प्रवेशाच्या वेळी वय
- Question
- प्रवेशाच्या वेळी वय
- Answer
-
- किमान: 18 वर्षे
- कमाल: 55 वर्षे
तुमच्यासाठी योग्य वेळ आम्हाला सांगा.
लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा
तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.
पुरुष
महिला
इतर
तुमचे तपशील प्रविष्ट केल्याबद्दल धन्यवाद
तुमच्या मौल्यवान अभिप्रायांमुळे आम्हाला आमची सेवा सुधारण्यात आणि आणखी कार्यक्षम बनवण्यात महत्वाची भूमिका बजावते.
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
विनासायास नोंदणी प्रक्रिया
माझ्यासाठी नोंदणीपासून सर्व वैद्यकीय तपासण्यांपर्यंत, इंडियाफर्स्ट लाईफ ने सर्व काही सुकर केले. मी घेतलेल्या प्लॅनची वैशिष्ट्ये माझ्या अपेक्षांप्रमाणे आहेत, जी मला भविष्याबद्दल मनःशांती देतात.
मोहित अगरवाल
(मुंबई, 21 मार्च 2024)
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
ऑनलाईन खरेदीचा सुखद अनुभव
इंडियाफर्स्ट लाईफकडून लाईफ इन्शुरन्स पॉलिसी विकत घेणे हा माझ्यासाठी सुखद अनुभव होता. कंपनीच्या प्रतिनिधींसोबत विनासायास संवाद हा वरदानासारखा होता आणि त्याचप्रमाणे अति आवश्यक वैशिष्ट्यांना प्लॅनमध्ये घेणेही.
सत्यम नागवेकर
(मुंबई, 22 मार्च 2024)
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
माझ्या आर्थिक प्रवासातील विश्वासू सहकारी
इंडियाफर्स्ट लाईफ रेडियंट स्मार्ट इन्व्हेस्ट प्लॅन ने मला जिंकून घेतले! आर्थिक प्रवासात विश्वासू सहकारी असल्यासारखे आहे. त्याच्या फंड स्विचच्या फ्लेक्झिबल पर्यायांमुळे, मी जसा विचार केला होता त्याप्रमाणे माझ्या गुंतवणुकी करू शकतो. माझ्या गुंतवणुकीवर 20% चे घसघशीत परतावे मिळाले आहेत! नोंदणी टीम कडून मिळालेला आधार खूपच सुंदर होता, ज्यामुळे माझी खरोखरच काळजी घेत असल्याचे आणि आधार दिल्याचे जाणवले.
पौलोमी बॅनर्जी
(कोलकाता, 21 मार्च 2024)
होय, फ्री लूक पिरियडच्या दरम्यान तुम्ही तुमची पॉलिसी परत करु शकता.
जर तुम्ही पॉलिसीच्या कोणत्याही अटी आणि नियमांशी सहमत नसाल, तर पॉलिसी मिळाल्याच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत, तशी कारणं सांगून पॉलिसी परत करण्याचा पर्याय तुमच्याकडे आहे. डिस्टन्स मार्केटिंग किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने खरेदी केलेल्या पॉलिसींसाठी फ्री-लूक पिरियड 30 दिवसांचा असेल.
तुम्ही तुमची पॉलिसी परत करता तेव्हा तुम्हाला काही रिफंड मिळतो का?
होय. आम्ही पुढील रक्कम परत करू - भरलेला प्रीमियम
वजा i. पॉलिसी ज्या कालावधीसाठी लागू होती त्यासाठी प्रो-रेटा जोखिम प्रीमियम
वजा ii. भरलेले मुद्रांक शुल्क
वजा iii. वैद्यकीय तपासणीवर झालेला खर्च, जर झाली असल्यास
होय. लागू करांचा खर्च तुम्हाला, पॉलिसीधारकाला उचलावा लागेल. हे आयकर कायदा 1961 नुसार वेळोवेळी बदलू शकतो.
ही पॉलिसी खालीलपैकी कोणतीही घटना आधीच घडल्यास भविष्यातील सर्व प्रीमियम माफ करते, मात्र यासाठी मूळ पॉलिसी आणि रायडर पॉलिसी दोन्ही सक्रिय असल्या पाहिजेत;
A. मृत्यू
B. अपघातामुळे संपूर्ण कायमस्वरुपी अपंगत्व
C. गंभीर आजार
इंडियाफर्स्ट लाईफ वेव्हर ऑफ प्रीमियम रायडर एक नॉन-लिंक्ड रायडर आहे. हा रायडर मृत्यू, अपघातातील संपूर्ण कायमस्वरुपी अपंगत्व आणि गंभीर आजार यासारख्या कोणत्याही आगामी दुर्दैवी घटनांपासून तुमच्या प्रियजनांची आणखी सुरक्षा करण्यात तुम्हाला मदत करेल. तुम्ही खरेदी केलेल्या पॉलिसीचे लाभ आणखी वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या मूळ पॉलिसीमध्ये हा घेऊ शकता.
ही रायडर पॉलिसी खरेदी करताना रायडर प्लॅन अंतर्गत उपलब्ध कव्हरसाठी तुम्ही 3 वेगवेगळ्या पर्यायातून निवड करू शकता. हे पर्याय खाली दिलेले आहेत –
पर्याय | लाभ |
---|---|
मृत्यूवरती वेव्हर ऑफ प्रीमियम | पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास बेस पॉलिसी अंतर्गत बाकी आणि देय असलेले भविष्यातील सर्व प्रीमियम माफ करण्याचा लाभ या पर्यायाद्वारे मिळतो (फक्त तेव्हाच जेव्हा बेस पॉलिसी अंतर्गत लाईफ अशुअर्ड आणि पॉलिसीधारक वेगवेगळ्या व्यक्ती असतात), जे रायडर आणि लागू बेस पॉलिसीच्या अधीन आहेत. |
अपघातामुळे पूर्ण कायमस्वरुपी अपंगत्व आणि गंभीर आजाराचे निदान झाल्यास वेव्हर ऑफ प्रीमियम | या पर्यायामुळे खाली दिलेल्या घटनांपैकी कोणतीही एक घटना किंवा अनेक घटना एकत्र, घडल्यास बेस पॉलिसीच्या अंतर्गत बाकी आणि देय भविष्यातील सर्व प्रीमियम माफ करण्याचा लाभ देतो; रायडर लाईफ अशुअर्ड ला अपघातामुळे पूर्ण कायमस्वरुपी अपंगत्व किंवा रायडर अंतर्गत कव्हर असलेलाकोणताही एक गंभीर आजार रायडर लाईफ अशुअर्ड ला झाल्याचे खात्रीशीर निदान झाल्यास,सदर लाभ रायडर आणि लागू बेस पॉलिसीच्या अधीन आहे. |
मृत्यू किंवा अपघातामुळे पूर्ण कायमस्वरुपी अपंगत्व किंवा गंभीर आजारावर वेव्हर ऑफ प्रीमियम | या पर्यायामुळे हा पर्याय खाली दिलेल्या घटनांपैकी कोणतीही एक घटना एकदा किंवा अनेक घटना एकत्र, एकत्रितपणे घडल्यास बेस पॉलिसीच्या अंतर्गत बाकी आणि देय भविष्यातील सर्व प्रीमियमप्रिमियम माफ करण्याचा लाभ देतो; रायडर लाईफ अशुअर्ड चा मृत्यू किंवा रायडर लाईफ अशुअर्डचे अपघातामुळे पूर्ण कायमस्वरुपी अपंगत्व किंवा रायडर अंतर्गत कव्हर असलेल्या कोणत्याही एक गंभीर आजारापासून रायडर लाईफ अशुअर्डग्रस्त असल्याचे खात्रीशीर निदान झाल्यावर, सदर लाभ रायडर आणि लागू मूळ पॉलिसीच्या अधीन आहे. हा पर्याय निवडण्यासाठी, बेस पॉलिसी अंतर्गत विमाधारक आणि पॉलिसीधारक वेगवेगळ्या व्यक्ती असल्या पाहिजेत. |
अपघाती संपूर्ण कायमस्वरुपी अपंगत्व (एटीपीडी) आणि गंभीर आजाराच्या सविस्तर व्याख्यांसाठी महत्त्वपूर्ण व्याख्या पहा.
तुम्ही भरलेल्या प्रीमियमवर आणि प्राप्त झालेल्या लाभांवर प्रचलित आयकर कायद्यानुसार करलाभ मिळू शकतो. हे आयकर कायदा, 1961 अनुसार वेळोवेळी बदलू शकते. कृपया गुंतवणूक करण्याआधी तुमच्या कर सल्लागाराशी बोला.
निकष | किमान | कमाल |
---|---|---|
प्रवेशाच्या वेळी वय | 18 वर्षे | 55 वर्षे |
प्रीमियम | ₹ 500 |
|
रायडर मुदत | 5 वर्षे (मूळ प्लॅनची बाकी पॉलिसी मुदत/ प्रीमियम भरायची मुदत कमीत कमी 5 वर्षे असल्यास) | मूळ प्लॅनच्या प्रीमियम भरायच्या मुदती प्रमाणे (यापैकी जे आधी असेल त्याप्रमाणे: जास्तीत जास्त 30 वर्षे किंवा पॉलिसीधारकाचे वय 70 पेक्षा अधिक नसावे (नजीकच्या झालेल्या वाढदिवसानुसार) |
प्रीमियम भरायची मुदत | रायडर पॉलिसी मुदतीनुसार | रायडर पॉलिसी मुदतीनुसार |
होय, जरी आम्ही तुमची पॉलिसी सरेंडर करण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन देत नाही, मात्र तुम्ही ती सरेंडर करू शकता. तुम्ही लक्षात घ्यायला हवे कि या पॉलिसीमध्ये कोणतेही सरेंडर मूल्य नाही.
प्रीमियम रद्द होणे टाळण्यासाठी हफ्ता वेळेवर किंवा देय तारखेच्या आधी भरला पाहिजे. जर तुम्ही देय तारखांना तुमचा देय प्रीमियम भरणे चुकले तर मासिक पद्धतीच्या अंतर्गत तुम्हाला 15 दिवसांचा आणि इतर प्रीमियम भरणा पद्धतीसाठी 30 दिवसांचा वाढीव काळ दिला जातो.
या वाढीव काळाच्या दरम्यान तुमचे सर्व पॉलिसी लाभ सुरु राहतील आणि पॉलिसी चालू राहील.
प्रीमियम भरण्याच्या पद्धती आणि मोडल फॅक्टर्स मूळ पॉलिसी सारखेच असतील.
मूळ पॉलिसी रद्द झाल्यास, रायडर पॉलिसी थांबेल. जर तुम्ही ग्रेस पिरियड समाप्त होण्याआधी तुमचे प्रीमियम भरले नाही, तर तुमची पॉलिसी रद्द होईल. फक्त पहिल्या न भरलेल्या प्रीमियमच्या देय तारखेपासून व्याज/ विलंब शुल्कासह प्रलंबित प्रीमियम भरून तुम्ही ठराविक कालावधीमध्ये तुमची पॉलिसी पुन्हा सुरु करू शकता.
तुम्ही तुमची रद्द झालेली पॉलिसी पुन्हा सुरु करु शकता, तुमचा रिव्हायव्हल कालावधी संपायच्या आत, जोपर्यंत तुम्ही ती पहिल्या न भरलेल्या नियमित प्रीमियमच्या देय तारखेपासून ते मॅच्युरिटी तारखेपर्यंत असतो. पॉलिसी पुन्हा सुरु होणे कंपनीद्वारे मागितलेल्या वैद्यकीय आणि आर्थिक आवश्यकता समाधानकारकरीत्या पूर्ण होण्यावर अवलंबून आहे. वैद्यकीय खर्च, कोणताही असल्यास, तुम्हाला उचलावा लागेल. जर तुम्ही रिव्हायव्हल पिरियड समाप्त होण्याआधी तुमची पॉलिसी पुन्हा सुरु केली नाही, तर पॉलिसी समाप्त होते आणि तुम्ही कोणतेही लाभ मिळण्यास पात्र राहणार नाही.
A. आत्महत्या अपवाद
पॉलिसी अंतर्गत जोखिम कव्हर सुरु झाल्याच्या तारखेपासून किंवा पॉलिसी पुन्हा सुरु केल्याच्या तारखेपासून, जे लागू असेल, 12 महिन्यांच्या आत आत्महत्येमुळे मृत्यू झाल्यास, पॉलिसीधारकाचे नामनिर्देशित व्यक्ती किंवा लाभार्थीला, मृत्यू तारखेपर्यंत भरलेल्या एकूण प्रीमियमच्या कमीत कमी 80% रक्कम किंवा मृत्यूच्या तारखेनुसार उपलब्ध सरेंडर मूल्य, जी कोणतीही जास्त आहे, ती मिळेल, ज्यासाठी पॉलिसी चालू असायला हवी.
B. अपघाती संपूर्ण आणि कायमस्वरुपी अपंगत्वासाठी अपवाद
जर अपघाती संपूर्ण आणि कायमस्वरुपी अपंगत्वासाठी कोणताही दावा प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे खालीलपैकी कोणत्याही परिस्थितीमुळे उद्भवला असेल, तर लाभ देय होणार नाही
1. मानसिकरित्या शाबूत असताना किंवा वेडसरपणाच्या भरात, स्वतःला जाणीवपूर्वक केलेल्या दुखापती, आत्महत्या किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणे;
2. विमाधारक व्यक्ती मादक पदार्थ, मद्य, अंमली पदार्थ किंवा सायकोट्रॉपिक पदार्थांच्या प्रभावी खाली असताना, जोपर्यंत ते कायदेशीर मार्गाने आणि नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाच्या सुचनांनुसार घेतलेले नाही;
3. युद्ध, आक्रमण, परदेशी शत्रूचे कृत्य, शत्रूत्व (भलेही युद्ध घोषित केले असेल किंवा नसेल), सशस्त्र किंवा निःशस्त्र युद्धबंदी, यादवी युद्ध, बंडखोरी, बंडाळी, दहशतवादी कृत्य, क्रांती, उठाव, लष्करी किंवा सत्ता बळकावणे, दंगल किंवा नागरी क्षोभ, संप;
4. कोणत्याही उड्डाणामध्ये विमाधारक व्यक्तीचा सहभाग, फक्त प्रमाणित, व्यावसायिकरित्या नोंदणीकृत विमानामध्ये प्रवासी म्हणून वगळून;
5. विमाधारक व्यक्तीचा गुन्ह्यात किंवा बेकायदेशीर कृत्यामध्ये सहभाग;
6. कव्हर प्रभावी होण्याच्या तारखेच्या आधी झालेल्या अपघातामुळे आलेले कोणतेही अपंगत्व
7. कव्हर प्रभावी होण्याच्या तारखेच्या आधी आणि/किंवा तारखेनंतर कोणत्याही प्रकारच्या आजार, रोग किंवा जन्मजात विसंगतीमुळे आलेले कोणतेही अपंगत्व;
8. व्यावसायिक खेळांमध्ये किंवा कोणत्याही धोकादायक व्यवसायात गुंतणे किंवा त्यात भाग घेणे, ज्यामध्ये डायविंग, रायडिंग किंवा कोणत्याही प्रकारची शर्यत; श्वासोच्छवासाच्या उपकरणांचा वापर करुन किंवा न करता पाण्याखालील कृती; मार्शल आर्ट्स; शिकार करणे; पर्वतारोहण; पॅराशुटिंग; बंगी-जंपिंगचा समावेश आहे, परंतु हे इतकेच मर्यादित नाही.
9. आण्विक संसर्ग; आण्विक इंधन सामग्रीचे किरणोत्सारी, स्फोटक किंवा घातक स्वरुप किंवा आण्विक इंधन सामग्रीमुळे दूषित झालेली मालमत्ता किंवा अशा स्वरुपामुळे उद्भवणारे अपघात;
C. गंभीर आजारासाठी अपवाद
जर यामध्ये समाविष्ट गंभीर आजार प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे खालीलपैकी कोणत्याही कारणामुळे किंवा दरम्यान उद्भवल्यास या रायडर अंतर्गत विमाधारक कोणत्याही लाभासाठी पात्र असणार नाही:
1. विमाधारकाचा मृत्यू, समाविष्ट गंभीर आजाराचे निदान झाल्याच्या 30 दिवसांच्या आत होतो.
2. अश्या कोणत्याही वैद्यकीय परिस्थिती किंवा वैद्यकीय प्रक्रियेसाठी जी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे मानसिकरित्या शाबूत असताना किंवा वेडसरपणाच्या भरात, जाणीवपूर्वक स्वतःला केलेली दुखापत, आत्महत्येचा प्रयत्नाच्या परिणामस्वरुप उद्भवली आहे.
3. विमाधारकापुढे उद्भवलेली कोणतीही वैद्यकीय परिस्थिती किंवा विमाधारकावर झालेली कोणतीही वैद्यकीय प्रक्रिया, जर ती वैद्यकीय परिस्थिती किंवा ती वैद्यकीय प्रक्रिया प्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे कोणत्याही जन्मजात विसंगती किंवा दोषामुळे निर्माण झालेली आहे.
4. विमाधारकापुढे उद्भवलेल्या कोणत्याही वैद्यकीय परिस्थितीसाठी किंवा विमाधारकावर झालेली कोणतीही वैद्यकीय प्रक्रिया, जर ती वैद्यकीय परिस्थिती किंवा ती वैद्यकीय प्रक्रिया प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे मद्य किंवा मादक पदार्थांच्या अतिसेवनामुळे झाल्यास.
5. *धोकादायक कृत्यांमध्ये गुंतणे किंवा भाग घेणे, ज्यामध्ये डायविंग, रायडिंग किंवा कोणत्याही प्रकारची शर्यत; मार्शल आर्ट्स; शिकार करणे; पर्वतारोहण; पॅराशुटिंग; बंगी-जंपिंग; श्वासोच्छवासाच्या उपकरणांचा वापर करुन किंवा न करता पाण्याखालील कृतींचा समावेश आहे परंतु हे इतकेच मर्यादित नाही.
*धोकादायक कृत्ये म्हणजे असा कोणताही खेळ किंवा उद्योगधंदा किंवा छंद, जो विमाधारकासाठी संभवतः घातक आहे मग भलेही तो प्रशिक्षित आहे किंवा नाही.
6. विमाधारक व्यक्तीचा गुन्ह्यात किंवा गुन्हेगारी हेतूने बेकायदेशीर कृत्यामध्ये सहभाग.
7. आण्विक संसर्ग; आण्विक इंधन सामग्रीचे किरणोत्सारी, स्फोटक किंवा घातक स्वरुप किंवा आण्विक इंधन सामग्रीमुळे दूषित झालेली मालमत्ता किंवा अशा स्वरुपामुळे उद्भवणारे अपघातामुळे उद्भवलेली कोणतीही वैद्यकीय परिस्थिती किंवा कोणतीही वैद्यकीय प्रक्रिया.
8. अशी कोणतीही वैद्यकीय परिस्थिती किंवा कोणतीही वैद्यकीय प्रक्रिया जी एकतर युद्ध, आक्रमण, परदेशी शत्रूचे कृत्य, शत्रूत्व (भलेही युद्ध घोषित केले असेल किंवा नसेल), सशस्त्र किंवा निःशस्त्र युद्धबंदी, यादवी युद्ध, बंडखोरी, बंडाळी, दहशतवादी कृत्य, क्रांती, उठाव, लष्करी किंवा सत्ता बळकावणे, दंगल किंवा नागरी क्षोभ, संप किंवा शांतता काळात कोणत्याही नौसेना, लष्करी किंवा हवाई दलाच्या सैनिकी हालचालीमधील सहभागामुळे उद्भवली आहे.
9. अशा कोणतीही वैद्यकीय परिस्थिती किंवा कोणत्याही वैद्यकीय प्रक्रिया जी विमाधारकाच्या कोणत्याही उड्डाण कार्यात सहभागी झाल्याने उद्भवली आहे, यामध्ये प्रमाणित, भाडे भरणारे प्रवासी आणि विमान वाहतूक उद्योगातील कर्मचारी जसे नियमित मार्ग आणि नियोजित वेळापत्रकावरील एक प्रतिष्ठित विमानसेवेचे पायलट किंवा केबिन क्रू यांचा समावेश नाही.
10. व्याख्यांमध्ये नमूद केल्याप्रमाणे आजारांशी संबंधित अपवाद.
वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार विमा कायदा 1938 च्या कलम 45 च्या तरतूदींनुसार फसवणूक/चूकीच्या विधानांवर कारवाई केली जाईल.
वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार विमा कायदा 1938 च्या कलम 45 अनुसार, जो सांगतो कि
1) पॉलिसीच्या तारखेपासून म्हणजेच पॉलिसी जारी केल्याच्या तारखेपासून किंवा जोखिम सुरु झाल्याच्या तारखेपासून किंवा पॉलिसी पुन्हा सुरु केल्याच्या तारखेपासून किंवा पॉलिसीमध्ये रायडर जोडल्याच्या तारखेपासून, जी कोणतीही नंतरची असेल, तीन वर्षांची मुदत संपल्यावर कोणत्याही लाईफ इन्शुरन्स पॉलिसीवर कोणत्याही कारणास्तव प्रश्न विचारला जाणार नाही.
2) पॉलिसी जारी केल्याच्या तारखेपासून किंवा जोखिम सुरु झाल्याच्या तारखेपासून किंवा पॉलिसी पुन्हा सुरु केल्याच्या तारखेपासून किंवा पॉलिसीमध्ये रायडर जोडल्याच्या तारखेपासून, जी कोणतीही नंतरची असेल, तीन वर्षांच्या मुदतीच्या आत, फसवणूकीच्या कारणास्तव, एखाद्या लाईफ इन्शुरन्स पॉलिसीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो: मात्र इन्शुरन्स कंपनीला विमाधारक किंवा कायदेशीर प्रतिनिधी किंवा विमाधारकाच्या नामनिर्देशित किंवा नियुक्त व्यक्तींना लिखित स्वरुपात, ज्यावर निर्णय आधारित आहे अशा आधार आणि आशयांविषयी कळवावे लागेल.
3) उपकलम (2) मध्ये काहीही असले तरी, कोणताही विमाकर्ता फसवणुकीच्या कारणास्तव लाईफ इन्शुरन्स पॉलिसी नाकारू शकत नाही जर, विमाधारकाने सिद्ध केले की एखाद्या भौतिक वस्तुस्थितीचे चुकीचे विधान किंवा लपवणे त्याच्या माहिती आणि विश्वासाप्रमाणे सत्य होते किंवा वस्तुस्थिती लपवण्याचा प्रयत्न जाणूनबुजून केलेला नव्हता किंवा असे भौतिक वस्तुस्थितीचे चुकीचे विधान किंवा लपवणे विमाकर्त्याला माहिती होते: मात्र, फसवणूकीच्या प्रसंगी, जर पॉलिसीधारक जीवित नसेल, तर त्याचे खंडन करण्याचे दायित्व लाभार्थींवर आहे.
4) पॉलिसी जारी केल्याच्या तारखेपासून किंवा जोखिम सुरु झाल्याच्या तारखेपासून किंवा पॉलिसी पुन्हा सुरु केल्याच्या तारखेपासून किंवा पॉलिसीमध्ये रायडर जोडल्याच्या तारखेपासून, जी कोणतीही नंतरची असेल, तीन वर्षांच्या आत, या आधारावर पॉलिसीविषयी प्रश्न केला जाऊ शकतो कि प्रस्ताव किंवा इतर दस्तऐवजात विमाधारकाच्या आयुष्याच्या अपेक्षेबद्दल केलेले विधान किंवा वस्तूस्थितीचुकीच्या पद्धतीने लपवली गेली, ज्याच्या आधारे पॉलिसी जारी करण्यात आली किंवा पुन्हा सुरु केली किंवा रायडर जारी करण्यात आले: मात्र विमा कंपनीला विमाधारक किंवा कायदेशीर प्रतिनिधी किंवा विमाधारकाच्या नामनिर्देशित किंवा नियुक्त व्यक्तींना लिखित स्वरुपात त्या आधार आणि आशयांविषयी कळवावे लागेल ज्यावर लाईफ इन्शुरन्स पॉलिसी नाकारण्याचा निर्णय आधारित आहे: परंतु पुढे असे की, चुकीचे विधान केल्यामुळे किंवा भौतिक वस्तुस्थिती लपण्याच्या कारणास्तव पॉलिसी नाकारल्यास, फसवणुकीसाठी नाही, पॉलिसी नाकारल्याच्या तारखेपर्यंत पॉलिसीमध्ये गोळा केलेले प्रीमियम पॉलिसी नाकारण्याच्या तारखेपासून नव्वद दिवसांच्या कालावधीच्या आत विमाधारकाला किंवा कायदेशीर प्रतिनिधीला किंवा नामनिर्देशित किंवा विमाधारकाच्या नियुक्त व्यक्तीला दिले जातील.
5) या विभागातील कोणतीही बाब विमा कंपनीला वयाचे पुरावे मागणीसाठी रोखणार नाही, जर ते असे करण्यासाठी पात्र असतील, आणि कोणत्याही पॉलिसीवर फक्त यासाठी प्रश्न केला जाणार नाही कारण पॉलिसीच्या अटींना नंतरच्या पुराव्यांच्या आधारे समायोजित केले जाते की प्रस्तावात विमाधारकाचे वय चुकीचे नमूद करण्यात आलेले होते.
या रायडरच्या अंतर्गत कोणताही परिपक्वता किंवा उत्तरजीवित लाभ देय नाही.
तुम्ही अशा एखाद्या प्लान बद्दल ऐकले आहे का, जो तुम्हाला लाईफ कव्हरसोबत संपत्तीच्या निर्माणात देखील मदत करतो? 1 प्लानमध्ये 2 लाभांचा इंडियाफर्स्ट लाईफ रेडियन्स स्मार्ट इनव्हेस्ट प्लानसोबत आस्वाद घ्या.
आपल्या स्वप्नांना पाठिंबा द्यायला जर आपल्याकडे उत्पन्नाचा दुसरा स्त्रोत असेल तर किती चांगले होईल नाही का? तुमच्या स्वप्नांना सत्यात आणण्याचा हा एक मार्ग आहे, ज्यायोगे तुम्ही 1ल्या महिनाअखेरीपासून उत्पन्न मिळवण्यास सुरुवात करु शकता.
इंडियाफर्स्ट लाईफ गॅरंटेड रिटायरमेंट प्लानसोबत तणावमुक्त निवृत्ती मिळवा. तुमच्या वित्ताच्या जडणघडणीसाठी हा ठोस परताव्यांचे वचन देण्यासोबत तुम्हाला तुमच्या पध्दतीने अधिकाधिक बचतीची मुभा देतो. अतिरिक्त लाभ आणि टॅक्स पर्क्ससोबत तुमच्या बचतींना वृध्दिंगत करा.
View All