एक गृहिणीसाठी टर्म इंश्युरन्स काय आहे?
टर्म इंश्युरन्स प्लान, लाईफ इंश्युरन्सच्या सर्वात मूलभूत आवृत्तींपैकी एक आहे, ही एक अशी पॉलिसी आहे जी जवळपास कुणीही त्यांच्या स्वतःसाठी किंवा त्यांच्या प्रियजनांसाठी खरेदी करू शकतात. अगदी सोप्या शब्दांमध्ये, टर्म इंश्युरन्स:मध्ये एक व्यक्तीला एक निश्चित रकमेने (विमा रक्कम) सुरक्षित करण्याचा समावेश आहे जिचा त्या व्यक्तीचे निधन झाल्यावर दावा केला केला जाऊ शकतो. गृहिणीसाठी टर्म इंश्युरन्स खरेदी करण्यामध्ये योग्य विमा रकमेसाठी उपलब्ध सर्वोत्तम प्लान तसेच आवश्यक सर्व ॲड-ऑन्स निवडण्याचा समावेश आहे.
गृहिणींसाठी टर्म इंश्युरन्सचे महत्त्व
टर्म प्लान, किंवा सर्वसामान्यपणे लाईफ इंश्युरन्स प्लान, यांना सामान्यतः अशा व्यक्तींसाठी एक स्पष्ट पर्याय म्हणून मानले जाते जे कुटुंबातील मुख्य कमवणारे व्यक्ती आहेत किंवा ज्यांच्यावर आई-वडील, मुलं किंवा जोडीदार यांसारखे व्यक्ती अवलंबून आहे, जे त्यांच्यावर आर्थिररित्या अवलंबून असतात. मात्र, कुटुंबात योगदान देणे फक्त उत्पन्नाच्या स्वरुपात मोजले जाऊ शकत नाही.
म्हणून, कुटुंबाच्या या योगदान देणाऱ्या व्यक्तीसोबत काही दुर्दैवी घडल्यास मागे राहणाऱ्या पोकळीची कल्पना करणे कठीण आहे. जरी तिची अनुपस्थिती भरून काढली जाऊ शकत नाही, मात्र ती नसल्यानंतर आर्थिक पाठिंबा सदस्यांना त्यांच्या गरजांची काळजी घेण्यात मदत करू शकतो.
इथे काही कारणं दिली आहेत कि एक गृहिणीसाठी टर्म इंश्युरन्स प्लान्सचा का विचार केला गेला पाहिजे.
अवलंबून असलेल्यांसाठी आधार
गृहिणीनंतर मागे राहिलेले व्यक्ती त्यांची स्वतःची काळजी घेण्यासाठी टर्म इंश्युरन्समधून मिळालेल्या मृत्यू लाभावर अवलंबून राहू शकतात.
तिच्या मुलांच्या भविष्याचे नियोजन
आई गेल्यानंतर, जवळचे नातेवाईक तिच्या मुलांच्या भविष्यांचे नियोजन करण्यासाठी किंवा त्यांच्या शिक्षणासाठी विमा रकमेचा उपयोग करू शकतात.
वैद्यकीय आणीबाणींसाठी आधार
जर टर्म प्लान ॲक्सीडेंटल परमनंट डिसेबिलिटी किंवा क्रिटिकल इलनेस रायडर सारख्या रायडर्ससोबत खरेदी केला असेल, तर या लाभाचा तिच्या अनपेक्षित वैद्यकीय गरजांसाठी किंवा प्लानमधील अशा ॲड-ऑन्स द्वारे कवर असलेल्या कोणत्याही अनपेक्षित घटनांसाठी वापरला जाऊ शकतो.
एक गृहिणीच्या टर्म प्लानसाठी ₹1 कोटीची विमा रक्कम योग्य आहे का? तुमच्या गरजांसाठी योग्य असलेले प्लान शोधा. अधिक जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
गृहिणींसाठी टर्म इंश्युरन्सचे मुख्य विशेषता
सामान्यतः, गृहिणींसाठी असलेले टर्म इंश्युरन्स प्लान त्याच प्लान सारखेच असतात जे तुम्ही इतर कुणासाठीही खरेदी करू शकता. इथे काही मुख्य विशेषता दिलेल्या आहेत ज्यांची तुम्ही या प्रकारच्या लाईफ इंश्युरन्स प्लानकडून अपेक्षा करू शकता.
टर्म प्लान्सना सर्वोत्तम प्रिमियम ते कवरेज गुणोत्तर देणाऱ्या प्लानपैकी एक मानले जाते. तुम्ही तुलनने किफायतशीर खर्चामध्ये इच्छित विमा रक्कम मिळवण्याची अपेक्षा करू शकता. तुमच्या इच्छित प्लानकरीता प्रिमियम दर समजून घेण्यासाठी तुम्ही टर्म इंश्युरन्स कॅलक्युलेटर सुद्धा वापरू शकता.
मूळतः, टर्म इंश्युरन्स प्लान्स फक्त लाईफ कवर घटक पुरवतात. जरी एक लेवल टर्म प्लानकडून इतर कोणत्याही परताव्यांची किंवा लाभांची अपेक्षा नसते, जी या प्लानची सर्वात मूलभूत आवृत्ती आहे, इतर प्लान प्रकार सुद्धा आहेत जे काही मुलभूत फायदे पुरवतात.
गृहिणींसाठी तुमच्या टर्म इंश्युरन्स प्लानची व्याप्ती वाढवण्यासाठी, तुम्ही प्लानसोबत उपलब्ध रायडर्स तपासू शकता. काही सर्वसामान्य रायडर्स मध्ये वेवर ऑफ प्रिमियम, ॲक्सीडेंटल डेथ बेनेफिट, ॲक्सीडेंटल टोटल अँड परमनंट डिसेबिलिटी आणि इंकम बेनेफिटचा समावेश आहे. हे पर्यायी आहेत आणि त्यांची किंमत तुमचा एकूण प्रिमियम बदलू शकतात.
गृहिणींसाठी टर्म प्लान्स काय फायदे देतात?
जर तुम्ही समजता कि गृहिणींसाठी टर्म इंश्युरन्स प्लान्स कोणतेही वास्तविक फायदे देण्यासाठी खुपच साधा आहे, तर याचे काही फायदे पहा:
भविष्याची सुरक्षा - गृहिणीसाठी लाईफ कवर निश्चित करण्याचा अर्थ होतो तिच्यावर अवलंबून असलेल्या लोकांचे भविष्य आर्थिकरित्या सुरक्षित करणे. त्यांच्या प्रियजनांच्या आधाराशिवाय भविष्याविषयी ते कमी काळजी करू शकतात.
कालावधीची पसंती - टर्म प्लान्स सहसा मर्यादित वेळेसाठी दिले जातात जिथे पॉलिसीधारकाद्वारे उपलब्ध पर्यायांमधून मुदत निवडली जाते. तुम्हाला जितके गरजेचे आहे फक्त तितकेच कवरेज तुम्ही निवडू शकता.
परतावे - जर तुम्ही गृहिणीकरीता टर्म इंश्युरन्स प्लान खरेदी करताना रिटर्न ऑफ प्रिमियम पर्याय निवडता, तर प्लान परिपक्वतेपर्यंत पोहोचल्यावर तुम्ही भरलेल्या प्रिमियमची रक्कम परत मिळवू शकता.
करामध्ये फायदा - प्रचलित कर कायद्यांनुसार, जुनी प्रणाली निवडलेले करदाता त्यांना भरलेल्या प्रिमियमवर ते कर सवलतीचा लाभ घेणे निवडू शकतात. जर नामनिर्देशित व्यक्तीने तिच प्रणाली निवडली असेल, तर ते प्राप्त मृत्यू लाभांवर सुद्धा सवलतीचा दावा करू शकतात.
मनःशांती - गृहिणीचे लाईफ कवर असणे विमाधारक आणि तिच्यावर अवलंबून असलेल्या मुख्य लोकांसह अनेक लोकांना मनःशांती देऊ शकते.
गृहिणींसाठी टर्म इंश्युरन्सचे प्लानचे प्रकार
गृहिणींसाठी टर्म लाईफ इंश्युरन्स प्लान्सचा विचार करताना, जाणून घ्या कि पर्यायांची एक श्रेणीच उपलब्ध आहे. उपलब्ध पर्यायांपैकी कोणताही प्लान निवडण्याऐवजी तुमच्या आवश्यकतांचा विचार करा.
याचे काही सामान्य प्रकार हे पहा.
लेवल टर्म इंश्युरन्स प्लान्स
हे प्लान्स पॉलिसी मुदतीच्या दरम्यान पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास नामनिर्देशित व्यक्तीला एक निश्चित विमा रक्कम देतात. हा कोणत्याही परिपक्वता लाभांशिवाय आवश्यक आर्थिक सुरक्षा पुरवतो.
टर्म इंश्युरन्स विथ रिटर्न ऑफ प्रिमियम
यास टीआरओपी म्हणून सुद्धा ओळखले जाते, हे प्लान्स निश्चित करतात कि भरलेले सर्व प्रिमियम पॉलिसीधारकाला परत केले जातील जर ते पॉलिसी मुदतीनंतर जिवंत राहतात. हा प्लान संरक्षण आणि बचत दोन्ही घटक पाहिजे असलेल्या गृहिणींसाठी योग्य आहे.
जॉइंट टर्म इंश्युरन्स कव्हर
जर तुम्ही दुहेरी लाईफ कवरेजचा लाभ असलेला प्लान शोधत आहात, तर तुम्ही जॉइंट टर्म इंश्युरन्स प्लान निवडू शकता. कोणत्याही एक जोडीदाराचे निधन झाल्याच्या प्रसंगी, हयात असलेल्या जोडीदाराला विमा रक्कम मिळते. हा प्लान कुटुंबासाठी सर्वसमावेशक कवरेज देतो.
इंक्रीजिंग टर्म लाईफ इंश्युरन्स प्लान
यामध्ये विमा रक्कम दर वर्षी वाढत जाते, जी महागाई आणि बदलत्या आर्थिक गरजांनुसार कवरेज वाढवत राहते.
डीक्रीजिंग टर्म लाईफ इंश्युरन्स प्लान
गृहिणींसाठी कमी होणारे टर्म लाईफ इंश्युरन्स एक खात्रीशीर कवर रक्कम देते जी कालांतराने एक पूर्वनिर्धारित दराने कमी होते. हा एक योग्य पर्याय आहे जर तुम्ही कालांतराने तुमच्या आर्थिक आणि इतर जबाबदाऱ्या संपण्याची अपेक्षा करता.
गृहिणींसाठी टर्म इंश्युरन्स सोबत उपलब्ध रायडर्स
जरी हे पर्यायी आहेत आणि अतिरिक्त किंमतीत उपलब्ध आहेत, रायडर्स तुम्हाला तुमच्या टर्म इंश्युरन्समधून जास्त मिळवण्यात मदत करू शकतात. उदाहरणार्थ, तुमच्याकडे ₹ 1 कोटी टर्म इंश्युरन्स असेल किंवा त्यापेक्षा जास्त उच्च विमा रकमेचा असेल, मिळणारा लाभ हा सरळ मृत्यू लाभ असेल. रायडर्स सोबत, तुम्ही जास्त शक्यतांसाठी अधिक कवरेजची अपेक्षा करू शकता.
इथे काही रायडरचे पर्याय दिलेले आहेत ज्यातून तुम्ही निवड करू शकता.
ॲक्सीडेंटल डेथ बेनेफिट रायडर : एक अतिरिक्त विमा रक्कम देतो जर पॉलिसीधारकाचा अपघातामध्ये मृत्यू होतो.
क्रिटिकल इलनेस रायडर : कर्करोग किंवा हृदय रोग सारख्या निर्दिष्ट गंभीर आजारांचे निदान झाल्यावर एक एकरकमी रक्कम देतो.
वेवर ऑफ प्रिमियम रायडर : पॉलिसीधारक अपंग झाल्यास किंवा गंभीररित्या आजारी पडल्यास भविष्यातील प्रिमियम माफ करतो.
डिसेबिलिटी इंकम रायडर : पॉलिसीधारक कायमस्वरुपी अपंग झाल्यास नियमित उत्पन्न देतो.
गृहिणींसाठी योग्य टर्म इंश्युरन्स निवडणे
योग्य टर्म इंश्युरन्स प्लान तुमच्या गरजांवर आधारित असला पाहिजे. तुमच्यासमोर जो कोणताही पहिला प्लान उपलब्ध होईल थेट तो खरेदी करणे टाळा.
टर्म प्लान्स दीर्घकालीन वचनबद्धता आहेत आणि तुमच्या आर्थिक नियोजनात एक उल्लेखनीय भूमिका बजावू शकतात. कोणता जास्त लोकप्रिय पर्याय आहे या ऐवजी तुम्हाला जे सर्वात चांगल्याप्रकारे जुळते याच्या आधारे प्लान निवडा.
तुम्ही विमा रकमेच्या मूल्याविषयी निर्णय घेऊन सुरुवात करू शकता. उदाहरणार्थ, तुम्हाला वाटू शकते कि ₹ 5 कोटी टर्म इंश्युरन्स तुमच्यासाठी एक किफायतशीर पर्याय आहे. मात्र तुम्हाला पाहिजे असलेले कवरेज त्यापेक्षा जास्त किंवा कमी असू शकते. या पैलूविषयी अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही ह्युमन लाईफ व्हॅल्यू कॅलक्युलेटर वापरू शकता किंवा तज्ञाचा सल्ला घेऊ शकता.
पुढे, तुमच्या इच्छित विमा रकमेसाठी प्रिमियमचा अंदाज मिळवण्यासाठी टर्म इंश्युरन्स प्रिमियम कॅलक्युलेटर वापरा. तुम्ही हे सुद्धा तपासू शकता कि रायडर्स तुमच्या प्रिमियमची रक्कम कशाप्रकारे बदलू शकतात. तुमच्या आवश्यकता आणि बजेटच्या आधारे ते निवडा.
गृहिणींसाठी टर्म इंश्युरन्स प्लान निवडण्याआधी विचारात घ्यायच्या गोष्टी
भलेही तुम्ही गृहिणी असाल किंवा असे कुणी जे गृहिणीसाठी लाईफ कवर खरेदी करत आहात, इथे काही गोष्टी दिल्या आहेत ज्या टर्म लाईफ इंश्युरन्स प्लान खरेदी करताना ध्यानात ठेवल्या पाहिजेत.
तुमच्या गरजांच्या आधारे एक योग्य विमा रक्कम निवडा. भलेही तुम्ही ₹2 कोटी टर्म इंश्युरन्स प्लान किंवा लाखांमधील विमा रकमेचा प्लान खरेदी करत असाल, खात्री करा कि ती रक्कम तुमच्यासाठी योग्य आहे.
तुमच्या जबाबदाऱ्यांविषयी तुमच्या अंदाजानुसार योग्य मुदत निवडा. उदाहरणार्थ, तुम्हाला अपेक्षित आहे कि तुमची मुलं पुढील 15-20 वर्षांमध्ये त्यांची स्वतःची काळजी घेऊ शकतात, तर 20 वर्षांची मुदत पुरेशी असेल. मात्र, जर तुम्हाला आई-वडिलांची देखभाल करायची आहे, तर तुम्हाला जास्त कवरेजची गरज भासू शकते.
उच्च क्लेम सेटलमेंट रेशियो आणि भरवश्याची ग्राहक सेवा असलेला विमा पुरवठादार निवडा. हे तुमच्या लाभार्थीला तसेच तुम्हाला कोणत्याही समस्या रोखण्यात मदत करेल.
योग्य रायडर्स निवडणे हा सुद्धा टर्म इंश्युरन्स खरेदी करण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही खरेदी करण्याआधी, रायडर्स काय आहेत आणि ते कशाप्रकारे फायदेशीर सिद्ध होऊ शकतात हे तुम्हाला स्पष्टपणे समजल्याची खात्री करा.
तुम्ही गृहिणीसाठी टर्म इंश्युरन्स खरेदी करण्याआधी, ऑनलाइन टर्म इंश्युरन्स कॅलक्युलेटर वापरून अंदाज मिळवा. हे तुम्हाला तुम्ही निवडलेल्या प्लानसाठी अंदाजित प्रिमियमची रक्कम देईल, ज्यामुळे तुम्हाला तुमचे आर्थिक नियोजन चांगल्याप्रकारे करण्यात मदत होईल. इथे क्लिक करा आणि जलद, त्रास-मुक्त टर्म इंश्युरन्स कॅलक्युलेटरचा अनुभव घ्या.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू)
गृहिणींसाठी टर्म इंश्युरन्स महाग आहे का?
टर्म लाईफ इंश्युरन्स प्लान हे बाजारात उपलब्ध सर्वात किफायतशीर लाईफ इंश्युरन्स पर्यायांपैकी एक आहेत. याचा प्रिमियम सहसा विमा रकमेचा एक अंश असतो. तुमच्या इच्छित प्लानसाठी तुम्हाला किती खर्च होऊ शकतो हे समजून घेण्यासाठी तुम्ही ऑनलाइन कॅलक्युलेटर वापरू शकता.
गृहिणी त्यांच्या पतींसोबत जॉइंट टर्म प्लान खरेदी करू शकतात का?
जर तुम्ही एक गृहिणी आहात, तर तुमचे पती एक जॉइंट टर्म प्लान घेऊन तुम्हाला त्याच्या लाईफ कवरमध्ये जोडू शकतात. मात्र, तुम्ही स्वतःसाठी ही खरेदी करू शकणार नाही जर तुमचे पती एक कमावते सदस्य आहेत.
एक बिन-पगारी व्यक्ती टर्म प्लान खरेदी करू शकते का?
गृहिणींचे कदाचित एक स्थित उत्पन्न स्रोत नसेल, किंवा त्या अजिबात कमवत नसतील. मात्र, जर त्यांना टर्म प्लान घ्यायचा असेल, तर त्यांना उत्पन्नाच्या पुराव्याची गरज आहे. यासाठी, ते त्यांच्या पतीच्या उत्पन्नाचा पुरावा वापरू शकतात.
गृहिणींसाठी टर्म इंश्युरन्स खरेदी करण्याकरीता वयोमर्यादा किती आहे?
गृहिणींसाठी टर्म इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी पात्रता निकष, वयोमर्यादेसह, तशाच आहेत जशा त्या इतर ग्राहकांसाठी आहेत. मात्र हे तपशील वेगवेगळ्या प्लान्ससाठी बदलू शकतात, तुम्हाला रुची असलेल्या प्लानसाठी पात्रता निकष तुम्ही तपासू शकता.
गृहिणीच्या प्रकरणात परवानगी असलेली जास्तीत जास्त विमा रक्कम किती आहे?
सहसा, टर्म लाईफ इंश्युरन्सच्या विमा रकमेसाठी कोणतीही कमाल मर्यादा नसते. तुम्ही तुमच्यासाठी योग्य असलेली रक्कम निवडू शकता. मात्र, अंतिम रक्कम विमा कंपनी देत असलेल्या प्लानच्या स्वीकृतीच्या अधीन असू शकते.