प्रवेशाच्या वेळी वय
- Question
- प्रवेशाच्या वेळी वय
- Answer
-
किमान: 3 वर्षे
कमाल: 65 वर्षे
टीप: वय हे मागच्या वाढदिवसाचे वय मानण्यात येईल.
तुमच्यासाठी योग्य वेळ आम्हाला सांगा.
लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा
तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.
पुरुष
महिला
इतर
तुमचे तपशील प्रविष्ट केल्याबद्दल धन्यवाद
तुमच्या मौल्यवान अभिप्रायांमुळे आम्हाला आमची सेवा सुधारण्यात आणि आणखी कार्यक्षम बनवण्यात महत्वाची भूमिका बजावते.
किमान: 3 वर्षे
कमाल: 65 वर्षे
टीप: वय हे मागच्या वाढदिवसाचे वय मानण्यात येईल.
किमान: 18 वर्षे
कमाल: 85 वर्षे
टीप: वय हे मागच्या वाढदिवसाचे वय मानण्यात येईल.
वार्षिक: INR 36,000
अर्ध वार्षिक: INR 18,000
त्रैमासिक: INR 9,000
मासिक: INR 3,000
काही मर्यादा नाही: बोर्ड अनुमोदित हमी धोरणाच्या अधीन
वार्षिक
अर्ध वार्षिक
त्रैमासिक
मासिक
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
विनासायास नोंदणी प्रक्रिया
माझ्यासाठी नोंदणीपासून सर्व वैद्यकीय तपासण्यांपर्यंत, इंडियाफर्स्ट लाईफ ने सर्व काही सुकर केले. मी घेतलेल्या प्लॅनची वैशिष्ट्ये माझ्या अपेक्षांप्रमाणे आहेत, जी मला भविष्याबद्दल मनःशांती देतात.
मोहित अगरवाल
(मुंबई, 21 मार्च 2024)
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
ऑनलाईन खरेदीचा सुखद अनुभव
इंडियाफर्स्ट लाईफकडून लाईफ इन्शुरन्स पॉलिसी विकत घेणे हा माझ्यासाठी सुखद अनुभव होता. कंपनीच्या प्रतिनिधींसोबत विनासायास संवाद हा वरदानासारखा होता आणि त्याचप्रमाणे अति आवश्यक वैशिष्ट्यांना प्लॅनमध्ये घेणेही.
सत्यम नागवेकर
(मुंबई, 22 मार्च 2024)
लोकांना इंडियाफर्स्ट लाईफचा कसा फायदा झाला आहे
माझ्या आर्थिक प्रवासातील विश्वासू सहकारी
इंडियाफर्स्ट लाईफ रेडियंट स्मार्ट इन्व्हेस्ट प्लॅन ने मला जिंकून घेतले! आर्थिक प्रवासात विश्वासू सहकारी असल्यासारखे आहे. त्याच्या फंड स्विचच्या फ्लेक्झिबल पर्यायांमुळे, मी जसा विचार केला होता त्याप्रमाणे माझ्या गुंतवणुकी करू शकतो. माझ्या गुंतवणुकीवर 20% चे घसघशीत परतावे मिळाले आहेत! नोंदणी टीम कडून मिळालेला आधार खूपच सुंदर होता, ज्यामुळे माझी खरोखरच काळजी घेत असल्याचे आणि आधार दिल्याचे जाणवले.
पौलोमी बॅनर्जी
(कोलकाता, 21 मार्च 2024)
आपल्या स्वप्नांना पाठिंबा द्यायला जर आपल्याकडे उत्पन्नाचा दुसरा स्त्रोत असेल तर किती चांगले होईल नाही का? तुमच्या स्वप्नांना सत्यात आणण्याचा हा एक मार्ग आहे, ज्यायोगे तुम्ही 1ल्या महिनाअखेरीपासून उत्पन्न मिळवण्यास सुरुवात करु शकता.
तुमच्या गुंतवणूकींवर 7 x परतावा मिळाला तर आश्चर्य वाटेल नाही का? तुमचा शोध इथे संपतो! या सिंगल पेमेंट प्लॅनसोबत, तुम्ही तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करु शकता.
इंडियाफर्स्ट लाईफ मनी बॅलन्स प्लान ही युनिट-लिंक्ड लाईफ इन्श्युरन्स एंडोमेंट पॉलिसी आहे ज्यात युलिप आणि लाईफ कव्हरच्या लाभांचे संयोजन पाहण्यास मिळते.
सेटलमेंट कालावधीच्या दरम्यान गुंतणूकीची जोखिम आणि मूलभूत जोखिम पॉलिसीधारकाकडे असते.
तुमचा सेटलमेंट कालावधी परिपक्वता तारखेपासून सुरु होतो आणि, तुम्ही निवडल्यानुसार, 5 वर्षांच्या कालावधीपर्यंत लागू होतो. मात्र, मॅच्युरिटी तारखेच्या कमीत कमी 3 महिने आधी तुम्ही सेटलमेंट पर्याय निवडायला हवा.
आमचा इंडियाफर्स्ट लाईफ टर्म विथ युलिप प्लस हा एक नॉन-पार, युनिट लिंक्ड, इंडिविज्युअल सेविंग्स लाईफ इन्शुरन्स प्लॅन आहे, जो विशेषकरून अशा लोकांना उच्च लाईफ इन्शुरन्स कव्हरेज देण्यासाठी तयार करण्यात आला आहे ज्यांना टर्म इन्शुरन्स सारखे संरक्षण पाहिजे तसेच त्यांच्या बचतीवर युलिप सारख्या जास्तीत जास्त रिटर्न्स मिळवून पुढील आरामदायक जीवनासाठी अतिरिक्त संपत्ती तयार करायची आहे. रायडर कव्हर संरक्षणात भर घालते.
विमाधारकाचे अकाली निधन झाल्यास , नामनिर्देशित व्यक्ती/ नियुक्त व्यक्ती/ कायदेशीर वारसाला मृत्यू लाभ मिळतो, ज्यामध्ये विमाधारकाच्या मृत्यूच्या तारखेच्या तात्काळ आधीच्या 2 वर्षांच्या कालावधीत, फंड मूल्यातून केलेल्या पार्शल विथड्रॉवल इतकी (आंशिक प्रत्याहरणा) सम अशुअर्ड कमी केली जाईल.
होय, पॉलिसी मुदतीच्या शेवटी पॉलिसीधारकाला फंड मूल्य प्राप्त होईल.
तुम्ही भरलेल्या प्रीमियमवर आणि प्राप्त झालेल्या लाभांवर प्रचलित आय कर कायद्यांनुसार कर लाभ उपलब्ध असू शकतो. हे सरकारी कर कायद्यांनुसार वेळोवेळी बदलाच्या अधीन आहे. कृपया ही पॉलिसी खरेदी करण्याआधी तुमच्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.
मॅच्युरिटी वेळी तुम्ही
a. रिटर्न ऑफ प्रीमियम ॲलोकेशन चार्ज (आरओएसी) – प्रीमियम ॲलोकेशन शुल्क जे पॉलिसी मुदतीच्या दरम्यान कापले जाते ते खाली दिलेल्या तक्त्यानुसार फंड मूल्यात परत जोडले जातील -
पॉलिसी मुदत | वर्षांच्या शेवटी फंड मूल्यात जोडले जातात | रिटर्न ऑफ प्रीमियम ॲलोकेशन चार्जेस |
---|---|---|
15 | 11 ते 15 | कापलेल्या एकूण ॲलोकेशन चार्जेसपैकी 25% प्रत्येक वर्षाच्या शेवटी फंड मूल्यात जोडले जातात |
20 | 11 ते 15 | कापलेल्या एकूण ॲलोकेशन चार्जेसपैकी 25% प्रत्येक वर्षाच्या शेवटी फंड मूल्यात जोडले जातात |
16 ते 20 | कापलेल्या एकूण ॲलोकेशन चार्जेसपैकी 50% प्रत्येक वर्षाच्या शेवटी फंड मूल्यात जोडले जातात | |
25 | 11 ते 15 | कापलेल्या एकूण ॲलोकेशन चार्जेसपैकी 25% प्रत्येक वर्षाच्या शेवटी फंड मूल्यात जोडले जातात |
16 ते 20 | कापलेल्या एकूण ॲलोकेशन चार्जेसपैकी 50% प्रत्येक वर्षाच्या शेवटी फंड मूल्यात जोडले जातात | |
20 ते 25 | कापलेल्या एकूण ॲलोकेशन चार्जेसपैकी 75% प्रत्येक वर्षाच्या शेवटी फंड मूल्यात जोडले जातात |
a. रिटर्न ऑफ मोर्टेलिटी चार्ज (आरओएमसी) – मोर्टलिटी शुल्क जे पॉलिसी मुदतीच्या दरम्यान कापले जाते ते खाली दिलेल्या तक्त्यानुसार फंड मूल्यात परत जोडले जाईल–
पॉलिसी मुदत | रिटर्न ऑफ मोर्टेलिटी चार्जेस |
---|---|
15 | पॉलिसी मुदतीच्या दरम्यान गोळा केलेल्या मॉर्टेलिटी शुल्काचे 100% |
20 | पॉलिसी मुदतीच्या दरम्यान गोळा केलेल्या मॉर्टेलिटी शुल्काचे 100% |
25 | पॉलिसी मुदतीच्या दरम्यान गोळा केलेल्या मॉर्टेलिटी शुल्काचे 100% |
एकत्रीकरणासाठी आरओएमसी जोडले जाण्याच्या तारखेच्या दिवशीची युनिट किंमत/ एनएव्ही वापरले जाईल..
c. ॲलोकेशन शुल्कावर सूट
जर तुमची पॉलिसी ऑनलाइन किंवा डिरेक्ट मार्केटिंग चॅनल द्वारे खरेदी केली गेली असेल, तर पहिल्या वर्षाच्या प्रीमियम ॲलोकेशन शुल्कावर तुम्हाला थेट 3% सूट दिली जाईल.
तसेच 2 लाख किंवा अधिकचा वार्षिक प्रीमियम असलेल्या पॉलिसींसाठी पहिल्या वर्षाच्या प्रीमियम ॲलोकेशन शुल्कावर 1% अतिरिक्त सूट सुद्धा दिली जाईल.
ही पॉलिसी विशेषकरून तुमच्या गरजांनुसार आहे याची खात्री तुमच्यासाठी अनेक पर्याय देऊन केली आहे. निवड करण्यासाठी वेगवेगळ्या पॉलिसी मुदती, प्रीमियम भरण्याचा कालावधी, फंड पर्याय आणि गुंतवणूक धोरणांच्या व्यतिरिक्त, तुमचे आर्थिक नियोजन तुमच्या आर्थिक ध्येयाला अनुरुप असल्याची खात्री करण्यासाठी तुम्ही स्विचिंग, पार्शियल विड्रॉवल (आंशिक प्रत्याहरण) सारख्या पर्यायांचा सुद्धा वापर करू शकता.
पॉलिसी मुदतीच्या दरम्यान कितीही वेळा तुम्ही एक फंडातून दुसऱ्या फंडात गुंतवत तुमचे फंड बदलू शकता.
स्विचिंग वर कोणतीही मर्यादा आहे का?
स्विचिंगच्या अंतर्गत तुम्ही तुमच्या युनिट्स पैकी काही किंवा सर्वच युनिट्स एक युनिट लिंक्ड फंडातून दुसऱ्यात स्थानांतरित करू शकता..
किमान स्विचिंग रक्कम | ₹ 5,000 |
---|---|
कमाल स्विचिंग रक्कम | फंड मूल्य |
फंड्स बदलण्यासाठी शुल्क काय आहेत?
एक कॅलेंडर महिन्यात तुम्हाला अमर्यादित वेळा स्विचिंगची परवानगी आहे. हे बदल सध्या विनाःशुल्क आहेत. मात्र, आयआरडीएआय कडून पूर्वमंजूरीच्या अधीन, शुल्क लागू करण्याचा अधिकार आमच्याकडे सुरक्षित आहे. सदर शुल्क प्रति व्यवहार ₹.500 पेक्षा अधिक नसेल.
तुमच्या पॉलिसीला पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतरच पार्शल विथड्रॉवल (आंशिकरित्या प्रत्याहरण)द्वारे, तुमची पॉलिसी तुम्हाला गरजेच्या परिस्थितीमध्ये तुमचे पैसे मिळवण्याची सुविधा देते..
पार्शल विथड्रॉवल (आंशिक प्रत्याहरणावर) कोणतीही मर्यादा आहे का?
किमान प्रत्याहरण रक्कम | ₹ 10,000 |
---|---|
लिमिटेड प्रीमियम | आंशिक प्रत्याहरणाच्या वेळी फंड मूल्याच्या जास्तीत जास्त 20% पर्यंत रक्कम काढू शकता, फक्त तेव्हाच जर रक्कम काढल्यानंतर तुमच्या फंडचे मूल्य एक संपूर्ण वर्षाच्या प्रीमियमच्या किमान 110% राहील. |
उदाहरण: तुम्ही ₹ 16,000 पर्यंत रक्कम काढू शकता जर तुम्ही ₹ 15,000 चा वार्षिक प्रीमियम भरत असाल आणि काही वर्षांमध्ये ₹ 80,000 (फंड मूल्याचे 20%) इतके फंड मूल्य जमा झाले आहे .
आम्हाला लेखी सूचना देऊन प्रीमियम एक फंडातून दुसऱ्या फंडात पुनर्निर्देशित करण्याचा पर्याय तुमच्याकडे आहे.
प्रीमियम पुनर्निर्देशन सध्या विनाःशुल्क आहे.
तुम्हाला तुमच्या पॉलिसीमध्ये खालील बदल करण्याची परवानगी आहे –
सदर प्लॅन 10 विविध फंड्स देतो:
मल्टी कॅप इक्विटी फंड
मॅक्रो ट्रेंड्स फंड
इक्विटी 1
डेट 1
बॅलेंस्ड 1
सस्टेनेबल इक्विटी
डायनामिक ॲसेट ॲलोकेशन फंड
इक्विटी एलिट अपोर्च्युनिटीज
लिक्विड 1 फंड
फ्लेक्सी कॅप इक्विटी
इंडियाफर्स्ट लाईफ टर्म विथ युलिप प्लस मध्ये गुंतवणूक धोरणांच्या अनेक पर्यायांचा समावेश आहे. तुम्हाला तुमच्या प्रिमियमचा जास्तीत जास्त परतावा मिळत असल्याची खात्री करण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणत्या धोरणांपैकी एक निवडू शकता.
आमच्याकडे या उत्पादनात वेगवेगळे फंड पर्याय दिलेले आहेत. हा धोरण पर्याय निवडून तुम्हाला 10 विविध फंड्सचा आमचा सुव्यवस्थित सुट प्राप्त होईल, तुमच्या प्रीमियमचा वापर कसा करावा यावर नियंत्रण मिळेल आणि एक फंडातून दुऱ्यात स्विच करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य मिळेल. तुमच्या जोखिम क्षमता आणि गरजांच्या आधारे तुम्ही यापैकी कोणत्याही एक, अनेक किंवा सर्वच पर्यायांमध्ये तुमचे प्रीमियम ठेवणे निवडू शकता.
पॉलिसी सुरु होण्याच्या तारखेच्या आधी किंवा कोणत्याही पॉलिसीला वर्ष पूर्ण झाल्यावर, तुम्ही एक ठराविक कालावधीमध्ये इक्विटी मार्केटमधून वाढीव नियमित परतावे कमावण्यासाठी फंड ट्रांसफर धोरण निवडू शकता.
या धोरणामध्ये तुम्ही तुमचे फंड पर्याय निवडू शकता, जेथे लागू शुल्क कापल्यानंतर तुमचे प्रीमियम तुम्ही निवडलेल्या डेब्ट-केंद्रित फंडात, त्या फंडातील विद्यमान युनिट्स सह, वितरित केले जातील. निवडलेल्या डेब्ट-केंद्रित फंडातील युनिट्स त्यानंतर निवडलेल्या इक्विटी-केंद्रित फंडामध्ये मासिक पद्धतीने खालील प्रकारे पद्धतशीरपणे हस्तांतरित केले जातात :
फंड व्यवस्थापन शुल्क, मोर्टेलिटी शुल्क, प्रीमियम ॲलोकेशन शुल्क, पॉलिसी व्यवस्थापन शुल्क हे या पॉलिसीच्या अंतर्गत आकारले जाणारे काही सर्वसामान्य शुल्क आहेत.
प्लॅनमध्ये उपलब्ध रायडर्सने तुम्हाला वाढील संरक्षण मिळेल.
घटना | लाभ कसे आणि कधी देय असतात | अशा लाभांचा आकार |
---|---|---|
अपघाती मृत्यू | रायडरच्या मुदतीच्या दरम्यान लाईफ अशुअर्डचा अपघाती मृत्यू झाल्यास, वारसदाराला रायडर सम अशुअर्ड इतका एकरकमी लाभ मिळेल. हा मूळ पॉलिसी लाभाच्या व्यतिरिक्त एक अतिरिक्त लाभ आहे. | एडीबी विमा रकमेची 100% रक्कम एकरकमी स्वरुपात दिली जाईल |
घटना | लाभ कसे आणि कधी देय असतात | अशा लाभांचा आकार |
---|---|---|
आजारपण किंवा अपघातामुळे संपूर्ण आणि कायमस्वरुपी अपंगत्व | आजारपण/ अपघातामुळे संपूर्ण आणि कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास देय असलेला लाभ, हे अपंगत्व इतर कोणत्याही कारणांच्या व्यतिरिक्त फक्त बाहेरील, हिंसक, अनपेक्षित आणि दृश्य कारणांमुळे, अशा अपघाताच्या 180 दिवसांच्या आत झाल्याचे निष्पन्न झाले पाहिजे व विमा कंपनीला पूर्णपणे पटले पाहिजे, संपूर्ण आणि कायमस्वरुपी अपंगत्वाच्या अटीं पूर्ण झाल्याच्या आणि आमच्या द्वारे दावा स्वीकारल्या गेल्याच्या अधीन आहे. | टीपीडी विमा रकमेची 100% रक्कम एकरकमी स्वरुपात दिली जाईल. |
होय, सेटलमेंट कालावधीच्या दरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाल्यास.
भरलेल्या एकूण प्रीमियम 105% इतके रिस्क कव्हर कायम ठेवले जाईल, त्यानुसार मोर्टेलिटी शुल्क कापले जातील.
आम्ही मृत्यूच्या सुचनेच्या तारखेनुसार फंड मूल्य किंवा भरलेल्या एकूण प्रीमियमच्या 105% पैकी जी जास्त असेल ती रक्कम नामनिर्देशित व्यक्ती/ नियुक्त व्यक्ती/ कायदेशीर वारसाला देऊ आणि त्यानंतर पॉलिसी ताबडतोब समाप्त होईल.
सेटलमेंट कालावधीच्या दरम्यान संपूर्ण प्रत्याहरण केल्या, लाईफ कव्हरताबडतोब थांबेल.
तुमच्याकडे पॉलिसीच्या अटी आणि नियम तपासण्यासाठी पॉलिसीचे कागदपत्र मिळाल्याच्या तारखेपासून 30 (तीस) दिवसांचा फ्री लूक पिरियड असतो, मग ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने किंवा इतर पद्धतीने प्राप्त झाले असतील, आणि त्यापैकी कोणत्याही अटी किंवा नियमांशी तुम्ही असहमत असल्यास रद्द करण्यासाठीआमच्याकडे पॉलिसी परत पाठवण्याचा पर्याय तुमच्याकडे असेल.
नाही, बदलण्याची आणि पार्शल विथड्रॉवलची आंशिक प्रत्याहरणाची परवानगी नाही.
पॉलिसी बंद करण्याच्या परिस्थिती आणि पॉलिसी दस्तावेजात निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे, पॉलिसीधारकाला डिस्कंटिनुयअन्स शुल्क आकारले जाऊ शकते.
रिड्यूस्ड पेड-अप पॉलिसीच्या बाबतीत, पॉलिसी जितके वर्ष चालू होती त्याच्या संख्येच्या आधारे आणि इतर संबंधित घटक विचारात घेतल्यानंतर सदर शुल्क फंड मूल्यात परत जोडले जातील.
तिमाही, अर्धवार्षिक, आणि वार्षिक माध्यमांच्या अंतर्गत सर्व प्रिमियमच्या भरण्यासाठी आम्ही 30 दिवसांचा आणि मासिक माध्यमाच्या अंतर्गत भरण्यासाठी 15 दिवसांचा ग्रेस पिरियड देऊ. हा कालावधी प्रत्येक प्रीमियम भरण्याच्या देय तारखेपासून सुरु होतो. या ग्रेस पिरियडच्या दरम्यान तुमची पॉलिसी सक्रिय असल्याचे ग्राह्य धरले जाईल आणि तुमचे सर्व पॉलिसी लाभ चालू राहतील.
आम्ही आयआरडीएआय द्वारे जारी केलेल्या युनिट लिंक्ड मार्गदर्शक तत्वांनुसा र अनुषंगाने तुमच्या युनिट्सचे मूल्य ठरवू. प्राधिकरणाच्या प्रचलित मार्गदर्शक तत्वांनुसार, खालीलप्रमाणे युनिट किंमत मोजली जाईल:
मालमत्तांचा बाजार भाव, अधिक: वर्तमान मालमत्तांचे मूल्य, वजा: वर्तमान दायित्वे आणि तरतूदींचे मूल्य, कोणतेही असल्यास, भागिले: मूल्यनिर्धारणाच्या तारखेला विद्यमान युनिट्सची संख्या (युनिट्स निर्मिती/ रीडम्प्शन आधी).
जेव्हा मूल्यनिर्धारणाच्या तारखेला (कोणतेही युनिट्स रीडीम करण्याआधी) फंडमधील युनिट्सच्या एकूण संख्येने भागले जाते तेंव्हा फंडची युनिट किंमत आम्हाला मिळते.
प्रत्येकप्रीमियम (नवीन व्यवसाय किंवा नूतनीकरण), ॲलोकेशन शुल्क कापल्यावर, कोणतेही, अर्जा मध्ये निवडल्यानुसार किंवा त्यानंतरच्या विनंती द्वारे किंवा निवडलेल्या गुंतवणूक धोरणानुसार फंड पर्यायांमध्ये वाटप केला जातो.
पॉलिसी मार्गदर्शक तत्वांच्या आधारे आधी केलेल्या प्रीमियम नूतनीकरणांवरसवलत मिळू शकते.
पॉलिसी सुरु केल्याच्या तारखेपासून किंवा पॉलिसी पुन्हा चालू करण्याच्या तारखेपासून, जसे लागू होईल तसे, 12 महिन्यांच्या आत आत्महत्येमुळे मृत्यू झाल्यास मृत्यूची सूचना दिल्याच्या तारखेला उपलब्ध असेल त्याप्रमाणे नामनिर्देशित/ नियुक्त व्यक्ती/ कायदेशीर वारस, जे असेल त्यांना, फंड मूल्य दिले जाईल.
पुढे मृत्यूच्या तारखेनंतर वसूल करण्यात आलेले फंड व्यवस्थापन शुल्क आणि खात्रीशीर शुल्काच्या व्यतिरिक्त इतर सर्व शुल्क मृत्यूची सूचना दिल्याच्या तारखेला उपलब्ध असलेल्या फंड मूल्यामध्ये परत जोडले जातील.
सर्व पहा
अस्वीकरण
लिंक्ड इन्शुरन्स उत्पादने ही पारंपरिक विमा उत्पादनांपेक्षा वेगळी असून जोखमीच्या अधीन असतात. युनिट लिंक्ड लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज मध्ये भरलेली प्रीमियम यात गुंतवणुकीतील जोखमीच्या अधीन असतात आणि युनिट्स चे नॅव्ह वर खाली होऊ शकतात, फंड्सची कामगिरी आणि कॅ पिटल मार्केटवर परिणाम करणाऱ्या घटकांनुसार आणि विमा घेणारी व्यक्ती आपल्या निर्णयासाठी जबाबदार असते. इन्डियाफर्स्ट लाईफ इंश्योरंस कंपनी लिमिटेड हे फक्त विमा कंपनीचे नाव असून याद्वारे कराराची गुणवत्ता, यासंबंधी भविष्यातील धोरणे किंवा परतावा, यासंबंधी हमी देत नाही.
कृपया संबंधित धोके आणि यासंबंधी लागू होणारे शुल्क तुमच्या विमा एजंटकडून किंवा विमा कंपनीने जारी केलेले मध्यस्थ किंवा पॉलिसी कागदपत्रे वाचून जाणून घ्या. या करारांतर्गत दिले गेलेले विविध फंड ही फंडांची नावे आहेत आणि कोणत्याही प्रकारे या योजनांची गुणवत्ता, त्यांच्या भविष्यातील धोरणे आणि परतावा दर्शवत नाहीत. भूतकाळातील कामगिरी भविष्यात बदलू शकते आणि भविष्यातील कामगिरीची हमी देऊ शकत नाही. या कागदपत्रातील मजकुरात शिफारस/विधाने /अंदाज/अपेक्षा/भाकीत असू शकतात, जे कदाचित 'फॉरवर्ड लुकिंग' असू शकतात.
वास्तविक परिणाम या कागदपत्रात व्यक्त / निहित परिणामांपेक्षा भौतिकदृष्ट्या भिन्न असू शकतात. ही विधाने, कोणत्याही विशिष्ट व्यक्तीला वैयक्तिक शिफारस किंवा एखाद्या व्यक्तीच्या कोणत्याही गुंतवणूक गरजा प्रदान करण्याचा हेतू नाही. शिफारसी / विधाने / अंदाज / अपेक्षा / भाकीत सर्वसाधारण स्वरूपाचे आहेत आणि वैयक्तिक पॉलिसीधारक / ग्राहक यांच्या विशिष्ट गुंतवणूक गरजा किंवा जोखीम पत्करण्याची स्थिती किंवा आर्थिक परिस्थिती विचारात घेत नाहीत. जोखीम घटक आणि अटी व शर्तींच्या अधिक तपशीलांसाठी, कृपया विक्री पूर्ण करण्यापूर्वी विक्री माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचा. कर लाभ कर कायद्यातील बदलांच्या अधीन आहेत.