खालीलपैकी कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला नामनिर्देशित व्यक्तीचे तपशील अद्यावत करायचे किंवा बदलायचे असू शकतात:
- नामनिर्देशित व्यक्तीच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल
- नामनिर्देशित व्यक्तीच्या नातेसंबंधातील बदल (प्रस्ताव फॉर्म भरताना झालेल्या चुकीमुळे)
- नामनिर्देशित व्यक्तीच्या जन्मतारखेतील बदल (प्रस्ताव फॉर्म भरताना झालेल्या चुकीमुळे)
- नामनिर्देशित व्यक्ती बदलणे
तर तुम्हाला काय करायचे आहे?
1. खाली दिलेल्या तपशीलांचा उल्लेख करुन पॉलिसीधारकाने रीतसर सही केलेला नामनिर्देशन बदल फॉर्म जमा करा:
- नामनिर्देशित व्यक्तीचे नाव
- पत्ता
- जन्मतारीख
- पॉलिसीधारकसोबत नातेसंबंध
2. नामनिर्देशित व्यक्ती अल्पवयीन असल्यास, नियुक्त व्यक्तीचे तपशील अनिवार्य आहेत. नियुक्त व्यक्तीचे नाव, जन्मतारीख, पत्ता सुद्धा आवश्यक असेल.
तुम्ही बदलांसाठी कशाप्रकारे अर्ज करू शकता?
आम्हाला ईमेल करा:
- तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवरून customer.first@indiafirstlife.com वर आम्हाला ईमेल करा.
- रीतसर सही केलेल्या नामनिर्देशन बदल फॉर्मची प्रत सोबत जोडा.
आम्हाला भेट द्या:
आमच्या बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया किंवा इंडियाफर्स्ट लाईफ इंश्युरन्स च्या कोणत्याही शाखेत जा आणि नामनिर्देशन बदलण्याची विनंती करा.
टपाल/ कुरियर:
खाली दिलेल्या पत्त्यावर आम्हाला पॉलिसीधारकाने रीतसर सही केलेला नामनिर्देशन बदल फॉर्म पाठवा:
इंडियाफर्स्ट लाईफ इंश्युरन्स कंपनी लिमिटेड
१२वा आणि १३वा मजला,
उत्तर [क] विंग, टॉवर ४, नेस्को आयटी पार्क, नेस्को सेंटर,
पश्चिम द्रुतगती महामार्ग,
गोरेगाव (पूर्व), मुंबई – ४०००६३.