आत्महत्या अपवाद
पॉलिसी अंतर्गत जोखिम कवर सुरु झाल्याच्या तारखेपासून किंवा पॉलिसी पुन्हा सुरु केल्याच्या तारखेपासून, जसे लागू असेल तसे, 12 महिन्यांच्या आत आत्महत्येमुळे किंवा गंभीर आजारामुळे मृत्यूच्या प्रसंगी, पॉलिसीधारकाचे नामनिर्देशित व्यक्ती किंवा लाभार्थी, मृत्यू तारखेपर्यंत भरलेल्या एकूण प्रिमियमच्या 80% रक्कम किंवा मृत्यूच्या तारखेनुसार उपलब्ध सरेंडर मूल्य, जी कोणतीही जास्त आहे, मिळवण्यासाठी पात्र आहे, ज्यासाठी पॉलिसी सक्रिय असायला हवी.
अपघाती संपूर्ण कायमस्वरुपी अपंगत्वासाठी अपवाद:
संपूर्ण आणि कायमस्वरुपी अपंगत्व (अपघातामुळे) साठी लाभ दिला जाणार नाही जर अपंगत्व प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे खालीलपैकी कोणत्याही कारणामुळे झाले आहे, घडले आहे, वाढले किंवा दुणावले आहे:
1. आत्महत्या किंवा स्वतःला इजा करणे, भले विमाधारक वैद्यकीयरित्या शहाणा किंवा वेडा असेल.
2. युद्ध, दहशतवाद, आक्रमण, विदेशी शत्रूची कृती, शत्रुत्व, गृहयुद्ध, मार्शल लॉ, बंड, क्रांती, बंड, लष्करी किंवा सत्ता बळकावणे, नागरी गोंधळ. युद्ध म्हणजे घोषित केलेले किंवा न केलेले कोणतेही युद्ध.
3. सशस्त्र दलात नोकरी, युद्धात असलेल्या कोणत्याही देशाची किंवा आंतरराष्ट्रीय संस्थेच्या कोणत्याही दलात सेवा
4. शांतिकाळात कोणत्याही नौदल, लष्करी किंवा हवाई दलाच्या ऑपरेशनमध्ये भाग घेणे.
5. प्राणघातक हल्ला, फौजदारी गुन्हा, बेकायदेशीर क्रियाकलाप किंवा गुन्हेगारी हेतूने कायद्याचे कोणतेही उल्लंघन करणे.
6. मद्य सेवन किंवा मादक पदार्थ, अंमली पदार्थ किंवा सायकोट्रॉपिक पदार्थ घेणे जोपर्यंत ते कायदेशीर मार्गाने आणि नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाच्या सुचनांनुसार घेतलेले नाही
7. विष, वायू किंवा धूर (स्वेच्छेने किंवा अनैच्छिकपणे, चुकून किंवा इतर प्रकारे घेतलेले, देखरेखीखाली, शोषलेले किंवा श्वास घेतलेले).
8. विमाधारकाचा कोणत्याही उड्डाण कार्यात सहभाग, यामध्ये प्रमाणित, भाडे भरणारे प्रवासी, नियमित मार्ग आणि नियोजित वेळापत्रकावरील एक प्रतिष्ठित विमानसेवेचे पायलट किंवा केबिन क्रू यांचा समावेश नाही.
9. व्यावसायिक खेळ किंवा कोणत्याही साहसी आवड किंवा छंदामध्ये सहभागी होणे. “साहसी आवड किंवा छंद” यामध्ये कोणत्याही प्रकारच्या शर्यतीचा (पायी किंवा पोहोण्याची वगळून), पोथोलिंग, रॉक क्लायम्बिंग (मानवनिर्मित भिंती वगळून), शिकार, गिर्यारोहण किंवा दोरी किंवा मार्गदर्शकाच्या वापराची आवश्यकता असलेली चढाई, पाण्याखालील कोणतेही क्रियाकलाप ज्यामध्ये पाण्याखाली श्वसनाच्या उपकरणांच्या वापराचा समावेश आहे जसे खोल समुद्रात डायविंग, स्काय डायविंग, क्लिफ डायविंग, बंगी जंपिंग, पॅराग्लायडिंग, हँड ग्लायडिंग आणि पॅराशुटिंगचा समावेश आहे.
10. कवरच्या प्रभावी तारखेपूर्वी आणि/किंवा नंतर कोणत्याही प्रकारच्या आजारामुळे, रोगामुळे कोणतेही अपंगत्व; कोणतीही विद्यमान बाह्य जन्मजात विसंगती कवर केली जाणार नाही आणि बाह्य जन्मजात विसंगती असलेल्या अशा सदस्यांसाठी पॉलिसी जारी केली जाणार नाही. बाह्य जन्मजात विसंगती व्यतिरिक्त इतर सर्व जन्मजात विसंगती कवर केल्या जातील. जेथे बाह्य जन्मजात विसंगती म्हणजे अशी स्थिती, जी दिसून येते आणि शरीराच्या बाह्य भागांवर आणि जन्मापासून उपस्थित आहे आणि जी स्वरुप, रचना किंवा स्थितीच्या संदर्भात असामान्य आहे.
11. आण्विक संसर्ग; आण्विक इंधन सामग्रीचे किरणोत्सारी, स्फोटक किंवा घातक स्वरुप किंवा आण्विक इंधन सामग्रीमुळे दूषित झालेली मालमत्ता किंवा अशा स्वरुपामुळे उद्भवणारे अपघात;
गंभीर आजार/दीर्घकालिन रोगांसाठी अपवाद:
व्याख्येमध्ये नमूद केलेल्या अट विशिष्ट अपवादांच्या व्यतिरिक्त, आम्ही खालीलपैकी कोणत्याही कारणामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे उद्भवलेल्या कोणत्याही दाव्याची भरपाई करणार नाही:
1. आधीच अस्तित्वात असलेले रोग:
आधीच अस्तित्वात असलेले रोग म्हणजे कोणतीही स्थिती, दुखणे, जखम किंवा आजार:
a. विमा कंपनीने जारी केलेल्या पॉलिसीच्या प्रभावी तारखेच्या 48 महिन्यांच्या आत डॉक्टरांद्वारे त्याचे निदान केले जाते किंवा
b. ज्यासाठी पॉलिसीच्या प्रभावी तारखेच्या किंवा तिच्या पुनर्नियुक्तीच्या 48 महिन्यांच्या आत एखाद्या डॉक्टरांकडून किंवा त्याच्याकडून वैद्यकीय सल्ला किंवा उपचारांची शिफारस करण्यात आली होती.
पॉलिसी किंवा तिची पुनर्नियुक्ती, जारी करण्याच्या किंवा पुनर्नियुक्तीच्या तारखेपासून 48 महिने पूर्ण झाल्यानंतर, जी कोणतीही स्थिती असेल, पूर्वअस्तित्वातील अपवाद कलम लागू होणार नाही
2. मानसिकरित्या शाबूत असताना किंवा वेडसरपणाच्या भरात, जाणीवपूर्वक स्वतःहून केलेल्या दुखापती, आत्महत्येचा प्रयत्न करणे.
3. मद्य सेवन किंवा मादक पदार्थ, अंमली पदार्थ किंवा सायकोट्रॉपिक पदार्थ घेणे जोपर्यंत ते कायदेशीर मार्गाने आणि नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाच्या सुचनांनुसार घेतलेले नाही
4. युद्ध, आक्रमण, परदेशी शत्रूचे कृत्य, शत्रूत्व (भलेही युद्ध घोषित केले असेल किंवा नसेल), सशस्त्र किंवा निःशस्त्र युद्धबंदी, यादवी युद्ध, बंडखोरी, बंडाळी, क्रांती, उठाव, लष्करी किंवा सत्ता बळकावणे, नागरी क्षोभ, संप;
5. शांतिकाळात कोणत्याही नौदल, लष्करी किंवा हवाई दलाच्या ऑपरेशनमध्ये भाग घेणे.
6. विमाधारकाचा कोणत्याही उड्डाण कार्यात सहभाग, यामध्ये प्रमाणित, भाडे भरणारे प्रवासी, नियमित मार्ग आणि नियोजित वेळापत्रकावरील एक प्रतिष्ठित विमानसेवेचे पायलट किंवा केबिन क्रू यांचा समावेश नाही.
7. विमाधारक व्यक्तीचा गुन्ह्यात किंवा गुन्हेगारी हेतूने बेकायदेशीर कृत्यामध्ये सहभाग.
8. व्यावसायिक खेळांमध्ये किंवा कोणत्याही धोकादायक व्यवसायात गुंतणे किंवा त्यात भाग घेणे, ज्यामध्ये डायविंग, रायडिंग किंवा कोणत्याही प्रकारची शर्यत; श्वासोच्छवासाच्या उपकरणांचा वापर करुन किंवा न करता पाण्याखालील क्रियाकलाप; मार्शल आर्ट्स; शिकार करणे; पर्वतारोहण; पॅराशुटिंग; बंगी-जंपिंगचा समावेश आहे परंतु हे इतकेच मर्यादित नाही.
9. कोणतीही बाह्य जन्मजात विसंगती कवर केली जाणार नाही आणि बाह्य जन्मजात विसंगती असलेल्या अशा व्यक्तींना पॉलिसी जारी केली जाणार नाही. जेथे बाह्य जन्मजात विसंगती म्हणजे अशी स्थिती, जी दिसून येते आणि शरीराच्या बाह्य भागांवर आणि जन्मापासून उपस्थित आहे आणि जी स्वरुप, रचना किंवा स्थितीच्या संदर्भात असामान्य आहे.
10. आण्विक संसर्ग; आण्विक इंधन सामग्रीचे किरणोत्सारी, स्फोटक किंवा घातक स्वरुप किंवा आण्विक इंधन सामग्रीमुळे दूषित झालेली मालमत्ता किंवा अशा स्वरुपामुळे उद्भवणारे अपघात. गंभीर आजारांवरील अपवादांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया महत्त्वाच्या व्याख्या विभागाचा संदर्भ घ्या.