भावना वर्मा
Aअपॉइंटेड ॲक्च्युअरी, इंडियाफर्स्ट लाईफ
इंडियाफर्स्ट लाईफमधील अपॉइंटेड ॲक्च्युअरी म्हणून, भावना वर्मा विमा कार्याच्या सर्व पैलूंवर देखरेख करतात, ज्यामध्ये नियामक आणि शेयरहोल्डर रिपोर्टिंग, उत्पादन विकास आणि व्यवस्थापन, आणि आर्थिक व विमा जोखीम विश्लेषणाचा समावेश आहे.
भारतीय, आशियाई आणि युके बाजारातील भावनाचा व्यापक अनुभव तिला जीवन विम्याच्या सर्व विमा पैलूंमध्ये विशेषज्ञता देतो. इंडियाफर्स्ट लाईफमध्ये सामील होण्याआधी, त्या कोटक लाईफ इंश्युरन्स मध्ये ॲक्च्युरियल रिपोर्टिंग अँड रिस्कच्या प्रमुख होत्या, जेथे त्यांनी कंपनीसाठी महत्त्वाच्या विमा अंमलबजावणीचे नेतृत्व केलेले.
भावनाने तिच्या कारकिर्दीची सुरुवातीची वर्षे विलिस टॉवर्स वॉटसन मध्ये, आणि काही मिलीमन येथे ॲक्च्युरियल कन्सल्टिंगमध्ये घालवली, जेथे त्यांनी विभिन्न भौगोलिक प्रदेशात टेक्निकल ॲक्च्युरियल आणि स्ट्रेटेजिक असाइन्मेंट्सच्या श्रेणीवर काम केले. भावना सर्व कार्यांमध्ये विमा तत्वांच्या वापराच्या प्रयोगांना समग्रपणे एकत्रित करण्याविषयी उत्सुक आहे. .
त्या इंस्टीट्युट ऑफ ॲक्च्युअरीज ऑफ इंडिया आणि इंस्टीट्युट अँड फॅकल्टी ऑफ ॲक्च्युअरीज, युकेचे फेलो आहेत. या व्यतिरिक्त, त्यांनी इंस्टीट्युट ऑफ ॲक्च्युअरीज ऑफ इंडिया चे प्रमुख प्रकाशन, ॲक्च्युअरी इंडिया मासिकाचे मुख्य संपादक म्हणून सुद्धा काम केले आहे. भावना यांनी दिल्ली विद्यापीठातील सेंट स्टिफन्स कॉलेजातून गणितात बी.ए. (ऑनर्स) केले आहे.