श्री. देबदत्त चंद यांची बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आणि त्यांनी 1 जुलै 2023 रोजी पदभार स्वीकारला. श्री. चंद यांना बँकिंग आणि आर्थिक सेवा उद्योगात 29 वर्षांचा अनुभव आहे
एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी, श्री. चंद यांनी बँक ऑफ बडोदा येथे कार्यकारी संचालक म्हणून काम केले जेथे ते कॉर्पोरेट आणि इंस्टीट्युशनल क्रेडिट, कॉर्पोरेट आणि इंस्टीट्युशनल बँकिंग, ट्रेझरी आणि ग्लोबल मार्केट्स, मिड-कॉर्पोरेट बिझनेस आणि ट्रेड आणि फॉरेन एक्स्चेंज यांची देखरेख करत होते. याशिवाय, त्यांनी आंतरराष्ट्रीय बँकिंग व्यवसाय, देशांतर्गत सहाय्यक/संयुक्त उपक्रम, संपत्ती व्यवस्थापन, भांडवली बाजार, एनआरआय व्यवसाय तसेच बँकेमध्ये एचआरएम, वित्त आणि नियोजन, जोखीम व्यवस्थापन, ऑडिट आणि तपासणी, क्रेडिट देखरेख, वसूली, कायदा, अनुपालन, शिक्षण आणि विकास, शिस्तपालन कार्यवाही, माहिती सुरक्षा आणि मालमत्ता व्यवस्थापन आणि सुरक्षा या सारख्या महत्त्वाच्या मंचाच्या कार्यांवर सुद्धा यशस्वीरित्या देखरेख केली आहे.
श्री. चंद यांनी 1994 मध्ये अलाहाबाद बँकेत अधिकारी म्हणून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि नंतर 1998 ते 2005 पर्यंत स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया मध्ये व्यवस्थापक म्हणून काम केले. 2005 मध्ये, ते पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) मुख्य व्यवस्थापक म्हणून रुजू झाले आणि मुख्य महाव्यवस्थापक पदापर्यंत सतत प्रगती करत गेले. पीएनबी मधील त्यांच्या 15 वर्षांपेक्षा जास्त कारकीर्दीत, त्यांनी पटणा येथील विभागीय लेखापरीक्षण कार्यालयाचे प्रमुख, बरेली क्षेत्राचे मंडळ प्रमुख, इंटीग्रेटेड ट्रेझरी ऑपरेशन्सचे प्रमुख आणि मुंबई विभागाचे प्रमुख यासह विविध भूमिका पार पाडल्या.
श्री. चंद सध्या बीओबी कॅपिटल मार्केट्स लिमिटेड, इंडिया इंफ्राडेट लिमिटेड, बडोदा फायनांशियल सोल्युशन्स लिमिटेड, बँक ऑफ बडोदा (टांझानिया) लिमिटेड, बँक ऑफ बडोदा (युगांडा) लिमिटेड आणि बँक ऑफ बडोदा (केनिया) लिमिटेडच्या बोर्डांवर देखील कार्यरत आहेत. यापूर्वी, त्यांनी पीएनबी प्रिन्सिपल म्युच्युअल फंड आणि स्विफ्ट इंडिया प्रायवेट लिमिटेड च्या बोर्डांवर पंजाब नॅशनल बँकेचे नामनिर्देशित संचालक म्हणून काम केले आहे.
त्यांच्याकडे बी.टेक. डिग्री, एमबीए आणि सीएआयआयबी पात्रता प्राप्त आहे. याव्यतिरिक्त, श्री. चंद यांचा इक्विटी रिसर्चमध्ये पीजी डिप्लोमा झालेला आहे आणि ते प्रमाणित पोर्टफोलिओ मॅनेजर आहेत.