शंकरनारायणन राघवन
Chief Technology & Digital Officer
इंडियाफर्स्ट लाईफ मधील प्रमुख तंत्रज्ञान आणि डेटा अधिकारी म्हणून, शंकरनारायणन राघवन तंत्रज्ञान, डेटा आणि डेटा सायन्स धोरण, अंमलबजावणी, प्रत्यक्ष/डिजिटल विक्री, आणि कार्यक्षमता देखरेखीसाठी जबाबदार आहेत.
त्यांना जीवन विमा, डिजिटल धोरण आणि व्यवसाय व्यवस्थापनेमध्ये 30 वर्षांपेक्षा अधिकचा अनुभव आहे. इंडियाफर्स्ट लाईफमध्ये रुजू होण्याआधी, ते एगॉन लाईफ इंश्युरन्स कंपनीचे प्रमुख संचालन अधिकारी होते. त्यांच्या करीयरमध्ये एगॉन लाईफ इंश्युरन्स, एचसीएल टेक्नोलॉजीज, कंप्युटर सायन्सेस कॉर्पोरेशन इंडिया आणि लाईफ इंश्युरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामधील कार्यकाळाचा समावेश आहे.
त्यांच्याकडे भारतीदासन विद्यापीठाची विज्ञान शाखेतील बॅचलर्स डिग्री आणि एमबीए केलेले आहे. त्यांनी इंडियन स्कूल ऑफ बिझनेस (आयएसबी) येथून मॅनेजमेंट फोर सीनियर एक्झीक्युटिव्स मधील पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम सुद्धा पूर्ण केला आहे आणि सध्या इंश्युरन्स इंस्टीट्युट ऑफ इंडिया आणि लाईफ मॅनेजमेंट इंस्टीट्युटचे फेलो आहेत.