Menu
close
एक्सपर्टला विचारा arrow

लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा

तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.

right-icon-placeholder
right-icon-placeholder
male male

पुरुष

male male

महिला

male male

इतर

नियम आणि अटी - इंडियाफर्स्ट लाईफ इंश्युरन्स

या अटी आणि नियम आमच्या वेबसाइटचा तुमचा वापर नियंत्रित करतात. आमची वेबसाइट वापरून, तुम्ही या अटी आणि नियम पूर्णपणे स्वीकारता. जर यापैकी कोणत्याही अटी आणि नियमांशी किंवा या अटी आणि नियमांच्या कोणत्याही भागांशी तुम्ही असहमत आहात, तर तुम्ही आमची वेबसाइट वापरू नये. कृपया ही वेबसाइट वापरण्यापूर्वी सर्व नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचा.

वेबसाइटचे ट्रेडमार्क आणि कॉपीराइट वापरण्यासाठी परवाना

Answer

अन्यथा नमूद केल्याशिवाय, आम्ही किंवा आमच्या परवानाधारकांकडे वेबसाइट आणि वेबसाइटवरील सामग्रीचे बौद्धिक संपदा अधिकार आहेत. वेबसाइटवर समाविष्ट असलेल्या कोणत्याही गोष्टीचा अर्थ इंडियाफर्स्ट लाईफ इंश्युरन्स कंपनी लिमिटेड (इथे पुढे “इंडियाफर्स्ट लाईफ” म्हणून उल्लेख केला जाईल) किंवा असेच तिसरे पक्ष, जे या वेबसाइटवर दाखवलेल्या ट्रेडमार्क्सचे मालक असू शकतात, त्यांच्या लिखित परवानगीशिवाय या वेबसाइटवर प्रदर्शित कोणत्याही ट्रेडमार्कचा उपयोग करण्यासाठी अनुल्लेखाने किंवा अन्यथा, कोणताही परवाना किंवा वापरण्याचा अधिकार मंजूर करणे असा केला जाऊ नये. वेबसाइटवर प्रदर्शित केलेल्या चित्रांचा कोणताही अनधिकृत वापर कॉपीराइड कायदे, ट्रेडमार्क कायदे, गोपनीयतेचे कायदे आणि आयआरडीएआय जाहिरातीचे नियम आणि संप्रेषण नियम आणि कायद्यांचे उल्लंघन समजले जाईल.

पुढे, खालील परवान्याच्या अधीन, वेबसाइटवरील सर्व बौद्धिक संपदा हक्क आणि वेबसाइटवरील सामग्री राखीव आहेत. "या अटी आणि नियमांमध्ये खाली आणि इतर कुठेही दिलेल्या निर्बंधांच्या अधीन, तुम्ही फक्त कॅशिंगच्या उद्देश्यासाठी पाहू, डाउनलोड करू शकता आणि फक्त तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी वेबसाइटवरील पृष्ठे प्रिंट करू शकता."

तुम्ही:

  • या वेबसाइटवरील सामग्री पुर्नप्रकाशित करणार नाही (इतर वेबसाइटवरील पुर्नप्रकाशनसह);
  • वेबसाइटवरील सामग्रीची विक्री करणार, भाड्याने देणारे किंवा उप-परवाना देणार नाही;
  • वेबसाइटवरील कोणतीही सामग्री सार्वजनिकरित्या दाखवणार नाही;
  • व्यावसायिक हेतूसाठी आमच्या वेबसाइटवरील सामग्रीचे पुनरुत्पादन, नक्कल, कॉपी किंवा अन्यथा शोषण करणार नाही;
  • वेबसाइटवरील कोणतीही सामग्री संपादित किंवा अन्यथा बदलणार नाही; किंवा
  • या वेबसाइटवरील सामग्रीचे पुर्नवितरण करणार नाही.

स्वीकार्य वापर

Answer

तुम्ही आमची वेबसाइट अशा कोणत्याही प्रकारे वापरणार नाही ज्यामुळे वेबसाइटचे नुकसान होऊ शकते किंवा ज्यामुळे वेबसाइटच्या उपलब्धता किंवा ॲक्सेस करण्याची क्षमता बिघडू शकते; किंवा अशा कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर, अवैध, फसवणूक किंवा हानिकारक क्रिया असू शकते.

तुम्ही आमची वेबसाइट किंवा कंपनीशी संबंधित वस्तू किंवा सेवांची जाहिरात करण्यासाठी किंवा खरेदी आणि/किंवा विक्री करण्यासाठी आमची वेबसाइट वापरणार नाही.

तुम्ही आमच्या पूर्व लिखित संमतीशिवाय कोणत्याही तिसऱ्या पक्षाची कोणतीही मालकीची किंवा गोपनीय माहिती या वेबसाइटवर शेयर, जमा, प्रकट, पोस्ट किंवा प्रकाशित करणार नाही.

तुम्ही आमच्या पूर्व लिखित संमतीशिवाय आमच्या वेबसाइटच्या माध्यमातून, वर किंवा संदर्भाद कोणतीही स्पर्धा आयोजित करणार नाही.

सामग्री डाउनलोड करणे

Answer

इंडियाफर्स्ट लाईफ याची हमी किंवा वॉरंटी देत नाही की आमच्या वेबसाइट द्वारे डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असलेल्या फाइल्स सॉफ्टवेयर वायरलेस किंवा इतर हानिकारक कंप्युटर कोड, फाइल्स किंवा प्रोग्राम्स द्वारे संक्रमण मुक्त असतील.

प्रतिबंधित प्रवेश

Answer

आमच्या वेबसाइटचा काही भाग प्रवेशासाठी प्रतिबंधित आहे. आम्ही आमच्या विवेकबुद्धीनुसार आमच्या वेबसाइटच्या इतर भागात, किंवा आमच्या संपूर्ण वेबसाइटवर, प्रवेश प्रतिबंधित करण्याचा अधिकार राखून ठेवतो.

जर आम्ही आमच्या वेबसाइटच्या प्रतिबंधित भागात किंवा इतर सामग्री किंवा सेवांमध्ये प्रवेश मिळू देण्यासाठी युजर आयडी आणि पासवर्ड देतो, तर तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड गोपनीय राखण्याची तुम्ही खात्री करायला हवी.

आम्ही कोणत्याही सुचना किंवा स्पष्टीकरणाशिवाय आमच्या विवेकबुद्धीसार तुमचा युजरआयडी आणि पासवर्ड बंद करू शकतो.

युजर निर्मित कंटेंट

Answer

या अटी आणि नियमांमध्ये, “तुमची युजर सामग्री” म्हणजे ती सामग्री (यामध्ये कोणत्याही मर्यादेशिवाय शब्द, प्रतिमा, ऑडियो सामग्री, व्हिडीयो सामग्री आणि ऑडियो-विज्युअल सामग्रीचा समावेश आहे) जी तुम्ही, कोणत्याही उद्देश्यासाठी, आमच्या वेबसाइटवर जमा करतात.

तुमची युजर सामग्री कोणत्याही प्रकारे बदनामीकारक, असभ्य, अश्लील, आक्षेपार्ह, निंदनीय, खोटी किंवा अवैध किंवा बेकायदेशीर असू नये आणि कोणत्याही तिसऱ्या पक्षांच्या अधिकारांचे उल्लंघन करणारी नसावी आणि ही तुमच्या किंवा आमच्या किंवा कोणत्याही तिसऱ्या पक्षाच्या विरुद्ध (प्रत्येक प्रकरणात कोणत्याही लागू कायद्यानुसार) कायदेशीर कारवाई करण्यासाठी सक्षम नसावी.

तुम्ही वेबसाइटवर अशी कोणतीही युजर सामग्री जमा करू नये जी कोणत्याही धोका किंवा वास्तविक कायदेशीर खटला किंवा अशाच इतर तक्रारीचा विषय आहे किंवा कधी राहिला आहे.

आम्ही कोणत्याही पूर्व सुचना किंवा स्पष्टीकरणाशिवाय आमच्या वेबसाइटवर जमा केलेली, किंवा आमच्या सर्वर्सवर संग्रह कोलेली, किंवा आमच्या वेबसाइटवर आयोजित किंवा प्रकाशित केलेली कोणतीही सामग्री संपादित करण्याचा किंवा काढून टाकण्याचा अधिकार सुरक्षित ठेवतो.

युजर सामग्रीशी संबंधित या अटी आणि नियमांच्या अंतर्गत आमचे अधिकार असून सुद्धा, आमच्या वेबसाइटवर जमा केलेल्या सामग्री, किंवा सामग्रीच्या अशा प्रकाशनावर देखरेख ठेवण्याचे आम्ही काम करत नाही.

मर्यादित वॉरंटी

Answer

आम्ही या वेबसाइटवर प्रकाशित केलेल्या माहितीच्या पूर्णतेची किंवा अचूकतेची हमी देत नाही; आणि ना ही आम्ही हे निश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहोत की वेबसाइट उपलब्ध राहील किंवा वेबसाइटवरील सामग्री अद्यावत ठेवलेली आहे. आम्ही या गोष्टीची हमी देत नाही की वेबसाइटवर उपलब्ध कार्य अखंडित किंवा त्रुटी-मुक्त राहतील, दोष दुरुस्त केले जातील, किंवा ही वेबसाइट किंवा ही उपलब्ध करणारे सर्वर्स वायरस किंवा इतर हानिकारक घटकांपासून मुक्त आहेत.

या वेबसाइटवरील सर्व माहिती आणि सामग्री "जशी आहे तशी" तत्त्वावर प्रदान केली आहे. आम्ही या वेबसाइटवरील सामग्रीच्या उपयोग किंवा उपयोगाच्या परिणामांविषयी त्यांची शुद्धता, अचूकता, पूर्णता, पर्याप्तता, विश्वसनीयता आणि इतर कोणत्याही संदर्भात हमी देत नाही किंवा कोणतेही प्रतिनिधित्व (व्यक्त किंवा निहित) करत नाही. इथे उपलब्ध माहिती आणि वर्णन उत्पादने आणि सेवांवर लागू होणारे सर्व नियम, अपवाद आणि अटींचे पूर्ण वर्णन असण्यासाठी नियोजित नाही, परंतु हे फक्त सामान्य माहितीच्या उद्देश्यांसाठी दिलेले आहे.

लागू कायद्याद्वारे परवानगी असलेल्या कमाल मर्यादेपर्यंत आम्ही या वेबसाइट आणि या वेबसाइटच्या वापराशी संबंधित सर्व प्रतिनिधित्व, हमी आणि अटी वगळतो (ज्यामध्ये, कोणत्याही मर्यादेशिवाय, किफायतशीर देखभाल आणि कौशल्याच्या उद्देश्य आणि/किंवा वापरासाठी समाधानकारक गुणवत्ता, तंदुरुस्तीच्या कायद्याद्वारे निहित कोणत्याही हमीचा समावेश आहे).

ही वेबसाइट इतर वेबसाइट्सना जोडलेली असू शकते ज्यांची इंडियाफर्स्ट लाईफ द्वारे देखरेख केली जात नाही. त्या वेबसाइट्सच्या सामग्रीसाठी इंडियाफर्स्ट लाईफ जबाबदार नाही.

मर्यादा आणि उत्तरदायित्व वगळणे

Answer

जरी आम्ही या वेबसाइटवर अचूक आणि अद्यावत माहिती समाविष्ट करण्यासाठी वाजवी प्रयत्न केलेला आहे, तरीही कधी-कधी त्रुटी किंवा चूका होऊ शकतात. या वेबसाइटच्या सामग्रीची शुद्धता, अचूकता, पूर्णता, पर्याप्तता, विश्वसीयता किंवा इतर संदर्भात कोणतीही हमी किंवा प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये, ज्यामध्ये निष्काळजीपणाचा समावेश असून, इतकाच मर्यादित नाही, इंडियाफर्स्ट लाईफ, किंवा वेबसाइट तयार, निर्मित, किंवा वितरण करण्यात सहभागी कोणताही पक्ष या वेबसाइटवरील सामग्रीच्या वापराच्या, किंवा वापराच्या अक्षमेच्या परिणामस्वरुप कोणत्याही थेट, प्रासंगिक, परिणामी, अप्रत्यक्ष नुकसान किंवा दंडात्मक नुकसानासाठी जबाबदार असणार नाही, भलेही इंडियाफर्स्ट लाईफ किंवा आमच्या अधिकृत प्रतिनिधींना अशा नुकसानाच्या शक्यतेविषयी कळवलेले असेल.

कोणत्याही परिस्थितीत इंडियाफर्स्ट लाईफ किंवा तिचे प्रतिनिधी किंवा इंडियाफर्स्ट लाईफचे कर्मचारी किंवा संचालक या वेबसाइटचा वापर केल्यामुळे होणारे नुकसान, हानि आणि कारवाईच्या कारणांसाठी जबाबदार ठरवले जाणार नाही. तुमच्या बदनामीकारक, असभ्य, अश्लील, आक्षेपार्ह, निंदनीय, खोट्या किंवा अवैध किंवा बेकायदेशीर आचरणासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये इंडियाफर्स्ट लाईफ जबाबदार असणार नाही.

वेबसाइटच्या ॲक्सेस, वापर किंवा ब्राउजिंग करण्याच्या किंवा या वेबसाइटवरून कोणतीही सामग्री, डेटा, शब्द, चित्रे, व्हिडीयो किंवा ऑडियो डाउनलोड करण्याच्या परिणामस्वरुप तुमच्या संगणक उपकरण किंवा इतर मालमत्तेच्या कोणत्याही नुकसानासाठी, किंवा व्हायरसने संक्रमित होण्यासाठी, आम्ही कोणतीही जबाबदारी घेत नाही, आणि यासाठी उत्तरदायी असणार नाही.

आमच्या वाजवी नियंत्रणाच्या पलीकडील कोणत्याही घटना किंवा घटनांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही नुकसानाच्या संदर्भात आम्ही तुमच्यासाठी उत्तरदायी असणार नाही.

या अटी आणि नियमांचे उल्लंघन

Answer

या अटी आणि नियमांच्या अंतर्गत आमच्या इतर अधिकारांविषयी कोणताही पूर्वग्रह न ठेवता, जर तुम्ही कोणत्याही प्रकारे या अटी आणि नियमांचे उल्लंघन करता, तर या उल्लंघनाचा सामना करण्यासाठी आम्हाला योग्य वाटेल तशी कारवाई आम्ही करू शकतो, ज्यामध्ये वेबसाइटसाठी तुमचा प्रवेश निलंबित करणे, तुम्हाला वेबसाइटवर प्रवेश देण्यापासून प्रतिबंधित करणे, तुमचा आयपी ॲड्रेस वापरून संगणकांना वेबसाइटवर प्रवेश देण्यापासून अवरोध करणे, वेबसाइटवर तुमचा प्रवेश अवरोधित करण्यासाठी तुमच्या इंटरनेट सेवा पुरवठादाराला संपर्क करणे आणि/किंवा तुमच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई उभी करण्याचा समावेश आहे.

नुकसानभरपाई

Answer

तुम्ही समजता आणि सहमत आहात की वेबसाइटवरील तुमच्या वर्तन आणि तुमच्या युजर सामग्रीसाठी तुम्ही वैयक्तिकपणे जबाबदार आणि उत्तरदायी आहात. वेबसाइटच्या तुमच्या वापराच्या संदर्भात कोणत्याही दावा, किंमत, खर्च, मागणी, निकाल, पुरस्कार किंवा इतर नुकनासाठी तुम्ही भरपाई देण्यासाठी आणि इंडियाफर्स्ट लाईफला आणि त्यांच्या सहयोगींना निरपराध ग्राह्य धरण्यासाठी सहमत आहात.

फरक

Answer

ही पोस्टिंग अद्यावत करुन या अटी आणि नियमांमध्ये कधीही सुधारणा केल्या जाऊ शकतात. प्रकाशनाच्या तारखेपासून आमच्या वेबसाइटच्या वापराला या सुधारित अटी आणि नियम लागू होतील. तुम्ही अशा कोणत्याही सुधारणांसाठी बांधील आहात आणि म्हणून तुम्ही वेळोवेळी या पृष्ठावर भेट देऊन त्या वर्तमान नियम आणि अटींची समिक्षा करायला हवी ज्यांच्याशी तुम्ही बांधील आहात. या पोस्टिंगच्या अशा अद्यतनातील कोणत्याही विलंबासाठी आम्ही जबाबदार असणार नाही किंवा आम्हाला जबाबदार मानले जाणार नाही.

तिसऱ्या पक्षांचे अधिकार वगळणे

Answer

या अटी आणि नियम तुमच्या फायद्यासाठी आहेत आणि कोणत्याही तिसऱ्या पक्षाच्या फाद्यासाठी किंवा कोणत्याही तिसऱ्या पक्षाद्वारे अंमलबजावणी करण्यासाठी नियोजित नाहीत. या अटी आणि नियमांच्या संदर्भात आमच्या आणि तुमच्या अधिकारांची अंमलबजावणी कोणत्याही तिसऱ्या पक्षाच्या संमतीच्या अधीन नाही.

संपूर्ण करार

Answer

आमच्या गोपनीयता धोरणासह (जी आमच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे) या अटी आणि नियम तुमच्या आमच्या वेबसाइटच्या वापरासंबंधात तुमच्या आणि आमच्यामधील संपूर्ण करार तयार करतात आणि या वेबसाइटच्या तुमच्या वापरासंदर्भातील सर्व आधीच्या करारांची जागा घेतात.

अधिकारक्षेत्र

Answer

आमची वेबसाइट संपूर्ण जगभर उपलब्ध आहे. जर तुम्ही भारतात राहत नाही आणि तुम्ही आमची वेबसाइट वापरता, तर तुम्ही अटी आणि नियमांशी बांधील आहात आणि माहितीच्या आंतरराष्ट्रीय हस्तांतरणासाठी विशेषकरून संमती देता. येथे स्पष्टपणे नमूद केल्याशिवाय, आम्ही असे कोणतेही प्रतिनिधित्व करत नाही की या वेबसाइटवरील सामग्री कोणत्याही ठिकाणी वापरण्यासाठी योग्य किंवा उपलब्ध आहे. जे व्यक्ती या वेबसाइटचा उपयोग करणे निवडतात ते आपल्या स्वतःच्या पुढाकाराने असे करतात आणि स्थानिक कायद्यांचे पालन करण्यासाठी जबाबदार आहेत.

विमा हा विनंतीचा विषय आहे. म्हणून, विशेषत: येथे नमूद केल्याशिवाय, या वेबसाइटवर दिलेली माहिती कोणतीही सुरक्षा, विमा उत्पादन किंवा इतर उत्पादन किंवा सेवा विकण्यासाठी किंवा कर, कायदेशीर किंवा इतर सल्ला देण्यासाठी ऑफर नाही. कोणतीही सुरक्षा, विमा उत्पादन किंवा इतर उत्पादन किंवा सेवा अशा कोणत्याही अधिकारक्षेत्रात दिली जात नाही किंवा विकली जाणार नाही जेथे अशी ऑफर किंवा विनंती, खरेदी किंवा विक्री अशा अधिकारक्षेत्राच्या सुरक्षा, विमा किंवा इतर कायद्यांच्या अंतर्गत बेकायदेशीर असेल. काही उत्पादने आणि सेवा सर्वच अधिकारक्षेत्रात कदाचित उपलब्ध नसतील.

या अटी आणि नियमांमुळे किंवा आमच्या वेबसाइटच्या वापराच्या संबंधामुळे उद्भवणारे सर्व विवाद किंवा फरक भारतीय कायद्याच्या आणि विशेषकरून मुंबई न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राच्या अधीन असतील.

माहितीची गोपनीयता आणि मालकी

Answer

जोपर्यंत इथे स्पष्टपणे अन्यथा सांगितलेले नाही, या वेबसाइटवर तुम्ही पाठवणारी कोणतीही माहिती, सूचना किंवा सामग्री ज्यामध्ये डेटा, प्रश्न, टिप्पणी किंवा सल्ल्यांचा समावेश आहे, गैर-गोपनीय आणि बिगर-मालकीची मानली जाईल आणि आपोआपपणे इंडियाफर्स्ट लाईफची मालमत्ता बनेल. या वेबसाइटवर कोणतीही माहिती, सूचना किंवा सामग्री जमा करणे आणि/किंवा पाठवणे जसे वर नमूद केलेले आहे, तुम्ही अशा माहिती, सूचना किंवा सामग्रीमध्ये मालकी अधिकार द्याल ज्यामध्ये कोणत्याही संबंधित अधिकारक्षेत्राच्या अंतर्गत बौद्धिक मालमत्ता अधिकारांचा समावेश असून ते इतकेच मर्यादित नाही.

अशी माहिती, सूचना किंवा सामग्री (आमच्या गोपनीयता धोरणाच्या अधीन) कोणत्याही हेतूसाठी वापरली जाऊ शकते, ज्यामध्ये पुनरुत्पादन, विनंती, प्रकटीकरण, प्रेषण, प्रकाशन, प्रकाशन आणि पोस्टिंगचा समावेश आहे, परंतु हे इतकेच मर्यादित नाही. पुढे, इंडियाफर्स्ट लाईफ कोणत्याही हेतूसाठी या वेबसाइटवर पाठवलेल्या कोणत्याही संदेशात असलेल्या कोणत्याही कल्पना, संकल्पना, माहिती किंवा तंत्रे वापरण्यास मुक्त आहे, ज्यामध्ये, अशी माहिती वापरून उत्पादने तयार करणे आणि मार्केटिंग करण्याचा समावेश आहे, परंतु हे इतकेच मर्यादित नाही.

सॉफ्टवेयर परवाने

Answer

तुम्ही स्वीकारता की या वेबसाइटवर उपलब्ध किंवा तुम्हाला पुरवलेल्या कोणत्याही सॉप्टवेयरमध्ये असे काही असू शकते जे भारतातील वेगवेगळ्या नियम आणि विनियमांद्वारे कठोर नियंत्रणाच्या अधीन असू शकते. तुम्ही याद्वारे सहमत आहात की भारतीय कायदे आणि नियमांचे उल्लंघन करून तुम्ही असे कोणतेही सॉफ्टवेयर भारतातून हस्तांतर किंवा निर्यात करणार नाही (ज्यामध्ये, उदाहरणार्थ, भारतातील कोणत्याही विदेशी व्यक्ती किंवा संस्थेला असे सॉफ्टवेयर देण्याचा समावेश आहे) किंवा भारताबाहेर असे सॉफ्टवेयर पुन्हा निर्यात करणार नाही. इंडियाफर्स्ट लाईफ या वेबसाइट वरून भारतीय कायदे आणि नियमांद्वारे प्रतिबंधित कोणत्याही अधिकारक्षेत्रातील कोणत्याही सॉफ्टवेयर किंवा तांत्रिक डेटा डाउनलोड किंवा निर्यात करण्यासाठी अधिकृत करत नाही.

आमचे तपशील

Answer

ही इंडियाफर्स्ट लाईफ इंश्युरन्स कंपनी लिमिटेडची अधिकृत वेबसाइट आहे, जिचे कॉर्पोरेट कार्यालय इथे आहे:

इंडियाफर्स्ट लाईफ इंश्युरन्स कंपनी लिमिटेड,

12वा आणि 13वा मजला, नॉर्थ [सी] विंग, टॉवर 4,

नेस्को आयटी पार्क, नेस्को सेंटर, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे,

गोरेगाव (पूर्व), मुंबई - 400063.

इंडियाफर्स्ट लाईफ द्वारे दिल्या जाणाऱ्या उत्पादन आणि सेवांविषयी आणि तुमच्या गरजांसाठी त्यांच्या योग्यतेचे तपशील मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागार किंवा इंश्युरन्स एजंटला संपर्क करू शकता.

अस्वीकृति

लिंक्ड इन्शुरन्स उत्पादने ही पारंपरिक विमा उत्पादनांपेक्षा वेगळी असून जोखमीच्या अधीन असतात. युनिट लिंक्ड लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज मध्ये भरलेली प्रीमियम यात गुंतवणुकीतील जोखमीच्या अधीन असतात आणि युनिट्स चे नॅव्ह वर खाली होऊ शकतात, फंड्सची कामगिरी आणि कॅ पिटल मार्केटवर परिणाम करणाऱ्या घटकांनुसार  आणि विमा घेणारी व्यक्ती आपल्या निर्णयासाठी जबाबदार असते. इन्डियाफर्स्ट लाईफ इंश्योरंस कंपनी लिमिटेड हे फक्त विमा कंपनीचे नाव असून याद्वारे कराराची  गुणवत्ता, यासंबंधी भविष्यातील धोरणे किंवा परतावा, यासंबंधी हमी देत नाही.

कृपया संबंधित धोके आणि यासंबंधी लागू होणारे शुल्क तुमच्या विमा एजंटकडून किंवा विमा कंपनीने जारी केलेले मध्यस्थ किंवा पॉलिसी कागदपत्रे वाचून जाणून घ्या. या करारांतर्गत दिले गेलेले विविध फंड ही फंडांची नावे आहेत आणि कोणत्याही प्रकारे या योजनांची गुणवत्ता, त्यांच्या भविष्यातील धोरणे आणि परतावा दर्शवत नाहीत. भूतकाळातील कामगिरी भविष्यात बदलू शकते आणि भविष्यातील कामगिरीची हमी देऊ शकत नाही. या कागदपत्रातील मजकुरात शिफारस/विधाने /अंदाज/अपेक्षा/भाकीत असू शकतात, जे कदाचित 'फॉरवर्ड लुकिंग' असू शकतात.


वास्तविक परिणाम या कागदपत्रात व्यक्त / निहित परिणामांपेक्षा भौतिकदृष्ट्या भिन्न असू शकतात. ही विधाने, कोणत्याही विशिष्ट व्यक्तीला वैयक्तिक शिफारस किंवा एखाद्या व्यक्तीच्या कोणत्याही गुंतवणूक गरजा प्रदान करण्याचा हेतू नाही. शिफारसी / विधाने / अंदाज / अपेक्षा / भाकीत सर्वसाधारण स्वरूपाचे आहेत आणि वैयक्तिक पॉलिसीधारक / ग्राहक यांच्या विशिष्ट गुंतवणूक गरजा किंवा जोखीम पत्करण्याची स्थिती किंवा आर्थिक परिस्थिती विचारात घेत नाहीत. जोखीम घटक आणि अटी व शर्तींच्या अधिक तपशीलांसाठी, कृपया विक्री पूर्ण करण्यापूर्वी विक्री माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचा. कर लाभ कर कायद्यातील बदलांच्या अधीन आहेत.

सर्वात जास्त शोधले गेलेले शब्द

1800 209 8700

ग्राहक सेवा क्रमांक

whatsapp

8828840199

ऑनलाइन पॉलिसी खरेदीसाठी

call

+91 22 6274 9898

आमच्यासोबत व्हॉट्सॲपवर चॅट करा

mail