Menu
close
एक्सपर्टला विचारा arrow

लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा

तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.

right-icon-placeholder
right-icon-placeholder
male male

पुरुष

male male

महिला

male male

इतर

टर्म इन्शुरन्स म्हणजे काय?

सोप्या शब्दांत सांगायचे तर, टर्म इन्शुरन्स हा एक प्रकारचा जीवन विमा आहे जो प्रामुख्याने पूर्व-निर्धारित कालावधीसाठी (सामान्यतः काही विशिष्ट वर्षांसाठी) आर्थिक कव्हर देतो. जर या पूर्व-निर्धारित कालावधीत तुमचे निधन झाले तर ऑनलाइन टर्म इन्शुरन्स प्लॅन, तुम्ही निवडलेल्या वारसाला ते आर्थिक कव्हर प्रदान करू शकतो. कव्हरची वैधता सुनिश्चित करण्यासाठी, तुम्हाला नियमितपणे काही पूर्व-निर्धारित रक्कम भरावी लागते. प्युअर टर्म प्लॅन पॉलिसीची मुदत संपेपर्यंत तुम्ही जीवित राहिल्यास, पॉलिसी कोणतेही आर्थिक कव्हर प्रदान करत नाही. सर्वायव्हल फायदे किंवा प्रीमियम मूल्य परत मिळविण्यासाठी तुम्ही निवडू शकता अशा कस्टमायझेशन आणि प्लॅन पर्याय यात उपलब्ध आहेत.

तुम्ही टर्म इन्शुरन्स का खरेदी करावा?

  • विशिष्ट कालावधीसाठी विमा संरक्षण देते.
  • पॉलिसीधारकाच्या मृत्युनंतर लाभार्थ्यांना मृत्यू लाभाची हमी देते.
  • अकाली मृत्यू झाल्यास तुमच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करते.
  • परवडणाऱ्या प्रीमियमवर व्यापक कव्हर प्रदान करते.
  • विशेषतः कोविड-19 साथीच्या काळात, हे आवश्यक असल्याचे सिद्ध होते.
  • खात्रीशीर रक्कम मिळण्यासाठी IRDAI द्वारे नियंत्रित आणि देखरेख केली जाते.
  • पॉलिसीधारकाच्या मृत्युनंतर वारसदाराला एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात.
  • ग्राहकांना त्यांच्या गरजांनुसार अतिरिक्त फायदे निवडण्याची परवानगी देते
  • अपंगत्व, गंभीर आजार किंवा अपघाती मृत्यू कव्हर समाविष्ट करण्याचा पर्याय मिळतो.
  • आर्थिक सुरक्षेसाठी नाममात्र किमतीच्या पर्यायांसह येते.
term-work-policy

इंडियाफर्स्ट टर्म इन्शुरन्स प्लॅन्स एक्सप्लोर करा

alt

उत्पादने

IndiaFirst Life Elite Term Plan

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ एलिट टर्म प्लान

Dropdown Field
टैक्स सेविंग
Product Description

एक अशा जगाची कल्पना करा जेथे तुमच्या कुटुंबाची सुरक्षा निश्चित आहे. इंडियाफर्स्ट लाईफ एलिट टर्म प्लानने, तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करा आणि तुमच्या कुटुंबाची आर्थिक स्थिरता निश्चित करा, मग आयुष्यात काहीही येऊ द्या.

Product Benefits
  • किफायतशीर किंमतीत उच्च कवर
  • वयाच्या 99 वर्षांपर्यंत आयुष्यभर संरक्षण
  • सोयीनुसार प्रिमियम भरण्याचे पर्याय
  • लागू कर कायद्यांनुसार कर लाभ
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

alt

उत्पादने

IndiaFirst Life Plan

Product Name

इंडियाफ़र्स्ट लाइफ़ प्लान

Dropdown Field
टैक्स सेविंग
Product Description

तुमच्या कुटुंबासाठी असा प्रोटेक्शन प्लान जो त्यांना स्वतंत्र होण्यास मदत करतो! इंडियाफर्स्ट लाइफ प्लान तुमच्या कुटुंबाला तुमच्या पश्चात तारु शकणारी आर्थिक सुविधा/कुशन देतो.

Product Benefits
  • कालावधी निवडण्याची सुविधा
  • कुटुंबाला पेआउट मिळेल
  • आश्वस्त रक्कम निवडण्याची सुविधा
  • दीर्घकाळ प्रोटेक्शन
  • कर लाभ
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

alt

उत्पादने

IndiaFirst Life Guaranteed Protection Plus Plan

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ गॅरेंटेड प्रोटेक्शन प्लस प्लान

Dropdown Field
टैक्स सेविंग
Product Description

प्रोटेक्शन प्लान हवा आहे का? आता पुढे कुठेही पाहू नका! तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सहज मार्गाने आर्थिक सुरक्षा देणे हा या प्लानचा उद्देश आहे.

Product Benefits
  • तुमचे पैसे परत मिळवण्याचा (आरओपी) विकल्प
  • एकाधिक जीवन विकल्प
  • सोईस्कर प्रीमियम अटी
  • तुमच्या जोडीदाराला याच पॉलिसीच्या अंतर्गत विमा उपलब्ध करुन द्या.
  • 99 वर्षांपर्यंत कव्हर
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

alt

उत्पादने

IndiaFirst Life Saral Bachat Bima Plan

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ सरल बचत बीमा प्लान

Dropdown Field
बचत
Product Description

तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी खात्रीशीर लाभ, लघु पेमेंट नियम, लाईफ कव्हर आणि अतिरिक्ततांसह विस्तृत बचत प्लान

Product Benefits
  • दीर्घकालीन प्रोटेक्शन
  • 5 किंवा 7 वर्षांची पेमेंटची अल्प कालावधीची वचनबध्दता
  • वार्षिक खात्रीशीर ॲडिशन्स
  • मृत्यूपश्चातचे सोईस्कर लाभ
  • अपघातात्मक मृत्यूच्या स्थितीत अतिरिक्त आश्वस्त रक्कम मिळवा.
  • तुमच्या अनुपस्थितीत देखील (डब्ल्यूओपी) पॉलिसी सक्रिय राहते.
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

और अधिक जानें

टर्म प्लॅन कुणी विकत घ्यावा?

जर तुम्ही तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या प्रियजनांचे संरक्षण करण्याचा विचार करत असाल, तर टर्म प्लॅन तुम्हाला त्यात मदत करू शकतो. मिळत असलेले संरक्षण, त्याची कमी किंमत आणि सोपी रचना यामुळे टर्म इन्शुरन्स प्लॅन विविध प्रकारच्या लोकांसाठी योग्य ठरतात.


टर्म इन्शुरन्स पॉलिसी कोणी घ्यावी याची काही उदाहरणे येथे आहेत.

तरुण नोकरदार

जेव्हा तुम्ही तुमचे करिअर सुरू करता तेव्हा तुमच्या प्रियजनांसाठी सुरक्षित उद्याची खात्री करण्याऐवजी तुमचे भविष्य सुरक्षित करणे हे प्राधान्य असते. तथापि, जर तुमची नजीकच्या काळात कुटुंब वाढवण्याची किंवा तुमच्या पालकांना आधार देण्याची योजना असेल, तर तुम्ही शक्य तितक्या लवकर टर्म इन्शुरन्सद्वारे जीवन विमा खरेदी करण्याचा विचार करू शकता. याला प्रोत्साहन दिले जाते कारण प्रीमियम दरांवर वयाचा परिणाम होऊ शकतो.

secure-future

पालक

 पालकांसाठी बहुतेकदा लहान मुलाच्या भविष्याची काळजी घेणे हे प्राधान्य असते. टर्म इन्शुरन्स तुमच्या चिंता काही प्रमाणात कमी करण्यास मदत करू शकतो. तुमच्या कुटुंबासाठी टर्म इन्शुरन्सची सुरक्षा मिळवल्याने तुम्ही स्थिर भविष्याचा पाया रचू शकता.

low-premium

स्वतंत्र व्यावसायीक

स्वतंत्र व्यावसायीकांसाठी साठी त्यांच्या व्यवसायाचा आकार आणि अवलंबितांची संख्या काहीही असली तरी, टर्म इन्शुरन्स महत्त्वाचा आहे. स्वतःचा व्यवसाय चालवताना, आर्थिक स्थिरता अत्यंत महत्त्वाची असते. टर्म इन्शुरन्स भविष्यासाठी ही स्थिरता प्रदान करतो.

protect-asset

महिला

महिलांसाठी टर्म इन्शुरन्स हा कुटुंबातील पुरुषांसाठीच्या टर्म इन्शुरन्सइतकाच महत्त्वाचा आहे. विशेषतः जेव्हा महिला त्यांच्या मुलांची किंवा त्यांच्या पालकांची आर्थिक गरज पूर्ण करत असतात तेव्हा हे महत्त्वाचे असते. जेव्हा तुम्ही त्यांच्या प्रियजनांच्या जीवनातील त्यांच्या भूमिकेचा विचार करता, तेंव्हा गृहिणींसाठी टर्म इन्शुरन्स हा तितकाच महत्त्वाचा बनतो. जर तुम्ही अशी महिला आहात जिच्या अनुपस्थितीत तुमच्या मुलांना किंवा पालकांना संरक्षण देऊ इच्छिता, तर टर्म इन्शुरन्स हा एक किफायतशीर पर्याय आहे, ज्याचा विचार केला पाहिजे.

protect-lifestyle

ज्येष्ठ नागरिक

साधारणपणे, बहुतेक ज्येष्ठ नागरिक त्यांच्या कुटुंबातील अवलंबून असलेल्या सदस्यांची काळजी घेण्याची जबाबदारी तरुण पिढीकडे सोपवतात. परंतु, वृद्धांना त्यांच्या निधनानंतर प्रियजनांची काळजी घेण्याची इच्छा असणे असामान्य नाही. जर अनेक वृद्ध प्रौढ अजूनही त्यांच्या जोडीदार किंवा नातवंडांसारख्या अवलंबून असलेल्यांची काळजी घेत असतील तर त्यांनाही टर्म इन्शुरन्सचा फायदा होईल.

life-certainties

कर्जदार

जर तुम्ही कोणत्याही प्रकारचे कर्ज किंवा उधारी फेडत असाल तर टर्म इन्शुरन्सचा विचार केला पाहिजे. कर्ज पूर्णपणे फेडण्यापूर्वीच तुमचे दुर्दैवाने निधन झाल्यास, परतफेडीचा भार तुमच्या कुटुंबावर येऊ शकतो आणि त्यांना आर्थिक अडचणीत आणू शकतो.

cover-covid-claim

टर्म प्लॅन चे कार्य कसे चालते?

तुम्ही संभाव्य पॉलिसीधारक असाल, टर्म इन्शुरन्स पॉलिसीचे मालक असाल, वारस असाल किंवा कधीही विम्याशी संबंध आला नसेल अशी व्यक्ती असाल, टर्म इन्शुरन्स पॉलिसी कशी कार्य करते हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना सुरक्षित भविष्याचे नियोजन करण्यासाठी योग्य आर्थिक निर्णय घेता येतील.

टर्म इन्शुरन्स प्लॅनच्या कार्यपद्धतीबद्दल तुम्हाला काय माहित असणे आवश्यक आहे ते येथे आहे.

  • टर्म प्लॅन विविध प्रकारचे असू शकतात. सर्वात सोप्या प्लॅनला, सामान्यतः लेव्हल टर्म इन्शुरन्स प्लॅन म्हणतात. तो फक्त डेथ बेनिफिट देतो. जर तुम्हाला अशा पॉलिसीमधून अधिक गरज असेल, तर तुमच्याकडे रायडर्स जोडण्याचा पर्याय असू शकतो.

  • तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन पॉलिसी खरेदी करू शकता. ऑनलाइन टर्म इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. जर तुम्ही सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केली तर ती काही टप्प्यांमध्ये पूर्ण केली जाऊ शकते.

  • टर्म इन्शुरन्स प्लॅन (term insurance plan), खरेदी करताना, तुमची वैयक्तिक माहिती, निवडलेली योजना आणि तुम्ही शोधत असलेल्या विमा रकमेवर आधारित प्रीमियमचा अंदाज मिळविण्यासाठी टर्म इन्शुरन्स प्लॅन प्रीमियम कॅल्क्युलेटर वापरणे उचित आहे.

  • मंजुरी मिळाल्यानंतर, तुम्ही त्यासाठी प्रीमियम भरू शकता. उपलब्ध पर्यायांवर आधारित तुम्ही प्रीमियम पेमेंट वारंवारता निवडू शकता.

  • टर्म इन्शुरन्स प्लॅन खरेदी केल्याने जीवन कव्हर मिळते. म्हणून, जर पॉलिसी चालू असताना तुमचा मृत्यू झाला, तर योजनेसाठी वारस व्यक्ती मृत्यु लाभाचा दावा करू शकते.

अशाप्रकारे, टर्म इन्शुरन्स प्लॅन घेतल्याने तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या प्रियजनांचे संरक्षण होण्यास मदत होऊ शकते.

 

टर्म इन्शुरन्स प्लॅनची वैशिष्ट्ये

5 वर्षांसाठी किंवा40  वर्षांसाठी निवडलेले, टर्म इन्शुरन्स प्लॅन, तुम्ही तुमच्या स्वप्नांना गावसण्यासाठी उंच भरारी घेत असताना तुमच्या प्रियजनांचे संरक्षण करण्यास मदत करू शकतात. टर्म इन्शुरन्स प्लॅनची ​​प्रमुख वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत, जी त्यांना एक महत्त्वाची आर्थिक मालमत्ता बनवतात.
  • कॉस्ट इफेक्टिव्ह रचना

टर्म लाइफ पॉलिसी ही विविध प्रकारच्या संभाव्य खरेदीदारांसाठी योग्य आणि उपलब्ध मानली जाते. याचे एक कारण म्हणजे ती किती किफायतशीर असू शकते. टर्म लाइफ इन्शुरन्स पॉलिसी तुलनेने कमी प्रीमियमवर उच्च विमा रक्कम देतात असे माहिती आहे. तुम्ही अल्पकालीन कव्हर शोधत असाल किंवा दीर्घकालीन, त्यामुळे पॉलिसी परवडणारी बनते.

  • सोयीस्कर कव्हरेज कालावधी

टर्म लाइफ इन्शुरन्स प्लॅनमध्ये, पॉलिसीधारक उपलब्ध पर्यायांमधून कव्हर कालावधी निवडू शकतो. सहसा, तुम्ही किमान ५ वर्षांपासून ते कमाल ४० वर्षांपर्यंतचा कव्हर कालावधी निवडू शकता. तो विमाधारकाच्या वयानुसार असतो. टर्म प्लॅनसाठी किमान प्रवेश वय 18 वर्षे आहे, तर कमाल 65 वर्षे आहे.

  • प्रीमियम भरण्याचे पर्याय

तुम्हाला काय सोयीस्कर वाटते त्यानुसार, तुम्ही उपलब्ध असलेल्या प्रीमियम पेमेंट पर्यायांमधून निवड करू शकता. सामान्यपणे, पॉलिसीधारक त्यांच्या टर्म लाइफ इन्शुरन्स पॉलिसीचे प्रीमियम मासिक, तिमाही किंवा वार्षिक भरण्याचा पर्याय निवडू शकतो. तुमच्याकडे मर्यादित प्रीमियम पेमेंट टर्मचा पर्याय देखील असू शकतो, याचा अर्थ तुम्हाला संपूर्ण कव्हरेज कालावधीसाठी प्रीमियम भरावे लागणार नाहीत.

  • रायडरचे पर्याय

तुमच्या टर्म प्लॅनद्वारे ऑफर केलेल्या कव्हरची व्याप्ती वाढवण्यासाठी, तुम्ही त्यात रायडर्स जोडू शकता. तुम्ही गंभीर आजार, अपघाती कायमचे अपंगत्व लाभ, अपघाती मृत्यू लाभ आणि अशा इतर रायडर्सची निवड करू शकता. ही अतिरिक्त वैशिष्ट्ये आहेत जी अतिरिक्त किमतीत खरेदी करता येतात.

  • कर लाभ

तुमच्या टर्म इन्शुरन्स प्रीमियम्स तसेच मिळालेल्या फायद्यांवर तुम्हाला कर सवलत मिळू शकते. आयकर कायद्याच्या कलम 80C* अंतर्गत, टर्म इन्शुरन्स प्लॅनमध्ये भरलेल्या प्रीमियम्ससाठी दावा केला जाऊ शकतो. वारसदाराला मिळालेल्या मृत्यू लाभासाठी, कलम 80D अंतर्गत सूट मागता येते. हे दावे चालू कर नियमांच्या अधीन आहेत आणि जुन्या पद्धतीचा पर्याय निवडणाऱ्या करदात्यांना उपलब्ध आहेत.

  • खरेदीची सुलभता

तुम्ही तुमच्या पसंतीचा टर्म प्लॅन ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदी करू शकता. तो ऑनलाइन खरेदी करण्यासाठी, तुम्ही आमच्या वेबसाइटला भेट देऊ शकता आणि खरेदी प्रक्रिया पूर्ण करू शकता. तुम्हाला फक्त सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील आणि पैसे भरावे लागतील. ऑफलाइन खरेदीसाठी, तुम्ही प्रक्रियेत मार्गदर्शन करण्यासाठी विमा एजंट किंवा विमा प्रदात्याचा सल्ला घेऊ शकता.

टर्म इन्शुरन्सचे फायदे

या योजनांचा साधेपणा पाहता, टर्म इन्शुरन्सचे फायदे सर्वांना कळणार नाही. निवडलेल्या योजनेवर आणि निवडलेल्या कस्टमायझेशनवर अवलंबून, तुम्हाला खालील फायदे देणाऱ्या सोप्या योजना सापडतील.

  • लाईफ कव्हर

टर्म लाइफ इन्शुरन्स प्लॅनद्वारे दिले जाणारे प्राथमिक लाभ म्हणजे जीवन कव्हर, जे योजनेच्या लाभार्थ्यासाठी आर्थिक स्थिरतेचा स्रोत म्हणून काम करतात. हे पॉलिसीधारकाने योजनेत भरलेल्या प्रीमियमवर दिले जाते. पॉलिसी कालावधी दरम्यान विमाधारकाचे निधन झाल्यास, त्यांचे वारस व्यक्ती दावा करू शकतात आणि विमा रक्कम मिळवू शकतात.

  • रास्त प्रीमियम्स

परवडणारी क्षमता सापेक्ष असली तरी, टर्म इन्शुरन्स प्लॅन हा बाजारात उपलब्ध असलेल्या कमी किमतीच्या जीवन विमा पर्यायांपैकी एक आहे. म्हणून, तुम्ही तुमच्या करिअरच्या सुरुवातीला असाल किंवा निवृत्तीच्या जवळ असाल, तुमच्या बजेटमध्ये बसणारी एक योजना तुम्हाला मिळू शकते.

  • मॅच्युरिटी फायदे

जरी हे सर्व प्रकारच्या टर्म इन्शुरन्सना लागू नसले तरी, जर तुम्ही  प्रीमियम रिटर्न  पर्यायासह टर्म प्लॅन निवडलात,  तर तुम्ही मॅच्युरिटी बेनिफिट्सचा पर्याय निवडू शकता. याची किंमत थोडी जास्त असू शकते परंतु ज्यांना ते हवे आहेत त्यांना ते मॅच्युरिटी बेनिफिट्स देतात.

  • कर-बचतीची संभावना

जर तुम्ही जुन्या करप्रणालीतील करदाते असाल, तर तुम्ही तुमच्या टर्म इन्शुरन्समध्ये भरलेल्या प्रीमियमसाठी कलम 80C अंतर्गत सवलत मागू शकता. त्याचप्रमाणे, जर तुम्ही टर्म प्लॅन लाभ घेणारे वारस असाल, तर कलम 80D अंतर्गत सवलत  मागितल्यास ते करमुक्त असू शकते. हा लाभ कसा मिळवायचा हे जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या कर सल्लागाराचा सल्ला घेऊ शकता.

  • ॲड-ऑन फायदे

योग्य रायडर पर्यायांसह, तुम्ही तुमच्या गरजांनुसार टर्म प्लॅन तयार करू शकता आणि ज्या परिस्थितींत तुम्हाला गरज असणार आहे त्यासाठी कव्हर देऊ शकता. उदाहरणार्थ, गंभीर आजाराच्या टर्म इन्शुरन्स ॲड-ऑन सह, तुम्हाला खात्री असेल की निदान झाल्यानंतर तुमचे काही खर्च दाव्याच्या रकमेमधून भागवले जातील.

टर्म इन्शुरन्स प्लॅनचे प्रकार

तुमच्या गरजांसाठी योग्य पॉलिसी निवडण्यासाठी उपलब्ध असलेल्या टर्म इन्शुरन्स प्लॅनचे प्रकार जाणून घ्या.

लेव्हल टर्म इन्शुरन्स

जर तुम्ही कमी प्रीमियम खर्चासह नो-फ्रिल्स जीवन विमा पर्याय शोधत असाल, तर तुम्ही लेव्हल टर्म इन्शुरन्स प्लॅन शोधत आहात. या प्लॅनमध्ये फक्त मृत्यू लाभ दिले जातात.

secure-future

रिटर्न ऑफ प्रीमियमसह टर्म इन्शुरन्स प्लॅन

जर तुम्ही लेव्हल टर्म प्लॅनच्या सोप्या डिझाइनवर समाधानी असाल परंतु तुम्हाला खर्च न वाढवता काही प्रकारचे मॅच्युरिटी बेनिफिट हवे असतील, तर हा प्लॅन योग्य पर्याय ठरू शकतो. मॅच्युरिटीनंतर, तुम्हाला तुमचे प्रीमियम परत मिळेल.

low-premium

ॲड-ऑन फायद्यांसह टर्म इन्शुरन्स

तुमच्या गरजांनुसार तुमच्या टर्म इन्शुरन्स प्लॅनमध्ये रायडर्स ही आणखी एक भर आहे. प्रीमियममध्ये सवलत आणि टर्म रायडर सारख्या रायडर्ससह, तुम्ही जास्त संधीसह टर्म इन्शुरन्स प्लॅन निवडू शकता.

protect-asset

इंडियाफर्स्ट लाईफ का निवडावा?

 

 

तुमच्या कुटुंबाची आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे आणि इंडियाफर्स्ट टर्म लाइफ इन्शुरन्स प्लॅन्स हे प्राधान्य लक्षात घेऊन तयार केले आहेत. आमच्या टर्म इन्शुरन्स प्लॅन्सची निवड हा योग्य पर्याय का आहे ते येथे आहे:

category-benefit

 1.6  कोटी ग्राहकांचा त्यांच्या जीवन विमा पॉलिसीवर  life insurance policy

बँक ऑफ बडोदा द्वारे प्रमोट केलेले

98.04% इतके उच्च दावा सेटलमेंटचे प्रमाण

सोपा ऑनलाइन आणि ऑफलाइन अनुभव

100% खरे दावे 1 दिवसात सेटल केले जातात.

टर्म इन्श्युरन्स पात्रता निकषांना समजून घेणे

आमच्या टर्म इन्श्युरन्स निकषांचा तुमच्या कुटुंबाच्या भवितव्याच्या रक्षणासाठी शोध घ्या. या विभागात महत्वपूर्ण बाबी टर्म इश्युरन्स वयोमर्यादा आणि टर्म प्लान वयोमर्यादांचा आंतर्भाव करत कव्हर केल्या आहेत.

वयाची आवश्यकता (टर्म प्लान वयोमर्यादा):

  • निवेदनाचे किमान वय: 18 वर्षे

  • निवेदनाचे कमाल वय: 6- वर्षे

  • प्लानच्या समाप्तीचे कमाल वय: 99  वर्षे

secure-future

आश्वस्त रक्कम मर्यादा:

  • किमान आश्वस्त रक्कम: ₹1,00,000

  • कमाल आश्वस्त रक्कम: ₹ 5,00,00,000

low-premium

पॉलिसी टर्म पर्याय:

  • पॉलिसीची मुदत सामान्यतः ५ ते ८१ वर्षांपर्यंत असते, जी वैयक्तिक गरजांशी जुळते.
protect-asset

भारतातील सर्वोत्तम टर्म इन्शुरन्स प्लॅन कसा खरेदी करावा?

टर्म इन्शुरन्स प्लॅन म्हणजे दीर्घकालीन कमिटमेंट असते. तुम्ही केलेली खरेदी तुमच्यासाठी सर्वात योग्य आहे याची खात्री करण्यासाठी, सर्वोत्तम टर्म प्लॅन खरेदी करताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवाव्या ते येथे दिले आहे.

  • सर्वोत्तम टर्म इन्शुरन्स प्लॅन हा सर्वांसाठी एकसारखा असू शकत नाही. तुमचे बजेट विचारात घ्या आणि तुमच्यासाठी योग्य टर्म प्लॅन शोधा. उदाहरणार्थ, तुम्ही 50 लाख रुपयांचा टर्म इन्शुरन्स 50 lakh term insurance पॉलिसी निवडू शकता, परंतु जर प्रीमियम मुळे तुमच्या बजेटवर ताण येऊ शकेल असे वाटल्यास, तर कव्हर रकमेचे पुनर्मूल्यांकन करा.

  • तुमच्या बजेटव्यतिरिक्त, त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या कव्हरची योग्यता देखील विचारात घेतली पाहिजे. उदाहरणार्थ, तुम्ही 1 कोटी टर्म इन्शुरन्स प्लॅन  1 Crore term insurance  निवडू शकता, परंतु तुमच्यासाठी ती आवश्यक असेलच असे नाही. परिस्थितीच्या गरजेपेक्षा जास्त भरपाई देणाऱ्या फायद्यासाठी पैसे भरणे अर्थपूर्ण नाही. तुमच्या जबाबदाऱ्यांचा आढावा घ्या आणि त्यानुसार योग्य सम अशुअर्ड निवडा.

  • विश्वासार्ह विमा कंपनी निवडा. टर्म इन्शुरन्स खरेदी करताना, तुम्ही ज्या विमा कंपनीकडे जाण्याचा विचार करत आहात त्याची विश्वासार्हता तपासा. कंपनीची प्रतिष्ठा, क्लेम सेटलमेंट गुणोत्तर  claim settlement ratio, ग्राहक समर्थन, क्लेम सेटलमेंटचे प्रमाण आणि इतर तत्सम घटक विचारात घ्या, ज्याची तुम्हाला निवड करण्यात मदत होईल.

  • खरेदी करण्यापूर्वी, सर्व वेगवेगळ्या प्लॅन पर्यायांमधून ब्राउझ करा. अंदाज मिळविण्यासाठी तुम्ही टर्म इन्शुरन्स कॅल्क्युलेटर देखील वापरू शकता.

याव्यतिरिक्त, तुमच्या वारसाला पॉलिसीच्या तपशीलांची आणि दाव्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया माहिती असल्याची खात्री करणे महत्वाचे आहे.

तुम्हाला किती टर्म इन्शुरन्स कव्हरेजची गरज आहे?

तुमच्या कुटुंबावर पडलेल्या कोणत्याही आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी तुमच्या मुदत विम्याची रक्कम पुरेशी असावी.

आदर्श विमा रक्कम मिळविण्यासाठी सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या पद्धतींपैकी एक म्हणजे मानवी जीवन मूल्याचा (human life value). अंदाज घेणे. हे मानवी जीवन मूल्य, कॅल्क्युलेटर वापरून किंवा तुमच्या दायित्वांची गणना करून आणि तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या दहापट मूल्याचा विचार करून काढता येते.

तरीही, उदाहरणार्थ, जर तुमच्या परिस्थितीमुळे तुम्हाला असे वाटले की 1.5  कोटीचा टर्म इन्शुरन्स खरेदी करणे तुमच्यासाठी 1  कोटीच्या विमा रकमेपेक्षा योग्य आहे, तर तुम्ही त्यानुसार तो पर्याय निवडू शकता.

लक्षात ठेवा की तुम्ही निवडलेली विमा रक्कम विमा कंपनीच्या अंडररायटिंग टीमच्या मंजुरीच्या अधीन आहे.

टर्म इन्शुरन्स रायडर म्हणजे काय? याचे महत्व काय?

टर्म इन्शुरन्स रायडर  term insurance rider ही एक अतिरिक्त सुविधा आहे जी तुमच्या कोर टर्म इन्शुरन्स पॉलिसीमध्ये जोडता येते. त्यासाठी तुमच्या बेस प्रीमियममध्ये अतिरिक्त किंमत वाढवली जाते.

तुम्हाला टर्म इन्शुरन्स रायडर्सची आवश्यकता का आहे? टर्म प्लॅन्सची रचना सोपी असते. जर तुम्हाला खर्च कमी ठेवत वैशिष्ट्यांची यादी वाढवण्याचा प्रयत्न करत असाल तर रायडर्स हा एक पर्याय असू शकतो.

उदाहरणार्थ, टर्म रायडर हा एक ॲड-ऑन आहे ज्यामुळे तुम्हाला तुमच्या पॉलिसीचा कव्हर कालावधी वाढवता येतो. तसेच, वेव्हर ऑफ प्रीमियम रायडरमुळे लाभाचा दावा केला गेल्यास तुम्हाला प्रीमियम पेमेंट थांबवण्यात मदत होऊ शकते.

तुमच्या गरजा आणि बजेटनुसार तुम्ही पॉलिसीमध्ये अनेक रायडर्सपैकी एक जोडू शकता. यामुळे तुम्हाला वेगळा प्लॅन खरेदी करण्याची गरज देखील कमी होऊ शकते.

इंडियाफर्स्ट लाईफ टर्म इन्शुरन्स विकत घेण्याचे टप्पे?

 
  • टप्पा 1 - कव्हरेजची गरज ठरव

    तुमच्या बदलत्या जीवनशैली आणि कुटुंबाच्या गरजांनुसार योग्य कव्हर  शोधण्यासाठी आमच्या टर्म इन्शुरन्स कॅल्क्युलेटरचा term insurance calculator वापर करा.

  • टप्पा 2 - आयुष्याचा टप्पा विचारात घ्या
    तुमच्या आयुष्यातील टप्पा, कुटुंबातील अवलंबून असणाऱ्या व्यक्ती, उत्पन्न आणि सवयींनुसार तुमचा प्लॅन तयार करा.
  • टप्पा 3 - टर्म प्लॅनचे फायदे समजून घ्या

    पॉलिसी वैशिष्ट्यांचा आढावा घ्या आणि व्यापक कव्हरेजसाठी रायडर पर्यायांचा तपास घ्या.

  • टप्पा 4 - कोट मिळवा

    सम अशुअर्ड आणि कव्हरेज वर्षे निवडून त्वरित टर्म इन्शुरन्स प्रीमियम कोट मिळवा. 

  • टप्पा 5 - कव्हर चालू करण्यासाठी प्रीमियम भरा

    तुमचा प्लॅन नक्की करा, पूर्ण तपशील भरा, ऑनलाइन पैसे भरा आणि त्वरित ॲक्टिव्हेशनसाठी कागदपत्रे सबमिट करा.

टर्म इन्शुरन्ससाठी आवश्यक कागदपत्रे

खरेदी सुलभ करण्यासाठी, टर्म इन्शुरन्स प्लॅन खरेदी करताना खालील कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक आहे.

ओळखीचा पुरावा

  • पॅन कार्ड

  • आधार कार्ड

  • मतदार ओळखपत्र     

  • पासपोर्ट

choose-plan

पत्त्याचा पुरावा

  • गेल्या तीन महिन्यांतील टेलिफोन, वीज किंवा गॅस बिल

  • मालमत्ता कराची पावती

premium-amount

उत्पन्नाचा पुरावा

पगारदार व्यक्तींसाठी:

  • अलीकडचा फॉर्म 16

  • पगाराचे बँक स्टेटमेंट

     

स्वतंत्र व्यावसायिकांसाठी:

  • फॉर्म 26AS

  • सीए द्वारे व्हेरिफाय केलेले नफा-तोटा दस्तऐवज आणि बॅलन्स शीट

select-stategy

तुमचा वैद्यकीय इतिहास आणि वय यानुसार, तुम्हाला वैद्यकीय अहवाल सादर करावा लागू शकतो किंवा वैद्यकीय चाचणी करावी लागू शकते.

make-payments

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

View All FAQ’s 

सर्वात जास्त शोधले गेलेले शब्द

Disclaimer


T&C*

 

*First year monthly premium for 1 Cr sum assured bought online for 20-year-old healthy male for cover up to age 75 would be 1608 (20.27 per day). Regular monthly premium from year 2 for the same parameters would be 1676 (22.53 per day).

1800 209 8700

ग्राहक सेवा क्रमांक

whatsapp

8828840199

ऑनलाइन पॉलिसी खरेदीसाठी

call

+91 22 6274 9898

आमच्यासोबत व्हॉट्सॲपवर चॅट करा

mail

You’re eligible for a Discount!!

Get 10% off on online purchase of IndiaFirst Life Elite Term Plan