₹2 कोटी टर्म इन्शुरन्सकाय आहे?
हि एकप्रकारे वारसदाराला ₹2 कोटी मृत्यू लाभ देणारी टर्म लाईफ इन्शुरन्सपॉलिसी आहे.. हा लाभ पॉलिसीची मुदत आणि दाव्याशी संबंधित परिस्थितींच्या अधीन आहे.
टर्म इन्शुरन्सप्लॅन्स तुलनेने कमी किंमतीत जास्त कव्हरेज देण्यासाठी बरेच प्रसिद्ध आहेत. या प्लॅन्सबद्दल लक्षात घेण्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या प्लॅनची अगदी मूलभूत आवृत्ती मृत्यू लाभ देते. लेवल टर्म प्लॅन्स सोबत कोणतेही परिपक्वता लाभ किंवा इतर कोणतेही अतिरिक्त दावे शक्य नाहीत, जोपर्यंत तुम्ही कस्टमायजेशन निवडत नाही. ते निवडल्यास , त्याचा तुमच्या प्रिमियमच्या रकमेवर परिणाम होतो.
₹2 कोटी टर्म इन्शुरन्सप्लॅन का खरेदी करावा?
विमाधारकाच्या अकाली मृत्यूच्या प्रसंगी ₹2 कोटी टर्म इन्शुरन्सप्लॅन मुळे तुमच्या कुटुंबाला मोठी आर्थिक सुरक्षा मिळते.
याच्यामुळे कोणत्याही आर्थिक तणावाशिवाय तुमचे कुटुंब त्यांची जीवनशैली कायम ठेवू शकेल, दैनंदिन खर्च भागतील आणि शिक्षण व लग्न या सारखे भविष्यातील ध्येयं पूर्ण करू शकतील याची खात्री मिळते
या प्रकारचे कव्हर विभिन्न परिस्थितींतमध्ये लाभदायक असते, जसे उच्च-जोखमीची परंतु उच्च-पगाराची नोकरी किंवा जीवनशैलीचा उच्च खर्च. याचा विचार करता, ₹2 कोटी टर्म इन्शुरन्सविमा रक्कम निवडणे एक चांगला आर्थिक निर्णय होऊ शकतो.
₹2 कोटी टर्म इन्शुरन्सप्लॅन कशाप्रकारे काम करतो?
₹2 कोटी टर्म प्लॅन प्युअर प्रोटेक्शनच्या तत्वावर काम करतो:
पॉलिसीधारकाचे प्रिमियम: तुम्ही विमा कंपनीला नियमित प्रिमियम भरता.
कव्हरेज कालावधी: पॉलिसी विशिष्ट कालावधीसाठी कव्हरेज देते, ज्यास मुदत म्हटले जाते.
मृत्यू लाभ: मुदतीदरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, वारसदाराला ₹2 कोटींचा मृत्यू लाभ प्राप्त होतो.
मॅच्युरिटी लाभ नाही: इतर लाईफ इन्शुरन्स प्लॅन्स प्रमाणे, विमाधारक व्यक्तीमुदत संपेपर्यंत टर्म प्लॅन्स जिवंत राहिल्यास मॅच्युरिटी लाभ मिळत नाही.
₹2 कोटी टर्म इन्शुरन्सप्लॅन चे काय फायदे आहेत?
किफायतशीर प्रिमियम: इतर इन्शुरन्सउत्पादनांच्या तुलनेत टर्म प्लॅन्स किफायतशीर आहेत.
जास्त कव्हरेज : हे तुलनेने कमी प्रिमियम मध्ये जास्त कव्हरेज देतो.
आर्थिक सुरक्षा: तुमच्या नसल्यावर तुमच्या कुटुंबाला आर्थिक स्थिरतेची खात्री देतो.
योग्य ₹2 कोटी टर्म इन्शुरन्सप्लॅन कसा निवडावा?
₹2 कोटी विमा रक्कम असलेला योग्य टर्म इन्शुरन्सप्लॅन निवडताना अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. योग्य पॉलिसी निवडताना खालील टीप्स तुम्हाला मार्गदर्शक ठरतील.
तुमच्या गरजांचे मूल्यामापन करा: तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा, जबाबदाऱ्या आणि भविष्यातील ध्येयांचे मूल्यमापन करा.
प्लॅन्सची तुलना करा: ऑनलाइन कंपेरिजन टूल्स वापरून प्रिमियम, वैशिष्ट्ये आणि लाभांच्या आधारे वेगवेगळ्या टर्म प्लॅन्सची तुलना करा.
क्लेम सेटलमेंट रेश्यो तपासा: तुमच्या कुटुंबाचा दावा ताबडतोब निकाली काढण्याची खात्री करण्यासाठी उच्च क्लेम सेटलमेंट रेश्योअसलेली विमा कंपनी निवडा.
रायडर्स आणि ॲड-ऑन: तुमची पॉलिसीची किंमत वाढवण्यासाठी क्रिटिकल इलनेस कव्हर, ॲक्सीडेंटल डेथ बेनेफिट किंवा वेवर ऑफ प्रिमियम सारख्या अतिरिक्त रायडर्सचा विचार करा.
पॉलिसी मुदत: तुमच्या आर्थिक ध्येयआणि जबाबदाऱ्यांशी जुळणारी पॉलिसी मुदत निवडा.
प्रिमियम भरायचा पर्याय: तुमच्या आर्थिक नियोजनाशी जुळणारे सोयिस्कर प्रिमियम हफ्त्याचे पर्याय पहा.
₹2 कोटी टर्म इन्शुरन्सप्लॅन साठी प्रिमियम रकमेची गणना करायची आहे का? हे इथे ऑनलाइन कॅलक्युलेटरने करा!
₹2 कोटी टर्म इन्शुरन्सच्या लाभांवर कर लागेल का?
₹2 कोटी टर्म इन्शुरन्स प्लॅन चा लाभ हा सामान्यपणे आयकर कायदा, 1961 च्या कलम 10 (10डी) अनुसार कर-मुक्त असतो. याचाच अर्थ कि मृत्यू लाभ आय कराच्या अधीन नाही. मात्र, या सवलतीकरीता पात्र ठरण्यासाठी तुम्ही भरलेला प्रिमियम विमा रकमेच्या 10% पेक्षा अधिक नाही याची खात्री करणे आवश्यक आहे.
इंडियाफर्स्ट लाईफचा ₹2 कोटी टर्म इन्शुरन्सप्लॅन का खरेदी करावा
इंडियाफर्स्ट लाईफचा ₹2 कोटी टर्म इन्शुरन्सप्लॅन निवडण्याने अनेक फायदे मिळतात:
सर्वसमावेशक कव्हरेज: तुमच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी व्यापक कव्हरेज देतो.
बरोबरीचे प्रिमियम: उच्च मूल्याच्या कव्हरेज साठी किफायतशीर प्रिमियम दर देतो.
अतिरिक्त रायडर्स: तुमची पॉलिसी कस्टमाइज करण्यासाठी वेगवेगळ्या रायडर्सची उपलब्धता.
उच्च क्लेम सेटलमेंट रेशियो: उच्च क्लेम सेटलमेंट रेश्यो असणाऱ्या विनासायास दावा प्रक्रियेची खात्री.
भरणा करण्याचे सोयिस्कर पर्याय: तुमच्या आर्थिक नियोजनाशी जुळणारे प्रिमियम हफ्त्याचे अनेक पर्याय.
ग्राहक सेवा: पॉलिसी व्यवस्थापन आणि दावा निकालात काढण्यासाठी समर्थ ग्राहक सेवा.
योग्य लाईफ इन्शुरन्सप्लॅन निवडण्यात मदत पाहिजे का? 8828840199 वर आम्हाला आताच कॉल करा किंवा इथे कॉल बूक करा.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
₹2 कोटी टर्म इन्शुरन्सप्लॅन खरेदी करण्यासाठी पात्रता निकष काय आहेत?
तुम्ही कोणत्याही रकमेचा विमा घेण्याचे ठरवत असलात तरी, टर्म लाईफ इन्शुरन्सप्लॅन खरेदी करण्यासाठी तुमचे वय कमीत कमी 18 वर्ष असले पाहिजे. तुम्ही घेऊ इच्छित असलेल्या टर्म पॉलिसीचे पात्रता निकष तपासून तुम्ही तो प्लॅन घेऊ शकाल का याची खात्री करा.
जरी अंतिम स्वीकृती अंडररायटिंग टीम कडे असली तरी, रेग्युलर टर्म प्लॅन साठी पात्र प्रत्येक व्यक्ती ₹2 कोटी टर्म इन्शुरन्सप्लॅन खरेदी करण्यासाठी अर्ज करू शकतो.
₹2 कोटीची विमा रक्कम पुरेशी असेल की नाही हे मला कसे कळेल?
लाईफ इन्शुरन्ससाठी एक आदर्श विमा रक्कम अशी असावी कि जी तुमच्या वार्षिक उत्पन्न आणि आर्थिक जबाबदाऱ्यांचा 10 पट रक्कमआहे. तुम्ही एक ऑनलाइन टर्म इन्शुरन्सकॅलक्युलेटर वापरून स्वतः किंमत काढू शकता किंवा तज्ञाला तुमच्यासाठी काढण्यास सांगू शकता.
₹2 कोटीचे कव्हरेज देणाऱ्या प्लॅनसाठी टर्म इन्शुरन्सच्या प्रिमियमची रक्कम काय आहे?
₹2 कोटी टर्म इन्शुरन्सचा प्रिमियम विमाधारकाचे वय आणि लिंग तसेच विमा रक्कम या सारख्या वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून आहे. तुम्ही एकतर टर्म इन्शुरन्सप्रिमियम कॅलक्युलेटर वापरू शकता किंवा यामध्ये विमा कंपनीच्या प्रतिनिधीची मदत घेऊ शकता.
जर विमाधारक, पॉलिसी मुदत संपेपर्यंत जिवंत राहिल्यास काय होते?
जर तुम्ही एक लेवल टर्म इन्शुरन्सपॉलिसी निवडली आणि पॉलिसी मुदत संपेपर्यंत जिवंत राहिल्यास, तर दावा करण्यासारखा टर्म इन्शुरन्सचा कोणताही मॅच्युरिटी लाभ नाही. मात्र, जर तुमच्या प्लॅन मध्ये रिटर्न ऑफ प्रिमियमचा पर्याय असेल, तर तुम्ही प्लॅन मॅच्युअर झाल्यावर प्रिमियम परत करण्याचा दावा करू शकता.
₹2 कोटी टर्म इन्शुरन्स प्लॅनसाठी कोणते रायडर्स उपलब्ध आहेत?
निवडलेल्या प्लॅनवर रायडर्सची उपलब्धता अवलंबून आहे. तुम्ही तपासू शकता कि तुम्ही निवडलेल्या प्लॅनबरोबर कोणते रायडर्स घेतले जाऊ शकतात.