाजारास प्रभावित करणाऱ्या कारकांवर आधारित आहेत आणि विमा घेतलेली व्यक्ती त्याच्या/तिच्या निर्णयांसाठी जबाबदार आहे. इंडियाफर्स्ट लाईफ इंश्युरन्स कंपनी लिमिटेड हे फक्त इंश्युरन्स कंपनीचे नाव आहे आणि कोणत्याही प्रकारे कराराची गुणवत्ता, त्यांच्या भविष्यातील शक्यता आणि रिटर्न्स सूचवत नाही.

 

कृपया तुमच्या विमा एजंट किंवा मध्यस्थी कडून किंवा विमा कंपनीद्वारे जारी केलेल्या पॉलिसी कागदपत्रांद्वारे संबंधित जोखिम आणि लागू होणारे शुल्क जाणून घ्या. या करारच्या अंतर्गत देण्यात आलेले विभिन्न फंड्स हे फंड्सची नावं आहेत आणि हे कोणत्याही प्रकारे या प्लान्सची गुणवत्ता, त्यांच्या भविष्यातील शक्यता आणि रिटर्न्स सूचवत नाही. मागील कामगिरी कदाचित भविष्यात कायम राहू शकते किंवा कदाचित नाही आणि भविष्यातील कामगिरीची हमी नाही. या पत्रातील काही आशयात विधानं / अनुमान / अपेक्षा / अंदाज असू शकतात, जे ‘भविष्य-उन्मुख’ असू शकतात.

 

वास्तविक परिणाम या पत्रात व्यक्त केलेल्या/दर्शवलेल्या परिणामांपेक्षा मूल्य स्वरुपात वेगळे असू शकतात. या विधानांचा कोणत्याही विशिष्ट व्यक्तीला किंवा एखाद्या व्यक्तीच्या कोणत्याही गुंतवणूकीच्या गरजांसाठी वैयक्तिक शिफारस करण्याचा हेतू नाही. सदर शिफारसी / विधाने/ अनुमान / अपेक्षा/ अंदाज सर्वसाधारण स्वरुपाच्या आहेत आणि वैयक्तिक पॉलिसीधारक / ग्राहकांच्या आर्थिक स्थिती किंवा विशिष्ट गुंतवणूकीच्या गरजा किंवा जोखिम घेण्याची क्षमता विचारात घेत नाही. जोखिम आणि नियम व अटींविषयी अधिक माहितीसाठी, कृपया विक्री पूर्ण करण्याआधी विक्री विवरणपत्र काळजीपूर्वकपणे वाचा. कर लाभ कर कायद्यांमधील बदलांच्या अधीन आहेत.

सर्वात जास्त शोधले गेलेले शब्द

1800 209 8700

ग्राहक सेवा क्रमांक

whatsapp

8828840199

ऑनलाइन पॉलिसी खरेदीसाठी

call

+91 22 6274 9898

आमच्यासोबत व्हॉट्सॲपवर चॅट करा

mail