नोंदणीच्या वेळी वय
- Question
- नोंदणीच्या वेळी वय
- Answer
-
किमान
- 10 वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी 8 वर्षे
- 15 वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी 3 वर्षे
कमाल: 50 वर्षे
तुमच्यासाठी योग्य वेळ आम्हाला सांगा.
लाईफ इंश्युरन्स खरेदी करण्यासाठी तज्ञास विचारा
तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला प्राधान्य देत आहात हे जाणून आम्ही आनंदी आहोत. सर्वोत्तम इंश्युरन्स प्लान शोधण्यात आमचे लाईफ इंश्युरन्स तज्ञ तुम्हाला मदत करतील. कॉलची वेळ निश्चित करण्यासाठी, कृपया खालील काही तपशील शेयर करा.
पुरुष
महिला
इतर
तुमचे तपशील प्रविष्ट केल्याबद्दल धन्यवाद
तुमच्या मौल्यवान अभिप्रायांमुळे आम्हाला आमची सेवा सुधारण्यात आणि आणखी कार्यक्षम बनवण्यात महत्वाची भूमिका बजावते.
मुख्य वैशिष्ट्ये
तुमच्या योजनेची कल्पना करा
किमान
कमाल: 50 वर्षे
65 वर्षे
10 आणि 15 वर्षे
10 वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी
15 वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी
किमान: ₹1,50,000.
कमाल: हमीच्या अधीन कोणतीही मर्यादा नाही.
वार्षिक, अर्धवार्षिक, त्रैमासिक किंवा मासिक.
बोर्ड अनुमोदित हमी धोरणाच्या अधीन कोणतीही मर्यादा नाही
इंडियाफर्स्ट लाईफमुळे लोकांना काय फायदा झाला आहे
उत्कृष्ट ग्राहक सेवा
पॉलिसीशी संबंधित सर्व तपशील संयमाने समजावून सांगण्यात आणि तुमच्या वेबसाइटवरून फॉर्म डाउनलोड करण्यात तुम्ही मला केलेली मदत प्रशंसनीय आहे.
विनय कुमार वर्मा
(मुंबई, 16 जून 2022)
इंडियाफर्स्ट लाईफमुळे लोकांना काय फायदा झाला आहे
उत्कृष्ट ग्राहक सेवा टीम
तुमची ग्राहक सेवा टीम उत्कृष्ट आहे. माझ्या एचआरकडे जमा करण्यासाठी मला इनवॉइस तातडीने पाहिजे होते, आणि आश्वासन दिल्याप्रमाणे तुमच्या टीमकडून मला दिलेल्या तारखेला माझे इनवॉइस मिळाले.
जतिन राव
(कर्नाटक, 7 मार्च 2022)
इंडियाफर्स्ट लाईफमुळे लोकांना काय फायदा झाला आहे
समस्या सोडवण्याचे उत्कृष्ट कौशल्य
इंडियाफर्स्ट लाईफ इन्शुरन्सची ग्राहक सेवा टीम उत्कृष्ट आहे. कर्मचारी ग्राहकांच्या समस्या समजून घेतात आणि ते खुपच सहकार्यपूर्ण आणि मदतशील आहेत.
झियाउद्दीन मलिक
(उत्तर प्रदेश, 4 मार्च 2022)
सादर आहे इंडियाफर्स्ट लाईफ स्मार्ट पे प्लॅन, ज्यात लाईफ इन्शुरन्स आणि बचत प्लॅन एकत्रित आहे. हा फक्त स्मार्ट पेमेंट प्लॅनच नाही; तर एक आय कर-बचत योजना सुद्धा आहे. या मनी-सेविंग प्लॅनने, तुम्ही मर्यादित कालावधीसाठी प्रीमियम भरता, आणि या कालावधीच्या दरम्यान तुम्हाला काही रक्कम परत मिळू शकते. तुमचा एखादा प्रीमियम भरणा जरी चुकला, तरी तुमचे लाईफ कव्हर चालू राहते. या व्यतिरिक्त, जेव्हा हा स्मार्ट टर्म पेमेंट प्लॅन मॅच्युअर होतो, तेंव्हा बोनस (घोषित झाल्यास) तुम्हाला मिळू शकतो. कोणत्याही दुर्दैवी घटनेच्या प्रसंगी हा प्लॅन तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी लाईफ कव्हर सुद्धा देतो. हा अधिक लवचिकता आणि सुरक्षेसह तुमच्या आर्थिक लक्ष्यांपर्यंत पोहोचण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी तयार केलेला आहे.
फ्री लूक पिरियडच्या दरम्यान तुम्ही तुमची पॉलिसी परत करु शकता;
जर तुम्ही पॉलिसीच्या कोणत्याही अटी आणि नियमांशी असहमत असाल, तर तुमच्याकडे पॉलिसीच्या अटी आणि नियम तपासण्याचा पर्याय आहे आणि जर तुम्ही त्या अटी किंवा नियमांपैकी कशाशीही असहमत असाल, तर तुमच्याकडे पॉलिसी प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत तुमचा आक्षेपाचे कारण सांगून, पॉलिसी रद्द करण्यासाठी कंपनीकडे पॉलिसी परत पाठवण्याचा पर्याय आहे. डिस्टन्स मार्केटिंग किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने खरेदी केलेल्या पॉलिसींसाठी फ्री-लूक पिरियड 30 दिवसांचा असेल.
तुम्ही तुमची पॉलिसी रद्द करता तेव्हा तुम्हाला काही रिफंड मिळतो का?
होय. आम्ही पुढील रक्कम परत करू -
भरणा केलेला प्रीमियम
वजा: i. पॉलिसी ज्या कालावधीसाठी, कोणताही असल्यास, लागू होती त्यासाठी प्रो-रेटा जोखिम प्रीमियम आणि रायडर प्रीमियम
वजाii. भरलेली कोणताही स्टँप ड्युटी
वजाiii. वैद्यकीय तपासणीवर, कोणतीही केली असल्यास, झालेला खर्च
डिस्टन्स मार्केटिंग मध्ये खालील माध्यमांद्वारे इन्शुरन्स प्रोडक्ट्सच्या विक्री आणि विनंतीच्या प्रत्येक कृतींचा (लीड निर्मितीसह) समावेश आहे: (i) वॉइस मोड, ज्यात टेलिफोन कॉलिंगचा समावेश आहे; (ii) शॉर्ट मेसेजिंग सर्विस (एसएमएस); (iii) इलेक्ट्रॉनिक मोड ज्यात ई-मेल, इंटरनेट आणि इंटरॅक्टिव टिव्ही (डीटीएच) चा समावेश आहे; (iv) फिजिकल मोड ज्यात थेट पोस्टाने आणि वर्तमानपत्रे व मॅगझीनमधील पत्रकांचा ; आणि, (v) वैयक्तिकपणे सोडून संपर्काच्या इतर कोणत्याही माध्यमांद्वारे विनंती यांचा समावेश आहे.
होय, या प्लॅन अंतर्गत तुम्हाला कर्ज सुविधेचा लाभ मिळू शकतो.
कोणत्याही क्षणी तुम्ही घेऊ शकणाऱ्या कर्जाची रक्कम, सरेंडर मूल्यावर अवलंबून असेल. तुम्ही उपलब्ध सरेंडर मूल्याच्या 90% पर्यंत रक्कम कर्जाऊ घेऊ शकता. कर्जाची कमीत कमी रक्कम ₹ 1,000 असली पाहिजे. आम्ही प्रति वर्ष 10% च्या दराने व्याज आकारू, जो आयआरडीएआयच्या स्वीकृतीच्या अनुसार वेळोवेळी बदलला जाऊ शकतो. जेव्हा जमा व्याजासह कर्जाची रक्कम सरेंडर मूल्यापेक्षा वाढते, पॉलिसी मुदतपूर्व बंद केली जाईल आणि जमा व्याजासह थकीत कर्जसरेंडर मूल्यातून वसूल केले जाईल. व्याजासह थकीत कर्जाची मृत्यू किंवा मॅच्युरिटीच्या आधी परतफेड न केल्यास, मृत्यू/मॅच्युरिटी लाभातून त्याची वसूली केली जाईल.
तुमच्या पॉलिसीच्या संपूर्ण लाभांचा आनंद घेण्यासाठी तुमची पॉलिसी सुरु ठेवण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, आम्हाला कल्पना आहे की काही परिस्थितींमध्ये तुम्ही तुमची पॉलिसी सरेंडर करू इच्छित असाल. दोन संपूर्ण वर्षांचा प्रीमियम भरणा केल्यानंतर पॉलिसीला सरेंडर मूल्य प्राप्त होईल.
सरेंडर करण्याच्या वेळी गॅरंटीडसरेंडर व्हॅल्यू (जीएसव्ही) किंवा स्पेशल सरेंडर व्हॅल्यू (एसएसवी) पैकी जी जास्त असेल तर देय असेल. पॉलिसीची मुदत आणि सरेंडरचे पॉलिसी वर्ष यांच्याअनुसार देय असलेले सरेंडर मूल्य बदलेल. जीएसव्ही फॅक्टर्स, सरेंडरचे पॉलिसी वर्ष आणि पॉलिसी मुदतीवर अवलंबून आहे. इथे जीएसव्ही फॅक्टर्सचे दोन संच आहेत. जीएसव्ही फॅक्टरचा एक संच एकूण भरलेल्या प्रीमियमवर लागू होईल आणि जीएसव्ही फॅक्टरचा दुसरा संच सरेंडरच्या तारखेपर्यंत जमा झालेल्या कोणत्याही विद्यमान सरळ प्रत्यावर्ती बोनस (घोषित झाल्यास) वर लागू होईल.
जीएसव्ही= प्रीमियमसाठी जीएसव्ही फॅक्टर * एकूण भरणा केलेला प्रीमियम, ज्यात लागू कर, रायडर प्रीमियम कोणतेही असल्यास आणि अतिरिक्त प्रीमियम, कोणतेही असल्यास, समाविष्ट नाही; अधिक
सरळ प्रत्यावर्ती बोनस * अधिक सरळ प्रत्यावर्ती बोनस (घोषित झाल्यास) साठी जीएसवी फॅक्टर; वजा
सरेंडरच्या तारखेपर्यंत भरणा केलेल्या वार्षिक प्रीमियम, कोणताही असल्यास, च्या 103% इतर उत्तरजीवित लाभ.
एसएसव्ही असेल = {(भरणा केलेल्या प्रीमियमची एकूण संख्या/पॉलिसी मुदतीच्या दरम्यान देय प्रीमियमची एकूण संख्या) x (सम अशुअर्ड अधिक पॉलिसीच्या अंतर्गत देय वार्षिक प्रीमियमचा 103% इतका जीवित राहिल्यास लाभ);
वजा, सरेंडरच्या तारखेपर्यंत भरणा केलेल्या वार्षिक प्रीमियम, च्या 103% कोणताही असल्यास,जीवित राहिल्याचा लाभ; अधिक, सरळ प्रत्यावर्ती बोनस (घोषित झाल्यास) गुणिले सरेंडरच्या वेळी प्रचलित एसएसव्ही फॅक्टर.
नियायमकाच्या पूर्व मंजूरीच्या अधीन एसएसव्ही फॅक्टर आमच्या द्वारे वेळोवेळी निश्चित केला जाईल. जीएसव्ही फॅक्टर्स जोडपत्र I मध्ये नमूद केल्याप्रमाणे आहे.
खालील दिलेल्या उदाहरणात आम्ही पॉलिसीचे कार्य स्पष्ट केलेले आहे.
40 वर्षीय श्री. कुमार यांनी 15 वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी इंडियाफर्स्ट लाईफ स्मार्ट पे प्लॅन खरेदी केला. त्यांनी 8 वर्षांच्या प्रीमियम भरायच्या मुदतीसाठी आणि परिपक्वतेच्या वेळी ₹ 150,000 च्या गॅरंटीड विमा रकमेसाठी ₹ 19,200 (कर वगळून) चा वार्षिक प्रीमियम भरला. शेवटचा प्रीमियम भरणा करायच्या अगदी आधी, कुमार यांना ₹ 19,776 चा जीवित राहिल्याचा लाभ प्राप्त होईल; जो त्यांच्या वार्षिक प्रीमियमचा 103% आहे. प्लॅनच्या मुदतीच्या शेवटी, त्यांना 4% दराने ₹ 169,776 किंवा 8% दराने ₹ 248,526 चा मॅच्युरिटी लाभ प्राप्त होईल. पॉलिसी मुदतीच्या दरम्यान त्यांचे निधन झाल्यावर सुद्धा, त्यांचे प्रियजन लाईफ कव्हरने सुरक्षित राहतील. पॉलिसीमधील हा मृत्यू लाभ एकरकमी स्वरुपात किंवा 5/10/15 वर्षांच्या कालावधीत हप्ता स्वरुपात मिळणे श्री कुमार निवडू शकतात.
निकष | पैलू |
---|---|
नोंदणीच्या वेळी वय | किमान*– 10 वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी 8 वर्षे ; कमाल – 50 वर्षे |
मॅच्युरिटीच्या वेळी कमाल वय | 65 years |
प्रीमियम भरायच्या पद्धती - मोडल फॅक्टर | 10 वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी 5 वर्षे पीपीटी 15 वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी 5/6/7/8 वर्षे पीपीटी |
प्रीमियम | किमान - ₹ 18,000 वार्षिक - ₹ 9,215 अर्धवार्षिक - ₹ 4,662 त्रैमासिक - ₹ 1,556 मासिक कमाल – बोर्ड अनुमोदित हमी धोरणाच्या अधीन कोणतीही मर्यादा नाही |
प्रीमियम भरायच्या पद्धती - मोडल फॅक्टर | वार्षिक अर्धवार्षिक – 0.5119 त्रैमासिक – 0.2590 मासिक – 0.0870 |
*अल्पवयीन विमाधारकासाठी, जोखिम कव्हर ताबडतोब चालू होते. अल्पवयीन विमाधारकासाठी, एकतर आई-वडील किंवा कायदेशीर पालक ज्यांचे अल्पवयीन विमाधारकाशी विमायोग्य हितसंबंध आहेत, ते अर्जदार/पॉलिसीधारक बनू शकतात जे प्रीमियम भरतील. जसे आणि जेव्हा विमाधारक सज्ञान होतात, पॉलिसी विमाधारकाकडे जाईल.
विमाधारक अल्पवयीन असताना पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, जीवित आई/वडील किंवा कायदेशीर पालक, ज्यांचे अल्पवयीन विमाधारकाशीविमायोग्य हितसंबंध आहेत, ते पॉलिसीधारक होतील. जर आई-वडील किंवा कायदेशीर पालक कुणीही नसतील आणि पॉलिसीने अजून सरेंडर मूल्य प्राप्त केलेले नसेल, तेव्हा पॉलिसी समाप्त होते किंवा पेड-अप पॉलिसी म्हणून पॉलिसी सुरु ठेवली जाईल आणि पॉलिसी अटी आणि नियमांनुसार लाभ दिले जातील.
तुम्ही भरलेल्या प्रीमियमवर आणि प्राप्त झालेल्या लाभांवर प्रचलित आयकर कायद्यांनुसार कर लाभ उपलब्ध असू शकतो. हे सरकारी कर कायद्यांनुसार वेळोवेळी बदलाच्या अधीन आहे. कृपया ही पॉलिसी खरेदी करण्याआधी तुमच्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.
वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार विमा कायदा 1938 च्या कलम 45 च्या तरतूदींनुसार फसवणूक/चूकीच्या विधानांवर कारवाई केली जाईल.
वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार विमा कायदा 1938 च्या कलम 45 अनुसार, जो सांगतो कि
पॉलिसीने पेड अप मूल्य प्राप्त केले असल्यास तुमच्या पॉलिसीमध्ये अखंडित लाईफ कव्हर लाभ असेल.
या लाभाच्या अंतर्गत, तुमच्या पॉलिसीचे पेड अप मूल्य पूर्ण केल्यावर, पॉलिसीच्या एक वर्षासाठी तुमचा प्रीमियम हप्ता चुकल्यास, “न भरलेल्या पहिल्या प्रीमियम” च्या तारखेपासून एक वर्षासाठी लागू पॉलिसी नुसार पॉलिसीच्या अंतर्गत मृत्यू लाभ सुरु राहील. या कालावधीच्या दरम्यान त्या वर्षासाठी कोणताही सरळ प्रत्यावर्ती बोनस (घोषित झाल्यास) दिला जाणार नाही, ज्यात त्या वर्षाचा वार्षिक प्रीमियम भरला गेलेला नाही.
ग्राहकाला “अखंडित लाईफ कव्हर लाभ” पुढे आणखी वाढवण्याचा पर्याय असेल तर तो/ती “न भरलेल्या पहिल्या प्रीमियम” च्या तारखेपासून एक वर्षाच्या आत लागू व्याजासह प्रीमियम भरतो/भरते. अशा भरण्यावर, सुधारित “न भरलेल्या प्रीमियम” च्या तारखेपासून एक वर्षासाठी अखंडित लाईफ कव्हर लाभ लागू होईल. तुम्हाला त्या वर्षासाठी प्रत्यावर्ती बोनस, घोषित झाल्यास, प्राप्त होईल ज्यासाठी तुम्ही देय प्रीमियम भरला आहे.
जर तुम्ही “न भरलेल्या पहिल्या प्रीमियम” च्या तारखेपासून 12 महिन्यांच्या आत प्रीमियम भरला नाही, तर कमी केलेल्या पेड अप पॉलिसीनुसार मृत्यू लाभ कमी केला जाईल.
पॉलिसीमध्ये मॅच्युरिटीवरील विमा रक्कम पॉलिसीच्या सुरुवातीला तुम्ही निवडल्यानुसार आहे आणि जो मॅच्युरिटीवर मिळणारा कमीतकमी लाभ आहे.
किमान मूळ विमा रक्कम | किमान मूळ विमा रक्कम |
---|---|
1,50,000 | बोर्ड अनुमोदित हमी धोरणाच्या अधीन कोणतीही मर्यादा नाही |
तुम्ही वाढीव लाभासाठी वेव्हार ऑफ प्रीमियम रायडर सुद्धा निवडू शकता. उल्लेखित रायडरविषयी अधिक तपशीलांसाठी कृपया इंडियाफर्स्ट लाईफ वेव्हार ऑफ प्रीमियम रायडर ब्रोशर पहा.
आम्ही तुम्हाला वाढीव कालावधी देतो जो प्रीमियम देय तारखेपासून प्रीमियमचा भरणा करण्यासाठी दिलेला वेळ आहे, ज्या दरम्यान पॉलिसी जोखिम कव्हरसह लागू असल्याचे ग्राह्य धरले जाते. या पॉलिसीसाठी वार्षिक, अर्ध-वार्षिक आणि त्रैमासिक फ्रिक्वेंसीसाठी प्रीमियम देय तारखेपासून 30 दिवसांचा आणि मासिक फ्रिक्वेंसीसाठी 15 दिवसांचा वाढीव कालावधी आहे. या कालावधीत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, मृत्यू होण्याच्या तारखेपर्यंतचा देय प्रीमियम कापून घेतल्यानंतर, त्यांच्या नामनिर्देशित व्यक्ती/ नियुक्त व्यक्ती/ कायदेशीर वारसाला मृत्यू लाभ दिला जाईल. या कालावधीच्या दरम्यान, पॉलिसीला सक्रिय असल्याचे मानले जाईल.
होय, तुम्ही उच्च विमा रक्कम निवडल्यास खालील तक्त्यानुसार प्रीमियम मध्ये सूट आहे :-
मॅच्युरिटीवरील विमा रक्कम श्रेणी | प्रीमियमवर % सूट |
---|---|
1,50,000 to < 2,00,000 | शून्य |
2,00,000 to <3,00,000 | 1% |
3,00,000 to <5,00,000 | 2% |
5,00,000 to <10,00,000 | 3% |
10,00,000 आणि अधिक | 4% |
होय, तुमच्याकडे इंडियाफर्स्ट लाईफ वेव्हर ऑफ प्रीमियम (डब्ल्यूओपी) रायडर (UIN:143B017V01) निवडण्याचा पर्याय आहे. हा रायडर निवडल्यावर, पॉलिसीधारकाचा/ विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, अपघातामुळे पूर्ण कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास किंवा रायडर अंतर्गत नमूद गंभीर आजारपण आल्यास तुम्ही निवडलेल्या रायडर पर्यायानुसार तुमच्या बेस पॉलिसीचे भविष्यातील प्रीमियम माफ केले जातील. पॉलिसीधारक/ विमाधारकासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पर्याय आहेत.
पर्याय | लाभ |
---|---|
मृत्यूवर वेव्हर ऑफ प्रीमियम | हा पर्याय पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास बेस पॉलिसी अंतर्गत बाकी आणि देय असलेले भविष्यातील सर्व प्रीमियम माफ करण्याचा लाभ देतो (फक्त तेव्हाच जेव्हा बेस पॉलिसी अंतर्गत विमाधारक आणि पॉलिसीधारक वेगवेगळी व्यक्ती आहेत), जे रायडर आणि बेस पॉलिसी लागू असण्याच्या अधीन आहेत. |
अपघातामुळे पूर्ण कायमस्वरुपी अपंगत्व आणि गंभीर आजाराचे निदान झाल्यास वेव्हर ऑफ प्रीमियम | हा पर्याय खाली दिलेल्या घटनांपैकी कोणतीही एकदा किंवा एकत्रितपणे घडल्यास बेस पॉलिसीच्या अंतर्गत बाकी आणि देय भविष्यातील सर्व प्रीमियम माफ करण्याचा लाभ देतो; रायडर विमाधारकाचे अपघातामुळे पूर्ण कायमस्वरुपी अपंगत्व किंवा रायडर अंतर्गत कव्हर असलेल्या कोणत्याही एक गंभीर आजारापासून रायडर विमाधारक ग्रस्त असल्याचे खात्रीशीर निदान झाल्यावर, सदर लाभ रायडर आणि बेस पॉलिसी लागू असण्याच्या अधीन आहे. |
मृत्यू किंवा अपघातामुळे पूर्ण कायमस्वरुपी अपंगत्व किंवा गंभीर आजारावर वेव्हर ऑफ प्रीमियम | हा पर्याय खाली दिलेल्या घटनांपैकी कोणतीही लवकर घडल्यास बेस पॉलिसीच्या अंतर्गत बाकी आणि देय भविष्यातील सर्व प्रीमियम माफ करण्याचा लाभ देतो; रायडर विमाधारकाचा मृत्यू किंवा रायडर विमाधारकाचे अपघातामुळे पूर्ण कायमस्वरुपी अपंगत्व किंवा रायडर अंतर्गत कव्हर असलेल्या कोणत्याही एक गंभीर आजारापासून रायडर विमाधारक ग्रस्त असल्याचे खात्रीशीर निदान झाल्यावर, सदर लाभ रायडर आणि बेस पॉलिसी लागू असण्याच्या अधीन आहे. हा पर्याय निवडण्यासाठी, बेस पॉलिसी अंतर्गत विमाधारक आणि पॉलिसीधारक वेगवेगळी व्यक्ती असली पाहिजे. |
कंपनीच्या घोषित बोनस धोरणानुसार या पॉलिसीच्या अंतर्गत बोनस मध्ये सरळ प्रत्यावर्ती बोनस (एसआरबी) आणि टर्मिनल बोनस (टीबी) चा समावेश आहे.
ग्रेस पिरियड दरम्यान पॉलिसी अंतर्गत देय असलेल्या प्रीमियमचा भरणा न झाल्यास, पॉलिसी रद्द होईल जर पॉलिसीने ग्यारंटेड सरेंडर मूल्य प्राप्त केलेले नाही. जोखिम कव्हर थांबेल आणि रद्द झालेल्या पॉलिसीमध्ये पुढे कोणतेही लाभ देय होणार नाही.
दोन संपूर्ण वर्षांपेक्षा कमी प्रीमियम भरणा केला असल्यास पॉलिसी रद्द होईल.
मात्र, तुम्ही पुनरारंभ कालावधीच्या अंतर्गत तुमची रद्द झालेली पॉलिसी पुन्हा सुरु करू शकता. पुन्हा सुरु करण्याविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेले पुढील भाग पाहू शकता.
पहिल्या भरणा न केलेल्या प्रीमियमपासून ग्रेस पिरियडच्या मुदत समाप्तीनंतर पॉलिसीला पेड-अप मूल्य प्राप्त होईल जर कमीत कमी दोन (2) पूर्ण वर्षांचा प्रीमियम भरला गेला आहे आणि त्यानंतरचे कोणतेही प्रीमियम भरले गेलेले नाही. पॉलिसी पेड-अप पॉलिसीमध्ये रुपांतरित झाल्यानंतर कोणतेही भविष्यातील सरळ प्रत्यावर्ती बोनस (घोषित झाले असल्यास) साठी पॉलिसी पात्र असणार नाही.
टीप:
एक पेड-अप पॉलिसी पहिल्या न भरलेल्या प्रीमियमच्या तारखेपासून अटींच्या अधीन पाच वर्षांच्या आत (मूळ लाभांसह) पुन्हा सुरु केली जाऊ शकते.
जर पुनरारंभ कालावधीच्या दरम्यान पेड-अप मोड मध्ये असलेली पॉलिसी पुन्हा सुरु केली जात नाही, तर ती परिपक्वता किंवा मृत्यू किंवा पॉलिसी सरेंडर केली जाईपर्यंत रेड्युस्ड पेड अप मोड मध्ये राहील. पॉलिसी मुदतीच्या दरम्यान सर्व देय प्रीमियम भरलेले असल्यास पॉलिसी पूर्ण पेड-अप होते आणि देय असलेले लाभ पॉलिसीच्या अटी आणि नियमांनुसार असतील.
पॉलिसी पेड-अप झाल्यानंतर:
पॉलिसी मुदतीच्या शेवटी, तुम्हाला परिपक्वतेवरील रेड्युस्ड पेड-अप विमा रक्कम अधिक सरळ प्रत्यावर्ती बोनस, घोषित असल्यास, अधिक रेड्युस्ड पेड-अपच्या तारखेपर्यंत टर्मिनल बोनस, घोषित असल्यास वजा उत्तरजीवित लाभ रक्कम जर कोणतीही दिली असल्यास, असेल.
जेथे परिपक्वतेवरील रेड्युस्ड पेड-अप विमा रक्कम याप्रमाणे आहे:
(परिपक्वतेच्या वेळी गारंटीड विमा रक्कम अधिक उत्तरजीवित लाभ) x (भरलेल्या प्रीमियम्सची एकूण संख्या)/ पॉलिसी मुदतीच्या दरम्यान देय प्रीमियम्सची एकूण संख्या).
पॉलिसी पुनः सुरु करण्यासाठी तुमच्याकडे काय पर्याय आहेत?
तुम्ही पहिल्या न भरलेल्या प्रीमियमच्या देय तारखेपासून 5 वर्षांच्या आत परंतु पॉलिसीची मुदत समाप्त होण्याच्या आधी याद्वारे तुमची पॉलिसी पुनः सुरु करू शकता -
व्याजासह सर्व न भरलेले देय प्रीमियम भरून; आणि
बोर्ड अनुमोदित हमी धोरणानुसार आरोग्याचा समाधानकारक पुरावा, आवश्यक असल्यास, देऊन. वैद्यकीय तपासणींचा खर्च, कोणताही असल्यास, पॉलिसीधारकाद्वारे वहन केला जाईल.
एक रद्द झालेली किंवा रेड्युस्ड पेड-अप पॉलिसी तिच्या सर्व लाभांसह आमच्या बोर्ड अनुमोदित हमी धोरणाच्या अनुषंगाचे पुन्हा सुरु केली जाऊ शकते. जर पॉलिसी पुन्हा सुरु केली जाते, तर एक सक्रिय पॉलिसीसाठी पॉलिसी अटी आणि नियमांनुसार सर्व लाभ पुनर्संचयित केले जातील.
टीप: प्रीमियम भरणा करण्यात विलंबासाठी आकारला जाणारा सध्याचा व्याजदर 9% वार्षिक आहे ज्यामध्ये आयआरडीएआय कडून पूर्व मंजूरीच्या अधीन प्रत्येक आर्थिक वर्षात बदल केला जाऊ शकतो.
पॉलिसी अंतर्गत जोखिम कव्हर सुरु झाल्याच्या तारखेपासून किंवा पॉलिसी पुन्हा सुरु केल्याच्या तारखेपासून, जसे लागू असेल तसे, 12 महिन्यांच्या आत आत्महत्येमुळे मृत्यूच्या प्रसंगी, पॉलिसीधारकाचे नामनिर्देशित व्यक्ती किंवा लाभार्थी, मृत्यू तारखेपर्यंत भरलेल्या एकूण प्रीमियमच्या 80% रक्कम किंवा मृत्यूच्या तारखेनुसार उपलब्ध सरेंडर मूल्य, जी कोणतीही जास्त आहे, मिळवण्यासाठी पात्र आहे, ज्यासाठी पॉलिसी सक्रिय असायला हवी.
परिपक्वतेच्या वेळी तुम्हाला खालील गोष्टी मिळतील: -
यास पॉलिसीमध्ये परिपक्वता लाभ म्हणून सुद्धा ओळखले जाते.
परिपक्वता लाभ दिल्यावर, पॉलिसी समाप्त होईल आणि इतर कोणतेही लाभ दिले जाणार नाही.
पॉलिसी मुदतीच्या दरम्यान विमाधारकाचे निधन झाल्याच्या प्रसंगी, मृत्यू लाभ एकतर एकरकमी स्वरुपात किंवा 5/10/15 वर्षासाठी मासिक उत्पन्नाच्या स्वरुपात नामनिर्देशित व्यक्तीला दिला जातो. दोन पर्यायांपैकी जो जास्त असेल त्यानुसार मृत्यू लाभ निश्चित केला जातो:
मृत्यू झाल्यावर विमा रकमेची गणना यातील जास्त असेल त्याप्रमाणे केली जाते:
जर हप्त्यांमध्ये मृत्यू लाभ दिला गेल्यास, मृत्यू लाभाला मृत्यूच्या तारखेला प्रचलित एसबीआय बँक व्याज दरावर आधारित ॲन्युईटी फॅक्टरने गुणून करून मासिक हप्त्याची रक्कम निश्चित केली जाईल. संपूर्ण कालावधीत हप्त्याची रक्कम समान राहते. 31 मार्च रोजी घेतलेल्या निर्णयानुसार, प्रचलित एसबीआय बचत बँक व्याज दर प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी तपासणीच्या अधीन आहे.
खालील तक्त्यानुसार तुम्हाला तुमचा जीवित असल्याचा लाभ प्राप्त होईल: -
प्रीमियम भरायची मुदत | पेआउट वर्ष (या पॉलिसी वर्षाच्या शेवटी एक वार्षिक प्रीमियमच्या 103% रक्कम दिली जाते) |
---|---|
5 वर्षे | 4th वर्षे |
6 वर्षे | 5th वर्षे |
7 वर्षे | 6th वर्षे |
8 वर्षे | 7th वर्षे |
हा जीवित असल्याचा लाभ तुमच्या पॉलिसीचा प्रीमियम भरण्यासाठी वापरण्याचा तुमच्याकडे पर्याय आहे. सुरुवातीला तुम्ही निवडलेल्या मॅच्युरिटी विमा रकमेची रक्कम जीवित असल्याच्यालाभानंतर सुद्धा गॅरंटीड होईल आणि तुम्हाला पुन्हा दिलेल्या रकमेच्या राशीपर्यंत कमी केली जाणार नाही. तुम्हाला हा पर्याय सुरुवातीलाच निवडणे आवश्यक आहे.
आपल्या स्वप्नांना पाठिंबा द्यायला जर आपल्याकडे उत्पन्नाचा दुसरा स्त्रोत असेल तर किती चांगले होईल नाही का? तुमच्या स्वप्नांना सत्यात आणण्याचा हा एक मार्ग आहे, ज्यायोगे तुम्ही 1ल्या महिनाअखेरीपासून उत्पन्न मिळवण्यास सुरुवात करु शकता.
सोईस्कर प्रीमियम्स, गॅरेंटेड सर्व्हाव्हल लाभ आणि 15 किंवा 20 वर्षांच्या संपूर्ण पॉलिसी कालावधीच्या दरम्यान लाईफ इन्श्युरन्स कव्हरसोबत रोख बोनस(जर जाहिर केला असल्यास) उपलब्ध करुन देणा-या या गॅरंटेड सेव्हिंग्ज लाईफ इन्श्युरन्स प्लानसह व्यक्तीगत स्वरुपाच्या प्रवासाला सुरुवात करा.
तुमच्या गुंतवणूकींवर 7 x परतावा मिळाला तर आश्चर्य वाटेल नाही का? तुमचा शोध इथे संपतो! या सिंगल पेमेंट प्लॅनसोबत, तुम्ही तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करु शकता.
ज्ञान केंद्र
सर्व पहा
अस्वीकरण
लिंक्ड इन्शुरन्स उत्पादने ही पारंपरिक विमा उत्पादनांपेक्षा वेगळी असून जोखमीच्या अधीन असतात. युनिट लिंक्ड लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज मध्ये भरलेली प्रीमियम यात गुंतवणुकीतील जोखमीच्या अधीन असतात आणि युनिट्स चे नॅव्ह वर खाली होऊ शकतात, फंड्सची कामगिरी आणि कॅ पिटल मार्केटवर परिणाम करणाऱ्या घटकांनुसार आणि विमा घेणारी व्यक्ती आपल्या निर्णयासाठी जबाबदार असते. इन्डियाफर्स्ट लाईफ इंश्योरंस कंपनी लिमिटेड हे फक्त विमा कंपनीचे नाव असून याद्वारे कराराची गुणवत्ता, यासंबंधी भविष्यातील धोरणे किंवा परतावा, यासंबंधी हमी देत नाही.
कृपया संबंधित धोके आणि यासंबंधी लागू होणारे शुल्क तुमच्या विमा एजंटकडून किंवा विमा कंपनीने जारी केलेले मध्यस्थ किंवा पॉलिसी कागदपत्रे वाचून जाणून घ्या. या करारांतर्गत दिले गेलेले विविध फंड ही फंडांची नावे आहेत आणि कोणत्याही प्रकारे या योजनांची गुणवत्ता, त्यांच्या भविष्यातील धोरणे आणि परतावा दर्शवत नाहीत. भूतकाळातील कामगिरी भविष्यात बदलू शकते आणि भविष्यातील कामगिरीची हमी देऊ शकत नाही. या कागदपत्रातील मजकुरात शिफारस/विधाने /अंदाज/अपेक्षा/भाकीत असू शकतात, जे कदाचित 'फॉरवर्ड लुकिंग' असू शकतात.
वास्तविक परिणाम या कागदपत्रात व्यक्त / निहित परिणामांपेक्षा भौतिकदृष्ट्या भिन्न असू शकतात. ही विधाने, कोणत्याही विशिष्ट व्यक्तीला वैयक्तिक शिफारस किंवा एखाद्या व्यक्तीच्या कोणत्याही गुंतवणूक गरजा प्रदान करण्याचा हेतू नाही. शिफारसी / विधाने / अंदाज / अपेक्षा / भाकीत सर्वसाधारण स्वरूपाचे आहेत आणि वैयक्तिक पॉलिसीधारक / ग्राहक यांच्या विशिष्ट गुंतवणूक गरजा किंवा जोखीम पत्करण्याची स्थिती किंवा आर्थिक परिस्थिती विचारात घेत नाहीत. जोखीम घटक आणि अटी व शर्तींच्या अधिक तपशीलांसाठी, कृपया विक्री पूर्ण करण्यापूर्वी विक्री माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचा. कर लाभ कर कायद्यातील बदलांच्या अधीन आहेत.