Menu
close
एक्सपर्टला विचारा arrow

लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा

तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.

right-icon-placeholder
right-icon-placeholder
male male

पुरुष

male male

महिला

male male

इतर

इंडियाफर्स्ट लाईफ सरल बचत बीमा प्लॅनची मुख्य वैशिष्ट्ये

दीर्घकालीन संरक्षण

12 किंवा 15 वर्षांपर्यंत जीवन विम्याच्या कव्हरेजसह तुमच्या प्रिय व्यक्तींसाठी दीर्घकालीन सुरक्षेची सुनिश्चिती करा.

cover-life

कमी काळासाठी पैसे भरण्याच्या वचनबद्धता

पॉलिसीच्या संपूर्ण कालावधीसाठी लाभ घेत 5 किंवा 7 वर्षांसाठी प्रीमियम्स भरा.

wealth-creation

गॅरंटीड अॅडिशन्स

तुमच्या बचतींमध्ये वाढ करण्यासाठी दरवर्षी गॅरंटीड  अॅडिशन्स मिळवा

secure-future

मृत्यूवर लवचिक लाभ

तुमच्या मृत्यूवर तुमच्या प्रिय व्यक्तींना एकगठ्ठा रक्कम किंवा 5 वर्षांपेक्षा जास्त काळ उत्पन्न उपलब्ध करा.

many-strategies

अपघाती मृत्यूवर अतिरिक्त विमा रक्कम

पोलिसीच्या पहिल्या वर्षादरम्यान अपघाती मृत्यूसाठी एक अतिरिक्त विमा रक्कम मिळवा

many-strategies

अंत्यविधीसाठी कवर

अंत्यविधीसाठी कवर मिळवा, विमाधारकाच्या मृत्युच्या सूचनेवर मृत्यूवरील विमा रकमेच्या 10% किंवा 25,000 (जी कमी असेल) समोरून मिळवा.

many-strategies

प्रीमियम रायडरची माफी

इंडियाफर्स्ट लाईफ वेव्हर ऑफ प्रीमियम रायडरसाठी पर्याय स्वीकारल्याने पॉलिसी तुमच्या अनुपस्थितीत लागू राहते.

many-strategies

इंडियाफर्स्ट लाईफ सरल बचत बीमा प्लॅन कसा खरेदी करावा?

टप्पा 1

आवश्यक माहिती द्या

तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि इतर आवश्यक माहिती भरा.

choose-plan

टप्पा 2

तुमची पॉलिसी कस्टमाइझ करा

तुमच्या गरजेनुसार पॉलिसी टर्म आणि प्रीमियम भरण्याची मुदत निवडा.

premium-amount

टप्पा 3

कोटेशन मिळवा आणि तपासून पहा

मिळालेले कोटेशन तपासून पहा. प्लॅन तुमच्या अपेक्षा आणि बजेट पूर्ण करत असल्याची खात्री करा.

select-stategy

टप्पा 4

आमच्या तज्ञांशी बोला

पुढील मार्गदर्शनासाठी आमच्या जाणकार विक्री प्रतिनिधींशी संपर्क साधा.

make-payments

टप्पा 5

पैसे भरा

तुमची इच्छित पॉलिसी मिळवण्यासाठी पैसे भरून करून तुमचा अर्ज पूर्ण करा.

make-payments

पात्रता निकष

प्रवेशाच्या वेळी वय

Question
प्रवेशाच्या वेळी वय
Answer
  • 7x च्या मृत्यू लाभासाठी
    • 12-वर्षांचा पॉलिसी कालावधी: 46 - 50 वर्षे
    • 15-वर्षांचा पॉलिसी कालावधी: 46 - 50 वर्षे
  • 10x च्या मृत्यू लाभासाठी:
    • 12-वर्षांचा पॉलिसी कालावधी: 6 - 45 वर्षे
    • 15-वर्षांचा पॉलिसी कालावधी: 3 - 45 वर्षे

 

Tags

परिपक्वतेच्या वेळी वय

Question
मॅच्युरिटीच्या वेळी वय
Answer
  • 7x चा मृत्यू लाभ: 18 – 65 वर्षे
  • 10x चा मृत्यू लाभ: 18 – 60 वर्षे
Tags

प्रीमियम पेमेंट टर्म (पीपीटी)

Question
प्रीमियम पेमेंट टर्म (पीपीटी)
Answer

5/7 वर्षे

Tags

पॉलिसी मुदत (पीटी)

Question
पॉलिसी मुदत (पीटी)
Answer

12 वर्षे; 15 वर्षे

Tags

किमान प्रीमियम रक्कम

Question
किमान प्रीमियम रक्कम
Answer
  • एक वर्षासाठी : ₹12,000
  • अर्ध-वर्षासाठी : ₹6,000 
  • त्रैमासिकसाठी : ₹3,000 
  • मासिकसाठी: ₹1,000

 

Tags

मृत्यूनंतर विमा रक्कम

Question
मृत्यूनंतर विमा रक्कम
Answer

किमान: ₹84,000 

 

कमाल: ₹5,00,000

Tags

इंडियाफर्स्ट लाईफमुळे लोकांना काय फायदा झाला आहे

उत्कृष्ट ग्राहक सेवा

पॉलिसीशी संबंधित सर्व तपशील संयमाने समजावून सांगण्यात आणि तुमच्या वेबसाइटवरून फॉर्म डाउनलोड करण्यात तुम्ही मला केलेली मदत प्रशंसनीय आहे.

विनय कुमार वर्मा

(मुंबई, 16 जून 2022)

इंडियाफर्स्ट लाईफमुळे लोकांना काय फायदा झाला आहे

उत्कृष्ट ग्राहक सेवा टीम

तुमची ग्राहक सेवा टीम उत्कृष्ट आहे. माझ्या एचआरकडे जमा करण्यासाठी मला इनवॉइस तातडीने पाहिजे होते, आणि आश्वासन दिल्याप्रमाणे तुमच्या टीमकडून मला दिलेल्या तारखेला माझे इनवॉइस मिळाले.

जतिन राव

(कर्नाटक, 7 मार्च 2022)

इंडियाफर्स्ट लाईफमुळे लोकांना काय फायदा झाला आहे

समस्या सोडवण्याचे उत्कृष्ट कौशल्य

इंडियाफर्स्ट लाईफ इन्शुरन्सची ग्राहक सेवा टीम उत्कृष्ट आहे. कर्मचारी ग्राहकांच्या समस्या समजून घेतात आणि ते खुपच सहकार्यपूर्ण आणि मदतशील आहेत.

झियाउद्दीन मलिक

(उत्तर प्रदेश, 4 मार्च 2022)

आम्ही काय मदत करू शकतो?

View All FAQ

इंडियाफर्स्ट लाईफ सरल बचत बीमा प्लॅन काय आहे?

Answer

हा एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, इंडिविज्युअल, लिमिटेड प्रीमियम, सेविंग्ज लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आहे, जी फक्त 5/7 वर्षांचा पेमेंटचा कमी कालावधी पुरवीत नाही, तर तुम्हाला 12 किंवा 15 वर्षांच्या दीर्घ कालावधीसाठी सुरक्षा देत एकाच पॉलिसीमध्ये बचत आणि संरक्षण दोन्ही प्रदान करते. एवढेच नव्हे, तर ही पॉलिसी दरवर्षी खात्रीशीर लाभ, पहिल्या वर्षात अपघाती मृत्यू लाभ, कोणत्याही वैद्यकीय चाचण्यांशिवाय अंत्यविधीसाठी कव्हर आणि जलद प्रक्रिया उपलब्ध करून देते.

ही पॉलिसीचे काम कसे चालते?

Answer

आम्ही नमुना उदाहरणासह पॉलिसीची कार्यपद्धती खाली स्पष्ट केली आहे.

श्री. गोंजाल्विस, वय 25 वर्षे यांनी 15 वर्षांच्या पॉलिसी कालावधीसाठी इंडियाफर्स्ट लाईफ सरल बचत बीमा प्लॅन खरेदी केला. त्यांनी रु. 1,69,200 च्या सम अशुअर्डसाठी 7 वर्षांसाठी 24,000 चा वार्षिक प्रीमियम भरला.

पॉलिसी कालावधीच्या शेवटी, त्यांना गॅरंटीड  अॅडिशन्ससह रु. 2,80,080 मिळतील.

जरी पॉलिसीच्या कालावधीत, पॉलिसीच्या 10 व्या वर्षात त्यांचा मृत्यू झाला, तरी त्यांच्या प्रियजनांना रु. 2,95,440 च्या मृत्यू लाभासह संरक्षण मिळेल. त्यांचे नामनिर्देशित व्यक्ती मृत्यू लाभ एकगठ्ठा रक्कम किंवा 5 वर्षांच्या कालावधीत उत्पन्न यातील पर्याय निवडू शकतील.

7 वर्षांच्या प्रीमियम पेमेंट कालावधीसह 12 वर्षे आणि 15 वर्षांच्या पॉलिसी कालावधीसाठी नमुनादाखल मॅच्युरिटी रक्कम 

वयवार्षिक प्रीमियमपॉलिसी कालावधी 12 वर्षेपॉलिसी कालावधी 15 वर्षे
परिपक्वतेवर विमा रक्कमपरिपक्वतेवर विमा रक्कम
25 वर्षे25,0001,72,500 1,76,250
35 वर्षे25,0001,70,0001,73,750 
45 वर्षे25,0001,62,5001,66,250 

 

या पॉलिसीसाठी पात्रतेचे कोणते मुलभूत निकष आहेत (उत्पादनावर एक नजर)?

Answer
निकषतपशील
प्रवेशाच्या वेळी किमान वय6 वर्षे12 वर्षांच्या पॉलिसी कालावधीसाठी10x चा मृत्यू लाभ
3 वर्षे15 वर्षांच्या पॉलिसी कालावधीसाठी10x चा मृत्यू लाभ
46 वर्षे12 वर्षांच्या पॉलिसी कालावधीसाठी7x चा मृत्यू लाभ
46 वर्षे15 वर्षांच्या पॉलिसी कालावधीसाठी7x चा मृत्यू लाभ
प्रवेशाच्या वेळी कमाल वय10x चा मृत्यू लाभ45 वर्षे
7x चा मृत्यू लाभ50 वर्षे
परिपक्वतेच्या वेळी किमान वय18 वर्षे
परिपक्वतेच्या वेळी कमाल वय10x चा मृत्यू लाभ60 वर्षे
7x चा मृत्यू लाभ65 वर्षे
प्रीमियम पेमेंट टर्म5 / 7 वर्षे
पॉलिसी टर्म12 वर्षे, 15 वर्षे
मृत्यूवर विमा लाभकिमानकमाल
रु. 84,000रु.. 5,00,000
Premium (Rs.)किमानकमाल
रु. 12,000रु. 50,000 
रु. 6,000
रु. 3,000
रु. 1,000
प्रीमियम भरण्याचे मार्ग आणि मोडल घटकप्रीमियमची वारंवारतावार्षिक प्रीमियमसाठी लागू करावयाचे घटक
वार्षिक1.0000
अर्ध-वार्षिक0.5119
त्रैमासिक0.2590
मासिक0.0870

 

टिप:

अ. अल्पवयीनाच्या आयुष्यासाठी जोखमीचे कवर त्वरित सुरु होते. अल्पवयीन जीवन आश्वस्ताच्या अंतर्गत खालील अटी लागू आहेत. 

 

  • जेव्हापण जीवन आश्वस्त प्रौढ होतो, म्हणजेच 18 वर्षांचा होतो, पॉलिसी जीवन आश्वस्तावर निहित होईल
  • जीवन आश्वस्त अल्पवयीन असताना विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, जीवित आई/वडील किंवा कायदेशीर पालक, ज्याचे अल्पवयीनाच्या आयुष्यावर विमा योग्य हित असते, तो विमाधारक असतो.

ब. निर्दिष्ट वय शेवटच्या वाढदिवसानुसार असते.

क. वार्षिक प्रीमियम ही विमाधारकाने निवडलेल्या वर्षात कर, रायडर प्रीमियम, अंडररायटिंग अतिरिक्त प्रीमियम्स आणि मोडल प्रीमियम्ससाठी लोडिंग, जर असल्यास, वगळून देय असलेली प्रीमियमची रक्कम असेल.

 

ड. एकूण भरलेले प्रीमियम्स म्हणजे कोणतेही अतिरिक्त प्रीमियम, रायडर प्रीमियम आणि लागू कर वगळता प्राप्त झालेल्या सर्व प्रीमियम्सची एकूण संख्या असते.

पॉलिसी कालावधीच्या अखेरीस तुम्हाला काय मिळेल (मॅच्युरिटी लाभ)?

Answer

विमाधारकाच्या मृत्यूच्या प्रकरणात, पॉलिसी लागू असल्यास किंवा पूर्णपणे भरलेली असल्यास खालील मृत्यू लाभ नामनिर्देशित व्यक्तीला/व्यक्तींना दिला जाईल. निर्धारित मृत्यू लाभ दिला जातो आणि पॉलिसी समाप्त होते.

नामनिर्देशित व्यक्तींना यांच्यापैकी जास्त असेल ते मिळेल:

 

अ. मृत्यूवर लाईफ अशुअर्ड  (एसएडी) अधिक जमा झालेले गॅरंटीड अॅडिशन्स (मृत्युच्या तारखेपर्यंत जर असल्यास) किंवा

ब. मृत्युच्या तारखेपर्यंत भरलेल्या एकूण प्रीमियम्सच्या 105%

 

जेथे मृत्यूवर लाईफ अशुअर्ड  (एसएडी) वार्षिक प्रीमियमच्या किंवा एक निव्वळ आश्वस्त रकमेच्या (मुलभूत लाईफ अशुअर्ड ) X पटीपेक्षा जास्त असते. 3 ते 45 वर्षे वयांसाठी X 10 आहे आणि 46 पेक्षा जास्त वर्षे वयांसाठी ते 7 आहे.

 

तुम्ही खंड 6 मध्ये निर्दिष्ट केल्यानुसार वेव्हर ऑफ प्रीमियम रायडरसाठी देखील पर्याय निवडू शकता. अधिक तपशिलांसाठी कृपया रायडर ब्रोशर पहा.

.पॉलिसीच्या कालावधी दरम्यान विमाधारकाच्या मृत्युच्या दुर्दैवी प्रसंगी, त्याच्या नामनिर्देशित व्यक्तीला/व्यक्तींना मृत्यू लाभ एकगठ्ठा रक्कम किंवा 5 वर्षांच्या कालावधीत मासिक उत्पन्न म्हणून दिले जाते.  

 

टिप: मृत्यू लाभ विमाधारक/ नामनिर्देशित व्यक्तीने/व्यक्तींनी पॉलिसी कालावधी दरम्यान किंवा जीवन विमाधारकाच्या मृत्यूच्या वेळी निवडलेप्रमाणे 5 वर्षांच्या कालावधीत एकगठ्ठा रक्कम म्हणून किंवा मासिक हप्त्यांमध्ये दिले जाईल. हप्त्यांमध्ये मृत्यू लाभ देण्याच्या बाबतीत; मासिक हप्त्याची रक्कम वार्षिकी घटकासह मृत्यू लाभाचा गुणाकार करून मोजली जाईल, जेथे मृत्यूच्या तारखेनुसार प्रचलित एसबीआय बचत बँकेच्या व्याजदराच्या आधारे वार्षिकी घटक निश्चित केला जाईल. एकदा हप्ते देणे सुरू झाले की, हे पैसे संपूर्ण हप्त्याच्या कालावधीत समान राहतील. प्रचलित एसबीआय बचत बँक व्याज दर प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी होणाऱ्या पुनरावलोकनाच्या अधीन असेल.



वरील बाबीसोबत, पॉलिसीच्या पहिल्या वर्षी अपघातामुळे मृत्यू झाल्यास मृत्यूवर आश्वस्त रकमेच्या (एसएडी) समान रक्कम देय असेल.
पॉलिसी पीओएस चॅनलद्वारा प्राप्त केलेली असेल, तर जोखीम स्वीकारण्याच्या तारखेपासून पहिल्या 90 दिवसांपर्यंत प्रतीक्षा कालावधी असेल.


पीओएस चॅनलद्वारा प्राप्त केलेल्या पॉलिसीसाठी मृत्यू लाभ:

जर मृत्यू झाला (अपघाताखेरीज)

i) प्रतीक्षा कालावधी दरम्यान- भरलेल्या प्रीमियमच्या 100%

ii) प्रतीक्षा कालावधी संपल्यावर- मृत्यूवर लाईफ अशुअर्ड

अपघाती मृत्यूवर किंवा पॉलिसीच्या पुनरुज्जीवनाच्या प्रकरणी प्रतीक्षा कालावधी लागू असणार नाही.

 

अंत्यविधी कवर: मृत्यूवर आश्वस्त रकमेच्या 10% किंवा रु. 25,000 (जि कमी असेल) देय असेल आणि विमाधारकाच्या मृत्युच्या सूचनेवर आगाऊ दिली जाईल. हा एक अतिरिक्त लाभ नसेल. अंत्यविधी कवर म्हणून दिलेली रक्कम देय मृत्यू लाभाच्या रकमेतून कापली जाईल.

या पॉलिसीमध्ये गॅरंटीड अॅडिशन्स काय आहेत?

Answer

तुमची पॉलिसी एकूण भरलेल्या प्रीमियम्सच्या X% च्या गॅरंटीड अॅडिशन्स देते, जिथे X पॉलिसी कालावधी आणि वार्षिक प्रीमियमनुसार बदलते, जे खालील तक्त्यामध्ये दिले आहे:-

12 वर्षांच्या पॉलिसी कालावधीसाठी

वार्षिक प्रीमियम 

(रु.)

गॅरंटीड अॅडिशन्स
25,000 पेक्षा कमी4.75%
25,000 ते 34,9995.00%
35,000 आणि अधिक 5.25%

 

15 वर्षांच्या पॉलिसी कालावधीसाठी

 

वार्षिक प्रीमियम (रु.)गॅरंटीड अॅडिशन्स
25,000 पेक्षा कमी5.50%
25,000 ते 34,9995.75%
35,000 आणि अधिक 6.00% 

 

गॅरंटीड अॅडिशन्स प्रत्येक पॉलिसी वर्षाच्या अखेरीस गोळा होईल, या अटीवर की अशा गॅरंटीड अॅडिशन्सच्या वेळी पॉलिसी चालू असेल.

वार्षिक प्रीमियम ही तुम्ही निवडलेल्या वर्षात कर, रायडर प्रीमियम, अंडररायटिंग अतिरिक्त प्रीमियम्स आणि मोडल प्रीमियम्ससाठी लोडिंग, जर असल्यास, वगळून देय असलेली प्रीमियमची रक्कम असेल. एकूण भरलेले प्रीमियम म्हणजे, कोणतेही अतिरिक्त प्रीमियम, रायडर प्रीमियम आणि लागू कर वगळता प्राप्त झालेल्या सर्व प्रीमियम्सची बेरीज असेल.

पॉलिसी कालावधीच्या अखेरीस तुम्हाला काय मिळेल (परिपक्वता लाभ)?

Answer

तुम्ही पॉलिसी कालावधीच्या अखेरीस मॅच्युरिटी लाभ म्हणून परिपक्वतेवर लाईफ अशुअर्ड  (एसएएम) अधिक गोळा झालेले गॅरंटीड अॅडिशन्स मिळण्यास पात्र असाल, या अटीवर की तुम्ही पॉलिसी कालावधीच्या अखेरपर्यंत जीवित असाल आणि पॉलिसी चालू असेल आणि पूर्ण पैसे भरलेले असतील.

मॅच्युरिटी लाभाची रक्कम दिल्यावर, पॉलिसी समाप्त होईल, आणि आणखी कोणतेही लाभ देय राहणार नाहीत.

मॅच्युरिटीवर लाईफ अशुअर्ड  (एसएएम) म्हणजे पॉलिसीच्या मॅच्युरिटीच्या वेळी वर देय गॅरंटीड रक्कम असते.

या पॉलिसीमध्ये रायडर्स उपलब्ध आहेत का?

Answer

होय, तुम्ही या पॉलिसीमध्ये खालील रायडरचा पर्याय निवडू शकता-

अ. इंडियाफर्स्ट लाईफ वेव्हर ऑफ प्रीमियम (डब्ल्यूओपी) रायडर (यूआयएन: 143B017V01)

इंडियाफर्स्ट लाईफ वेव्हर ऑफ प्रीमियम रायडर

हा रायडर निवडल्यावर विमाधारकाचा/लाईफ अशुअर्डच्या  मृत्यू, अपघातामुळे पूर्ण कायमस्वरूपी अपंगत्व किंवा गंभीर आजाराचे निदान झाल्यास, निवडलेल्या रायडर पर्यायानुसार च्या तुमच्या मूळ पॉलिसीचे भविष्यातील प्रीमियम्स माफ करून तुम्हाला आधार देतो. विमाधारक/लाईफ अशुअर्डचे पर्याय खाली नमूद केल्याप्रमाणे आहेत.

पर्यायलाभ
मृत्यू झाल्यास प्रीमियमची माफीहा पर्याय रायडर आणि मूळ पॉलिसी चालू असल्यास, विमाधारकाचा  मृत्यू झाल्यास मूळ पॉलिसीच्या अंतर्गत आणि भविष्यातील सर्व बाकी देय प्रीमियम्स माफ करण्याचा लाभ देतो. 
अपघातामुळे पूर्ण कायमस्वरूपी अपंगत्व  किंवा गंभीर आजार (च्या निदानाच्या)  असल्यास प्रीमियमची माफीहा पर्याय पुढील सर्व घटनांपैकी एकतर किंवा एकाच वेळी घडणाऱ्या मूळ पॉलिसी अंतर्गत बाकी व देय असलेले भविष्यातील सर्व प्रीमियम्स माफ करण्याचा लाभ देतो; रायडर आणि मूळ पॉलिसी चालू असल्यास, रायडर लाईफ अशुअर्डच्या अपघाती एकूण कायमस्वरूपी अपंगत्व किंवा रायडर अंतर्गत समाविष्ट असलेला कोणताही गंभीर आजार रायडर लाईफ अशुअर्डला  असल्याचे निश्चित निदान झाल्यास .
मृत्यू झाल्यावर किंवा अपघातामुळे पूर्ण कायमस्वरूपी अपंगत्वाच्या किंवा गंभीर आजाराच्या प्रकरणी प्रीमियमची माफीहा पर्याय खालीलपैकी कोणत्याही एका घटनेच्या आधी घडलेल्या मूळ पॉलिसीच्या अंतर्गत भविष्यातील सर्व बाकी आणि देय प्रीमियम्स माफ करण्याचा लाभ देतो- रायडर आणि मूळ पॉलिसी चालू असण्याच्या अटीवर, रायडर लाईफ अशुअर्डचा मृत्यू किंवा विमाधारकाचे अपघाती एकूण कायमस्वरूपी अपंगत्व किंवा रायडर अंतर्गत समाविष्ट असलेल्या कोणत्याही गंभीर आजार रायडर लाईफ अशुअर्डला झाल्याचे निश्चित निदान झाल्यावर हा पर्याय निवडण्यासाठी, मूळ पॉलिसीच्या अंतर्गत लाईफ अशुअर्ड आणि पॉलिसीधारक वेगवेगळ्या व्यक्ती असल्या पाहिजेत.

मी प्रीमियम्सच्या नूतनीकरणासाठी आधी पैसे भरल्यास मला सूट मिळेल का?

Answer

तुम्ही प्रीमियमच्या देय तारखेच्या किमान 12 महिने आधीच्या तारखेला  प्रीमियम भरल्यास आम्ही नूतनीकरण प्रीमियमच्या रकमेवर सूट देऊ, हा कालावधी प्रीमियम देय तारखेच्याच  आर्थिक वर्षात येईल. एका आर्थिक वर्षातील देय प्रीमियम, सवलतीसाठी पात्र होण्यासाठी, प्रीमियमच्या देय तारखेच्या जास्तीत जास्त तीन महिन्यांच्या आधीच्या आर्थिक वर्षात गोळा केला जाऊ शकतो. प्रीमियम त्याच्या देय तारखेच्या आधी एक महिन्याच्या आत भरल्यास कोणतीही सवलत दिली जाणार नाही.

या पॉलिसीमध्ये मला कर्ज मिळू शकते का?

Answer

होय, या पॉलिसीच्या अंतर्गत तुम्हाला कर्ज सुविधा मिळू शकते.

कोणत्याही वेळी तुम्हाला मिळू शकणाऱ्या कर्जाची रक्कम सरेंडर मूल्यावर अवलंबून असेल. तुम्ही प्राप्त केलेल्या सरेंडर मूल्याच्या, जर असल्यास, 70% पर्यंत कर्ज घेऊ शकता. तुम्हाला मिळू शकणारी किमान कर्ज रक्कम रु. 1000 असेल. आर्थिक वर्ष 2021-22 साठी कर्जावरील सध्याचा व्याज दर 9% प्रति वर्ष आहे. (सरळ व्याज) जे वेळोवेळी बदलू शकते. कर्जावरील व्याजदराच्या गणनेसाठी वापरला जाणारा आधार म्हणजे गेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस 10-वर्षाचा जी-सेक दर अधिक 50 बेसिस पॉइंटपर्यंत राउंड अप केलेल्या 250 बेसिस पॉइंट्सचे परिपूर्ण मार्जिन असते. हा व्याज दर पुढील आर्थिक वर्षात लागू होईल. कर्जाच्या व्याज दराच्या गणनेच्या आधारातील कोणताही बदल आयआरडीएआय कडून पूर्व परवानगी घेऊन केला जाऊ शकेल.

कर्ज घेतल्यावर, पॉलिसी आम्हाला सोपविण्यात येईल. तुम्ही व्याजासह संपूर्ण कर्जाची परतफेड केल्यावर तुम्हाला ही पॉलिसी परत सोपवू. आम्ही नामनिर्देशित व्यक्ती/नियुक्त व्यक्ती/कायदेशीर वारसांना मृत्यू लाभ देण्यापूर्वी किंवा लाईफ अशुअर्डला मॅच्युरिटी लाभ देण्यापूर्वी व्याजासह थकीत कर्जाची रक्कम वसूल करू. जेव्हा कर्जाची मुद्दल रक्कम व्याजासह पेड-अप पॉलिसीसाच्या सरेंडर मूल्यापेक्षा जास्त होते, तेव्हा आम्ही सक्तीने पॉलिसी सरेंडर करू आणि व्याजासह थकित कर्जाची रक्कम सरेंडर मूल्य किंवा पेड-अप बेनिफिटमधून वसूल केली जाईल. चालू पॉलिसींना सक्तीचे सरेंडर लागू होणार नाही. चालू असलेल्या पॉलिसींसाठी, व्याजासह थकित कर्ज सरेंडर मूल्याच्या 90% पेक्षा जास्त झाल्यास, कंपनी विमाधारकाला कर्जाची अंशतः किंवा पूर्ण परतफेड करण्यासाठी नोटीस पाठवेल. नोटीस मिळाल्यानंतर कर्जाची परतफेड न केल्यास, आम्ही कोणत्याही लाभाचे पैसे देण्याअगोदर व्याजासह थकित कर्ज वजा करू. व्याजासह थकित कर्ज वसूल केल्यानंतर, उर्वरित लाभ, उरले असल्यास, देय असतील.

चुकलेल्या प्रीमियम्ससाठी वाढीव कालावधी असतो का?

Answer

आम्ही तुम्हाला वाढीव कालावधी प्रदान करतो जो प्रीमियमच्या देय तारखेपासून प्रीमियम भरण्यासाठी दिलेला वेळ असतो, ज्या दरम्यान पॉलिसी जोखीम कव्हरसह लागू आहे असे मानले जाते.

जर तुम्ही तुमचे देय प्रीमियम देय तारखांवर भरण्यास चुकला असाल, तर तुम्हाला मासिक मोड अंतर्गत 15 दिवसांचा अतिरिक्त कालावधी दिला जातो, परंतु इतर प्रीमियम पेमेंट मोडसाठी एक महिन्याचा, पण 30 दिवसांपेक्षा कमी नसेल. लाईफ अशुअर्डचा मृत्यू झाल्यास किंवा वाढीव कालावधी दरम्यान निवडलेल्या लाभाच्या पर्यायानुसार कोणतीही समाविष्ट केलेली घटना घडल्यास, आम्ही मृत्यूच्या तारखेपर्यंत न भरलेले देय प्रीमियम वजा करून लाभ देऊ. या कालावधीत पॉलिसी लागू असल्याचे मानले जाईल.

या पॉलिसीमध्ये प्रीमियमच्या देय तारखेपासून वार्षिक, अर्ध-वार्षिक आणि त्रैमासिक वारंवारतेसाठी 30 दिवसांचा आणि मासिक वारंवारतेसाठी 15 दिवसांचा वाढीव कालावधी आहे. या कालावधीत लाईफ अशुअर्डचा मृत्यू झाल्यास, मृत्यूच्या घटनेच्या तारखेपूर्वी देय प्रीमियम वजा केल्यानंतर मृत्यू लाभ, नामनिर्देशित व्यक्ती/नियुक्त/कायदेशीर वारसांना दिला जाईल.

या पॉलिसीत कर लाभ कोणते आहेत?

Answer

प्रचलित आयकर कायद्यांनुसार भरलेल्या प्रीमियम्सवर आणि मिळणाऱ्या लाभांवर कर लाभ मिळू शकतात. हे सरकारच्या कर कायद्यानुसार वेळोवेळी होणाऱ्या बदलांच्या अधीन असतील. ही पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी कृपया तुमच्या कर सल्लागाराशी संपर्क साधा.

तुम्ही प्रीमियम्स भरणे चुकल्यास काय होईल?

Answer

वाढीव कालावधीत पॉलिसीच्या अंतर्गत देय प्रीमियम्स न भरल्यास, जर पॉलिसीने गॅरंटीड सरेंडर मूल्य प्राप्त केले नसेल पॉलिसी लॅप्स होईल.

पूर्ण दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीचे प्रीमियम भरले असल्यास पॉलिसी कोणत्याही पेड-अप मूल्याशिवाय लॅप्स होईल. परंतु, तुम्ही तुमची लॅप्स झालेली पॉलिसी पुनरुज्जीवन कालावधीमध्ये पुन्हा चालू करू शकता. जर पॉलिसी लॅप्स झाली असेल आणि पुनरुज्जीवन कालावधीत पुनरुज्जीवित केली गेली नसेल, तर पुनरुज्जीवन कालावधी संपल्यानंतर कोणताही लाभ न देता ती मुदतपूर्व समाप्त केली जाईल. अधिक माहितीसाठी तुम्ही रिव्हायवलवर  सेक्शन13 पाहू शकता.

जर सर्व प्रीमियम किमान (2) सलग दोन पॉलिसी वर्षांसाठी पूर्ण भरले गेले असतील आणि त्यापुढील देय प्रीमियम भरले गेले नाहीत, तर पहिल्या न भरलेल्या प्रीमियमच्या तारखेपासून वाढीव कालावधीच्या समाप्तीनंतर पॉलिसीला  पेड-अप मूल्य मिळेल.

टिप: 

  • कमी केलेली पेड-अप पॉलिसी, अटींच्या अधीन राहून, पहिल्या न भरलेल्या प्रीमियमच्या तारखेपासून पाच वर्षांच्या आत (मूळ फायद्यांसह) पुनरुज्जीवित केली जाऊ शकते.
  • जर कमी केलेली पेड-अप पॉलिसी पुनरुज्जीवन कालावधी दरम्यान पुनरुज्जीवित केली नाही, तर ती मॅच्युरिटीपर्यंत किंवा मृत्यूपर्यंत किंवा पॉलिसीच्या सरेंडरपर्यंत कमी झालेल्या पेड अप मोडमध्येच राहील.

पॉलिसी एकदा पेड-अप झाली:

  • कमी झालेल्या पेड-अप पॉलिसीच्या अंतर्गत मृत्यू लाभ: पॉलिसी कालावधी दरम्यान मृत्यूवर, लागू होणारा लाभ हा मृत्यूवरील पेड-अप लाईफ अशुअर्ड  अधिक जमा झालेले गॅरंटीड   ॲडिशन्स असेल; जेथे मृत्यूवरील पेड-अप सम अशुअर्ड म्हणजे मृत्यू झाल्यावर  सम अशुअर्ड  अशी केली जाते * (भरलेल्या प्रीमियम्सची एकूण संख्या) / (पॉलिसी कालावधी दरम्यान देय प्रीमियम्सची एकूण संख्या).
  • कमी झालेल्या पेड-अप पॉलिसी अंतर्गत मॅच्युरिटी लाभ: पॉलिसी कालावधी संपेपर्यंत लाईफ अशुअर्ड जीवित राहिल्यास, मॅच्युरिटी लाभ हा परिपक्वतेवरील पेड-अप लाईफ अशुअर्ड  अधिक जमा झालेली गॅरंटीड   ॲडिशन्स असेल; जेथे मॅच्युरिटी झाल्यावर  पेड-अप सम अशुअर्डची व्याख्या मॅच्युरिटीच्या वेळी  गॅरंटीड लाईफ अशुअर्ड  म्हणून केली जाते * (भरलेल्या प्रीमियम्सची एकूण संख्या)/ (पॉलिसी कालावधी दरम्यान देय प्रीमियमची एकूण संख्या)

कोणत्याही परिस्थितीत, वर उल्लेख केल्याप्रमाणे मृत्यू किंवा मॅच्युरिटीच्या  वेळी दिलेले एकूण लाभ या पॉलिसीच्या अंतर्गत भरलेल्या एकूण प्रीमियम्सपेक्षा कमी नसावेत.

पॉलिसी पुनरुज्जीवित करण्यासाठी तुमच्याकडे काय पर्याय आहेत?

Answer

तुम्ही तुमच्या पॉलिसीचे पुनरुज्जीवन पहिल्या न भरलेल्या नियमित प्रीमियमच्या देय तारखेपासून 5 वर्षांच्या आत, परंतु पॉलिसी कालावधी समाप्त होण्याच्या अगोदर करू शकता, त्यासाठी तुम्हाला-

  • व्याजासह सर्व न भरलेले प्रीमियम्स भरावे लागतील; आणि
  • बोर्डद्वारा मंजूर अंडररायटिंग पॉलिसीच्या अनुसार उत्तम आरोग्याचा पुरावा द्यावा लागेल, गरज भासल्यास

लॅप्स झालेली पॉलिसी फक्त आमच्या बोर्डद्वारा मंजूर अंडररायटिंग पॉलिसीच्या अनुषंगाने त्याच्या सर्व लाभांसह पुनरुज्जीवित केली जाईल. पॉलिसी पुनरुज्जीवित केल्यास, पॉलिसीच्या अटी आणि शर्तींनुसार चालू पॉलिसीसाठी सर्व फायदे पुन्हा चालू होतील. . लॅप्स झालेल्या पॉलिसीचे पुनरुज्जीवन केल्यावर, पॉलिसी ज्या कालावधीसाठी लॅप्स स्थितीत होती, त्या कालावधीसाठी गॅरंटीड   ॲडिशन्ससाठी पात्र होईल. पॉलिसी भविष्यातील गॅरंटीड  ॲडिशन्ससाठी देखील पात्र होईल. 

टिप: प्रीमियमचे पैसे भरण्यास विलंब झाल्यावर आर्थिक वर्ष 2021-22 साठी सध्या लागू असणारा सरळ व्याज दर 9.50% प्रति वर्ष आहे. कर्जावरील व्याजदराच्या गणनेसाठी वापरला जाणारा आधार म्हणजे गेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस 10-वर्षाचा जी-सेक दर अधिक 50 बेसिस पॉइंटपर्यंत राउंड अप केलेल्या 300 बेसिस पॉइंट्सचे परिपूर्ण मार्जिन असते. हा व्याज दर पुढील आर्थिक वर्षासाठी लागू होईल. कर्जाच्या व्याज दराच्या गणनेच्या आधारातील कोणताही बदल आयआरडीएआयकडून पूर्व परवानगी घेऊन केला जातो.

तुम्ही तुमची पॉलिसी सरेंडर करू शकता का?

Answer

तुमच्या पॉलिसीचे पूर्ण फायदे मिळण्यासाठी तुमची पॉलिसी चालू ठेवण्याचा सल्ला दिला जातो. तथापि, आम्ही जाणतो की ठराविक परिस्थितींमध्ये तुम्हाला तुमची पॉलिसी सरेंडर करावयाची गरज भासू शकते. पॉलिसीला पहिल्या दोन वर्षांचे प्रीमियम्स पूर्ण भरल्यानंतरच सरेंडर मूल्य प्राप्त होते.

तुम्ही तुमच्या पॉलिसीच्या कालावधीत तुमची पॉलिसी सरेंडर करू शकता. यासाठी पॉलिसीचे सरेंडर मूल्य प्राप्त झाल्यावर कधीही, तुम्ही आम्हाला एक विनंती करू शकता

सरेंडरवर दिली जाणारी रक्कम गॅरंटीड सरेंडर व्हॅल्यू (जीएसव्ही) आणि स्पेशल सरेंडर व्हॅल्यू (एसएसव्ही) यांच्यापैकी जास्त असणारी असेल.

गॅरंटीड सरेंडर व्हॅल्यू (जीएसव्ही)  


जीएसव्ही घटक सरेंडरच्या पॉलिसीचे वर्ष आणि पॉलिसी कालावधी यांच्यावर अवलंबून असेल, आणि त्याची गणना खालीलप्रमाणे केली जाईल.

प्रीमियमचा जीएसव्ही घटक * एकूण भरलेले प्रीमियम्स + गॅरंटीड ॲडिशनसाठी जीएसव्ही घटक * गोळा झालेले गॅरंटीड ॲडिशन्स

 

स्पेशल सरेंडर व्हॅल्यू (एसएसव्ही)

पूर्णपणे भरलेल्या पॉलिसीसाठी, म्हणजेच, सर्व नियमित प्रीमियम्स भरल्यानंतर:

एसएसव्हीची गणना खालीलप्रमाणे केली जाईल:

(परिपक्वतेवर गॅरंटीड लाईफ अशुअर्ड ) गुणिले सरेंडरच्या वेळी प्रचलित असलेला एसएसव्ही घटक + गोळा झालेले गॅरंटीड ॲडिशन्स गुणिले सरेंडरच्या वेळी प्रचलित असलेला एसएसव्ही घटक

कमी झालेल्या पेड-अप पॉलिसीसाठी:

एसएसव्हीची गणना खालीलप्रमाणे केली जाईल: 

परिपक्वतेवर पेड-अप लाईफ अशुअर्ड  गुणिले सरेंडरच्या वेळी प्रचलित असलेला एसएसव्ही घटक + गोळा झालेले गॅरंटीड अॅडिशन्स गुणिले सरेंडरच्या वेळी प्रचलित असलेला एसएसव्ही घटक.

एसएसव्ही घटक कंपनी वेळोवेळी आयआरडीएआयच्या पूर्व परवानगीच्या अधीन असलेल्या गुंतवणुकीच्या परिस्थितीचा विचार करून निर्धारित करेल.

गॅरंटीड सरेंडर मूल्याच्या घटकांबद्दल अधिक तपशिलांसाठी, कृपया परिशिष्ट I चा संदर्भ घ्या किंवा आमच्या वेबसाईटला भेट द्या: www.indiafirstlife.com किंवा तुमच्या आर्थिक सल्लागाराशी बोला.

वाढीव कालावधीच्या समाप्ती दरम्यान प्रीमियम न भरल्यास आणि पॉलिसीला सरेंडर मूल्य प्राप्त न झाल्यास; पॉलिसी लॅप्स होईल. सर्व लाभ बंद  होतील आणि त्या पॉलिसीच्या अंतर्गत कोणताही लाभ देय असणार नाही.

लाईफ अशुअर्डने आत्महत्या केल्यास काय होईल (आत्महत्या अपवाद)?

Answer

पॉलिसीच्या अंतर्गत जोखीम सुरु होण्याच्या तारखेपासून किंवा पॉलिसी पुनरुज्जीवित झाल्याच्या तारखेपासून 12 महिन्यांच्या आत आत्महत्येमुळे मृत्यू झाल्यास, लागू असल्यानुसार, लाईफ अशुअर्डच्या वारसाला किंवा लाभार्थीला मृत्यूच्या तारखेपर्यंत भरलेल्या एकूण प्रीमियम्सपैकी 80% किंवा मृत्यूच्या तारखेपर्यंत उपलब्ध सरेंडर मूल्य यापैकी जे जास्त असेल, ते मिळेल, पॉलिसी चालू असल्यास.

खोटी किंवा चुकीची माहिती सादर केल्यास काय होईल?

Answer

फसवणुकीच्या/चुकीच्या विधानासाठी वेळोवेळी केलेल्या सुधारणेनुसार, विमा कायदा, 1938 च्या खंड 45 च्या तरतुदींच्या अनुषंगाने कारवाई केली जाईल.

वेळोवेळी केलेल्या सुधारणेनुसार, विमा कायदा, 1938 चा खंड 45 असे म्हणतो की:

1) पॉलिसी लागू केल्याच्या तारखेपासून तीन वर्षे पूर्ण झाल्यावर कोणत्याही आधारावर जीवन विम्याच्या कोणत्याही पॉलिसीवर प्रश्न उचलले जाऊ शकत नाहीत. म्हणजेच, पॉलिसी जारी करण्याच्या तारखेपासून किंवा जोखीम सुरु होण्याच्या तारखेपासून किंवा पॉलिसीच्या पुनरुज्जीवनाच्या तारखेपासून किंवा पॉलिसीसाठी रायडरच्या तारखेपासून, जे नंतर असेल.

2) पॉलिसी लागू केल्याच्या तारखेपासून किंवा जोखीम सुरू होण्याच्या तारखेपासून किंवा पॉलिसीच्या पुनरुज्जीवनच्या तारखेपासून किंवा पॉलिसीच्या रायडरच्या तारखेपासून तीन वर्षांच्या आत, जे नंतर असेल, फसवणुकीच्या आधारावर कधीही जीवन विम्याच्या पॉलिसीवर प्रश्न केले जाऊ शकतात: या अटीवर की विमाकर्ता विमाधारकाला किंवा कायदेशीर प्रतिनिधी किंवा विमाधारकाच्या नामनिर्देशित व्यक्तीला किंवा नियुक्त केलेल्या व्यक्तींला, ज्या आधारावर आणि पुराव्यावर असा निर्णय घेतला असेल, तो लेखी स्वरुपात कळवेल.

3) उप-कलम (2) मध्ये काहीही असले तरी, कोणताही विमाकर्ता फसवणुकीच्या कारणास्तव जीवन विमा पॉलिसी नाकारू शकत नाही, जर विमाधारक हे सिद्ध करू शकत असेल की एखाद्या महत्त्वाच्या वस्तुस्थितीचे चुकीचे विधान किंवा लपवून ठेवणे त्याच्या सर्वोत्तम ज्ञान आणि विश्वासानुसार सत्य होते किंवा वस्तुस्थिती लपवण्याचा जाणीवपूर्वक उद्देश नव्हता किंवा वस्तुस्थितीबद्दलची अशी चुकीची विधाने किंवा लपवलेली गोष्ट विमाकर्त्याला माहिती होती: या अटीवर की, फसवणूक झाल्यास, विमाधारक जीवित नसल्यास, हे सिद्ध करण्याची जबाबदारी लाभार्थ्यांवर असते.

4) पॉलिसी जारी केल्याच्या तारखेपासून किंवा जोखीम सुरू होण्याच्या तारखेपासून किंवा पॉलिसीच्या पुनरुज्जीवनच्या तारखेपासून किंवा पॉलिसीच्या रायडरच्या तारखेपासून तीन वर्षांच्या आत कधीही जे नंतर असेल, फसवणुकीच्या कारणास्तव कधीही जीवन विम्याच्या पॉलिसीवर प्रश्न उचलले जाऊ शकतात, या आधारावर की, विमाधारकाच्या आयुष्याच्या अपेक्षेबद्दल  महत्त्वाच्या वस्तुस्थितीचे कोणतेही विधान किंवा लपवून ठेवलेले असेल किंवा इतर दस्तऐवजात चुकीचे प्रस्तुत केले असेल, ज्या आधारावर पॉलिसी दिली गेली किंवा पुनरुज्जीवित केली गेली किंवा रायडर दिले गेले असतील: या अटीवर की विमाकर्त्याने विमाधारकाशी किंवा कायदेशीर प्रतिनिधी किंवा विमाधारकाचे नामनिर्देशित व्यक्ती किंवा नियुक्त केलेल्या व्यक्तींशी ज्या आधारावर आणि पुराव्यावर असा निर्णय घेतला असेल, तो लेखी स्वरुपात कळविलेला असेल: या अटीवर की, नकाराचे कारण चुकीचे विधान किंवा महत्त्वाची तथ्ये लपवणे असेल, आणि कोणतीही फसवणूक नसेल, तर नकार देण्याच्या तारखेपर्यंत गोळा केलेले पॉलिसीचे प्रीमियम्स विमाधारकाला किंवा कायदेशीर प्रतिनिधीला किंवा विमाधारकाच्या नामनिर्देशित व्यक्तींना किंवा नियुक्त केलेल्या व्यक्तींना  नकाराच्या तारखेपासून नव्वद दिवसांच्या आत दिले जातील.

5) या कलमातील कोणतीही गोष्ट विमाकर्त्याला वयाचा पुरावा मागवण्यास कधीही प्रतिबंध करणार नाही, जर तो तसे करण्यास पात्र असेल, आणि कोणत्याही पॉलिसीवर केवळ यासाठी  प्रश्न विचारले  जाणार नाहीत कारण  लाईफ अशुअर्डचे वय प्रस्तावात चुकीचे नमूद केल्याचे आढळल्याने, पॉलिसीच्या अटी बदलल्या आहेत.

तुमच्या पॉलिसीमध्ये उपलब्ध असलेला फ्री लूक पिरीयड काय आहे?

Answer

तुम्ही फ्री लूक पिरीयडच्या कालावधीत तुमची पॉलिसी परत करू शकता.

तुम्हाला पॉलिसीच्या कोणत्याही अटी आणि शर्ती पटल्या नाहीत, तर तुमच्याकडे पॉलिसीच्या अटी आणि शर्तींचा आढावा घेण्याचा पर्याय असेल आणि जेथे तुम्ही कोणत्याही अटी आणि शर्तींसाठी असहमत असाल, तर तुमच्याकडे पॉलिसी मिळाल्याच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत तुमच्या आक्षेपासाठी कारणे देत, ती पॉलिसी रद्द करण्यासाठी विमाकर्त्याकडे परत करण्याचा पर्याय असेल. डिस्टन्स मार्केटिंग किंवा इलेक्ट्रॉनिक मोडवरून खरेदी केलेल्या पॉलिसीसाठी फ्री लूक पिरीयड 30 दिवसांचा असेल.

तुम्ही तुमची पॉलिसी रद्द केल्यावर तुम्हाला परतावा मिळतो का?

होय. तुम्हाला खालील रकमेइतका परतावा मिळेल-

भरलेले प्रीमियम

वजा: i. प्रो-राटा रिस्क प्रीमियम आणि रायडर प्रीमियम, जर असल्यास, पॉलिसी चालू असलेल्या कालावधीसाठी

वजा ii. भरलेली स्टँप ड्युटी

जेथे प्रो-राटा रिस्क प्रीमियम प्रीमियम हा कवरच्या कालावधीसाठी अनुपाती रिस्क प्रीमियम असतो. डिस्टन्स मार्केटिंगमध्ये खालील पद्धतींद्वारे विनंतीची प्रत्येक क्रिया (लीड जनरेशनसह) आणि विमा उत्पादनांची विक्री समाविष्ट असते: (i) व्हॉइस मोड, ज्यात टेलिफोनद्वारा कॉल करणे सामील असते; (ii) शॉर्ट मेसेजिंग सर्विसेस (एसएमएस); (iii) इलेक्ट्रॉनिक मोड, ज्यात इमेल, इंटरनेट आणि इंटरॅक्टिव्ह टेलिव्हिजन (डीटीएच); (iv) प्रत्यक्ष मार्ग, ज्यात थेट टपाल सेवा आणि वृत्तपत्र आणि मासिकातील पत्रके; आणि (v) व्यक्तिगत स्वरूपाशिवाय पत्रव्यवहाराच्या अन्य कोणत्याही मार्गे विनंती सामील असेल.

असे प्लॅन्स जे कदाचित तुम्हाला आवडतील !

IndiaFirst Life Guarantee Of Life Dreams Plan

Product Image

 

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ गॅरंटी ऑफ लाईफ ड्रिम्स प्लॅन

Dropdown Field
गारंटीड रिटर्न
Product Description

आपल्या स्वप्नांना पाठिंबा द्यायला जर आपल्याकडे उत्पन्नाचा दुसरा स्त्रोत असेल तर किती चांगले होईल नाही का? तुमच्या स्वप्नांना सत्यात आणण्याचा हा एक मार्ग आहे, ज्यायोगे तुम्ही 1ल्या महिनाअखेरीपासून उत्पन्न मिळवण्यास सुरुवात करु शकता.

Product Benefits
  • 3 उत्पन्न विकल्पांमधून निवड करता येईल
  • गॅरंटी असलेले दीर्घकालीन उत्पन्न
  • ऑनलाइन खरेदीवर 5%पर्यंत अतिरिक्त उत्पन्न
  • लाईफ इन्श्युरन्स कव्हर
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

Indiafirst Life Guaranteed Single Premium Plan

Product Image

 

Product Name

इंडियाफर्स्ट लाईफ गॅरंटेड सिंगल प्रीमियम प्लॅन

Dropdown Field
गारंटीड रिटर्न
Product Description

तुमच्या गुंतवणूकींवर 7 x परतावा मिळाला तर आश्चर्य वाटेल नाही का? तुमचा शोध इथे संपतो! या सिंगल पेमेंट प्लॅनसोबत, तुम्ही तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करु शकता.

Product Benefits
  • गुंतवणूकीवर खात्रीशीर 7 x रिटर्न्स
  • एकदाच पेमेंट (सिंगल पे)
  • कराच्या बचतीचे लाभ
  • 11.25 पटीने जास्त असलेले लाईफ कव्हर
Porduct Detail Page URL

कोट मिळवा

Product Buy Now URL and CTA Text

अधिक जाणून घ्या

इंडियाफर्स्ट लाईफ का?

1.6 कोटी

जीवनांना संरक्षण

list

7,000+

बीओबी आणि युबीआय शाखा

list

5000 कोटी

दावे सेटल केले

list

1 दिवसात

 

दाव्याच्या सेटलमेंटची खात्री

list

सर्वात जास्त शोधले गेलेले शब्द

1800 209 8700

ग्राहक सेवा क्रमांक

whatsapp

8828840199

ऑनलाइन पॉलिसी खरेदीसाठी

call

+91 22 6274 9898

आमच्यासोबत व्हॉट्सॲपवर चॅट करा

mail