बिकाश चौधरी
मुख्य विमा आणि प्रशासन अधिकारी
इंडियाफर्स्ट लाईफ मधील मुख्य विमा आणि प्रशासन अधिकारी म्हणून, बिकाश चौधरी संस्थेतील विमा, जोखिम, प्रशासन, उत्पादन, आणि धोरण कार्यांवर देखरेख करण्यासाठी जबाबदार आहेत.
त्यांना लाईफ इंश्युरन्स आणि ॲक्च्युरियल कंसल्टिंगमध्ये 20 वर्षांचा कामाचा अनुभव आहे आणि त्यांनी भारत, युनायटेड किंग्डम, श्रीलंका, सिंगापूर, हाँग काँग, अणि बऱ्याच वेगवेगळ्या बाजारांमध्ये काम केले आहे.
इंडियाफर्स्ट लाईफमध्ये सामील होण्याआधी, ते नियुक्त विमागणितीय आणि प्रमुख जोखीम अधिकार म्हणून तसेच उत्पादन विकासावर देखरेख ठेवत फ्युचर जनराली इंडिया लाईफ इंश्युरन्समध्ये होते. त्यांनी टॉवर्स वॅटसन, बजाज अलियांज लाईफ इंश्युरन्स आणि अविवा इंडियामध्ये सुद्धा काम केले आहे.
ते इंस्टीट्युट ऑफ ॲक्च्युअरीज ऑफ इंडिया आणि इंस्टीट्युट अँड फॅकल्टी ऑफ ॲक्च्युअरीज, युकेचे फेलो आहेत. त्यांनी इंडियन स्टॅटिस्टिकल इंस्टीट्युट, कोलकता मधून एम.टेक आणि दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजातून स्टॅटिस्टिक्समध्ये एम. एससी केली आहे.