वय
- Answer
-
- प्रवेशाच्या वेळी किमान वय- 91 दिवस
- प्रवेशाच्या वेळी कमाल वय - शेवटच्या जन्मदिवसानुसार 24 वर्षे
- कवर बंद करण्याचे कमाल वय - शेवटच्या जन्मदिवसानुसार 25 वर्षे
तुमच्यासाठी योग्य वेळ आम्हाला सांगा.
लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा
तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.
पुरुष
महिला
इतर
तुमचे तपशील प्रविष्ट केल्याबद्दल धन्यवाद
तुमच्या मौल्यवान अभिप्रायांमुळे आम्हाला आमची सेवा सुधारण्यात आणि आणखी कार्यक्षम बनवण्यात महत्वाची भूमिका बजावते.
इंडियाफर्स्ट लाईफमुळे लोकांना काय फायदा झाला आहे
उत्कृष्ट ग्राहक सेवा
पॉलिसीशी संबंधित सर्व तपशील संयमाने समजावून सांगण्यात आणि तुमच्या वेबसाइटवरून फॉर्म डाउनलोड करण्यात तुम्ही मला केलेली मदत प्रशंसनीय आहे.
विनय कुमार वर्मा
(मुंबई, 16 जून 2022)
इंडियाफर्स्ट लाईफमुळे लोकांना काय फायदा झाला आहे
उत्कृष्ट ग्राहक सेवा टीम
तुमची ग्राहक सेवा टीम उत्कृष्ट आहे. माझ्या एचआरकडे जमा करण्यासाठी मला इनवॉइस तातडीने पाहिजे होते, आणि आश्वासन दिल्याप्रमाणे तुमच्या टीमकडून मला दिलेल्या तारखेला माझे इनवॉइस मिळाले.
जतिन राव
(कर्नाटक, 7 मार्च 2022)
इंडियाफर्स्ट लाईफमुळे लोकांना काय फायदा झाला आहे
समस्या सोडवण्याचे उत्कृष्ट कौशल्य
इंडियाफर्स्ट लाईफ इन्शुरन्सची ग्राहक सेवा टीम उत्कृष्ट आहे. कर्मचारी ग्राहकांच्या समस्या समजून घेतात आणि ते खुपच सहकार्यपूर्ण आणि मदतशील आहेत.
झियाउद्दीन मलिक
(उत्तर प्रदेश, 4 मार्च 2022)
तुम्ही भरलेल्या प्रिमियमवर आणि प्राप्त झालेल्या लाभांवर प्रचलित आय कर कायद्यांनुसार कर लाभ उपलब्ध असू शकतो. हे सरकारी कर कायद्यांनुसार वेळोवेळी बदलाच्या अधीन आहे. कृपया गुंतवणूक करण्याआधी तुमच्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.
वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार विमा कायदा 1938 च्या कलम 45 च्या तरतूदींनुसार फसवणूक, चूकीची माहिती सादर करणे आणि अपहारावर कारवाई केली जाईल. निर्विवाद कलम: वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार विमा कायदा 1938 च्या कलम 45 च्या सारांश अनुसार, जो सांगतो कि
1) पॉलिसीच्या तारखेपासून म्हणजेच पॉलिसी जारी केल्याच्या तारखेपासून किंवा जोखिम सुरु झाल्याच्या तारखेपासून किंवा पॉलिसी पुन्हा सुरु केल्याच्या तारखेपासून किंवा पॉलिसीमध्ये रायडर जोडल्याच्या तारखेपासून, जी कोणतीही नंतरची असेल, तीन वर्षांची मुदत संपल्यावर कोणत्याही लाईफ इंश्युरन्स पॉलिसीवर कोणत्याही कारणास्तव प्रश्न विचारला जाणार नाही.
2) पॉलिसी जारी केल्याच्या तारखेपासून किंवा जोखिम सुरु झाल्याच्या तारखेपासून किंवा पॉलिसी पुन्हा सुरु केल्याच्या तारखेपासून किंवा पॉलिसीमध्ये रायडर जोडल्याच्या तारखेपासून, जी कोणतीही नंतरची असेल, तीन वर्षांच्या मुदतीच्या आत, फसवणूकीच्या कारणास्तव, एखाद्या लाईफ इंश्युरन्स पॉलिसीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो: मात्र विमा कंपनीला विमाधारक किंवा कायदेशीर प्रतिनिधी किंवा विमाधारकाच्या नामनिर्देशित किंवा नियुक्त व्यक्तींना लिखित स्वरुपात त्या आधार आणि आशयांविषयी कळवावे लागेल ज्यावर अशा निर्णय आधारित आहे.
3) उपकलम (2) मध्ये काहीही असले तरी, कोणताही विमाकर्ता फसवणुकीच्या कारणास्तव जीवन विमा पॉलिसी नाकारू शकत नाही जर विमाधारक सिद्ध करू शकतो की एखाद्या भौतिक वस्तुस्थितीचे चुकीचे विधान किंवा लपवणे त्याच्या उत्तम ज्ञान आणि विश्वासाप्रमाणे सत्य होते किंवा वस्तुस्थिती लपवण्याचा हेतू जाणूनबुजून केलेला नव्हता किंवा असे भौतिक वस्तुस्थितीचे चुकीचे विधान किंवा लपवणे विमाकर्त्याच्या माहिती मध्ये आहे: मात्र, फसवणूकीच्या प्रसंगी, जर पॉलिसीधारक जीवित नाही, तर त्याचे खंडन करण्याचे दायित्व लाभार्थींवर आहे.
4) पॉलिसी जारी केल्याच्या तारखेपासून किंवा जोखिम सुरु झाल्याच्या तारखेपासून किंवा पॉलिसी पुन्हा सुरु केल्याच्या तारखेपासून किंवा पॉलिसीमध्ये रायडर जोडल्याच्या तारखेपासून, जी कोणतीही नंतरची असेल, तीन वर्षांच्या मुदतीच्या आत, या आधारावर पॉलिसीविषयी प्रश्न केला जाऊ शकतो कि प्रस्ताव किंवा इतर दस्तऐवजात विमाधारकाच्या आयुष्याच्या अपेक्षेबद्दल केलेले विधान किंवा वस्तूस्थितीचे लपवणे चुकीच्या पद्धतीने केली गेले होते ज्याआधारे पॉलिसी जारी करण्यात आलेली किंवा पुन्हा सुरु करण्यात आलेली किंवा रायडर जारी करण्यात आलेले: मात्र विमा कंपनीला विमाधारक किंवा कायदेशीर प्रतिनिधी किंवा विमाधारकाच्या नामनिर्देशित किंवा नियुक्त व्यक्तींना लिखित स्वरुपात त्या आधार आणि आशयांविषयी कळवावे लागेल ज्यावर लाईफ इंश्युरन्स पॉलिसी नाकारण्याचा निर्णय आधारित आहे: परंतु पुढे असे की, चुकीचे विधान केल्यामुळे किंवा भौतिक वस्तुस्थिती लपण्याच्या कारणास्तव पॉलिसी नाकारल्यास, आणि फसवणूकीच्या आधारे नाही, पॉलिसी नाकारल्याच्या तारखेपर्यंत पॉलिसीमध्ये गोळा केलेले प्रिमियम पॉलिसी नाकारण्याच्या अशा तारखेपासून नव्वद दिवसांच्या कालावधीच्या आत विमाधारकाला किंवा कायदेशीर प्रतिनिधीला किंवा नामनिर्देशित किंवा विमाधारकाच्या नियुक्त व्यक्तीला दिले गेले जातील.
5) या विभागातील कोणतीही बाब विमा कंपनीला वयाच्या पुराव्यासाठी कधीही कॉल करण्यापासून रोखणार नाही जर ते असे करण्यासाठी पात्र हेत, आणि कोणत्याही पॉलिसीवर फक्त यासाठी प्रश्न केला जाणार नाही कारण पॉलिसीच्या अटींना नंतरच्या पुराव्यांच्या आधारे समायोजित केले जाते की प्रस्तावात विमाधारकाचे वय चूकीचे नमूद करण्यात आलेले.
वेगवेगळ्या कवर पर्यायांच्या अंतर्गत लागू प्रतिक्षा कालावधी खालीलप्रमाणे आहे:
कवर पर्याय/ प्रसंग डेली हॉस्पिटलायजेशन कॅश बेनेफिट (डीएचसीबी) | प्रतिक्षा कालावधी (दिवसांमध्ये) 30 (अपघातामुळे हॉस्पिटलायेजनवर लागू नाही) |
|---|---|
| ब्रोकन बोन्स कवर | लागू नाही |
| डिसेबिलिटी कवर | लागू नाही |
| कँसर कवर | 180 |
| वेक्टर बॉर्न डिसिज कवर | 30 |
| कोरोनावायरस कवर | 15 |
पॉलिसीच्या सलग नूतनीकरणाच्या संदर्भात दुसऱ्या पॉलिसी कालावधीपासून पुढे प्रतिक्षा कालावधी लागू नाही.
कँसर कवर पर्यायासाठी, 5 दिवसांचा उत्तरजीवित कालावधी लागू आहे म्हणजेच दावा पात्र असण्यासाठी; प्रारंभिक/नंतरच्या टप्प्यातील कर्करोगाचे निदान झाल्याच्या तारखेपासून 5 दिवसांच्या कालावधीसाठी विमाधारक जीवित असायला हवे.
सवलतीवर बंदी: वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार विमा कायदा 1938 च्या कलम 41 अनुसार, जो सांगतो कि
1) कोणत्याही व्यक्तीला भारतातील जीवन किंवा मालमत्तेशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या जोखमीच्या संदर्भात विमा घेण्यासाठी किंवा नूतनीकरण करण्यासाठी किंवा चालू ठेवण्यासाठी, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, एखाद्या व्यक्तीला, देय कमिशनचा संपूर्ण किंवा काही भागाची कोणतीही सवलत किंवा पॉलिसीमध्ये दर्शवलेल्या प्रिमियमची कोणतीही सवलत, प्रलोभन म्हणून देण्याची परवानगी नाही किंवा देऊ शकणार नाही, किंवा पॉलिसी काढणारी किंवा नूतनीकरण करणारी किंवा पुढे चालू ठेवणारी कुणीही व्यक्ती कोणतीही सवलत स्वीकारणार नाही, फक्त विमा कंपनीच्या माहितीपत्रकात किंवा तक्त्यात प्रकाशित केलेल्याच्या अनुषंगाने परवानगी असू शकलेली अशी सवलत वगळलेली आहे.
2) या कलमाच्या तरतुदींचे पालन करण्यात कोणतीही चूक करणारी व्यक्ती दहा लाख रुपयांपर्यंतच्या दंडासाठी जबाबदार असेल.
तुम्ही, मास्टर पॉलिसीधारक/सदस्य हे पॉलिसी कागदपत्र परत करू शकता जर सर्व माध्यमांसाठी पहिल्या 15 दिवसांच्या आत तुम्ही कोणत्याही अटी आणि नियमांशी असहमत आहात, फक्त डिस्टन्स मार्केटिंग किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यम वगळून जेथे हे तुमच्या पॉलिसी कागदपत्र/ विमा प्रमाणपत्राच्या प्राप्तीपासून 30 दिवस आहे. तुम्ही आम्हाला पॉलिसी कागदपत्र/ विमा प्रमाणपत्र आणि रद्दीकरणाचे कारण सांगणारी लिखित विनंती पाठवणे आवश्यक आहे. जर या कालावधीच्या दरम्यान कोणताही दावा देण्यात आलेला आहे, तर मास्टर पॉलिसीधारक/सदस्य पॉलिसी फ्री लूकसाठी पात्र नसतील.
तुम्ही तुमची पॉलिसी रद्द करता तेव्हा तुम्हाला काही रिफंड मिळतो का?
होय. विनंती प्राप्त झाल्याच्या 15 दिवसांच्या आत आम्ही इतकी रक्कम परत करू -
भरणा केलेला प्रिमियम
कमी: i. पॉलिसी जितक्या कालावधीसाठी, कोणताही असल्यास, लागू होती त्यासाठी प्रो-रेटा जोखिम प्रिमियम आणि रायडर प्रिमियम
कमी ii. भरणा केलेला कोणताही स्टँप ड्युटी
कमी iii. वैद्यकीय तपासणी, कोणतीही केली असल्यास, वर झालेले खर्च
डिस्टन्स मार्केटिंग मध्ये खालील माध्यमांद्वारे इंशुरन्स प्रोडक्ट्सच्या विक्री आणि विनंतीच्या प्रत्येक क्रियाकलापांचा (लीड निर्मितीसह) समावेश आहे: (i) वॉइस मोड, ज्यात टेलिफोन कॉलिंगचा समावेश आहे; (ii) शॉर्ट मेसेजिंग सर्विस (एसएमएस); (iii) इलेक्ट्रॉनिक मोड ज्यात ई-मेल, इंटरनेट आणि इंटरॅक्टिव टिव्ही (डीटीएच) चा समावेश आहे; (iv) फिजिकल मोड ज्यात डिरेक्ट पोस्टल मेल आणि वर्तमानपत्रे व मॅगझीनमधील इंसर्ट्सचा समावेश आहे; आणि, (v) वैयक्तिकपणे सोडून संपर्काच्या इतर कोणत्याही माध्यमाद्वारे विनंती.
ग्रेस पिरियड म्हणजे प्रिमियम देय तारखेनंतरचा लगेचचा निश्चित कालावधी ज्या दरम्यान एक पॉलिसी सुरु ठेवण्यासाठी भरणा केला जाऊ शकतो. जर ग्रेस पिरियड दरम्यान एक वैध्य दावा करण्यात आला आहे, तर देय प्रिमियम कापल्यानंतर निवडलेला लाभ दिला जाईल. मासिक प्रिमियम पद्धतीच्या अंतर्गत 15 दिवसांचा आणि इतर सर्व प्रिमियम पद्धतींसाठी 30 दिवसांचा, जो कोणताही लागू होतो, ग्रेस पिरियड दिला जाईल.
पॉलिसीच्या नूतनीकरणाच्या संदर्भात, प्रतिक्षा कालावधी सारखे सातत्य लाभ न गमावता सक्रिय मास्टर पॉलिसीधारक/सदस्याला 30 दिवसांचा ग्रेस पिरियड दिला जातो. या ग्रेस पिरियड दरम्यान जर एखादा दावा केला जातो (म्हणजेच मागील पॉलिसी समाप्तीची तारीख आणि नूतनीकरण पॉलिसी सुरु होण्याच्या तारखेमधील ग्रेस पिरियड), तर निवडलेला लाभ दिला जाणार नाही.
बिगर-वार्षिक प्रिमियम भरणाच्या पद्धतीसाठी ग्रेस पिरियडमध्ये प्रिमियम न भरल्याच्या प्रसंगी, पॉलिसी रद्द होते आणि ग्रेस पिरियडच्या मुदती समाप्तीनंतर कवर थांबते.या निश्चित लाभ हेल्थ इंश्युरन्स पॉलिसीमध्ये पुनरारंभ नाही कारण हे वार्षिक पद्धतीने नूतनीकरण होणारे प्रोडक्ट आहे.
या पॉलिसीच्या अंतर्गत कोणताही परिपक्वता लाभ नाही.
या पॉलिसीच्या अंतर्गत सरेंडर लाभ नाही.
मात्र, तुम्ही, मास्टर पॉलिसीधारक ही पॉलिसी कधीही सरेंडर करू शकता. पॉलिसीच्या कालावधीमध्ये पॉलिसीच्या सरेंडरच्या संदर्भात, सदस्याला विमा प्रमाणपत्रानुसार त्यांचे कवरेज समाप्त होईपर्यंत पॉलिसी वैयक्तिक पॉलिसीच्या स्वरुपात कायम ठेवण्याचा पर्याय मिळेल.
“टर्मिनल तारीख” म्हणजे आम्हाला म्हणायचे आहे कवर समाप्त होण्याची तारीख, म्हणजेच योजनेच्या नियमांच्या आधारे जर सदस्य पुढील कवरेजसाठी पात्र नसेल, तर त्या सदस्यासाठी प्रिमियम भरला जाणार नाही. ज्याच्या परिणामस्वरुप, कवर समाप्त होईल.
पुढील प्रसंगी सुद्धा इंश्युरन्स कवरेज लवकरात लवकर समाप्त होईल:
1. शेवटच्या जन्मदिवसानुसार 66 वर्षे असलेल्या सदस्यासाठी कँसर कवर आणि कोरोनावायरस कवर आणि 80 वर्षांच्या सदस्यांसाठी इतर कवर पर्याय
2. मास्टर पॉलिसीधारक सोबत कराराची समाप्ती आणि सदस्य विमा प्रमाणपत्रानुसार मुदतीच्या शेवटपर्यंत वैयक्तिक सदस्य म्हणून सुरु ठेवू इच्छित नाही
3. ग्रेस पिरियड दरम्यान रेग्युलर प्रिमियमचा भरणा न करणे
4. सदस्याचा मृत्यू होणे
5. 25 वर्षे पूर्ण करणाऱ्या मुलासाठी डीएचसीबी
पॉलिसी मुदतीच्या शेवटपर्यंत किंवा टर्मिनल तारखेच्या आधीपर्यंत सदस्याच्या मृत्यूवर कोणतेही मृत्यू लाभ देय नाही. जर निवडलेल्या प्लान पर्यायानुसार कोणत्याही पात्र लाभासाठी दावा नोंदवण्याच्या आधी मृत्यू झाल्यास, तो नामनिर्देशित व्यक्ती/ नियुक्त व्यक्ती/ कायदेशीर वारसाला दिला जाईल.
इंडियाफर्स्ट लाईफ ग्रुप लिव्हिंग बेनिफिट्स प्लान हा कार्पोरेशन्ससाठी एक विस्तृत सामुहिक हेल्थ इन्श्युरन्स समाधान आहे. आरोग्याच्या विविध गरजांसाठी तयार केलेला हा कार्पोरेट हेल्थ प्लान हॉस्पिटलमध्ये भरती होण्याच्या, फ्रॅक्चरच्या, अपंगत्वाच्या आणि गंभीर आजारांच्या स्थितीत आर्थिक सुरक्षेची शाश्वती देतो. तुमच्या कर्मचा-यांच्या जीवनाचे रक्षण करणा-या सामुहिक हेल्थ प्लानसाठी इंडियाफर्स्टची निवड करा.
वार्षिक तत्वावर रिन्युएबल लाईफ पॉलिसी- इंडियाफर्स्ट लाईफ प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना बचत खाते असलेल्या कोणत्याही व्यक्तीसाठी उपलब्ध आहे. प्लान ग्राहकांना सोप्या आणि तात्काळ प्रक्रियेमार्फत लाईफ कव्हर उपलब्ध करुन देतो.
Introducing
App-like tool
designed for
all your insurance needs!
Save us on your home screen