डॉ. पूनम टंडन
चीफ इन्वेस्टमेंट ऑफिसर
डॉ. पूनम टंडन आमच्या कंपनीच्या चीफ इन्वेस्टमेंट ऑफिसर आहेत. त्या दिल्ली विद्यापीठातून वाणिज्य (ऑनर्स) मध्ये पदवीधर असून, झेवियर स्कूल ऑफ मॅनेजमेंट, जमशेदपूर येथून व्यवसाय व्यवस्थापनात पदव्युत्तर आणि नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई येथून व्यवस्थापन अभ्यासात तत्त्वज्ञानातील डॉक्टरेट मिळवली आहे.त्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकर्सच्या मान्यताप्राप्त सहयोगी आहेत. 25 फेब्रुवारी 2010 पासून त्या आमच्या कंपनी सोबत आहेत. यापुर्वी त्या मेटलाइफ इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड येथे मुख्य व्यवस्थापक (गुंतवणूक) या पदावर काम करत होत्या. इतर गोष्टींबरोबरच त्या गुंतवणुकीसंबंधी व्यवहारांचेही काम बघतात.
विराज एम नाडकर्णी
फंड मॅनेजर - इक्विटी
विराज कंपनी सेक्रेटरी, एमबीए (फायनान्स) सिम्बायोसिस, पुणे आहेत आणि त्यांनी पुणे विद्यापीठातून वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी देखील घेतली आहे. त्यांना आर्थिक क्षेत्रात, प्रामुख्याने इक्विटीमध्ये 10 वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे. त्यांना विश्लेषणाचा अनुभव आहे आणि इक्विटी मार्केट डायनॅमिक्स मध्ये रस आहे. यापूर्वी, ते एंजल ब्रोकिंग, फॉर्च्यून फायनान्शियल्समध्ये वरिष्ठ संशोधन विश्लेषक म्हणून कार्यरत होते. तेथे त्यांनी संस्थात्मक पातळीवर मूलभूत संशोधन हाताळले आणि अनेक क्षेत्रांचा मागोवा घेण्यात त्यांचा सहभाग होता.
येथे,
विराज इक्विटीचे फंड मॅनेजर आहेत.
संदीप शिरसाट
फंड मैनेजर - फिक्स्ड इन्कम
संदीप बीकॉम पदवीधर असून कॉस्ट अकाउंटंट (ICWAI) आहेत. त्यांना म्युच्युअल फंड, बँकिंग, पीएमएस तसेच विमा क्षेत्रात 22 वर्षांचा कामाचा अनुभव आहे. यापूर्वी, त्यांनी मल्टी-ॲक्ट इक्विटी रिसर्च (पीएमएस), मॅट्रिक्स ए एम सी, एचएसबीसी (इन्स्टीट्यूशनल फंड सर्विस), आणि यूटीआई ए एम सी प्रायव्हेट लिमिटेड (यूटीआई एम एफ) यांच्यासह काम केले आहे. त्यांना फंड व्यवस्थापनाचा अनुभव आहे - यात कर्ज आणि बॅलन्स्ड फंड्स , ट्रेझरी व्यवस्थापन, फंड अकाउंटिंग, गुंतवणूक ऑपरेशन्स, म्युच्युअल फंड कम्प्लायन्स आणि गुंतवणूक कार्यांशी संबंधित आयटी प्रकल्प डोमेन तज्ञ म्हणून सामील आहेत.
आज, ते आमच्या कंपनीमधे फिक्स्ड इन्कम साठी फंड मैनेजर म्हणून कार्यरत आहेत.