श्री. ललित त्यागी यांनी 1996 मध्ये बँक ऑफ बडोदामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून आपली कारकीर्द सुरू केली, त्यांना व्यावसायिक बँकिंगच्या विविध श्रेणीमध्ये, विशेषत: कॉर्पोरेट फायनांस, जोखीम व्यवस्थापन, आंतरराष्ट्रीय बँकिंग आणि प्रशासकीय भूमिकांमध्ये 28 वर्षांचा समृद्ध अनुभव आहे. ते एक ऑपरेशनल बँकर राहिले आहेत ज्यांना भारतातील आणि परदेशातील वेगवेगळ्या शाखा/ कार्यालयांमध्ये काम करण्याचा व्यापक अनुभव आहे, ज्यात बँकेच्या परदेशी संचालनातील दोन कार्यकाळांचा समावेश आहे, जे आहेत ब्रुसेल्स, बेल्जियम आणि न्यूयॉर्क, युएसए.
त्यांना बँकांचे महत्त्वपूर्ण युनिट्सचे नेतृत्व करण्याचा यशस्वी अनुभव आहे जसे बंगळुरु प्रदेशाचे प्रादेशिक प्रमुख, बँकेच्या सर्वात मोठ्या कॉर्पोरेट फायनांशियल सर्विसेस ब्रांच मुंबईचे महाव्यवस्थापक आणि शाखा प्रमुख आणि बँकेच्या सर्वात मोठ्या विदेशी प्रदेश युएस संचालन, न्यू यॉर्कचे मुख्य महाव्यवस्थापक (मुख्य कार्यकारी).
21 नोव्हेंबर 2022 रोजी बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक म्हणून त्यांची नियुक्ती होण्यापूर्वी, ते बँकेच्या यूएस ऑपरेशन्स, न्यूयॉर्कचे मुख्य कार्यकारी होते. त्यांनी यापूर्वी कॅनबँक कंप्युटर सर्विसेस लिमिटेड (सीसीएसएल - कॅनरा बँकेची पूर्णतः स्वतःची उपकंपनी) मध्ये संचालक आणि बँक ऑफ बडोदा (गयाना) इंक. चे बिगर-कार्यकारी अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. सध्या ते बीओबी कॅपिटल मार्केट्स लिमिटेड, इंडिया इंफ्राडेट लिमिटेड, इंडियाफर्स्ट लाईफ इंश्युरन्स कंपनी लिमिटेड, इंडो झांबिया बँक लिमिटेड, बँक ऑफ बडोदा (युगांडा) आणि बँक ऑफ बडोदा (युके) लिमिटेड मध्ये नामनिर्देशित संचालक म्हणून कार्यरत आहेत.
बँक ऑफ बडोदा चे कार्यकारी संचालक म्हणून, ते सध्या कॉर्पोरेट अँड इंस्टिट्युशन बँकिंग, ट्रेजरी अँड ग्लोबल मार्केट्स, मिड-कॉर्पोरेट बिझनेस, इंटरनॅशनल बँकिंग, डोमेस्टिक सबसिडरीज/ जॉइंट व्हेंचर्सवर लक्ष ठेवतात.
या अगोदर त्यांनी कंप्लायन्स, रिस्क मॅनेजमेंट, ऑडिट अँड इंस्पेक्शन, क्रेडिट मॉनिटरिंग, कलेक्शन्स, लीगल आणि एचआरएम सारख्या महत्त्वाच्या मंचांच्या कार्यांवर सुद्धा लक्ष ठेवलेले आहे.
श्री. त्यागी त्यांच्या नेतृत्व आणि प्रेरणात्मक कौशल्यांसाठी प्रसिद्ध आहेत.
त्यांनी नॅशनल इंस्टिट्युट ऑफ बँक मॅनेजमेंट (एनआयबीएम), पुणे येथून बँकिंग अँड फायनांस (पीजीडीबीएफ) मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला आहे आणि इंडियन इंस्टिट्युट ऑफ बँकर्सचे सर्टिफाइड असोशिएट सुद्धा आहेत. भविष्यातील नेतृत्व भूमिकांसाठी बँकेच्या बोर्ड ब्यूरो (आता फायनांशियल सर्विसेस इंस्टिट्युशन्स ब्यूरो म्हणून ओळखले जाते) द्वारे सार्वजनिक क्षेत्रातील बँकर्सपैकी एक म्हणून त्यांना नावाजले गेले आहे.