पॉलिसी चालू असताना किंवा पहिल्या न भरलेल्या प्रीमियमच्या देय तारखेपासून ते ग्रेस पिरियडच्या मुदत समाप्तीपर्यंत विमाधारकाच्या निधनाच्या अकाली घटनेत, नामनिर्देशित/ नियुक्त व्यक्ती/ कायदेशीर वारसाला, प्रसंगानुसार, पॉलिसीच्या अंतर्गत मृत्यूच्या तारखेनुसार उच्च फंड मूल्य किंवा सम अशुअर्ड ही मृत्यू लाभ म्हणून मिळेल (जसे सेक्शन 3 मध्ये स्पष्ट केलेले आहे). लाईफ पर्याय आणि एक्स्ट्रा शिल्ड पर्यायासाठी मृत्यू लाभ सेक्शन 3 मध्ये स्पष्ट केल्यानुसार आणि फॅमिली केयर पर्यायासाठी सेक्शन 3 मध्ये स्पष्ट केल्यानुसार मृत्यूच्या वेळी देय असलेली एकरकमी रक्कम दिली जाईल जी एकतर
- एकरकमी लाभ म्हणून; किंवा
- 5 वर्षांच्या कालावधीसाठी मासिक हप्ता म्हणून दिली जाईल, जसे पॉलिसीधारक/नामनिर्देशित व्यक्तीद्वारे पॉलिसी कालावधीच्या दरम्यान/ विमाधारकाच्या मृत्यूच्या वेळी निवडले असेल. मृत्यू लाभ हप्ता स्वरुपात मिळण्याच्या बाबतीत, लाभाच्या हप्त्याची रक्कम, एकरकमी रकमेला (समजा S) ॲन्युईटी फॅक्टर ने भाग देऊन मोजले जाईल (म्हणजेच a(n) (12))i.e. S/a(n)(12) जेथे n म्हणजे 5 वर्षांचा हप्त्याचा कालावधी). आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला एसबीआय बचत बँकेच्या व्याजदराचा ॲन्युईटी फॅक्टर मोजण्यासाठी वापर केला जाईल. आर्थिक वर्ष 21-22 साठी सध्याचा चालू एसबीआय बचत बँक व्याज-दर 2.70% प्रति वर्ष आहे. एकदा हप्ता भरणे सुरु झाल्यावर, ही रक्कम संपूर्ण हप्त्याच्या कालावधी दरम्यान समान राहील. ॲन्युईटी फॅक्टर मोजण्यासाठी वापरला जाणारा व्याजदर प्रत्येक आर्थिक वर्षात तपासाला जातो आणि एसबीआय बचत बँकेच्या व्याजदरात बदल झाल्यास बदलला जाईल.
- वरील बाब सर्व प्लॅन पर्यायांसाठी लागू आहे.
हा पर्याय निवडल्यास, नामनिर्देशित व्यक्ती/ नियुक्त व्यक्ती/ कायदेशीर वारस, जे असेल ते, सेटलमेंट कालावधीच्या दरम्यान कोणत्याही क्षणी उर्वरित मृत्यू लाभ काढून घेण्याची मागणी करू शकतात. या कालावधीच्या दरम्यान पार्शल विथड्रॉवल/आंशिक स्वरुपात फंड्स काढण्याची परवानगी दिली जाणार नाही.
नामनिर्देशित व्यक्ती अल्पवयीन असल्यास रक्कम नियुक्त व्यक्तीला दिली जाईल. मात्र, कोणत्याही क्षणी, मृत्यू लाभ पॉलिसीच्या मुदतीमध्ये भरलेल्या एकूण प्रीमियमच्या 105% पेक्षा कमी असणार नाही.
जेव्हा पॉलिसी मुदतीच्या दरम्यान दुर्घटनेमुळे मृत्यू झाल्यास आणि पॉलिसी मुदत संपल्यानंतर अपघाती मृत्यू झाल्यास परंतु अपघाताच्या तारखेपासून 180 दिवसांच्या आत, तर अपघाती मृत्यू लाभ देय असेल, म्हणजेच पॉलिसी मुदतीच्या शेवटच्या दिवशीही अपघात झाल्यास, जोखिम कव्हरच्या समाप्तीचा विचार न करता 180 दिवसांसाठी कव्हर दिले जाईल.
रिड्युस्ड पेड-अप पॉलिसींमध्ये, विमाधारकाचा मृत्यू झाल्यास,रिड्युस्ड पेड-अप विमा रक्कम किंवा मृत्यूची सूचना मिळाल्याच्या तारखेनुसार फंड मूल्य यापैकी जी जास्त असेल तेवढी रक्कम, पॉलिसीच्या सुरुवातीला पॉलिसीधारकाद्वारे निवडलेल्या देय पर्यायानुसार नामनिर्देशित व्यक्ती/ नियुक्त व्यक्ती/ कायदेशीर वारसाला दिली जाई आणि पॉलिसी समाप्त होईल.
पेड-अप विमा रक्कम म्हणजे सम अशुअर्ड * (भरलेल्या प्रीमियम्सची एकूण संख्या)/ पॉलिसी मुदतीच्या दरम्यान देय प्रीमियम्सची एकूण संख्या).
पार्शल विथड्रॉवल / पद्धतशीर पार्शल विथड्रॉवलचा मृत्यू लाभावर काय परिणाम होतो?
विमाधारकाचे अकाली निधन झाल्यास, नामनिर्देशित व्यक्ती/ नियुक्त व्यक्ती/ कायदेशीर वारसाला मृत्यू लाभ प्राप्त होईल, ज्यामध्ये विमाधारकाच्या मृत्यूच्या तारखेच्या आधीच्या 2 वर्षांच्या कालावधीत, फंड मूल्यातून केलेल्या पार्शल विथड्रॉवल /पद्धतशीर पार्शल विथड्रॉवलच्या एवढी सम अशुअर्ड कमी केली जाईल.
पॉलिसीने रिड्युस्ड पेड-अप स्थिती प्राप्त केल्यास मृत्यू लाभ काय आहे?
विमा रक्कम/पेड अप विमा रक्कम, विमाधारकाच्या मृत्यूची सूचना मिळाल्याच्या किंवा फंड मूल्यानुसार मृत्यूच्या तारखेच्या आधीच्या 2 वर्षांच्या कालावधीत केलेल्या पार्शल /पद्धतशीर पार्शल विथड्रॉवलच्या रकमेच्या एवढी कमी केली जाईल.
पॉलिसी रिड्यूस्ड पेड-अप स्थितीमध्ये असताना, पेड-अप विमा रक्कम किंवा फंड मूल्य (मृत्यूची सूचना मिळाल्याच्या तारखेनुसार) इतकी एकरकमी रक्कम नामनिर्देशित व्यक्ती/ नियुक्त व्यक्ती/ कायदेशीर वारसाला प्राप्त होईल.
फॅमिली केयर पर्याय: रिड्युस्ड पेड-अप पॉलिसीमध्ये विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, जेथे पॉलिसीधारकाने प्रीमियम भरणे बंद केले आहे, रिड्युस्ड पेड-अप विमा रक्कम किंवा फंड मूल्य पैकी जी जास्त असेल ती देय असेल आणि पॉलिसी समाप्त होईल.
रिड्यूस्ड पेड-अप पॉलिसीसाठी मॉर्टेलिटी शुल्क, कोणतेही असल्यास, पेड-अप विमा रकमेच्या आधारे मोजले जाईल. मृत्यूच्या तारखेनंतर वसूल करण्यात आलेले एफएमसी व्यतिरिक्त इतर सर्व शुल्क मृत्यूची सूचना दिल्याच्या तारखेला उपलब्ध असलेल्या फंड मूल्यामध्ये परत जोडले जातील.