श्री. नरसिंह राजशेखरन
स्वतंत्र संचालक
करीयरची 39 वर्षांची कारकीर्द असलेल्या श्री. राजशेखरन यांनी 1985 मध्ये एक ग्लोबल बँकर म्हणून त्यांचा प्रवास सुरु केला, गेल्या 24 वर्षांमध्ये त्यांनी 6 देशांमध्ये सिटीबँकेत काम केले आहे. ते भारतातील एक स्वतंत्र बोर्ड संचालक आहेत आणि त्यांनी सिटी लीगल वेहिकल्स अँड इंडस्ट्री चेंबर्स च्या बोर्डावर सुद्धा काम केले आहे (ज्यामध्ये चेयरमन पदाचा सुद्धा समावेश आहे). ते एक फिनटेक ॲडवायजर आहेत आणि पर्किन्स स्कूल फोर द ब्लाइंडच्या इंडिया ॲडवायजरी काउंसिलवर कार्यरत आहेत. ते भारत, चीन, थायलँड, कोरिया, जपान, बांग्लादेश आणि श्रीलंकेतील कंट्री फ्रँचाइजी अँड कंझ्युमर बिझनेसेससाठी मुख्य कार्यकारी अधिकारी राहिले आहेत, ज्यांनी विकास, डिजिटल बदल, खर्चाच्या कुशलतेमध्ये सुधारणा आणि गंभीर ऋण तणावांचा सामना करणाऱ्या पोर्टफोलियोंच्या बदलांसाठी धोरणे जुळवून अंमलात आणली आहेत. त्यांनी त्यांच्या नेतृत्वातील काही व्यवसायांची पुर्नस्थापना करण्याचा भाग म्हणून पोर्टफोलियोचे विलय आणि वियोग दोन्ही अंमलात आणले आहेत. त्यांनी धोरणात्मक, प्रतिष्ठा, बॅलेन्स शीट, बाजार, कर्ज, संचालन आणि अनुपालन जोखीम कारकांचा समावेश करुन गतिमान, सक्रिय आणि लवचिक व्यवसाय आणि जोखीम व्यवस्थापनासाठी त्यांनी प्रशासन कार्यान्वित केले आहे. त्यांनी व्यापार, कोषागार व्यवस्थापन, कंझ्युमर क्लाएंट इंटरफेस आणि भागीदार संपर्क मूल्यांच्या प्रस्तावांमध्ये ग्राहक आणि संस्थागत ग्राहक दोघांसाठी डिजिटल उपायांमध्ये मार्गदर्शन करत ग्राहक उत्कृष्टता आणि डिजिटल बदल अंमलात आणला आहे. त्यांनी उच्च कामगिरी करणारी आणि खुपच समाधानकार टीम तयार कऱण्यासाठी सांस्कृतिक आणि भाषेचे अडथळे पार करत उच्च कामगिरी, व्यवस्था, टीमवर्क आणि नैतिक संस्कृती करीता 3000 पक्षा अधिक लोकांच्या टीमचे नेतृत्व केले आहे. त्यांनी ग्राहक, नियामक, सरकार, समुदाय आणि इतर हितधारकांसोबत मजबूत संबंध तयार केले आहेत, ज्यामध्ये व्यवसाय करण्याच्या सोपेपणा आणि एफडीआयचे समर्थन करण्याचा सुद्धा समावेश आहे. त्यांनी बँगलोरच्या इंडियन इंस्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट मधून एमबीए आणि दिल्ली कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथून बीई (मेकॅनिकल) केले आहे. त्यांनी आयआयसीए (कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाच्या अधिपत्याखाली) तून इंडिपेंडेंट डिरेक्टर प्रोफिशियन्सी सर्टिफिकेशन मिळवले आहे.