ऋषभ गांधी
मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर
ऋषभ गांधी, MD व CEO, इंडियाफर्स्ट लाईफ, हे उद्योजकीय विचारसरणी व दुरदृष्टी असणारे नेते आहेत. ते त्यांच्या प्रबळ व्यावसायिक कौशल्याने आणि धोरणात्मक विचारसरणीने आव्हानांना संधींमध्ये रूपांतरित करतात. मजबूत बँकअश्युरन्स-आधारित, विविध वितरण चॅनेल धोरणाच्या माध्यमातून घडवलेल्या इंडियाफर्स्टच्या यशोगाथेमध्ये, ऋषभ यांचा सिंहाचा वाटा आहे.
ऋषभ यांच्या लोककेंद्रित नेतृत्वामुळे, कंपनीची व्यवसायसंबंधी सर्व क्षेत्रांमध्ये सातत्याने वाढ होत आहे, ज्यामुळे महत्वाच्या भागधारकांचे लक्ष कंपनीकडे वेधले जाण्यात मदत होत आहे.
ऋषभ गांधी यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे - 2022 चा नवभारत ट्रान्सफॉर्मेशनल लीडर ऑफ द इयर, एक्सेलन्स इन स्ट्रॅटेजिक लीडरशिप ॲट इन्शुरन्स इनोव्हेशन अवॉर्ड्स 2023, व्हिजनरी थॉट लीडर ॲट द Elets 7th NBFC 100 लीडर्स ऑफ एक्सेलन्स अवॉर्ड्स 2024, आणि 10 व्या एडिशन ऑफ एशियन बिझनेस लीडर्स कॉन्क्लेव्ह येथे टाइम्स नाऊ मोस्ट प्रॉमिसिंग बिझनेस लीडर्स ऑफ एशिया 2026. ऋषभ यांचे नाव HR असोसिएशन ऑफ इंडियाने (HRAI) जाहीर केलेल्या चेंजमेकर्स ऑफ 2025 च्या यादीत समाविष्ट होते.
ऋषभ हे नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (NMIMS) आणि INSEAD, फॉन्टेनब्लो चे माजी विद्यार्थी आहेत.