ऋषभ गांधी
मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर
ऋषभ गांधी, MD व CEO, इंडियाफर्स्ट लाईफ, हे उद्योजकीय विचारसरणी व दुरदृष्टी असणारे नेते आहेत. ते त्यांच्या प्रबळ व्यावसायिक कौशल्याने आणि धोरणात्मक विचारसरणीने आव्हानांना संधींमध्ये रूपांतरित करतात. मजबूत बँकअश्युरन्स-आधारित, विविध वितरण चॅनेल धोरणाच्या माध्यमातून घडवलेल्या इंडियाफर्स्टच्या यशोगाथेमध्ये, ऋषभ यांचा सिंहाचा वाटा आहे.
ऋषभ यांच्या लोककेंद्रित नेतृत्वामुळे, कंपनीची व्यवसायसंबंधी सर्व क्षेत्रांमध्ये सातत्याने वाढ होत आहे, ज्यामुळे महत्वाच्या भागधारकांचे लक्ष कंपनीकडे वेधले जाण्यात मदत होत आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारांचा तीन दशकांचा अनुभव असणारे, वित्तीय सेवा उद्योगातील जाणकार असलेले ऋषभ यांना BFSI लीडरशिप समिट अँड अवॉर्ड्स येथे बिझनेस लीडर ऑफ द इयर 2024 , नवभारत ट्रान्सफॉर्मेशनल लीडर ऑफ द इयर 2022, दूरदृष्टीच्या नेतृत्वासाठी इलेट्स BFSI गेम चेंजर अवॉर्ड 2022, आणि व्यावसायिक नेतृत्वासाठी द इंडियन अचिव्हर्स अवॉर्ड 21-22 अशा पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे.
ऋषभ हे नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (NMIMS) आणि INSEAD, फॉन्टेनब्लो चे माजी विद्यार्थी आहेत.