श्री. नरेंद्र ओस्तवाल
गैर-कार्यकारी संचालक
श्री. ओस्तवाल 2007 मध्ये वॉरबर्ग पिंकसमध्ये दाखल झाले आणि तेव्हापासून ते संस्थेच्या भारतीय संलग्न कंपनीसोबत काम करत आहेत. ते कंपनीच्या भारतातील गुंतवणूक सल्लागार उपक्रमांमध्ये सहभागी आहेत आणि भारतातील आर्थिक सेवा आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील संधींचे मूल्यमापन करतात. वॉरबर्ग पिंकसमध्ये सामील होण्यापूर्वी, श्री ओस्तवाल हे 3आय इंडिया आणि मॅकिन्से अँड कंपनीचे सहयोगी होते.
ते लॉरस लॅब्स लिमिटेड, एयू स्मॉल फायनांस बँक लिमिटेड, डीबी पॉवर अँड ग्रूप कंपनीज, कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायवेट लिमिटेड, स्टर्लिंग सॉफ्टवेअर प्रायवेट लिमिटेड आणि फ्यूजन मायक्रोफायनान्स प्रायवेट लिमिटेडचे संचालक आहेत. श्री. ओस्तवाल यांच्याकडे द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातील चार्टर्ड अकाउंटन्सीची पदवी आहे आणि त्यांनी आयआयएम, बंगलोर येथून एमबीए केले आहे.