5 करोड टर्म इन्शुरन्स प्लॅन काय आहे?
₹5 करोड टर्म इन्शुरन्स प्लॅन आर्थिक मदतीचा पर्याय आहे, जो समजायला अगदी सोपा आहे. ही ₹5 करोडची विमा रक्कम देणारी, एक टर्म इन्शुरन्स पॉलिसी आहे. तुमच्या कुटुंबाला भविष्यात योग्य संरक्षण पुरवण्याची व्यवस्था करून,तुम्हाला आजच मनःशांती मिळवून देते.
₹5 करोड टर्म इन्शुरन्स का खरेदी करावा?
ग्राहकांनी ₹5 करोड टर्म लाईफ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्याची अनेक कारणे आहेत:
ते उच्च-उत्पन्न गटातील कुटुंबाचे पालनकर्तेआहेत, ज्यांची जीवनशैलीही त्याप्रमाणे असते.
त्यांच्यावर गृह कर्जासारखी जबाबदारी आहे, जी त्यांच्या अकाली मृत्यूप्रसंगी कुटुंबियांवर ओझे बनू शकते.
त्यांच्यावर विशिष्ट गरजा असलेले कुटुंबातील सदस्य अवलंबून आहेत, जसे कि परदेशातील उच्च शिक्षणाचे स्वप्न बघणारे मूल किंवा वैद्यकीय गरजा असलेले आई-वडील.
यापैकी कोणत्याही बाबींच्या संयोजनाने सुद्धा ते ₹करोड टर्म इन्शुरन्स पॉलिसी निवडू शकतात.
उच्च विमा रकमेचा टर्म प्लॅन खरेदी करणे यासारखे महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेताना तुमच्या आर्थिक गरजा आणि बजेटशी संबंधित बाधांचा विचार करा.
₹5 करोड टर्म इन्शुरन्स निवडण्याचे फायदे?
चला आता काही फायदे पाहू ज्यांची तुम्ही एक ₹5 करोड टर्म लाईफ इन्शुरन्स पॉलिसीकडून अपेक्षा करू शकता.
₹5 करोड टर्म इन्शुरन्सच्या प्रिमियमला प्रभावित करणाऱ्या बाबी कोणत्या आहेत?
₹5 करोड टर्म इन्शुरन्सच्या प्रिमियमला प्रभावित करणारे घटक इतर कोणत्याही टर्म इन्शुरन्स प्लॅनच्या प्रिमियमला प्रभावित करणाऱ्या घटकांसारख्याच आहेत. तुमच्या विमा रकमेच्या व्यतिरिक्त, ₹5 करोड टर्म इन्शुरन्सच्या प्रिमियमला प्रभावित करणारे हे घटक आहेत.
तुम्ही निवडलेल्या कव्हरेजच्या कालावधीचा तुमच्या प्रिमियमच्या रकमेवर नक्कीच परिणाम होतो. मात्र, पॉलिसीची मुदत तुमच्या प्रिमियमच्या रकमेवर कशाप्रकारे परिणाम करते हे पाहण्याऐवजी तुमच्या गरजेनुसार पॉलिसी मुदत ठरवणे योग्य ठरते.
तुमची प्रिमियम रक्कम ठरवण्यात विमाधारकाचे वय महत्त्वाची भूमिका निभावते. वयस्कर व्यक्तींना मृत्यूचा जास्त धोका असतो. म्हणून, नेहमी कमी वयात टर्म प्लॅन खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो.
जर तुम्हाला कोणताही वैद्यकीय आजार असेलकिंवा तुमची उल्लेखनीय मेडिकल हिस्ट्री असेल , तर सर्वसाधारण मेडिकल हिस्ट्री असलेल्या लोकांच्या तुलनेत तुम्हाला जास्त प्रिमियम आकारला जाऊ शकतो. नंतरची गुंतागुंत टाळण्यासाठी , तुमच्या विमा कंपनीला तुमच्या मेडिकल हिस्ट्री विषयी स्पष्ट माहिती देणे योग्य ठरते.
प्रिमियम भरायची वारंवारता आणि मुदत
तुम्ही निवडलेली प्रिमियम हफ्त्याची वारंवारता आणि मुदत यामुळेही तुमची एकूण प्रिमियम रक्कम वाढू किंवा कमी होऊ शकते. तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळण्यासाठी, तुम्ही टर्म इन्शुरन्स कॅलक्युलेटर मध्ये उपलब्ध प्रिमियम हफ्त्याची वारंवारता निवडून बघू शकता, याततुमचे इतर तपशील सुद्धा प्रविष्ट केले जातील.
धुम्रपानाच्या सवयी मृत्यूचा धोका वाढवत असल्याचे मानले जाते, ज्यामुळे तुमच्या प्रिमियमच्या रकमेवर परिणाम होतो. याकारणामुळे जास्त प्रिमियम रक्कम आकारली जाऊ शकते.
पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये मृत्यूच्या धोका कमी असल्याचे मानले जाते. तसेच, ते शहरात राहतात कि निरोगी जीवनशैली असणाऱ्या शांत ठिकाणी, याचा सुद्धा प्रिमियमच्या दरांवर परिणाम होऊ शकतो.
जर तुम्ही रायडर्स घेत असाल किंवा काही अतिरिक्त विशेषता असलेला प्लॅन निवडत असाल, तर ते तुमच्या पॉलिसीमध्ये दिसू शकते.
ऑनलाइन टर्म इन्शुरन्स प्रिमियम कॅलक्युलेटर्सच्या सुलभ उपलब्धतेमुले, तुम्ही काही क्लिक्स मध्ये याचा अंदाज मिळवू शकता.
योग्य ₹5 करोड टर्म इन्शुरन्स प्लॅन कसा निवडावा?
जरी तुम्ही ₹5 करोड टर्म इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करत असाल, कमी विमा रकमेची किंवा जास्त विमा रकमेची, तरी योग्य प्लॅन निवडणे महत्त्वाचे आहे. इथे काही घटक दिलेले आहेत जे तुम्हाला एक योग्य टर्म इन्शुरन्स निवडण्यासाठी महत्वाचे ठरतील.
तुमची पॉलिसी तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यात मदत करु शकतील असे कुठले रायडर पर्याय किंवा कोणत्याही अतिरिक्त सुविधा देत आहे का? जरी ॲड-ऑन्स प्रिमियमची रकमेवर परिणाम करत असले तरी, तुम्हाला चांगले कव्हरेज मिळवून देण्यात मदत करू शकतात. वेवर ऑफ प्रिमियम आणि टर्म रायडर हे काही साधारणपणे उपलब्ध असणारे पर्याय आहेत.
तुमच्या पॉलिसीवरील दावा यशस्वीरित्या सेटल होण्याच्या जास्तीत जास्त शक्यतेसाठी, तुम्ही कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेश्यो आधी तपासला पाहिजे.हा आकडा तुम्हाला गत वर्षात यशस्वीरित्या निकालात काढलेल्या दाव्यांची टक्केवारी सांगतो.
खरेदी करण्याआधी, पॉलिसीच्या अपवादांविषयी चौकशी करणे गरजेचे आहे. तुमची पॉलिसी कशासाठी कव्हरेज देईल याविषयी तपशीलवार माहिती करून घेणे योग्य ठरते.
काही प्रकारच्या कव्हरेसाठी वेटिंग पिरियड लागू होऊ शकतो. खरेदी करण्याआधी याची चौकशी करा.
तुमच्या ₹5 करोड टर्म इन्शुरन्सच्या प्रिमियमची गणना करा
तुमच्या ₹5 करोड टर्म लाईफ इन्शुरन्स वरील प्रिमियमची गणना करण्याचा सर्वात सोपा, जलद आणि सर्वात सुलभ मार्ग आहे टर्म इन्शुरन्स कॅलक्युलेटर वापरणे.
इंडियाफर्स्ट लाईफ इन्शुरन्स का निवडावे?
आमच्या सेवा:
विभिन्न गरजांनुसार प्लॅन्सची श्रेणी
खात्रिशीर ग्राहक सेवा
सोपी क्लेम सेटलमेंट प्रक्रिया
तज्ञांकडून सल्ल्याची उपलब्धता
97.04% क्लेम सेटलमेंट रेश्यो
योग्य टर्म प्लॅन निवडण्यासाठी मदत पाहिजे का?
तुमचा टर्म प्लॅन निवडताना तज्ञांचा सल्ला पाहिजे असल्यास, इथे कॉल बूक करा. तुम्ही आम्हाला 1800 209 8700 वर कॉल करु शकता किंवा +91 22 6274 9898 वर व्हॉट्सॲप मेसेज सुद्धा करू शकता.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
₹5 करोड टर्म प्लॅन खरेदी करण्यासाठी पात्रता निकष काय आहेत?
हे इतर कोणत्याही टर्म इन्शुरन्स पॉलिसीच्या पात्रता निकषांसारखेच आहे. 18 वर्ष ते 65 वर्ष दरम्यानचे कुणीही भारतीय नागरिक, अंडररायटिंग टीमच्या स्वीकृतीच्या अधीन, पॉलिसी घेऊ शकतात. एनआरआय साठी टर्म इन्शुरन्सची उपलब्धता विमा पुरवठादार आणि निवडलेल्या प्लॅनच्या प्रकारावर अवलंबून आहे.
मला ₹5 करोड टर्म इन्शुरन्स वर कर लाभ मिळू शकतो का?
होय, तुम्ही भरलेले प्रिमियम तसेच मिळालेले लाभ कर सवलतीसाठी पात्र असू शकतात. कृपया नोंद घ्या कि विद्यमान आयकर नियमांनुसार, फक्त जुनी कर पद्धती निवडलेले करदातेच हा दावा करू शकतात.
मी पॉलिसी मुदती संपेपर्यंत जिवंत राहिल्यास काय होईल?
जर तुम्ही लेवल टर्म इन्शुरन्स पॉलिसी निवडली असेल आणि पॉलिसी मुदतीपर्यंत जिवंत राहिलात, तर तुम्ही मॅच्युरिटीच्या कुठल्याही लाभांसाठी दावा करू शकत नाही. मात्र, तुमच्या प्लॅन मध्ये रिटर्न ऑफ प्रिमियम पर्याय असल्यास, तुम्ही प्लॅन मॅच्युअर झाल्यावर प्रिमियम परत मिळवण्यासाठी दावा करू शकता.
₹5 करोड टर्म इन्शुरन्स प्लॅन्स फ्री-लूक पिरियड सोबत येतात का?
तुलनेने उच्च विमा रक्कम वगळता, ₹5 करोड टर्म इन्शुरन्सचे बहुतेक पैलू रेग्युलर टर्म इन्शुरन्स प्लॅन सारखेच आहेत. म्हणून, फ्री लूक पिरियडसह तुम्ही टर्म इन्शुरन्सच्या बहुतेक सुविधा आणि लाभांची अपेक्षा ठेवू शकता.
मी ₹5 करोड टर्म इन्शुरन्स प्लॅन ऑनलाइन खरेदी करू शकतो का?
होय, या सगळ्या पॉलिसीज् ऑनलाइन खरेदी करणे शक्य आहे. तुमच्याकडे सर्व कागदपत्रे तयार असल्यास, हि सर्व प्रक्रिया विनासायास आणि जलद होईल अशी अपेक्षा ठेऊ शकता.