₹50 लाख टर्म इंश्युरन्स काय आहे?
₹50 लाख टर्म इंश्युरन्स प्लॅन एक आर्थिक उत्पादन आहे जे, पॉलिसीच्या लाभार्थींना ₹50 लाख मूल्याचे लाईफ कवर देतो. पॉलिसी मुदतीच्या दरम्यान विमाधारकाच्या मृत्यू झाल्यास, हि योजना अमलात येते. या प्रकारचा लाईफ इंश्युरन्स प्लॅन विमाधारक नसतानाही त्याचे कुटुंब आर्थिकरित्या सुरक्षित असल्याची आणि त्यांची जीवनशैली कायम ठेवेल याची खात्री करतो.
₹50 लाख टर्म इंश्युरन्स प्लॅनचे काम कसे चालते?
₹50 लाख टर्म इंश्युरन्स प्लॅन पॉलिसी मुदतीच्या दरम्यान पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास लाभार्थींना एक मोठा मृत्यू लाभ दिला जातो.
याचे सविस्तर स्पष्टीकरण इथे दिले आहे:
पॉलिसी खरेदी: पॉलिसीधारक ₹50 लाखचा टर्म प्लॅन निवडतो आणि वय, आरोग्य, जीवनशैली आणि पॉलिसी मुदतीच्या आधारे प्रिमियम भरतो.
प्रिमियम भरणा: पॉलिसीधारकाच्या पसंतीच्या आधारे प्रिमियम वार्षिक, अर्धवार्षिक, त्रैमासिक किंवा मासिक पद्धतीने भरला जाऊ शकतो.
पॉलिसी मुदत: पॉलिसी मुदत वेगवेगळी असू शकते, टर्म प्लान्स सहसा 99 वर्षांपर्यंत कवरेज पुरवतात. पॉलिसीधारकाच्या आर्थिक ध्येय आणि जबाबदाऱ्यांच्या आधारे मुदत निवडली जाते.
मृत्यू लाभ: पॉलिसी मुदतीच्या दरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाल्यास विमा कंपनी लाभार्थींना ₹50 लाख देते. ही एकरकमी रक्कम कर्ज, रोजचे खर्च आणि भविष्यातील आर्थिक ध्येयं पूर्ण करण्यासाठी वापरली जाऊ शकते.
नवीन टर्म प्लॅन खरेदी करू इच्छिता का? इंडियाफर्स्ट लाईफ ₹50 लाख विमा रक्कम निवडण्याचा पर्याय असलेले अनेक टर्म लाईफ इंश्युरन्स प्लान्स देतो. तुमच्या आवश्यकतेनुरूप प्लॅन निवडा.
₹50 लाख टर्म इंश्युरन्स कोणासाठी आहे?
₹50 लाख टर्म इंश्युरन्स प्लॅन निवडणे वेगवेगळ्या बाबींवर अवलंबून आहे, जसे आर्थिक दायित्वे, अवलंबित व्यक्ती आणि भविष्यातील लक्ष्य. ज्यांच्यासाठी ₹50 लाख टर्म इंश्युरन्स प्लॅन फायदेशीर आहे, अशा व्यक्तींचे प्रकार इथे दिले आहेत:
तरुण व्यावसायिक: करीयरच्या सुरुवातीच्या टप्प्यात असलेल्या व्यक्ती ज्यांच्यावर कमी आर्थिक जबाबदाऱ्या आहेत, ते किफायतशीर प्रिमियम मध्ये त्यांच्या कुटुंबाची आर्थिक सुरक्षितता निश्चित करण्यासाठी ₹50 लाख टर्म प्लॅन निवडू शकतात.
नवविवाहित जोडपी: भविष्यातील जबाबदाऱ्या आणि मुलांची योजना करणाऱ्या नवविवाहितांनी जोडीदार आणि होणाऱ्या मुलांच्या आर्थिक भविष्याची सुरक्षा करण्यासाठी ₹50 लाखाच्या टर्म पॉलिसीचा विचार करायला हवा.
लहान मुलांचे पालक: लहान मुलांच्या पालकांनी, त्यांच्या अकाली मृत्यूच्या प्रसंगी त्यांच्या मुलांच्या शिक्षण आणि जीवनशैलीशी तडजोड होणार नाही याची खात्री करण्यासाठी एक मोठे कव्हर घेणे गरजेचे आहे.
गृहकर्ज घेतलेल्या व्यक्ती: गृहकर्ज बाकी असलेल्या व्यक्तींनी, त्यांचे कर्ज कव्हर करण्यासाठी आणि कुटुंबाला कर्जाच्या ओझ्यापासून वाचवण्यासाठी ₹50 लाख टर्म इंश्युरन्स प्लॅन निवडायला हवा.
व्यवसाय मालक: उद्योजक आणि व्यवसाय मालकांनी, व्यवसायातील जबाबदाऱ्या आणि वैयक्तिक खर्चांना कव्हर करण्यासाठी ₹50 लाखाच्या टर्म प्लॅन घेऊन, त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित करायला हवे.
₹50 लाख टर्म इंश्युरन्स प्लॅन का खरेदी करावा?
₹50 लाख टर्म लाईफ पॉलिसी खरेदी करण्याचे अनेक फायदे आहेत:
किफायतशीरपणा: टर्म इंश्युरन्स प्लॅन्स किफायतशीर आहेत आणि कमी प्रिमियममध्ये जास्त कव्हरेज देतात.
आर्थिक सुरक्षा: हा प्लॅन पॉलिसीधारक नसल्यावर, त्याच्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेची खात्री करू शकतो.
कर्जाचे कव्हरेज: ही पॉलिसी थकीत कर्ज कव्हर करु शकते जसे कि गृह कर्ज, वाहन कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज.
भविष्याचे नियोजन: एक टर्म-बेस्ड लाईफ प्लॅन मुलांच्या शिक्षण आणि इतर दीर्घकालीन ध्येयांच्या संदर्भातील आर्थिक गोष्टींसाठी मदत करू शकतो.
मनःशांती: तुमचे प्रियजन आर्थिकरित्या सुरक्षित असल्याची खात्री देऊन, हा प्लॅन मनःशांती देतो.
₹50 लाख टर्म इंश्युरन्सचे काय फायदे आहेत?
₹50 लाख विमा रक्कम असलेल्या टर्म इंश्युरन्स प्लॅनचे अनेक फायदे आहेत:
कमी प्रिमियम मध्ये जास्तकव्हरेज: टर्म इंश्युरन्सच्या मुख्य फायद्यांपैकी एक फायदा हा आहे की, हा प्लॅन किफायतशीर प्रिमियममध्ये जास्त कव्हवरेज देतो, ज्यामुळे हा अनेकांसाठी योग्य ठरतो.
कर लाभ: ₹50 लाख टर्म लाईफ पॉलिसीसाठी भरलेले प्रिमियम, कर कपातीसाठी पात्र आहे. हे आयकर कायद्याच्या कलम 80 सी नुसार आहे. या व्यतिरिक्त, कलम 10(10डी) अंतर्गत मृत्यू लाभ सुद्धा कर-मुक्त आहे.
आर्थिक सुरक्षा: हा प्लॅन पॉलिसीधारकाच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा पुरवतो. कि, ते पॉलिसीधारक नसतानासुद्धा कुटुंबाचीजीवनशैली कायम राहील आणि आर्थिक ध्येयं पूर्ण होतील याची खात्री करतो.
रायडर पर्याय: पॉलिसीधारक रायडर्स निवडून त्यांचे कव्हरेज वाढवू शकतात जसे क्रिटिकल इलनेस, ॲक्सीडेंटल डेथ आणि डिसॅबिलिटी रायडर्स. हे सर्व, अतिरिक्त आर्थिक संरक्षण देऊ शकतात.
लवचिकता: टर्म इंश्युरन्स प्लान्स पॉलिसी मुदत आणि प्रिमियम भरण्याची वारंवारिता निवडण्यात लवचिकता देतात. म्हणून पॉलिसीधारक त्यांच्या गरजांनुसार अनुकूल पर्याय निवडू शकतात.
योग्य ₹50 लाख टर्म इंश्युरन्स प्लॅन कसा निवडावा?
₹50 लाख विमा रकमेचा योग्य टर्म इंश्युरन्स प्लॅन , वेगवेगळ्या बाबींचा काळजीपूर्वक विचार करून मग निवडा.
प्लॅन्सची तुलना करा: टर्म इंश्युरन्स कॅलक्युलेटर वापरून विभिन्न विमा कंपन्यांद्वारे दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्लॅन्स आणि प्रिमियम्सची तुलना करा.
आर्थिक गरजांचे मूल्यमापन करा: पुरेशी कव्हरेज रक्कम निश्चित करण्यासाठी तुमच्या सध्याच्या आर्थिक जबाबदाऱ्या, भविष्यातील ध्येय आणि अवलंबितांच्या संख्येचे मूल्यमापन करा.
क्लेम सेटलमेंट रेश्यो तपासा: सुरळीत आणि विनासायास दावा प्रक्रियेसाठी ,क्लेम सेटलमेंट रेश्यो चांगला असलेल्या विमा कंपन्या निवडा.
पॉलिसीच्या अटी आणि नियम तपासा: प्लॅन्सच्या अटी, नियम, अपवाद आणि लाभ समजून घेण्यासाठी पॉलिसी कागदपत्रे लक्षपूर्वक वाचा.
रायडर्स विचारात घ्या: विशिष्ट जोखमींवर अतिरिक्त संरक्षण देणारे रायडर्स निवडून तुमचे कव्हरेज वाढवा.
इंडियाफर्स्ट लाईफचा ₹50 लाख टर्म इंश्युरन्स प्लॅन का खरेदी करावा?
आमच्या ₹50 लाख टर्म लाईफ इंश्युरन्स प्लॅनमध्ये आम्ही अनेक फायदे देतो:
किफायतशीर प्रिमियम: किफायतशीर प्रिमियममध्ये जास्त कवरेज ज्यामुळे हा अनेकांसाठी सुलभ होतो.
दाव्याची सोपी प्रक्रिया: चांगला क्लेम सेटलमेंट रेश्योअसलेली विनासायास आणि तत्पर क्लेम सेटलमेंट प्रक्रिया.
अतिरिक्त रायडर्स: वेगवेगळे रायडर्स, जसे कि टर्म रायडर आणि वेवर ऑफ प्रिमियम अतिरिक्त सुरक्षा देतात.
₹50 लाखांचे टर्म इंश्युरन्स कव्हरेज माझ्या कुटुंबासाठी पुरेसे आहे का?
तुमच्या आर्थिक जबाबदाऱ्या, अवलंबित व्यक्ती आणि भविष्यातील ध्येयांच्या आधारे ठरवा कि ₹50 लाखाचे कव्हरेज पुरेसे आहे की नाही.
इथे दिलेल्या काही बाबींचा विचार करा:
आर्थिक जबाबदाऱ्या: गृह कर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जासह तुमचे थकीत कर्ज मोजा आणि कव्हरेजची रक्कम या कर्जांची परतफेड करू शकत असल्याची खात्री करा.
दैनंदिन खर्च: तुमच्या कुटुंबाच्या मासिक खर्चांचा अंदाज काढा आणि तुम्ही त्यांना जितकी वर्षे आर्थिक मदत पुरवू इच्छिता त्या संख्येने गुणा.
शिक्षणाचा खर्च: शाळेची फी, कॉलेज ट्युशन आणि इतर संबंधित खर्चांसह तुमच्या मुलांच्या भविष्यातील शैक्षणिक खर्चांचा विचार करा.
महागाई: महागाईमुळे भविष्यातील खर्चांवर होणाऱ्या परिणामांचा विचार करा आणि त्यानुसार कव्हरेजची रक्कम ठरवा.
इतर ध्येयं: यामध्ये सेवानिवृत्तीचे नियोजन आणि आपत्कालीन प्रसंगासाठी निधी या सारख्या इतर आर्थिक ध्येयांचा समावेश करा.
या बाबींचे मूल्यमापन करून तुमच्या कुटुंबाच्या गरजांसाठी ₹50 लाख टर्म लाईफ इंश्युरन्स प्लॅन पुरेसा आहे की नाही हे निश्चित करा.
योग्य लाईफ इंश्युरन्स प्लॅन निवडण्यासाठी मदत पाहिजे का? आम्हाला 8828840199 वर लगेच संपर्क करा किंवा इथे कॉल नोंदवा.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
₹50 लाख टर्म प्लॅन खरेदी करण्यासाठीचे पात्रता निकष काय आहेत?
₹50 लाख टर्म खरेदी करण्याच्या पात्रता निकषात सामान्यतः पॉलिसीधारकाचे वय (सहसा 18 ते 65 वर्षे दरम्यान), उत्पन्न आणि आरोग्यस्थितीचा समावेश आहे.
₹50 लाखांचे कव्हरेज देणाऱ्या टर्म प्लॅन साठी प्रिमियमची रक्कम किती आहे?
₹50 लाखांचे कवरेज देणाऱ्या टर्म प्लॅन साठी प्रिमियमची रक्कम पॉलिसीधारकाचे वय, आरोग्य, जीवनशैली आणि पॉलिसी मुदतीच्या आधारे वेगवेगळी असू शकते.
जर मी पॉलिसी मुदती पर्यंत जिवंत राहिल्यास काय होईल?
जर तुम्ही पॉलिसी मुदतीपर्यंत जिवंत राहिल्यास, त्याचा कोणताही लाभ मिळणार नाही, कारण टर्म प्लॅन्स मॅच्युरिटी लाभ देत नाहीत.
₹50 लाख टर्म इंश्युरन्स पॉलिसीबरोबर कोणकोणते रायडर्स लागू केले जाऊ शकतात?
₹50 लाख टर्म इंश्युरन्स पॉलिसीमध्ये लागू होणाऱ्या रायडर्स मध्ये क्रिटिकल इलनेस रायडर, ॲक्सीडेंटल डेथ बेनेफिट रायडर आणि वेवर ऑफ प्रिमियम रायडरचा समावेश आहे.
₹50 लाख टर्म इंश्युरन्स प्लॅन्सना कर लाभ लागू होतो का?
होय, आयकर कायद्याच्या कलम 80सी आणि कलम 10(10डी) अंतर्गत ₹50 लाख टर्म इंश्युरन्स प्लॅन्सला कर लाभ लागू होतात.
जास्त कव्हरजेसाठी मी दोन टर्म इंश्युरन्स प्लॅन्स खरेदी करू शकतो का?
होय, जास्त कवरजेसाठी तुम्ही अनेक टर्म इंश्युरन्स प्लॅन्स खरेदी करू शकता. कव्हरेजची एकूण रक्कम तुमच्या आर्थिक गरजा आणि विमा कंपनीच्या मार्गदर्शक तत्वांनुसार असल्याची खात्री करा.