₹1.5 करोड विमा रकमेचा टर्म इन्शुरन्स काय आहे?
तुमच्या टर्म इन्शुरन्स करीता योग्य विमा रक्कम निवडण्यासाठी तुमच्या लाईफ इन्शुरन्स खरेदीच्या प्रवासातील सर्वात महत्त्वाच्या टप्प्यातील एक टप्पा आहे. ही ती रक्कम आहे जी तुम्ही तुमच्या प्रियजनांसाठी मागे सोडता, जेणेकरून त्यांचा आर्थिक तणाव कमी होऊ शकेल. ₹1.5 करोड विमा रकमेचा टर्म इन्शुरन्स प्लॅन ₹1.5 करोड मूल्याच्या लाईफ कव्हरेज सह येतो. ही एक मोठी रक्कम आहे जिच्यासाठी तुमचे नामनिर्देशित व्यक्ती मृत्यू लाभाचा दावा करू शकता.
तुम्ही ₹1.5 करोड विमा रकमेचा प्लॅन निवडण्याआधी, टर्म इन्शुरन्स काय आहे आणि हा तुमच्या आर्थिक नियोजनात कशाप्रकारे फिट बसतो याविषयी तुम्हाला चांगल्याप्रकारे माहित असल्याची खात्री करा. ₹1.5 करोड ची विमा रक्कम तुमच्यासाठी योग्य आहे की नाही याचा सुद्धा विचार करा.
₹1.5 करोड विमा रकमेचा टर्म इन्शुरन्स कशाप्रकारे काम करतो?
विमा रक्कम भले काहीही असो, जवळपास सर्वच टर्म इन्शुरन्स प्लॅन्स सारख्या पद्धतीने काम करतात. बहुतेक टर्म इन्शुरन्स प्लॅन्सचा मुख्य उद्देश तुमच्या निधनानंतर तुमच्या वारस किंवा लाभार्थी करीता आर्थिक मदतीचा स्रोत असा आहे.
उदाहरणार्थ, जर तुम्ही नसताना तुमच्या मुलाचे भविष्यातील शिक्षण सुनिश्चित करू इच्छित असाल, तर ₹ 1.5 करोड टर्म इन्शुरन्सची विमा रक्कम एक मोठी मदत ठरेल. .
योग्य विमा रक्कम निवडणे हा खरेदी करण्याआधी विचारात घेण्याच्या महत्वाच्या घटकांपैकी एक आहे. तुम्ही ₹1.5 करोड टर्म इन्शुरन्स कव्हर घेण्याचे निश्चित झाल्यावर, प्रिमियमची रक्कम, मुदत, रायडरचा समावेश आणि या सारख्या इतर घटकांचाही विचार करा.
प्रिमियमचा खर्च तुमच्या बजेटपेक्षा जास्त होणार नाही याची खात्री करण्यासाठी, टर्म इन्शुरन्स कॅलक्युलेटर वापरा. यात तुमच्या वैयक्तिक तपशील, प्लॅनच्या आवश्यकता आणि निवडलेल्या कस्टमायजेशनच्या आधारे, तुम्ही खर्चाचा अंदाज मिळवू शकता.
तुम्ही एकदा प्लॅन ची खरेदी केल्यावर, प्लॅन बद्दलची पूर्ण माहिती आणिदावा करण्याची प्रक्रिया याविषयी तुमच्या वारसदाराला पूर्ण माहिती असल्याची खात्री करा. जर तुम्ही रायडर्स निवडले आहेत, तर त्यांना ते समजल्याची खात्री करा.
नवीन टर्म प्लॅन खरेदी करू इच्छिता का? इंडियाफर्स्ट लाईफ टर्म इन्शुरन्स प्लॅन्स विविध पर्यायांमधून निवडा. त्यांची इथे ऑनलाइन खरेदी करा.
₹ 1.5 करोड टर्म इन्शुरन्स प्लॅन कोणी खरेदी करायला हवा?
टर्म लाईफ इन्शुरन्स प्लॅन्स जळपास प्रत्येक व्यक्तीसाठी फायदेशीर ठरू शकतात, विशेषकरून त्या लोकांसाठी ज्यांच्यावर कुटुंबातील सदस्य अवलंबून आहेत. खालील प्रकारच्या लोकांसाठी ₹ 1.5 करोड टर्म इन्शुरन्स प्लॅन्स उपयोगी असू शकतात:
जर तुमच्याकडे या रकमेइतक्या आर्थिक जबाबदाऱ्या असल्यास: कुटुंबातील बरेचसे सदस्य कदाचित तुमच्यावर आर्थिकरित्या पूर्णपणे अवलंबून नसतीलही. मात्र, तुमचा अकाली मृत्यू झाल्यास, तुमच्या गृहकर्जाचे ओझे तुम्हाला त्यांच्यावर टाकायचे नसेल.
जर विशिष्ट गरजा असलेल्या व्यक्ती तुमच्यावर अवलंबून आहेत: जर तुमच्या कुटुंबातील कुणी सदस्य गंभीररित्या आजारी आहे, ज्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागते किंवा मुलगा ज्याला उच्च शिक्षण घ्यायचे आहे.
जर तुम्ही खूप जोखमीची नोकरी करत आहात परंतु उत्पन्नसुद्धा भरपूर आहे: जर तुम्ही खुपच जोखमीचे परिस्थितीत काम करत असलात, तर या लाईफ कव्हरमुळे तुमच्या कुटुंबाला तुमच्या निधनानंतर त्यांची जीवनशैली कायम ठेवण्यासाठी मदत होते.
जर तुम्हाला महागाई आणि वाढत्या किंमतीविषयी काळजी आहे: जर तुम्हाला वाटते की येत्या काळात तुमच्या कुटुंबाच्या गरजा वाढतील, तर भविष्याचे नियोजन करण्यात ₹1.5 करोड टर्म इन्शुरन्स पॉलिसी तुम्हाला मदत करू शकते.
₹1.5 करोड टर्म इन्शुरन्स प्लॅन्सचे काही संभाव्य लाभ काय आहेत?
₹1.5 करोड टर्म इन्शुरन्स प्लॅन निवडण्याने पॉलिसीधारक आणि त्यांच्या कुटुंबांना अनेक फायदे मिळू शकतात. यातील काही प्रमुख फायदे इथे दिले आहेत:
आर्थिक सुरक्षा: ₹1.5 करोडची विमा रक्कम असलेला टर्म इन्शुरन्स प्लॅन तुमच्या प्रियजनांना उल्लेखनीय आर्थिक संरक्षण देतो.
किफायतशीर प्रिमियम: ₹1.5 करोडच्या पॉलिसीचे प्रिमियम इतकेच कव्हरेज देणाऱ्या इतर लाईफ इन्शुरन्स उत्पादनांच्या तुलनेत, याचे प्रिमियम साधारणपणे कमी असते.
कर लाभ: तुम्ही भरलेले प्रिमियम आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत करकपातीसाठी पात्र आहे, ज्यामुळे तुमचे करयोग्य उत्पन्न कमी होते. या व्यतिरिक्त, लाभार्थींना मिळालेला मृत्यू लाभ कलम 10(10डी) अंतर्गत करातून वगळला जातो.
लवचिकता: अनेक टर्म इन्शुरन्स प्लॅन्स पॉलिसी मुदत आणि प्रिमियम भरणा पर्याय निवडण्यात लवचिकता देतात.
रायडर पर्याय: नाममात्र किंमतीत तुमच्या ₹1.5 करोड टर्म इन्शुरन्स पॉलिसीमधे रायडर्स वाढवले जाऊ शकतात, जे वेगवेगळ्या अनपेक्षित परिस्थितींसाठी सर्वसमावेशक कव्हरेज देतात.
योग्य ₹1.5 करोड टर्म इन्शुरन्स प्लॅन कसा निवडावा?
तुम्ही निवडत असलेला प्लॅन तुमच्यासाठी योग्य असल्याची खात्री करण्यासाठी खाली दिलेल्या घटकांचा विचार करा.
₹1.5 करोड विमा रक्कम तुमच्यासाठी योग्य असल्याची खात्री करण्यासाठी तुम्ही टर्म इन्शुरन्स कॅलक्युलेटर वापरू शकता. योग्य विमा रक्कम जाणून घेण्यासाठी तुमचे वार्षिक उत्पन्न तसेच तुमच्यावरील जबाबदाऱ्यांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे.
एक योग्य इन्शुरन्स प्रोव्हायडर निवडणे हे तितकेच महत्त्वाचे आहे जितके योग्य पॉलिसी आणि विमा रक्कम निवडणे आहे. क्लेम सेटलमेंट रेश्यो तुम्हाला विमा कंपनीचा दावा निकालाबाबत काय कल आहे याची माहिती देतो. विचारात घेण्यासाठी हा एक योग्य मापदंड असू शकतो.
रायडर्स उपलब्ध आहेत किंवा नाही आणि ते घेण्याचा खर्च किती होतो ते तपासा. ते तुमच्या बजेटमध्ये बसत असल्यास आणि तुमच्या गरजेनुसार असल्यास घ्या.
आमच्याकडून ₹1.5 करोड टर्म इन्शुरन्स प्लॅन का खरेदी करावा?
₹1.5 करोड टर्म इन्शुरन्स कव्हरसाठी इंडियाफर्स्ट लाईफ इन्शुरन्स योग्य निवड आहे. आम्ही देत असलेल्या सेवा पहा:
निवड करण्यासाठी प्लॅन्सची मोठी श्रेणी
मदतीस तत्पर ग्राहक सेवा टीम
विनासायास क्लेम सेटलमेंट प्रक्रिया
पॉलिसीविषयी निर्णय घेण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी तज्ञांचा सल्ला
98.04% क्लेम सेटलमेंट रेश्यो
इंडियाफर्स्ट लाईफचा ₹1.5 करोड टर्म इन्शुरन्स प्लॅन कसा खरेदी करायचा?
इंडियाफर्स्ट लाईफच्या टर्म इन्शुरन्स पॉलिसी सहजपणे ऑनलाइन खरेदी केल्या जाऊ शकतात.
पुढे दिल्याप्रमाणे सुरुवात करा:
तुमच्या गरजांशी जुळणारा प्लॅन निवडा आणि पर्चेस पेजवर जा.
प्लॅनचे चे तपशील आणि त्यानंतर तुमचे वैयक्तिक तपशील द्या.
प्लॅन चे तपशील तपासून निश्चित करा.
आवश्यक कागदपत्रे जमा करा आणि प्रिमियम भरा.
तुम्हाला तुमचे पॉलिसी कागदपत्र मिळतील.
त्याचप्रमाणे, खरेदी प्रक्रियेच्या दरम्यान मार्गदर्शनासाठी तुमच्या इन्शुरन्स एजंटचा किंवा इंडियाफर्स्ट लाईफ सल्लागाराचा सल्ला घ्या.
योग्य लाईफ इन्शुरन्स प्लॅन निवडण्यात मदत पाहिजे का? 8828840199 वर आम्हाला आताच कॉल करा किंवा इथे कॉलबॅकची विनंती करा.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
₹1.5 करोड टर्म इन्शुरन्स करीता पात्र होण्यासाठी किमान किती उत्पन्नाची आवश्यकता आहे?
निवडलेल्या विमा रकमेसाठी कोणत्याही ठराविक किमान उत्पन्नाची आवश्यकता नाही. विमा रकमेची स्वीकृती अंडररायटिंग टीमच्या स्वीकृतीच्या अधीन आहे. पॉलिसी खरेदी मधील कोणत्याही समस्या टाळण्यासाठी, तुम्ही निवडलेल्या विमा रकमेसाठी तुम्हाला प्रिमियम परवडू शकते याची खात्री करा.
₹1.5 करोड टर्म प्लॅन साठी कोण पात्र आहे?
टर्म लाईफ इन्शुरन्सइंश्युरन्स प्लॅन प्लान खरेदी करताना कोणतीही विमा रक्कम निश्चित करण्याआधी, , तुम्ही कमीत कमी 18 वर्ष वयाचे असले पाहिजेत. तुम्ही घेऊ इच्छित असलेल्या टर्म पॉलिसीचे पात्रता निकष तपासून तुम्ही तो प्लॅन घेऊ शकाल याची खात्री करा.
जर विमाधारक पॉलिसी मुदती पर्यंत जिवंत राहिल्यास काय होते?
जर तुम्ही एक लेवल टर्म इन्शुरन्स पॉलिसी निवडली आणि पॉलिसी मुदतीपर्यंत जिवंत राहिलात, तर दावा करण्यासाठी टर्म इन्शुरन्सचे कोणतेही मॅच्युरिटी लाभ नाहीत. मात्र, जर तुमच्या प्लॅन मध्ये रिटर्न ऑफ प्रिमियमचा पर्याय असेल, तर तुम्ही प्लॅन मॅच्युअर झाल्यावर प्रिमियम परत करण्यासाठी दावा करू शकता.
₹1.5 करोड टर्म इन्शुरन्स प्लॅन साठी प्रिमियमची रक्कम किती आहे?
एखाद्या प्लॅन च्या प्रिमियमची रक्कम तुमचे वय आणि लिंग या सारख्या वेगवेगळ्या घटकांवर तसेच निवडलेल्या विमा रकमेवर अवलंबून असते. तुम्ही टर्म इन्शुरन्स कॅलक्युलेटर वापरून तुमच्या वैयक्तिक तपशीलांच्या आधारे निवडलेल्या प्लॅन आणि विमा रकमेचा अंदाज घेऊ शकता.
मी ₹1.5 करोड टर्म प्लॅन कसा खरेदी करू शकतो?
इंडियाफर्स्ट लाईफ वेबसाइट वर जाऊन तुम्ही खरेदी करू इच्छित असलेला प्लॅन निवडू शकता. खरेदीची प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण केली जाऊ शकते, ज्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील आणि प्रिमियमची रक्कम भरावी लागेल. त्याचप्रमाणे, तुम्ही इन्शुरन्स एजंटची मदत सुद्धा घेऊ शकता.