पॉलिसीधारक नावातील बदलासाठी खालीलपैकी कोणत्याही एक प्रकारे आम्हाला संपर्क करा:
आम्हाला ईमेल करा:
- संबंधित सर्व कागदपत्रांसह तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवरून customer.first@indiafirstlife.com वर आम्हाला ईमेल करा.
- त्याचप्रमाणे, जर तुम्ही नोंदणीकृत नसलेल्या ईमेल आयडी वरून विनंती पाठवत असाल, तर कृपया बदल विनंती फॉर्म भरा आणि संबंधित सर्व कागदपत्रांसह त्याची स्कॅन केलेली प्रत आम्हाला पाठवा.
- इथे क्लिक करून कागदपत्रांची यादी पहा.
आम्हाला कॉल करा:
- आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-209-8700 वर
- आमचे ग्राहक सेवा प्रतिनिधी तुम्हाला या प्रक्रियेत मार्गदर्शन करतील
आम्हाला भेट द्या:
- आवश्यक सर्व कागदपत्रांसह आमच्या इंडियाफर्स्ट लाईफ, आंध्रा बँक किंवा बँक ऑफ बडोदा च्या कोणत्याही शाखेत जा.
- इथे क्लिक करून कागदपत्रांची यादी पहा.
टपाल/ कुरियर:
- आवश्यक सर्व कागदपत्रांसोबत नावातील अद्यतन/बदलाची तुमची विनंती आम्हाला खालील पत्त्यावर पाठवा.
- तसेच, कृपया बदल विनंती फॉर्म भरा आणि आवश्यक सर्व कागदपत्रांसह रीतसर सही केलेली फिजिकल प्रत आम्हाला पाठवा.
- इथे क्लिक करून कागदपत्रांची यादी पहा
- खाली दिलेल्या पत्त्यावर आम्हाला हे पाठवा:
इंडियाफर्स्ट लाईफ इंश्युरन्स कंपनी लिमिटेड
१२वा आणि १३वा मजला,उत्तर [क] विंग, टॉवर ४
नेस्को आयटी पार्क, नेस्को सेंटर,
पश्चिम द्रुतगती महामार्ग,
गोरेगाव (पूर्व), मुंबई – ४०००६३.
आवश्यक कागदपत्रांची यादी:
- नावामध्ये दुरुस्ती आवश्यक असल्यास, तुम्ही नावाचा कोणताही सामान्य पुरावा जमा करु शकता जसे तुमचा वाहन चालवण्याचा परवाना, पॅन कार्ड किंवा पासपोर्टची प्रत
- आडनावात बदल झाला असल्यास, कृपया तुमच्या विवाह प्रमाणपत्राची प्रत जमा करा
- संपूर्ण नावात बदल झाला असल्यास, आम्हाला याव्यतिरिक्त राजपत्र अधिसूचना आणि वृत्तपत्राच्या कात्रणाची आवश्यकता आहे.