जर तुम्ही पहिल्या वाढीव कालावधीमध्ये प्रीमियम भरणे चुकवल्यास पॉलिसीचे कोणतेही गॅरंटीड सरेंडर मूल्य झाले नसल्यास ती लॅप्स होते. रिस्क कव्हर बंद होते आणि लॅप्स झालेल्या पॉलिसीच्या स्थितीत कोणतेही भविष्यातले लाभ देय होत नाहीत.
तुम्ही पाहिलय दोन पॉलिसी वर्षांमध्ये प्रीमियम भरणे चुकवल्यास पॉलिसी लॅप्स होते. परंतु पुनरुज्जीवन कालावधी दरम्यान तुम्ही लॅप्स झालेली पॉलिसी पुनरुज्जीवीत करु शकता. या कालावधीत कोणतेही लाभ देय नसतील. पॉलिसी लॅप्स झाली असेल आणि पुनरुज्जीवन कालावधीच्या दरम्यान पुनरुज्जीवीत केली असल्यास, ती पुनरुज्जीवन कालावधीच्या समाप्तीवर कोणताहा लाभ न देता फोरक्लोज होईल. तुम्ही अधिक माहितीसाठी रिव्हायव्हलवरील खालील सेक्शन पाहू शकता.
पहिल्या न भरलेल्या प्रीमियमच्या दिनांकापासून वाढीव कालावधीच्या समाप्तीनंतर पॉलिसीला पेड-अप मूल्य मिळेल, जर किमान दोन(2) पूर्ण वर्षांचा प्रीमियम भरला गेला असेल आणि नंतरचे देय प्रीमियम भरले गेले नसतील.
टीप:
• रिड्यूस्ड पेड-अप पॉलिसी (मूळ लाभांना), पहिल्या न भरलेल्या प्रीमियमच्या दिनांकापासून पाच वर्षांच्या आत पुनरुज्जीवीत करता येऊ शकते, जे अटींच्या अधीन आहे.
• रिड्यूस्ड पेड-अप मोडमधली पॉलिसी जर पुनरुज्जीवन कालावधीत पुनरुज्जीवीत झाली नाही, तर ती मॅच्युरिटीपर्यंत किंवा मृत्यू पर्यंत किंवा पॉलिसीच्या सरेंडरपर्यंत रिड्यूस्ड पेड-अप मोडमध्ये सुरु राहते.
• पॉलिसी संपूर्णपणे पेड-अप होते, जर पॉलिसी कालावधीतले सर्व देय प्रीमियम भरले गेले असेलआणि देय लाभ पॉलिसीच्या अटी व शर्तींनुसार देय असतील.
एकदा पॉलिसी पेड-अप झाली:
• रिड्यूस्ड पेड-अप पॉलिसी अंतर्गत असलेला मृत्यू पश्चातचा लाभ:
पॉलिसी कालावधीत मृत्यू झाल्यास, रिड्यूस्ड पेड-अप दिला जातो आणि पॉलिसी बंद होते.
मृत्यू पश्चातचा लाभ म्हणजे मृत्यू झाल्यावरची पेड-अप सम अशुअर्ड होय, जिथे मृत्यू झाल्यावरची पेड-अप सम अशुअर्ड म्हणजे मृत्यू झाल्यावरची सम अशुअर्ड * (भरलेल्या एकूण प्रीमियम्सची संख्या) / ( पॉलिसी कालावधीत देय असलेले एकूण प्रीमियम) अधिक टर्मिनल बोनस, जाहिर केला असल्यास.
• रिड्यूस्ड पेड-अप पॉलिसी अंतर्गत सर्व्हायवल लाभ:
पॉलिसी रिड्यूस्ड पेड-अप स्थितीत असताना लाईफ अशुअर्डजीवित असल्यास, खालील लाभ प्रीमियम भरण्याच्या कालावधीच्या अखेरपासून ते मॅच्युरिटीपर्यंत देय होतील: पेड-अप गॅरंटीड सर्व्हायवल लाभ म्हणजेच गॅरंटीड सर्व्हायवल लाभ*(भरलेल्या एकूण प्रीमियम्सची संख्या) /( पॉलिसी कालावधीत देय असलेले एकूण प्रीमियम) अधिक रोख बोनस जर जाहिर केला असल्यास.
पॉलिसीधारकाने सुरुवातीला सर्व्हायवल लाभ डिफर करण्याची निवड केल्यास आणि नंतर पॉलिसी रिड्यूस्ड पेड-अप बनल्यास, मग पॉलिसीधारक पेड-अप गॅरंटीड सर्व्हायवल लाभ अधिक रोख बोनस, जर जाहिर केला असल्यास त्याचा लाभ घेतो. सदर लाभ व्याजासह, ते असल्यास एकत्रित करुन मृत्यूच्या, सरेंडर किंवा मॅच्युरिटीच्या स्वरुपात पॉलिसी रद्द केल्यास यापैकी आधी येणा-या स्थितीत देय होतात.
• रिड्यूस्ड पेड-अप पॉलिसी अंतर्गत मॅच्युरिटी लाभ:
पॉलिसी कालावधीच्या अखेरपर्यंत जीवित राहिल्यास खालील लाभ मिळतील:
मॅच्युरिटी लाभ म्हणजे मॅच्युरिटीवरील पेड-अप सम अशुअर्ड, जिथे म पेड-अप सम अशुअर्ड म्हणजे मॅच्युरिटीवरील गॅरंटीड सम अशुअर्ड * (भरलेल्या एकूण प्रीमियम्सची संख्या) / ( पॉलिसी कालावधीत देय असलेले एकूण प्रीमियम)
अधिक टर्मिनल बोनस
जर जाहिर केला असल्यास. कोणत्याही स्थितीत मृत्यू किंवा मॅच्युरिटीच्या स्थितीत वर दिल्यानुसार दिलेले एकूण लाभ या पॉलिसीच्या अंतर्गत असलेल्या एकूण भरलेल्या प्रीमियमपेक्षा कमी नसतील.