नलिन भंडारी
एसवीपी अँड हेड - फायनांस कंट्रोलर
नलिन भंडारी, इंडियाफर्स्ट लाईफ मध्ये फायनांस कंट्रोलरचे एसवीपी अँड हेड आहेत. कंपनीतील त्यांच्या वर्तमान भूमिकेत, नलिनच्या जबाबदाऱ्यांमध्ये संपूर्ण वित्त, कर निर्धारण, वित्त संचालन, आंतरिक नियंत्रण, ऑडिट, आणि वैधानिक अनुपालनाव देखरेख करण्याचा समावेश आहे.
दोन दशकांहून अधिक अनुभवासह, निधी उभारणी, कार्यरत भांडवल व्यवस्थापन, खर्च व्यवस्थापन नियोजन, वित्त ऑपरेशन, योग्य परिश्रम, नियंत्रण, प्रक्रिया अंमलबजावणी आणि नातेसंबंध व्यवस्थापन यामध्ये त्यांची निपुणता आहे.
गेल्या काही वर्षांत, नलिन यांनी विमा, ऊर्जा आणि कृषी-आधारित उद्योग यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये स्टार्ट-अप आणि स्थापित संस्थांमध्ये काम केले आहे. त्यांनी यापूर्वी आयडीबीआय फेडरल लाईफ इंश्युरन्स, कोटक लाईफ इंश्युरन्स, एनरकॉन इंडिया लिमिटेड, आणि बजाज हिंदुस्तान लिमिटेड सोबत काम केले आहे.
नलिन यांच्याकडे जय नारायण व्यास विद्यापीठ, जयपूर येथील कॉमर्स डिग्री आहे, आणि ते इंस्टीट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीआएय) चे अहर्ताप्राप्त चार्टर्ड अकाउंटंट आहेत.