श्री. शैलेंद्र सिंह
बिगर-कार्यकारी संचालक
श्री. शैलेंद्र सिंह, सध्या बँक ऑफ बडोदाचे मुख्य महाव्यवस्थापक (एचआरएम) आहेत. बीओबीकार्ड (बँक ऑफ बडोदाची 100% उपकंपनी) चे एमडी आणि सीईओ म्हणून त्यांच्या अगोदरच्या कार्यकाळात, त्यांनी क्रेडिट कार्ड व्यवसायाला पुनर्जीवित करण्यात आणि क्रेडिट कार्ड क्षेत्रात तिला एक महत्त्वाच्या शक्तीच्या रुपात स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे.
ते 1998 मध्ये बँक ऑफ बडोदामध्ये मार्केटिंग स्पेशलिस्ट म्हणून रुजू झाले आणि बँक ऑफ बडोदामध्ये मुख्य महाव्यवस्थापक पदापर्यंत पोहोचले. त्यांनी संपूर्ण भारतातील विविध कार्यांमध्ये बँकेत विविध नेतृत्व भूमिका पार पाडल्या आहेत. एमडी आणि सीईओ म्हणून बीओबी फायनांशियल मध्ये रुजू होण्याआधी, ते बँक ऑफ बडोदा मध्ये डिजिटल बँकिंग प्रमुख होते. एक उत्सुक वाचक आणि लोकनेता असलेले, त्यांचा ‘बोलल्याप्रमाणे चाला’ मतावर ठाम विश्वास आहे.
त्यांच्याकडे मॅनेजमेंटमधील पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असून ते एनआयटीआयई, मुंबई आणि आयआयएम, बंगळुरुचे माजी विद्यार्थी सुद्धा आहेत.