अत्री चक्रवर्ती
मुख्य संचालन अधिकारी
इंडियाफर्स्ट लाईफ मधील मुख्य संचालन अधिकारी म्हणून, अत्री चक्रवर्ती व्यवसाय संचालनाचे डिझाइन, अंमलबजावणी आणि व्यवस्थापनावर संपूर्ण देखरेख करतात. ते वितरण आणि शाखा संचालन, ग्राहक सेवा, नवीन व्यवसाय आणि स्वीकृति, सातत्य, दावे, तंत्रज्ञान, डेटा सायन्स आणि बदल व्यवसाथापनासाठी जबादार आहेत.
बीएफएसआय क्षेत्रातील त्यांच्या सुमारे 30 वर्षांच्या समृद्ध आमि वैविध्यपूर्ण अनुभवामध्ये, अत्रींनी सुमारे दोन दशके देशाच्या विमा क्षेत्रासाठी समर्पित केलेली आहेत. विभिन्न संस्थांमधील त्यांच्या कार्यकाळात ते सेवा वितरणात बदल करण्यात, प्रक्रियेत उत्कृष्टता आणण्यात, डिजिटल परिवर्तन सुलभ करण्यात, प्रोग्राम व्यवस्थापन सिंक्रोनाइज करण्यात, आणि संचालन व्यवस्थापनेवर देरखेरख करण्यात यशस्वी राहिले आहेत.
इंडियाफर्स्ट लाईफ मध्ये सामील होण्याआधी, अत्रींनी सुमारे दोन दोशक टाटा एआयजी जनरल इंश्युरन्स आणि टाटा एआयए लाईफ इंश्युरन्स सोबत खर्च केली आहेत, जिथून ते ईव्हीपी आणि संचालन आणि सुविधा प्रमुख म्हणून बाहेर पडले. अत्रींनी सिटीबँक इंडिया, गुजरात लीज फायनांसिंग आणि युनायटेड क्रेडिट फायनांशियल सर्विसेस सोबत सुद्धा काम केले आहे.
अत्रींनी बिर्ला इंस्टीट्युट ऑफ टेक्नोलॉजी अँड सायन्स, पिलानी येथून मॅनेजमेंट स्टडीज मध्ये मास्टर्स डिग्री मिळवली आहे.